H2SO4 in Marathi Horror Stories by Sanjay Kamble books and stories PDF | H2SO4

Featured Books
Categories
Share

H2SO4

H2SO4'

By sanjay kamble

पंधरा दिवसावर दिवाळी आलेली पन अवेळीच पाऊस कोसळत होता. तसा एक नेहमीचा दिवस, विशाल college ला जाण्याची तयारी करत होता. त्याचे वडिल मोलमजुरी करून कुटुम्बाचा उदर निर्वाह चालवायचे तर आई काही घरांमधे धुनभांडी करून मुलांच्या शिक्षणाला पैसे जमवायची. त्याचे मित्र प्रकाश (पक्या), सचिन, बंडू सर्वाची परिस्थिति सारखीच पण आईवडिलांच्या कष्टाची किंमत नसलेल्या आजच्या पिढीतल्या काही मुलापैकी हे होते.

विशाल ने पायातले बुट घालतच आईला आदेश दिला,
" थोडे पैसै दे, मित्राना पार्टी द्यायची आहे..." मुलाच्या हट्टासाठी तीने ही घर खर्चा साठी ठेवलेले पैसे त्याच्या हातात दिले आणि 'सांभाळुन गाडी चालव' म्हणत आत गेली.... नेहमी प्रमाने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विशाल गंज चढलेल्या जीर्ण तिजोरीच्या तडा गेलेल्या आरशात पाहून केस विंचरू लागल इतक्यात फायबरच्या पांढ-या खुर्चीवर ठेवलेला सात ते आठ हजाराच्या घरातला मल्टिमिडीया मोबाइल वाजला...
फोन उचलत समोरच्याला विशाल चार शिव्या हासडतच बोलु लागला,
" आरे आवरतोय...आज पार्टी देणार बोललोय ना... आलोच थोड्या वेळात.."
त्याच बोलण थांबवत समोरूचा मित्र बोलु लागला.
" पक्याचा accident झालाय, सरकारी दवाखान्यात नेलय, तीथच ये.."
बोलण ऐकुन विशालला धक्काच बसला. दारामागच्या खिळ्याला अडकवलेले पावसाळी jacket काढुन अंगावर घालत सर्रर्रर्रर्रर्र कन चेन ओढली आणी धावच बाहेर येत गाडी सुरू करून वेगात तो सरकारी रूग्नालयाच्या दिशेने निघाला.
पाऊस कमी झाला असला तरी ये जा करणा-या वाहनांमुळ हवेत उडणारा पाण्याचा दुस्कारामात्र तोंडावर यायचा , रस्ता किंचीत रिकामा दिसला तसा त्याच्या गाडीचा वेग वाढला. मनात नको नको ते विचार येत होते. 'कसा असेल पक्या. किती दंगा मस्ती केली आम्ही, लोक आम्हाला खुप वैतागत होते. पन आम्ही कधी कोणाला घाबरलो नाही, आणि जुमानलही नाही,'
गाडी रेस करतच तो दवाखान्याच्या गेटमधून आत शिरला. तीथ ती नेहमीचीच गर्दी दिसत होती. अनेक रुग्न त्यांचे नातेवाईक, धावपळ, गोंधळ अशात तो आपले मित्र कुठ दिसतात का शोधत फिरु लागला. इतक्यात त्याला समोर त्याचे काही मित्र दिसले. धावतच तो त्यांच्याकडे गेला
"कसा झाला accident . पक्या कुठाय...?"
घाबरलेल्या आवाजात तो विचारू लागला.
सर्व जन बोलत पक्या च्या बेड जवळ गेले, सलाईनच्या बाटलीतुन थेंब थेंब पडणा-या ग्लुकोजकडे पहात विशाल प्रकाशकडे पाहु लागला. डोक्याला किरकोळ दुखापत झालेली ज्यावर पांढरी जाळीदार पट्टी बांधलेली.. हातालाही दुखापत झालेली.. विशालकडे पहात त्यांच्यातला एकजन दबक्या आवाजात सांगु लागला.
"काही नाही रे... नेहमी प्रमाणे college ला येत होता. बस स्टॉप वर मुलीं समोर स्टंट करत स्लिप होऊन बाजूच्या खड्यात पडला.. नशीब मागे कुठली गाडी नव्हती नाहीतर icu room ऐवजी पोस्ट मॉर्टम room मधे असता..च्यायला बेकार वाटल पंन्नसभर लोक होती तीथ, एकही पुढ मदतीला आला नाही ..."
इतक्यात पक्या चे आई वडिल धावत रुग्नालयात पोहोचले. मुलाची अवस्था बघून ती माय डोक बडऊन घेऊ लागली..
" आर देवा काय झाल हे... कितीदा सांगितल यवस्तित गाडी चालीव म्हणून ... आर.. तुझा बा आजुन सायकल वरन कामाला जातोय, पन पोराच्या हट्टापाई कर्ज काढून गाडी घेतली... आणि तु हे करून बसलास व्हय र..."
ती धाय मोकलुन रडू लागली...
शोजारची एक मावशी त्याच्या आई ला शांत करू लागली... पक्याचे मित्र नजर चोरून आपापल्या जागी उभे होते, त्यातला एक एक जन मोबाइल ची रिंग वाजवत बाहेर पडू लागले...
डॉक्टराना भेटून त्याचे वडिल आले..
" किरकोळ दुखापत झालीये तीन चार दिवसात डिस्चार्ज देऊ अस म्हणाले.."

