कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..
भाग- १६ वा
---------------------------------------------------------------------------
अभिजित –
------------------------------------------
माझ्या मनात अजून ही धाकधूक आहे ..ती एका गोष्टीची ..
अनुषा ..जेव्हा सागर देशमुख यांना भेटेल ..त्या पहिल्या भेटीत ..त्यांचे नाही जमले तर मात्र
पुढचे सगळेच कठीण होऊन बसणारे आहे.
आणि अनुषाने अजून आपल्या आईची भेट घेणे राहून गेले आहे .. आईची भेट .अनुषा घेते
आहे..तिच्या या भेटीच्या हेतूबद्दल जर बाबांना जरा ही शंका आली तर ..सगळ्या कामावर ,
मेहनतीवर बोळा...असे होईल ..बघू या कसे करते अनुषा .
कारण ..घरी आई एकटीच असते ..पण..तिच्यावर बाबांच्या खास लोकांचा जागता पहारा असतो.
दिवसभर आई कडे कोण आले ,कशाला आले..त्यांचा उद्देश काय होता . याबद्दल सगळा रिपोर्ट
बाबा घरी आले की ..जेव्हा ते त्यांच्या स्पेशल रूम मध्ये बसतात ..त्यावेळी त्यांना दिला जातो.
बाबांच्या खास माणसांच्या नजरकैदेत असणार्या आईला सुरुवातीला बराच त्रास होत असे..
आईच्या ओळखीचे कुणी आले तर ..एखादे वेळी आईच्या तोंडून काही शब्द असे निघून जायचे
की त्यामुळे ..सागर देशमुख ..त्यांच्या बायको बरोबर वागत नाहीत “ असे बोलले जाईल याची
बाबांना भीती वाटायची ..आणि मग..ते आईला फायर करायचे ..मग या नंतर आईला कळाले ,
आपल्या बोलण्यातून अनर्थच होईल असा अर्थ सागर देशमुखांना हे लोक सांगत असतात ..
तेव्हा पासून ..आईने बोलणे कमी केले ..आणि आलेल्या लोकांशी बोलणे सोडून दिले ..
यामुळे आईची इमेज ..बाहेर ..काय झाली ..की देशमुख मैडम यांची स्मृती कमी झाली आहे ,
त्यांना फारसे काही आठवत नाही ,..
सागर देशमुख यांच्यासाठी हे फारसे वाईट नव्हते . त्यांची इमेज लखलखीत रहात होती.
ताईचे लग्न झाल्यापासून ..बाबांनी ..तिच्यावर मनाच्या आतपासून राग धरला होता .त्या भरात त्यांना मुलगी आहे
..हे त्यांनी बाहेर सांगणेच बंद केले होते . तिच्याशी त्यांचे संभाषण नव्हते ,तर.जीजूशी त्यांची
समोरासमोर भेट ते कधी घेत नव्हते.
बाबा परदेसी दौर्यावर गेले तर ..त्या दिवसात मात्र ..ताई आईला भेटण्यास येत असते ..
बाबा आल्यावर त्यांना ताई येऊन गेल्याचा रिपोर्ट मिळत असेल ही , पण.. त्यावरून त्यांनी
आईशी भांडण कसे काय उकरून काढले नाही .?.याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत असते .
बाबा असतांना मी देखील घरी जाण्याचे टाळीत असतो . ते बाहेरगावी असतील तेव्हा मात्र
घरी जातो ..आई सोबत काही तास घालवतो , पुन्हा माझ्या रूमवर जातो . कारण बाबा
ठरल्या दिवशी येतीलच याचा नेम नसतो , ते कधी अवचित परत येतात , मग, अशावेळी
आम्ही समोर समोर आलो तर ?
त्यांचे चेहेरा , त्यांची नजर ..दोन्ही पाहूनच ..शब्दातला संवाद करण्याची गरज पडत नाही.
