Neela - 4 in Marathi Classic Stories by Harshad Molishree books and stories PDF | नीला... भाग ४

Featured Books
Categories
Share

नीला... भाग ४

अध्याय ४... ओळख

वैभव जेव्हा विशाल च्या location वर पोचला.... त्याने बघितलं की विशाल तिथं खाली पडला होता, विजय ने पटकन त्याची नाळी तपासली....

"सर उशीर झालं आपल्याला यायला"..... विजय

"Shit shit shit".... ! वैभव एक दम रागात ओरडला....

दुसऱ्या दिवशी postmortem report आल्यावर कळलं की विशालची मृत्यु heart failure मुले झाली.... "डॉक्टरांचं म्हणणं होतं की तो काय तरी बघून इतका घाबरला असेल की भीती मुले त्याच्या heart fail झाला"...

वैभवला हे कळत नव्हतं.... विशाल ने अस काय बघितलं की जागेवर त्याचा heart fail झाला...

५ दिवसा मध्ये ही तिसरी घटना होती, मीडिया मध्ये हा case खूप चर्चा मध्ये होता.... वैभववर pressure वाढत जात होता, एक बाजूला मीडिया, एक बाजूला वरून pressure.... वैभवला काहीच सुचत नव्हतं की नेमकं आता काय करावं...

"सर मी जे तुम्हाला अफ्फा बद्दल बोललो त्याच्या अनुसार विशाल फक्त उरला होता.... किलर आता easily पडून जाऊ शकतो".... विजय

"किलर पडून कुठेच जाणार नाही, कारण की आपल्याकडे कुठलाच प्रूफ नाहीये की हे आत्महत्या नसून मर्डर आहे.… विशालचा death cause आहे natural death due to heart failure.... तेच समीरच clear sucide आणि रहायला प्रश्न सुरजचा तर ते ही बघितल्यावर वाटत नाही की मर्डर आहे.... हे सगळं ज्याने पण केलं आहे खूप तगडी प्लॅनिंग सोबत केलाय त्याने"..... वैभव

"सर पण ह्यांना मारण्याचा मागे किलर चा motive काय आहे"....???? विजय

"अफवा.... अफवा विजय, ती अफवा खोटी नाहीये, ते fact असेल.... मला त्या बदल सगळी माहिती हवी आहे".... वैभव

"Ooook sir".... विजय

वैभव इथं त्या अफ्फा बद्दल माहिती काढत होता, तेच तिथं शिरीष आणि नीला त्यांच्या लिस्ट मधून ४.... माणसांच्या मागे लागले होते

दिनेश पाल.... ३९ वर्षीय व्यक्ती, शिरीष च्या बिल्डिंगचा watchman....ड्युटी संपल्यानंतर दिनेश दारू च्या अड्ड्यावर गेला आणि आता तिथून घरी जाण्यासाठी निघाला दिनेश इतका नशेत होता की त्याला नीट चालत पण येत नव्हतं...

एकदम शांतता होती, सुनसाम रस्ता होता.... दिनेश जस तस चालत जात होता, अचानक कुत्रे जोर जोरात भुंकायला लागले, दिनेश मधीच थांबला, त्याला कळलं की कोण तरी त्याचा पाठलाग करत आहे, दिनेश ने मागे वळून पाहिलं शिरीष त्याच्या मागे थांबला होता....

शिरीष ला बघताच दिनेश बोलला.... "अरे साहेब तुम्ही इथं काय करताय, माझ्या मागे मागे का येतायेत".... दिनेश

"कारण की आता तू वरती जाणार आहेस".... शिरीष

दिनेश हसायला लागला.... "काय मस्करी करतायेत साहेब"....

"मस्करी... मी तुला जोकर वाटलो, की एवढं रात्रीचा मी तुझा पाठलाग करून तुझा सोबत मस्करी करणार.... अरे दिनेश sorry मी तर मस्करी करत होतो.... हिहीही" शिरीष अगदी रागात बोलला

"साहेब तुम्ही काय बोलतायेत मला काहीच कळत नाहीये"..... दिनेश

"तुला तर कारण सांगावं लागणार, करण तू त्यांच्या पेक्षा पण मोठा गुनाह केला आहे".... शिरीष

( तेव्हाच शिरीशच्या मागून नीला आली.... )

"हो गुनाह.... आठव रूम नंबर १३०३, ती रात्र.... तुला सगळं माहीत होतं ना पण तू काय केलं नाहीस वरतून फायदा उचलास".... नीला

"नीला.... बोलायचं कश्याला मारून टाक भाड्याला".... शिरीष

दिनेश हसत होता, पण अचानक त्याचं हसणं बंद झालं, त्याला भीती वाटायला लागली....

"का रे भाड्या आता हस आता बोलती का बंद झाली तुझी".... शिरीष

दिनेश काहीच बोलला नाही आणि तिथून धावत सुटला....

"पलतोय साल्या.... जा कुट पर्यंत जाशील".... शिरीष

दिनेश धावत होता, तेव्हाच मधीच एक दगडा ला पाय लागून तो खाली पडला, त्याच्या डोक्यावर मार लागली आणि रक्त वाहत होतं.... नीला आणि शिरीष त्याच्या जवळ आले....