रात्रिचा डबा आई ने पाठवला होता. डबा संपवून शेजारच्या बेडवर सर्वजन मित्र गप्पा मारत बसलेले. accident word मधे फारशी पेशन्ट नसल्याने वर्दळही कमी होती.दवाखान्यातील नर्स नी पक्याला आराम करायला सांगितल आणि त्याच्या मित्राना दंगा न करण्याची ताकीत करत निघून गेली..
नर्स मागे फिरताच चौघेही तीच्या फिगर विषयी कमेन्ट पास करत मस्करी करु लागले...

रात्रिचा साधारण एक वाजला असेल, बाहेर पावसाची रिप रिप सुरूच होती. डोळा लागतो न लागतो तोच एक काळीज पिळवटून टाकणा-या किंकाळीने विशाल खाडकन जागा झाला. तोंडावरील चादर बाजुला करून उठून बसला आणि आजुबाजुला पाहु लागला. पन काहीच नाही, सगळ काही सामान्य होत. नर्स आपापल्या कामात होत्या. उठून चालत चालत तो बाहेर आला पन काहीच नाही, ' शेवटी हा दवाखाना. कोणीतरी रडत, ओरडत असणार, चालायचच. अशी स्वताची समजुन काढत तो पुन्हा आत येऊन अंथरुणावर पडला. आणी झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पुन्हा डोळा लागतो न लागतो तोच कोणाची तरी चाहूल लागली आणि तो जागा झाला, तोंडावरची चादर बाजुला करत पाहू लागला, समोर काही अंतरावर पंजाबी ड्रेस घातलेली एकोणीस, वीस वर्षाची एक मुलगी पाठमोरी ऊभी होती, नेहमीच्या सवयी प्रमाणे विशालने तीच्या फिगरचे calculations करत उठून उभा रहात थोडे impression मारायला सुरवात केली, तीने किंचीतस माग पाहिल आणि डोक्यावर ओढणी घेत तशीच पुढे चालत वार्ड च्या जिन्यावरून खाली उतरु लागली. तसा विशाल ही मागे चालू लागला..तीच्या मागे चालत तो जिन्यावर आला पन ती कुठेच दिसत नव्हती. तो तसाच पाय-या उतरत खाली आला तसा हवेतील गारवा जाणवू लागला. खाली तळमजल्यात खुप अडगळ होती, पेशंटना नेण्यासाठी लागणारी स्ट्रेचर. खराब झालेले मेडिकलची साधन, विखुरलेल साहीत्य.. पायरीवर उभ राहूनच त्याची नजर त्या मुलीचा शोध घेऊ लागली... ट्युबच्या प्रकाशात काही अंतरावर ती मुलगी तशीच पाठमोरी उभी होती. खाली पडलेल्या एका रिकाम्या सलाईन च्या बाटलीला पायाने खेळवत विशाल तसाच शिटी मारत, गाण गुनगुनत, आजुबाजुला पहात तीच्याकडे चालु लागला. फिनेल चा दर्प नाकात शिरला तस तोंड वेडवाकड करत आपला खेळ चालुच ठेवला. अजुनही ती तशीच पाठमोरी उभी होती . कोणतीच हलचाल न करता... जसजसा विशाल पुढे जात होता तसा हवेतील गारवा कमालीचा वाढत होता.
आता दोन, तीन पावले दुर होता तोच त्या मुलीने हाक दिली.
