Apradh kunacha, shiksha krunala ? - 4 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 4

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 4

(४) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला?
आठ-दहा दिवसानंतरची गोष्ट! डॉ. संदेश आणि अनिता यांच्या भेटीनंतर आणि त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या चर्चेनंतर लता कमालीची बदलली होती. प्रसंगोपात हसतही होती. अधूनमधून स्वयंपाक घरात जाऊन आईबाबांना आवडणारे पदार्थ स्वतः बनवून त्या दोघांना खाऊ घालत होती. आशाही दररोज येत होती. त्यादिवशीही आशा आली होती. सारे जण बैठकीत गप्पा मारत असताना फोनची घंटी वाजली. फोन उचलून वामनराव म्हणाले,
"हॅलो, मी वामनराव बोलतोय..."
"हे बघा, एक कृपा करा, आम्हाला तुमच्या मुलीच्या बंधनातून कायमचं मुक्त करा..."
"मी नाही समजलो. काय म्हणायचे तुम्हाला?" वामनरावांनी विचारले.
"स्पष्ट सांगितल्याशिवाय तुम्हाला कळतच नसेल तर ऐका,आम्हाला घटस्फोट हवाय."
"घटस्फोट? नाथराव, अजून आम्ही त्या धक्क्यातून सावरलो नाहीत..."
"तुम्हाला काय वाटते तुमच्या मुलीने आमच्या मुलाला एड्सची भेट दिलीय त्यामुळे का आम्हाला आनंद झालाय? आनंदाने आम्ही भांगडा करतोय का?"
"तसे नाही हो. दोन्ही कुटुंबं दुःखातच आहेत आणि इतक्यात घटस्फोटाचा विचार? लताच्या मनःस्थितीचा विचार करा."
"तोच विचार करतोय. असं रोजचं मरण जगण्यापेक्षा एकदाचा सोक्षमोक्ष होऊन जाऊ देत. म्हणजे दोन्ही कुटुंब मोकळे. उगाच न्यायालयात चर्चा करण्यापेक्षा, तिथे दोन्ही घराण्यांच्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगण्यापेक्षा सरळसरळ तुमच्या पोरीला कागदावर सही करायला सांगा आणि आम्हाला मुक्त करा..." असे म्हणत नाथरावांनी फोन बंद केला. वामनराव क्षणभर तिथेच उभे राहिले. 'लताला काय सांगावे? तिच्याशी काय चर्चा करावी. सांगावे की न सांगावे? न सांगून कसे चालेल? आपल्या बोलण्यातून तिला समजलेच असेल. काय करु?' वामनराव विचारात गुरफटलेले असताना आणि फोनवरील चर्चेचा अंदाज आल्यामुळे पसरलेल्या शांततेचा भंग करीत आशा म्हणाली,
"काका, खरेतर त्या कुटुंबाला, अभयला चांगला धडा शिकविण्याचा मी विचार केला होता. सरळ पोलीस केस करावी असे वाटत होते. पोलिसात गेल्यावर दोघांच्याही तपासण्या झाल्या असत्या आणि मग त्यातून कुणाला कधीपासून हा आजार आहे हे समजले असते. त्यातून कुणापासून कुणाला आजार जडलाय हेही निष्पन्न झाले असते. खरा दोषी कोण आहे, कोण कुणाच्या अपराधाची शिक्षा भोगतंय हे कळाले असते पण आधीच मेलेल्यांना काय झोडपावे असा दुसरा विचार आला. शिवाय प्रकरण वाढले तर त्याचा सर्वात जास्त त्रास लताला होईल. सध्या ती सकारात्मक वागतेय तर तिला अजून दुःखी का करावे? मला तरी वाटते देऊन टाकावा घटस्फोट? म्हणजे मग एक प्रकरण तरी बंद होईल?"
"पण आशा, हे का पुस्तकातले प्रकरण आहे. कधीही बंद करायला. अग, काही तरी मार्ग निघाला तर ..."
"बाबा, काहीही मार्ग निघणार नाही आणि कोणताही मार्ग काढायचा नाही. खरेतर लग्नानंतर आमच्या पहिल्या रात्री अभयने मला विश्वासात घेऊन त्याच्या आजाराची कल्पना दिली असती तर कदाचित आम्ही शरीराने एक झालो नसतो. मनाने त्याला वरले होतेच तर त्याची आजन्म सेवा केली असती. त्याचा आजार, त्याचं जगणं सुसह्य केलं असतं. लग्न म्हणजे केवळ शरीरसुख नव्हे तर शरीरापेक्षा मनाचे मिलन महत्त्वाचे असते. एकमेकांना मानसिक आधार देणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, एकमेकांवर प्रामाणिकपणे प्रेम करणे म्हणजे लग्न, संसार!.."