अशा वातावरणात थांबण्यपेक्षा तिथून गेलेले बरे .असा विचार निदान डोके आणि मन ,
दोन्ही शांत ठेवणारा असतो.
आमच्या घराची आणि त्यात राहणाऱ्या इन-मीन-तीन माणसांच्या अशा तऱ्हा आहेत ..अशा
तऱ्हेवाईक माणसांच्या घरात एक व्यक्ती म्हणून कायमचे राहायचे हा निर्णय कोणत्याही
मुलीसाठी सोपा मुळीच नव्हता .
ताई तर नेहमी म्हण्यची ..अभी ..तेरे लिये लाडकी अभी आयेगी की नाही रे ?
कोणत्याही मुलीचे आई-बाप ..स्थळ म्हणून तुला पसंत करतील ही ..पण..मुलाची फमिली
म्हणजे घरातली माणसे कशी आहेत या गोष्टी तर पाहणार , भले ही आपल्या बाबांची
बाहेरच्या जगातलली ओळख खूप मोठी आहे ,पण, एखाद्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न जेव्हा
समोर येतो ..तेव्हा मुलीने आणि तिच्या परिवाराने आपल्या घरातील वातावरण पाहून ..जरनिर्णय
घायचे ठरवले तर ..तो निर्णय आपल्या बाजूने असेलच याची खात्री देता येणार नाही.
आज आपल्यातले आणि बाबांचे संबंध ताणलेले आहेत ..ते नॉर्मल होण्यासाठी आपण कुणी
काहीच प्रयत्न करीत नाहीत ..कारण आपणच एकमेकावर प्रचंड नाराज आहोत .
आणि बाबांच्या वागण्याच्या पद्धतीमुळे आई तर अगोदर पासून तिचे स्वतन्त्र अस्तित्व विसरून
गेली आहे..
अभिजित..तुझी बहिण म्हणून..मी या विषयी विचार करू लागले की ..माझ्या मनावर खूप टेन्शन
येत असायचे . पण आता हे चित्र बदलून जाण्यास सुरुवात होईल ..असे मला वाटते आहे ,
हा बदल सुरु होण्यास एक छान निमित्त झाले ..जेव्हा
ताईच्या वाढदिवसाच्या दिवशी मी अनुषाला घेऊन तिच्याकडे गेलो , ताईला अनुषा आवडली ,
कारण आपली ताई फारच चौकस स्वभावाची आहे .वस्तू असोत की माणसे , यातले
सह्जासाहजी तिला काही आवडत नाही . त्यामानाने अनुशाचे तिने खूप चांगले स्वागत केले .
तिच्या वाढदिवसाला आम्ही दोघे मिळून आलेलो आहोत ,त्यात पुन्हा अनुशाने आणलेल्या गिफ्ट्स
सुद्धा ताईने अगदी आनंदाने घेतल्या , म्हणजे ताई आणि जीजू दोघांना ..अनुषा आणि माझी
जोडी आवडली आहे.. हे फारच छान झाले.
त्यामुळेच की काय ताई आणि अनुशातले नवे नाते ,नवी ओळख जुळून येण्यास
फारशी अडचण आली नाही . नंतर ..स्वतः ताईने ..अनुशाला फोन करून बोलावणे ..दिवसभर
दोघींनी सोबत असणे ..हे झाले नसते .
अनुशाचे प्रोजेक्ट एक निमित्त आहे.. पण, त्याचा हेतू ..आम्ही सगळे पुन्हा मनाने
जवळ यावेत , एकत्र यावेत “ हा आहे”
हे अनुशाने सांगितले , त्यामुळेच की काय ताई अनुशाला जास्त सपोर्ट करते आहे.
आपल्या घरातील माणसांबद्दल सांगणे, बाबांच्या स्वभावाबद्दल सांगणे ..याचा हेतू अनुशाला तिच्या
कामात मदत करणे हाच आहे..हे खूप दिलासा देणारे आहे.