" .....आपली नाही तर कोणाचीच नाही .. बरोबर ना....."
हे शब्द ऐकताच विशालच्या अंगावर सर्रर्रर्रर्र कन काटा आला... तोंडातली शिटी आतच विरून गेली. भीतीने त्याच्या तोंडातून आवाज फुटेनासा झाला. हाक ऐकुन तो जागेवरच थांबला. आवाज त्याच्या ओळखीचा होता. तो स्वता:ला सावरु लागला, तोच पुन्हा तीचा आवाज आला...
" बोल ना.....आपली नाही तर कोणाचीच नाही .... होय ना. .."
आता मात्र त्याच्या पोटात भितीचा गोळा आला. अंग घामान भिजल होत, थरथर कापत तो फक्त समोर पहात होता. त्याला इथुन बाहेर पडायच होत. तोच बाजुच्या भिंतीवर असलेली ट्युब चर्रर्र चर्रर्रर्र आवाज करत बंद चालु होऊ लागली. आवंढा गिळत, भीतीने डोळे मोठे करून तो त्या मुलीकडे पहात होता... आपल्या काळजाचे ठोके त्याला स्पष्ट जणवत होते... ती मुलगी मागे फिरणार तोच बाजुची ट्युब फट् कन फुटली तसा सर्वत्र अंधार आणि भयान शांतता पसरली. थरथरत विशाल मागे फिरला, जिन्यावरून किंचीतसा प्रकाश खाली येत होता. विशाल तसाच जिवाच्या आकांताने जिन्याकडे धावत सुटला, पडत, धडपडत जिन्याच्या दिशेने धाऊ लागला. मागे पहाण्याची हिम्मत होत नव्हती. तसाच वेगाने पाय-या चढू लागला, अंग घामान भिजल होत पन जीव वाचवण्यासाठी तो धावत होता. तोच समोर ती मुलगी उभी दिसली. तीला पहाताच विशाल ची दातखिळी बसली आणि त्याचा तोल मागे गेला. पायरीवर जोरात डोके आपटले, तसाच गडगडत खाली आला.
त्याच्या डोक्यात झालेल्या खोल जखमेतून एकसारख रक्त येत होत. पाठीत हूक भरली होती त्यामुळे त्याला उठताही येत नव्हत. ती हळु हळू पाय-या उतरत खाली येऊ लागली...काळेभोर मोकळे सोडलेले केस, पांढरा लांब पायाच्या टाचेपर्यंतचा ड्रेस. तीचा चेहरा निरखुन पाहण्याचा प्रयत्न करू लागला पन अंधार असल्याने फक्त एक काळीकूट्ट आकृतिच तेवढी दिसत होती, भयान घोग-या आवाजात ती बोलु लागली...
" तुम्ही मला मरण यातना देऊन मोकळे झालात.... याच दवाखान्यात मी महीनाभर एका भयानक मरणाशी झुंझ देत राहिली...." विशाल डोळे मोठे करून फक्त पाहात होता... त्याच्या शरिरात शक्ति उरली नव्हती. ती जवळ येईल तशी याच्या काळजाची धड धड वाढली. ती विशालच्या काना जवळ येत पुटपूटली
" खुप धाडशी समजतोस ना स्वता:ला... मरणालाही घाबरत नाहीस, मरण यातना काय असतात याचा अनुभव तुला आणि तुझ्या मित्रांना मी देईन...ही ही ही..."