दिनेश हाथ जोडून त्यांच्या कडे माफी मांगत होता.... "मला माफ करा... जाऊद्या मला" .... दिनेश

"माफी मंगतोय साल्या.... आता तर पक्का मरशील".... शिरीष

सकाळ.... झाली, पोलिसांना दिनेश ची बॉडी रस्त्यावर पडलेली भेटली.... रक्त खूप वाहून गेलं होतं, त्याला फक्त डोक्यावर जखम होती....

"सर बेवडा होता.... त्याची बायको बोलली रोज रात्री उशिरा यायचा दारू पिऊन, रात्री पण असाच जात असेल ठोकर लागून पडला आणि मेला असेल".... विजय

"नाही विजय... माणूस फक्त ठोकर लागून पडला आणि मेला, नाही मला हे पटत नाहीये.... काय तरी आहे जे आपल्या हातातून सुटतय".... वैभव

"काय सर".... ????? विजय

"ह्याच्या body ला postmortem साठी पटवून द्या".... वैभव

वैभव तिथून स्टेशनला पोचला....

"विजय मी तुला जे information काढायला सांगितलं होतं ते"....??? वैभव

"हो सर... सर मी... सुरज आणि समीर च्या common freinds ला भेटलो... पण त्याचं पण तेच म्हणणं आहे की confirm माहीत नाही, काय काय लोकांना तर ह्या बद्दल काय माहित पण नाही"....

"सर मी सुरज, समीर आणि विशाल च्या घरी गेलो होतो, त्यांच्या घरच्यांना पण विचारलं, त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं खोटं आहे, कोणी तरी अशीच अफ्फा पसरवली होती कॉलेज मध्ये ह्या तिघांची value down करण्यासाठी"..... विजय

"विजय value down करण्यासाठी.... इतकी मोठी अफ्फा कोण पासरावणार नाही, ठीक आहे अजून काय कळलं".... वैभव

"हो सर... सर सुरज च्या रूम मध्ये जेव्हा शोधलं मला त्याचा हा एक फोटो भेटला... त्यात तो एका मुलीसोबत आहे, सर ही मुलगी कोण आहे हे त्याच्या घरच्यांना पण माहीत नाही ना तर त्याच्या मित्रांना माहीत आहे.... मला वाटलं की ही मुलगी ह्या किल्लिंग च्या मागे अशु शकते, म्हणून मी तिच्या बद्दल माहिती काढली, सर ही मुलगी अंधेरी मध्येच रहाते रूम नंबर १३०३ मी तिथं गेलो होतो पण तिथं दाराला टाळा होता.... जेव्हा आजूबावल्याना विचारलं तर कळलं की ३ महिन्या आधी ती मुलगी कुठे तरी निघून गेली, कुठे ते माहीत नाही आता तिथं एक मुलगा रहातो... शिरीष नाव आहे त्याचा, सर नॉर्मल मुलगा आहे गावातून आला आहे".... विजय

"मग ती मुलगी कुठे गेली.... तीच नाव काय आहे, कोण आहे ती"...??? वैभव

"सर तिचं नाव ' नीला ' आहे.... सर एक मिनटं सर ज्या बिल्डिंग बद्दल मी बोलतोय, दिनेश त्याच बिल्डिंगचा watchman होता.... may be ह्या case सोबत त्याच्या काय तरी संबंध असणार".... विजय

"विजय.... ह्या दिनेशची मला एकूण एक डिटेल्स पाहिजे आणि तो मुलगा काय नाव बोललास तू शिरीष तो मला पाहिजे धरून आण त्याला"..... वैभव

विजय ने फटाफट दिनेशची माहिती काढली आणि तो पटकन परत वैभव कडे आला.....

"सर लिंक भेटली.... काही दिवसांपूर्वी दिनेशच्या बँक च्या खात्यात ५०,००० जमा झाले होते आणि ज्या अकाउंट मधून हे पैसे जमा झाले आहे तो अकाउंट सुरज नागर चा आहे".... विजय

"That's it... दिनेश ने नक्कीच सुरजला ब्लॅकमेल केलं असेल ज्या साठी सुरज ने त्याला पैसे दिले".... वैभव

"May be sir..... सर दिनेश नंतर त्या किलरचा पुढचा टार्गेट कोण असणार हे सांगता येत नाही आता, आपण चुकलो सर विशाल त्यांच्या लास्ट टार्गेट नव्हतं, विशाल नंतर त्याने दिनेशला मारलं आणि आता पुढे कोण असणार माहीत नाही".... विजय

"ह्याचा उत्तर आता आपल्याला तो मुलगा देईल काय नाव त्याच्या.... शिरीष, कुठे आहे तो"... वैभव

"सर चॉकशी केली तो घरी पण नाहीये आणि ऑफिसला पण नाहीये, मी त्याला कॉल केला होता पण त्याने फोन उचलला नाही".... विजय

"नाही नाही.... विजय त्याची location काढ.... हो ना हो, किलर तोच आहे"..... वैभव

-------------------------------------------------------------- To Be Continued -------------------------------------------------------------