ताई आणि आई इतका मी आस्तिक नाही, देवभोळा नाही. काही झाले की ..देवापुढे बसून त्याला
साकडे घालायचे या दोघी कायम या गोष्टी करीत असतात . मला आता वाटायला लागले आहे की
त्यांची श्रद्धा ,मनातल्या भावना नक्कीच त्यांना इच्छित गोष्टी मिळवून देणार आहेत..
मला हे असे वाटायचे कारण म्हणजे ..
अनुषा आणि मी ..एकत्र येणे “ या गोष्टीचे उदाहरण मला द्यावेसे वाटेल . कारण .आमच्यात
तसे काहीच साम्य नाहीये. दोघांचे परिवार ..दोन वेगवेगळ्या जगातले असल्या सारखे आहेत.
अनुशाच्या आयुष्यात माझे येणे असंभव ..पण..ती मात्र अगदी ठरवून माझ्या आयुष्यात आले आहेअसे मला वाटते ..
आमची संस्था , त्यात आम्ही करीत असलेले कार्य ..तिथली मित्र मंडळी..अनुशाचे
तिथले असणे ..यातूनच तिच्या नजरेस हा ..अभिजित पडला . ...
सागर देशमुख नावाच्या मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे ..हे तिला माहिती नव्हते
आणि माझ्याकडे पाहून कुणालच तसे वाटत नव्हते . अनोळखी अनुशाला वाटणे शक्यच नव्हते .
प्रेम का होते , प्रेम कधी होते ?, अमकी व्यक्तीच का आवडते ? असले प्रश्न प्रेमात पडलेल्या
मुला –मुलींना हमखास विचारला जातो . गंमत म्हणजे ..याचे उत्तर कुणी देऊ शकत नाही ..
कारण “प्रेम ठरवून करता येत नसते , प्रेम असे होत नसते “..हे असे कोणतेच प्रेमवीर सांगत नसतात .
मग ..आमचे प्रेम कसे झाले ? हे मी किंवा अनुषा नेमक्या शब्दात कसे सांगणार ?
एक मात्र नक्की की ..प्रेम ही भावना आहे..त्याची अनुभूती प्रेमात पडलेल्या मनालाच येत असते .
अनुषा नेहमी म्हणते मला .. अभि- तुला पहिल्यांदा पाहिलं त्याच वेळी ..दिल मी घंटी बाजी ..
मना ने सांगितले ..अनुषा ,,हाच तुझा स्वप्नातील राजकुमार . जा ..भेट ..संग त्याला ..
तू त्यची लेडी –लव्ह ,स्वप्न-परी आहेस. बस ..ही तिची प्यार की कहानी .
तिच्या मैत्रिणी ..मला जाणवत गेले ..प्रेम “या भावने पासून आपण खूप दुराव्लेलो आहोत.
आई-वडिलांचे प्रेम नाही , पण, जोडीदाराचे प्रेम ..ही भावना ..अनुषा मुले आपल्या मनाला झालीय.
आणि हीच अनुषा ..आता आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक नवा आनंद यावा या साठी
धडपडते आहे. हा योग म्हणजेच ..ताईच्या भाषेत “देवाची कृपा “ आहे असे म्हणावे का ?
येणारे काही महिने ..आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे..
अनुषा जे काम करणार आहे ,ते करतांना खूप काही मिळवण्याच्या नादात ..काही निसटून जाऊ नये ..
अशी प्राथना ताई आणि मी नक्कीच करतो आहोत .
तुमच्या शुभेच्छा पण आमच्या सोबत असू द्या मित्रांनो.
अरे बाप रे , खूपच वेळ सांगत बसलो आज तुम्हाला , पण,खूप छान वाटले बरे का .
आमच्या नेहमीच्या स्पॉटला जायचे आहे . अनुषा येणार आहे तिथे ..तिचाच मेसेज आलाय .
काय म्हणते बघू या ..
अभिजित वेळेवर पोंचला आणि लगेच अनुषा तिथे आली .