घोग-या आवाजातील तीच विद्रुप हास्य ऐकुन प्राण कंठाशी आल्यासारखा विशाल जमीनीवर थरथर कापत पडला होता. त्याची केविलवानी नजर तीच्या चेह-यावर गेली, भितीने छाती फाडून काळीज बाहेर यावे तसा तो थरारला.. ह्रदय जोरजोरात धडधडू लागल.. त्यान एक दिर्घ श्वास घेतला आणि कायमचा शांत झाला.

दुस-या दिवशी पोस्ट मॉर्टम करून विशालच प्रेत घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आल. सर्वजन या घटनेने मानसीक धक्यात होते. त्याच्या आई वडिलाचा आक्रोश ह्रदय पिळवटूण टाकत होता. पोलीस आणि डॉक्टर यांच्याकडून चौकशी अंती सांगण्यात आल की पाय घसरून पडल्यान डोक्याला गंभीर दुखापत झाली होती पण मृत्यु होण्याच कारण आहे hart attack ...

*****

जिवलग मित्राच्या अशा मृत्युने सर्वना खुपच वाईट वाटले. College मधे मन लागत नव्हते. पन आयुष्य हे जगावच लागत... विशाल गेला होता. आठ दिवसात सर्वकाही सामान्य झालं. आजपासुन दिपावलीच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या. त्यामुळे accident नंतर पहिल्यांदाच प्रकाश सर्व मीत्राना भेटायला college ला आला होता. प्रकाश, सचिन आणि बंडू college च्या रसायनशास्त्राच्या lab मधे बोलत बसलेली. नेहमी चौघे असायचे पण आता विशाल त्यांच्यात कधीच परतणार नव्हता.... चोरी करून आणलेल्या पैशातून विकत घेतलेला गांजा, सिगारेट मधे भरून सिगारेट चे झुरके मारत बसले होते. कोणीतरी आल्याची चाहूल लागताच सर्व बाथरूम च्या दिशेने धावले.. आणि लपुन बसले... 'त्या' सिगरेट ने तीघानाही धुंध चढली होती...
"डोक खुप जड झालय रे..."
बोलतच सचिन तोंडावर पाणी घेत तसाच खाली बसला..तीघे तीथेच बसुन राहीले... आणी गांजा डोक्यावर हावी झाला....

