अदित्य व त्याचे आई वडील प्राचीच्या घरून गेल्यावर प्राचीचे बाबा श्री वर खूप चिडतात. एवढं सर्व झाल्यावर त्यांना अदित्य चा लग्नासाठी होकार येईल याची आशा सोडून दिलेली असते व यासाठी ते अमृता व श्री ला जबाबदार मानत असतात. झालेल्या प्रकाराने प्राची ही दुखावलेली असते. प्राचीला हेच समजत नव्हतं की दादा, वहीनी व अदित्य जर काॅलेज फ्रेंडस् होते तर आज दादा अदित्य वर एवढा का चिडला होतो.
रात्री अमृता व श्री आपल्या रूममध्ये बोलत बसलेले असतात. श्रीचा राग अजूनही शांत झालेला नसतो. अमृता ही संभ्रमात असते व भूतकाळातील काही घटना आठवून दुःखी झालेली असते.
"हा ईथे येऊच कसा शकतो? याला काय वाटलं नेहमी हा म्हणेल तसच होईल का?" श्री
"श्री तू खूप पॅनिक होतोय. असंही असू शकतं ना की त्याला ही माहिती नसेल की आपण कुठे जातोय मुलगी बघायला." अमृता
"अमृता तूला नेहमीच त्याची बाजू घ्यायची काही गरज नाहीय." श्री
"मी कुठे त्याची बाजू घेतेय. मी फक्त एक शंका बोलून दाखवली. कारण जे काही झालं होत त्यात फक्त त्याच्या एकट्याचीच चूक नव्हती. आपल्या सगळ्यांची ही त्यात चूक होती. आणि आता आपल्याला त्या सर्व गोष्टींचा विचार करण्यापेक्षा प्राचीचा विचार करावा लागणार आहे." अमृता
"अदित्यच प्राची बरोबर लग्न मी होऊ देणार नाही." श्री
"आणि प्राचीला जर अदित्य आवडलेला असेल तर" अमृता
"तरीही नाही. मीरा बद्दल माहिती असतानाही आपण प्राचीला अदित्य सोबत जाऊ द्यायचं. आणि त्याचे परिणाम काय होतील हे ही आपल्याला माहीत आहे." श्री
"मला कळतय श्री तूला काय म्हणायचं आहे ते. पण मिरा आता अदित्य चा भूतकाळ आहे. आणि प्राचीला जर अदित्य आवडलेला असेल तर आपण काही करू शकत नाही." अमृता
"खूप त्रास होतो अमृता या सर्व गोष्टींचा. खूप वेळ लागला या सर्वातून सावरायला. आणि आता परत अदित्य समोर येऊन उभा राहिला. किती छान ग्रुप होता आपला काॅलेजला. पण आता कोणीच कोणाचं तोंड ही पाहत नाही. सगळे फ्रेंडस् जसे श्वास होते एकमेकांचे........." श्री पूढे काही बोलणारच असतो तोच प्राचीला तिथे आलेलं बघून तो शांत बसतो.
अमृता ही प्राचीला आलेलं बघते व विषय बदलत म्हणते,
"प्राची तू अजून जागीच आहेस झोपली नाही अजून."
"नाही वहीनी तूला विषय बदलण्याची गरज नाहीय. मला माहित आहे की अदित्य व तूम्ही काॅलेज फ्रेंडस् होते. आणि आता दादा जे काही बोलत होता तेही मी ऐकलंय." प्राची
प्राचीचे बोलणं ऐकून श्री भाऊक होऊन जातो. अमृता श्रीच्या खांद्यावर हात ठेवत त्याला गप्प बसायला खुणावते.
" दादा आदित्य तुझा मित्र आहे ना मग तू का बर एवढा चिडतोस त्याच्यावर. मला तर जेव्हा हे समजल की तूम्ही मित्र आहात म्हणून तेव्हा मला खूप आनंद झाला होता." प्राची
"प्राची तूला आवडला का अदित्य?" अमृता
"काय बोलाव वहीनी मला काहीच समजत नाही. कारण मला कोणाच्याही मनाविरुद्ध जायचं नाहीये. दादाच्या सुद्धा." प्राची
"प्राची तू तूझा निर्णय घेऊ शकते. तूला जर अदित्य आवडलेला असेल तर......" प्राची श्रीला मध्येच थांबवत म्हणते,
"दादा मी यासाठीच का यू. एस. वरून ईथे आली. मला जर माझ्या मर्जीनेच लग्न करायचं असतं तर त्या साठी मी पुण्यात आलीच नसते. तिकडेच एखाद्याशी लग्न करून मोकळी झाली असते. बरं मला आता या विषयावर काही डिस्कशन नकोय. मी झोपायला जातेय. गूड नाईट!" प्राची
गूड नाईट करून प्राची आली तशी निघूनही गेली. श्री व अमृता तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले. ते दोघेही प्राचीचा विचार करू लागले. प्राचीच्या बोलण्यावरून त्यांना याचा अंदाज आला होता की प्राचीला अदित्य आवडलेला आहे.