.लखनवी डिझाईनचा व्हाईट -कुर्ता ..आणि डार्क ब्ल्यू जीन “ डोळ्यावर गोगल ..
अभिजितला असे घायाळ करणे –अनुशाचे आवडते काम , न विसरता ती
हे करीत असते .
.तिला माहिती आहे ..अशा छोट्या छोट्या गोष्टी ..प्रेमाची रंगत वाढवत असतात ,
सहवासाला अधिक जानदार बनवतात .
अभिजितकडे पाहणार्या अनुशाच्या चेहेर्यावर त्यला वेड लावणारे दिलखुश स्माईल होते , नजरेत प्रेमाचे
मिस्कील भाव होते. अनुशाने ..अभिचे हात स्वतःच्या हातात घेत म्हटले ..
अभी ..मी आज सागर देशमुखांच्या पी.ए.ला फोन करून उद्या येणार आहे याची कल्पना दिली ..
ते मला म्हणाले .. हो , साहेबांना तुम्ही येणार आहात याची कल्पना आहे... कॉलेजचे प्रीन्सिपाल सर
येऊन गेलेत आमच्या ऑफिसला . त्यांनी साहेबांना प्रोजेक्टची कल्पना देत सहकार्य द्यावे ही विनंती
केल्यावर ..आमचे साहेब म्हणाले ..
अहो सर , तुम्ही प्रीन्सिपाल आहात ..गुरुवर्य आहात ..आणि शेवटी माझे जुने मित्र आहात ..
तुमचा शब्द इथे अजिबात वाया जाणार नाही., तुम्ही काळजी करू नका ..
तुमची विद्यार्थिनी ..मिस अनुषा ..येतील त्यांना मी पूर्ण सहकार्य देईल .त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे
समधानकारक उत्तरे देईन..अहो सर, तुमच्या विद्यार्थिनीच्या प्रोजेक्ट मुळे,,माझा ही फायदाच होणार
आहे की .
.माझ्या प्रकट मुलाखती पाहून ..लोक नक्की म्हणतील ..
हा सागर देशमुख ..ऐकला होता तितका वाईट नाहीये.
हे इतके ऐकवल्यावर पी ए. म्हणाले ..मिस अनुषा ..उद्या ठीक अकरा वाजता तुम्ही यावे.
मग .पुढचा कार्यक्रम तुम्ही ..साहेब आणि मी ..तिघे मिळवून ठरवू या .
अभिजित - इतके दिवस मारे थाटात मी यवं करीन त्यव करीन “ असे बोलत होते खरी .
आता उद्या पासून प्रत्यक्ष सागर देशमुखांच्या समोर बसून ..मी माझ्या मनात जे काम
करायचे ठरवले आहे ..त्याची सुरुवात करयची आहे मला .तसे तर मनावर टेन्शन अजिबात नाहीये ,
पण मी खूप excited झाले आहे .
अभिजीतच्या जवळ जात अनुषा म्हणाली ..
माय डियर ..बेस्ट लक दे मला .
किस मी ..!
अनुशाला मिठीत घेत अभिजितने तिच्या मधाळ गुलाबी ओठांवर त्याचे ओठे ठवले ..
तिचे चुंबन ..त्याच्यासाठी प्रेमाची एनर्जी होती.
अनुषा ..बेस्ट लक डार्लिंग.
उद्या संध्याकाळी अपडेट देशील ..आता तुझे काम पूर्ण होई पर्यंत आपण न भेटणे आपल्या
साठी सुरक्षित असेल . सागर देशमुखांना तुझी माझी मैत्री माहिती होणे ..म्हणजे तू हाती घेतलेल्या
कामावर संकट आणण्यासारखे होईल .
हो ,अभिजीत ..हे असे वागणे भाग आहे ..तुझ्या माझ्या प्रेमाची परीक्षा आता सुरु ..
Abhijit – My time starts now ……!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात –
भाग -१७ वा , लवकरच येतो आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
9850177342
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------