******

" ये ...दार उघड...कोणी आहे का रे..."
धाड. धप्प धप्प कोणीतरी बाहेर दरवाज़ावर दनादन लाथा मरत ओरडत होत. डोळे चोळत सचिन जागा झाला ...डोक अजुनही जड झालेल बंडु दार बडवत होता तर प्रकाश टेबलवर बसुन कसले तरी लिक्वीड तयार करताना दिसला....सर्वत्र अंधार होता आणि दुरच्या एका खांबावरील दिव्याचा किंचीतसा उजेड तेवढा येत होता . काय चाललय त्याला समजत नव्हते.
" ये बंड्या .. काय झालय... का दारावर लाथा मारतोस..."
भेदरलेल्या पण हताश आवाजात बंडु बोलु लागला..
" college बंद झालय ...आपन आत आडकलोय... " त्याच्या चेह-यावर भीती स्पष्ट दिसत होती...
"राहूदे.. खुप रात्र झालीय रे. झोपू इथेच... सकाळी उघडेलच ना. का tension घेतोस."
शांतपणे सचिन म्हणाला..
तसा बंडु चिडला आणि हातबल झाल्यासारखा दरवाज्याला पाठ टेकवत खाली बसत बोलु लागला.. " आजपासुन सगळी कडे दिवाली च्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत..... उघडणार पन एक महीन्याने..."
त्याच बोलण ऐकताच सचिन डोक धरुन माटकन खाली बसला ... "मोबाइल.."
"पाहिले पन सर्व switch off झालेत..."
आता दोघे ही जोरजोरात ओरडू लागले, पन ऐकायला कोणीच नव्हत.. तोच घर्रर्र घर्रर्रर घर्रर्र असा जंगली हिंस्र श्वापदासारखा आवाज येउ लागला.... दोघेही शांतपणे आवाज ऐकु लागले... तोच मागुन कोणीतरी बोलु लागल
".. शुsssssssss. ओरडून काही होणार नाही .. भुक लागली तर इथ खायला काही नाही... ही ही ही ही .... "
आवाजात कमालीची भिषणता होती. सचिन आणि बंडू दोघे जागेवरच शांत उभे रहात मागे पाहू लागले. अचानक हवेत गारवा वाढला.. एका टेबलजवळ सल्फ्युरीक असिड ची तिव्रता कमी करत खाली मान घालून बसलेला प्रकाश घोग-या आवाजात बोलत होता...त्याचा दाता वर दात आपटण्याचा आवाज स्पष्ट येत होता. कट कट, कट कट...
" काय झालं ... भिती वाटतेय....ही ही ही ही .."
पुन्हा दातावर दात आपटण्याचा आवाज ...
बंडू आणि सचिनच्या काळजाचा थरकाप उडाला. अंधार असल्याने वातावरण आणखी भयान वाटत होत.. दोघे एकमेका कडे पहात प्रकाश कडे चालु लागले.
" प......प.....पक्या..काय करतोयस....क क काय झालय तुला... बरा आहेस ना रे...."
भितीने आवंढा गिळत सचिन बोलु लागला..
बंडु मात्र भितीने तसाच थरथर कापत उभा होता..

दातावर दात आपटत खाली मान घालुन बसलेला प्रकाश पुन्हा बोलु लागला...
" खुप भिती वाटते काय रे...ही ही ही सससस...
हाफ्त्यावर आई बाबानी घेऊन दिलेल्या गाड्या गल्लीबोळात मुलींच्या मागे रेस करताना, त्याना घासून मारताना, त्यांचा पाठलाग करताना त्या मुलींना किती भिती वाटते, कधी विचार केलाय याचा....... ."

सचिन घाबरून प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला..." पक्या... काय बोलतोयस... काय झालय तुला..."
खाडकन उभ रहात प्रकाशन आपली नजर सचिनवर रोखली. लालबुंद डोळे, क्रुर निश्तेज चेहरा, आणि घोग-या, रागिट झालेल्या त्याच्या आवाजातली भिषणता आता स्पष्ट जाणवत होती.... त्याच्याकडे पहाताच सचिन वेगाने मागे सरकला.

पुन्हा कट कट, कट कट दातावर दात आपटत प्रकाश बोलू लागला...
" ह्या प्रकाशने सांगितले म्हणून माझ्या अंगावर acid फेकलत ना .. शरीरावर लाल मुंग्यांच वारुळ उठाव अशा यातना झाल्या होत्या माझ्या शरिराला, मेणकागद पाघळुन जावा तस माझ अंग पाघळल, वितळुन गेली माझी सारी स्वप्न, एका क्षणात सा-याची राख केली तुम्ही.... माझी आई बाबा, माझ्या कडे बघून ढसाढसा रडले, त्यांच तुटणार काळीज मला जाणवत होत..." त्याच्या आवाजात खुपच वेदना होती

दरवाजाला चिकटुन उभा असलेल्या बंडूची दातखिळी बसायची वेळ आली.
" पक्या.... काय बडबडतोयस...मला भिती वाटतेय भावा..."

दातावर दात आपटत पुन्हा प्रकाश बोलू लागला...कट कट, कट कट.
" पक्या,....ही ही ही पक्या.. नाही..... मी सोनाली.... आठवल का..."