"लता, त्या अभयला आणि त्याच्या कुटुंबाला हे कधीच कळणार नाही की, त्यांनी केवढी मोठी चूक केलीय, तुझ्या रुपाने त्यांनी काय गमावले ते..."
"आशा, हे त्याला आता कळाले तरीही खूप उशीर झालाय. बाबा, होऊ द्यात त्यांच्या मनासारखे. मी घटस्फोट द्यायला तयार आहे." लताने एक घाव दोन तुकडे याप्रमाणे विषय संपवला. स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र, कपाळावरील टिकली काढून टाकली. याचा अर्थ तिने अभयसोबतचे संबंध संपूर्णपणे संपविले. शेजारी पडलेले वर्तमानपत्र हातात घेतले. तिची ती कृती पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वामनराव काही बोलणार तेवढ्यात आशाने त्यांना हाताच्या इशाऱ्याने थांबवले. तितक्यात बाहेरून आवाज आला,
"वामनराव, कुरिअर..."
दारात येऊन वामनरावांनी कुरिअर घेतले. स्वाक्षरी करून आत येताना त्यांनी पाठवणाराचे नाव पाहिले. कुरिअर अभयने पाठवले होते याचा अर्थ आत घटस्फोटाची कागदं असणार या विचाराने वामनरावांचे ह्रदय धडधडू लागले. घटस्फोट! साडेचार अक्षरी शब्द पण केवढा ताकदवान! त्यांनी काही न बोलता ते लताच्या हातात दिले. अभयचे नाव पाहून सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात लता पुटपुटली,
"काय फास्ट सेवा आहे ना. फोनवर बरोबर बोलणे झाले न झाले, थोडा विचार करायलाही अवधी न देता लगेच कागदपत्रे पोहोचली पण..." बोलत बोलत तिने पाकीट फोडले. आत असणाऱ्या कागदांवर वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचावी अशा सहजतेने तिने त्यावर नजर टाकली आणि म्हणाली,
"उपरती झाली की काय? घटस्फोटाची कागदं नव्हेत तर अभयचे पत्र आहे..."
"देव पावला बाप्पा... " आई म्हणाली. तशी लता ताडकन म्हणाली,
"आई, थांब. लगेच देवाला पाचारण करू नकोस. आधी काय लिहलंय ते तर वाचू दे. नवीनच काही तरी वाढण पाठवलेले नसावे म्हणजे मिळवले..." लता बोलत असताना आशा उठली. तशी लता म्हणाली, "तू कुठे चाललीस? बस. काय लिहिले आहे ते बघू तर..."
"अग, ते तुझ्या नवऱ्याचे पत्र आहे. मी कशाला?"
"नवरा? किती मोठा अर्थ असलेला शब्द आहे ना? पण आता माझा काय संबंध ना? एका वराने मधुचंद्राच्या रात्री एका वधुच्या भावनांचा खून केलाय. होय! आशा, खून नाही तर काय गं? एवढ्या मोठ्या आजाराबाबत एका नवऱ्याने आपल्या पत्नीपासून लपवावे, तिला काडीचीही कल्पना न देता तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणे म्हणजे काय गं तर तिला चक्क त्या मंगळसुत्राने फासावर लटकावण्यासारखे आहे म्हणजे खूनच ना? खरे तर मी वाचणारच नव्हते..."
"अग, असे काही करू नकोस. कदाचित पुन्हा एकत्र येऊ अशी इच्छा असेल..."
"आई, तशी इच्छा असती तर त्याने महिनोन्महिने मौन धारण केले नसते. आणि आता जरी आला तरीही मी चक्क नकार देणार आहे. दोन दिवस वाट पाहते नाही तर मी स्वतःच घटस्फोटासाठी पुढाकार घेणार आहे. पण म्हटलं काय आहे ते पहावे तरी. चल. आशे, ये..." म्हणत लता तिच्या खोलीकडे निघाली. पाठोपाठ आशाही...
०००
नागेश सू. शेवाळकर