Kankachya svapratil kalpnechi katha - 4 in Marathi Horror Stories by मुक्ता... books and stories PDF | कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 4

Featured Books
Categories
Share

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 4

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी...

भाग-4


आपण काकांना जाऊन सांगू या विचाराने जेव्हा कणक परत येत होती, तेव्हाच तिला तिच्या मागे कोणीतरी येत असल्याची जाणीव झाली....! तिच्या अंतर्मनाला जरी जाणीव झाली होती, पण तिचं बाह्यमन मागे न बघण्याचं सिग्नल मेंदूला देत होतं. अचानक कोणीतरी लांब असलेलं जवळ असल्याचा भास तिला झाला. तिचा घसा कोरडा पडला. हृदयाचे ठोके तिच्या कानांना साफ ऐकू येत होते.रात्रीचा गार हवेचा गारवा तिच्या मनाला विलक्षण जाणवत होता. तिच्या मनाला एक गोष्ट तर कळली होती की, आपल्यामागे जे पण आहे ते आपल्या विचारांपासून वेगळ आहे..... रात किड्यांचा आवाज तिच्या काळजाची धक- धक आणखीनच वाढवत होता, सोबत तिच्यापासून थोडंच दूर असलेली गवतातील खळबळ तिला मागे बघण्यास मजबूर करत होती.....!
अखेर तिनी सर्व बळ एकवटून मागे पाहणार तेवढ्यात, कणकची आजी धावतच तेथे आली, आणि कनक च्या खांद्यावर ठेवत म्हणाली, "काय गं?? एवढ्या रात्री इथे काय करते?"
कणकनी मागे बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं....
"मी तुला काहीतरी विचारतेयं?? एवढ्या रात्री मळ्यात काय करत होतीस? आणि तु एवढी घाबरलीस काय आहे? काय झालं?" सर्व ठीक आहे ना..?"
" काही नाही गं आजी..... ते नयन ला बघायला आली होती. अगं तो मळ्यात आला होता. आणि तो पण एवढ्या रात्रीचा.मला वाटलं एवढ्या रात्री तो मळ्यात का आला? म्हणून मी त्याच्या मागे मागे मळ्यात आले. आणि बघते तर काय नयन इथे कुठेच नाहीये?"
"कसा असणार गं कणक? तो तर त्याच्या खाटेवर झोपलाय.... हा बघ. किती शांततेने झोपलायं .तू पण ना!!"
"आजी मी खरं बोलतेये नयन खरच मळ्यात गेला होता....!"
"बरं जाऊ दे ,आता खूप रात्र झाली आहे झोपून घे उद्या बघू......."
रात्र तर झाली होती मात्र, आजीला काही झोप लागत नव्हती. कणकच्या हावभावांवरूनच त्यांंना कळून चुकले होते की, तिथे नक्की काहीतरी झालं असणार... त्यांना बाबांनी सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्यावर त्या विचार करत होत्या....
"वत्सलेला सांगू की नको? काय करू? नको बाई नाही सांगत तिला सांगितलं तर ते तिकडच लग्न सोडून इकडे धावत- पळत येईल...!"

कणक देखील जागीच होती.तिला राहून- राहून आजींच्या गोष्टींची आणि त्या बाबांच्या वक्तव्याची आठवण येत होती. ती सारखे आज सकाळपासुन अचानक घडलेल्या या तीन गोष्टींचे तर्क लावत होती. तिला या गोष्टींची भीती वाटत होती. ती जरी या सगळ्या गोष्टी स्वप्नात बघत होती, पण त्या हाकिकत मध्ये एवढ्या लवकर घडायला सुरुवात होईल याची कल्पना देखील तिला नव्हती...

गावाकडचं म्हटलं म्हणजे तेथील सारे कुटुंब पहाटेच उठतात.कणकला हे काही नवीन नव्हतं. लहानपणापासून ती जेव्हा पाचगणीला जायची तेव्हापासून तिला लवकर उठण्याचा, शेतात जाण्याचा, काकूला कामात मदत करण्याचा, पाचगणी ला आल्यावर नातेवाईकांकडे फिरण्याचा, लहान भावंडांना सांभाळण्याचा हातखंडाच होता.

आज चहा पीत असताना तिला एक वेगळीच आनंदाची बातमी कळाली. आज ती, तिची आजी आणि छोटा भाऊ नयन तिघेजण तिच्या चुलत काकांकडे जाणार होते. या गोष्टीवर कणकचं खुश होण्याचं कारण असं की,चुलत काकांचा असलेला अलिशान बंगला, त्यांच्या घरात असलेल्या नवनवीन आणि महागड्या वस्तू, समोरच खूप मोठा फार्म हाऊस, घराला लागूनच असलेला खूप मोठा बगीचा यामुळे तिथे तीच काय गावातील खूप लोक आकर्षित व्हायचे.
मावशीने आज तिच्या आवडीचा खाणं बनवले होतं. पाटोड्यांची भाजी-पोळी, वरण भात आणि सोबत आम्रखंड. वा ...वा.. वा...! आजचा दिवस तर कणकचाच होता. ती, तिच्या सोबत तिची भावंडे आणि काका सगळे शेतात फेर- फटका मारायला गेले. कनक मस्त झाडावर चढून आंबे तोडत होती.पण तिचे भाऊ मात्र त्यांचा नेहमीचाच खेळ खेळायला लागले. झाडावरची पकडापकडी...! कणकला देखील हा खेळ खेळण्याची लहर आली. मस्तीला तर पर्यायच उरला नाही... सगळे आनंदाने चालले होते आणि अचानक झाडावर चढताना कणकचा पाय घसरला आणि ती धप्पकन खाली पडली... आणि मग काय खेळ बाजूलाच सगळे कणकला घेऊन घरी गेले. घरी गेल्यावर आजीने कणकला थोडा वेळ झोपून घ्यायला सांगितले. दुपारची वामकुक्षी घेऊन ते काकांकडे निघणारच होते तोच.....!!

-ज्ञानेश्वरी ह्याळीज


क्रमशः