त्याचे शब्द कानावर पडताच दोघे गंभिर पने प्रकाशकड पाहु लागले... आता रूम मधे भयान शांतता पसरली.... अचानक प्रकाश चा चेहरा बदलूत सोनाली चा चेहरा आला....
आणि दुस-याच क्षणाला acid ने विद्रूप झालेले तीचे रुप दिसले तसे घाबरून बंडू आणि सचिन खाली कोसळले. पुढे पायाच्या टाचा घासत ते मागे सरकु लागले. दोघाच्याही तोंडातून आवाज फुटत नव्हता....

दातावर दात आपटत पुन्हा प्रकाश बोलू लागला...कट कट, कट कट...
" तुमचा मित्र विशाल..ही ही ही .मी प्रकाशच्या प्रेमाला नकार दिला तेव्हा तोच म्हणाला होता ना
' आपली झाली नाही तर दुस-या कोणाची होऊ द्यायची नाही, मेलो तरी चालेल...'
काय रे...आम्ही मुली जन्माला येतो तेव्हा आमचे आईवडिल तुमच्या नावावर आम्हाला लिहून टाकतात का...(दिर्घ श्वास घेत).. बिचारा विशाल .. मला घासुन गाडी मारत ओरडायचा.... 'आपली नाही तर कोणाचीच नाही '...'मी मरणाला भित नाही ' म्हणत होता पन बिचारा भितीनच मेला... आठवल का....?"
सचिन बंडूकडे पहात बोलु लागला...
"ही सोनाली कुठून आली.. ती कधीची मेलीय पक्या घाबरवतोय आपल्याला....."
प्रकाश चालत चालत त्या दोघाच्या दिशेने निघाला. दातावर दात आपटत पुन्हा प्रकाश बोलू लागला...कट कट, कट कट.
"मी पन अशीच घाबरली होती ना...ते बघ सल्फ्युरिक acid ... बंडू ....तु इथूनच चोरल होतस ना ते.... आज तुम्हा तीघाना मरण, आणि नरक याचा जवळुन अनुभव येईल. ही ही ही...."

प्रकाशच बोलन ऐकताच सगळ लक्षात येऊ लागल. त्यांच्याच college मधली एक हुशार मुलगी. मध्यम वर्गीय कुटुम्बातली, खुप देखणी त्याहून मोहक, मनमोकळी, प्रकाश तिच्यावर एकतर्फी प्रेम करायच, पन ती कोणताच प्रतिसाद देत नव्हती. तीच्या मागे वेगात गाड्या फिरवण, गाडी घासुन मारन, रस्त्यावर तीचे नाव घेऊन हाक मारन हे नेहमीच. पन ती आपल्याला नेहमी नकार देते...म्हणजे दुस-या कोणावरतरी प्रेम करत आहे म्हणून तीच्या तोंडावर चौघा मित्रानी लपुन acid फेकल होत....