प्राची आपल्या रूममध्ये येते व खिडकीत येऊन उभी राहते. बाहेर छान गार हवा सूटलेली असते. आकाशात चांदणे पसरलेलं होतं. प्राची आकाशातील चांदणं पाहते व बोलते,
"दादा मी लग्न तर अदित्यशीच करेल, आणि तेही तूझा होकार मिळाल्यावरच. पण त्या आधी मी तुमचे फ्रेंडस् तूम्हाला परत मिळवून देईल. एवढ तर मला समजलंय की तुमचा खूप छान ग्रुप होता. आईने संध्याकाळीच मला सांगितले नाहीतर मला काही कळालेच नसतं. तुमच्या मध्ये जे काही गैरसमज झाले ते दूर करेल. आय प्राॅमिस!"
दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे प्राची तयार होऊन बाहेर येते. बाबा व श्री नाश्ता करत असतात. प्राची नाश्ता करायला बसते व हळूच श्री ला म्हणते,
"दादा मला जरा बाहेर जायचंय शाॅपिंग करायला. मी वहीनी ला सोबत घेऊन जाऊ?"
"हे काय विचारण झालं का. तूला जिथे जायचं तिथं जा व अमृताला ही सोबत घेऊन जा. चल येऊ मी." श्री आपला नाश्ता संपवत बोलतो. व ऊठून किचनमधे जाऊन अमृताला काही तरी सांगतो व ऑफीसला निघून जातो.
प्राची ही मनात काहीतरी ठरवत असते. ती नाश्ता करत आईला आवाज देते,
"आई, ऐक ना."
"काय ग काही हवंय का तूला?" आई
"हो, पण ऐक ना मला नाश्तात काही नकोय." प्राची
"मग" आई
"मला आपल्या स्टोररूमची चावी हवीय." प्राचीच्या या विचित्र मागणीने आई संशयाने प्राची कडे बघते.
"तू अशी काय बघते आहे.दादाची व माझी लहानपणीची खेळणी तिथेच ठेवलेली असेल ना. मला ती बघायची आहे एकदा." प्राची
"अरे आज अशी अचानक कशी आठवण आली." अमृता
"काही नाही ग अशीच ईच्छा झाली." प्राची
आई प्राचीला स्टोररूमची चावी देतात. चावी घेऊन प्राची आपला मोर्चा तिकडे वळवते. स्टोररूम मध्ये खूप शोधाशोध केल्यावर तिला श्री चे काॅलेजचे फोटो सापडतात. तिला जे हव असत ते तिला भेटत. ते फोटो घेऊन ती अमृताकडे येते. अमृता टिव्ही बघत असते.
"वहीनी हे बघ काय भेटलय मला." अस म्हणत प्राची ते फोटो अमृताला दाखवते. ते फोटो बघून तिच्या चेहर्यावरचे भाव बदलतात.
"हे तुमचे काॅलेज फ्रेंडस् आहेत ना. काय नाव आहेत यांची?" प्राची
"प्राची तू हे का काढले? ठेवून दे बरं. आणि आपल्याला बाहेर जायचंय जा तयारी कर."
"अगं अस काय करतेय मी तर फक्त तूला यांची नाव विचारली ना. सांग ना मग. हे बघ तूला मला सांगाविच लागतील. तूला माझी शप्पथ आहे." प्राची
हे ऐकून अमृता नाव सांगायला तयार होते. व एक ग्रुप फोटो घेऊन नाव सांगायला सुरुवात करते,
"हे बघ हा श्री, अदित्य, विकी, अनघा, मी, जय, नेहा, संजय, व ही मिरा. चल झाल आता. आता तू मला काही विचारनार नाही आणि आता आपण बाहेर जातोय तू लवकर तयारी करून ये." अमृता
प्राची ही आता पुरतं ईतकं बस बाकी माहिती नंतर काढू असा विचार करते व तयारी करायला जाते.
थोड्यावेळाने त्या दोघी माॅलमध्ये जाऊन शाॅपिंग करतात व एका काॅफीशाॅपमध्ये जातात. तिथे त्यांच्या आधीच श्री आलेला असतो व त्याच्या सोबत अजून कोणीतरी मूलगा बसलेला असतो. अमृता प्राचीला घेऊन सरळ श्री बसलेला असतो तिथं येते. प्राचीला श्री ला तिथे बघून नवल वाटत पण त्यापेक्षा ही जास्त आश्चर्य त्याच्या सोबत बसलेल्या मुलाकडे बघून वाटत. कारण तो दूसरा तिसरा कोणी नाही तर अदित्य असतो.
क्रमशः