प्रकाश च बोलन ऐकुन दोघानाही घाम फुटला. दोघे त्याच्या समोर हात जोडून माफी मागू लागले....
प्रकाश मागे फिरला, चालत चालत त्याने बाजुच्या टेबल वर ठेवलेले काचेचे चंचुपात्र हातात घेतले...आणि दातावर दात आपटत पुन्हा प्रकाश बोलू लागला...कट कट, कट कट...
" ससससस माझ्या अंगावर acid फेकून पळून गेलात, माझी काय अवस्था झाली होती तुम्ही पाहीली नव्हती... महिनाभर मी मरणाला तोंड देत होते... माझ्या आई बाबाना अन्न गोड लागत नव्हत... पन माझ्या लहान बहिणीसाठी त्यांना जगावच लागणार होत..पन तुम्हाला मी दाखवते मरण किती भयानक असते ते .कट कट कट.." इतके बोलून प्रकाश ने हातातले acid चे पात्र व वर वर उचलायला सुरवात केली...
" पक्या......पक्या ..... काय करतोयस तु....." सचिन आणि बंडु घाबरून ओरडतच मागे सरकु लागले...
प्रकाशने त्यांच्याकडे पहात भयान हास्य करत
पात्रातील द्रव स्वता:च्या डोक्यावरून ओतायला सुरवात केली..... तशी त्याच्या अंगावरची स्कीन गळुन खाली पडू लागली.... करपलेल्या कातडीचा करपट वास काही क्षणातच रुममधे पसरला... तो पांढरट धर सर्वत्र पसरू लागला तसा दोघांनाही ठसका लागल... काळजाचा थरकाप उडवणार हे दृष्य पाहून सचीन आणि बंडु जोर जोरात जिवाच्या आकांताने ओरडू लागले, रूम मधे चमडे जळालेला दर्प पसरु लागला...इतक्यात प्रकाश ही असह्य वेदनेने जिवाच्या आकांताने ओरडु लागला. ...
"आई........ग....आई.........मेलो........ग...आई......सचिन तु acid टाकलस माझ्या अंगावर..." अस म्हणत हातातल्या चंचुपात्रातील शिल्लक राहीलेले acid त्याने आपल्या जिवलग मित्रांच्या तोंडावर फेकले...तसे तीघे ही एखाद्या जनावरा प्रमाने ओरडु लागले .. डोक्यावरचे केसही करपले. त्रिव्र अॅसिड आपला परिणाम करू लागले शांतता भेदणा-या त्या किंकाळ्या त्या रुममधे विरून गेल्या...

*****

दहा दिवसा नंतर...

पोलिस सब इन्स्पेक्टर प्रेस कॉन्फरन्स मधे....
" तीघा मित्रानी एकमेकाच्या अंगावर जे acid फेकल त्याची त्रिव्रता थोडीे कमी केली होती... त्यामुळेच ते इतके दिवस जिवंत राहू शकले. त्यांच्यातला प्रकाश ला खुप दुखापत झाली आहे. डोळे कायमचे गेलात तर तीघांचेही चेहरे acid ने वितळलेत..ते इतके दहशती खाली आहेत की काहीच बोलु शकत नाहीत . तिघाचे ही चेहरे जळालेत पन त्यांच्या जिवीतास आता धोका नाही अस डॉक्टर म्हणालेत. .thank you.."

सब इन्स्पेक्टर चालत चालत काही दुर उभ्या एका महिलेकडे जात म्हणाले....
" thanks madam.... तस कायदा स्वप्नावर विश्वास ठेवत नाही पन हे बेपत्ता तरुण कुठच सापडत नसल्याने तुमच्या सांगण्यानूसार आम्ही या तरुणांपर्यन्त पोहचु शकलो...."

त्या बाई शांतपणे म्हणाल्या....
" ही मुल college lab मधे अडकी आहेत अस माझ्या मुलीन मला स्वप्नात येऊन सांगितल.... माझी मुलगी....सोनाली.... अशाच एका acid हल्ल्यात मरण पावली.एखाद्या नाजुक कळी सारखी माझी सोनाली... मेणकागदा सारखी पाघळून गेली. लहान असताना पायात इवलासा काटा रुतला तरी रडतच माझ्या कुशीत शिरणारी माझी मुलगी महिनाभर मरणाशी झुंझ देत राहीली... जीभ,ओठ जळाले होते त्यामुळे तीला बोलताही येत नव्हत.... शुद्धीवर येताच दुस-याच क्षणाला पुन्हा बेशुद्ध व्हायची ..तीच्यावर हल्ला करणारे कधीच सापडले नाहीत..." बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावले...इतक बोलुन तशाच त्या चालत चालत निघुण गेल्या ...

तीघेही वाचले चेहरे विद्रुप झाले तरी हात पाय धड होते..पन हे जग पहायला दृष्टी नव्हती... आता आयुष्यात राहीला काळोख ....काळोख...... आणी फक्त काळोख... पण असह्य यातना भोगत मरण कवटाळलेल्या सोनालीच्या आत्म्यान त्यांना का वाचवल हे कोडच होतं... त्यांचातला जो तो आपल्या परीन याचा अर्थ समजुन घेत होता.....

समाप्त....