कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन
भाग –१५-वा
-------------------------------------------------------------------------------------------------------------
गेल्या आठवड्यातील अनेक गोष्टी अनुशाच्या मनाप्रमाणे घडून येत होत्या , एका पाठोपाठ
घडून येणाऱ्या अशा सुखद प्रसंगातली ..भेट होती ..ती अभिजितच्या ताईच्या वाढदिवशी
झालेली ताईंची भेट. या भेटी नंतर अनुषा आणि ताई मनाने खूप जवळ आल्या .
ताईला विश्वास वाटू लागला होता ..की ..ही अनुषा आपल्या वडिलांच्या मनातील दुराग्रहाला नक्कीच
एक छान वळण देण्यात यशस्वी होणार .
चांगल्या गोष्टी होण्यासाठी ..वेळ मात्र खूप उशिराने येत असते “हेच खरे ..
आणि त्याची
प्रतीक्षा करण्यातच मनाची मोठी परीक्षा असते . तसे पाहिले तर ..आपले जगणे ,आपले आयुष्य
हीच एक मोठी कसोटी असते “,ही वाटचाल सहज आणि सोपी असती तर ..सगळ्यांचे आयुष्य
आणि त्यातले जगणे खूप सुसह्य झाले असते .
एक दिवस दुपारच्या वेळी अभिच्या ताईंचा फोन आला ,
अनुषा ,मी मार्केटमध्ये आलेली आहे , तू आत्ता लगेच आलीस तर भेट होईल आपली आणि बोलणे
होईल .आजचा लंच आपण सोबतच घेऊ या .
तू माझ्या बाबंना भेटायच्या अगोदर ..आपल्यात काही बोलणे झालेले तुला खूप उपयोगी पडेल असे मला वाटते ..
म्हणून तुला बोलावते आहे..
येशील ना लगेच ?
अनुशाने लगेच उत्तर दिले
बरे झाले ताई ,तुम्ही आत्ता फोन केलात , थोडा उशीर झाला असता तर मात्र जमले नसते ,
मी कोलेजला जाण्याच्या तयारीत होते , आणि एकदा कोलेज मध्ये गेले की , पुन्हा सिटीमध्ये
येणे सोपे नाहीये.
दहा मिनिटात माझ्या बाईकवर पोन्च्ते. बोलू या आपण .
बरोबर दहा मिनिटात ..अनुषा मार्केट मध्ये पोंचली ..हॉटेलच्या बाहेरच ताई तिची वाट पहात
होत्या ..
गोर्यापान नाजूक ताई ..इस्त्री केलेल्या सुरेख कॉटन साडी मध्ये होत्या . दोन्ही खांद्यावरून पदर ,
डोळ्यावर सन-ग्लास , हातात पर्स . अशा राजस रूपातल्या ताईंना पाहून अनुशाचे मन त्यांच्याविषयीच्या
आदराने भरून आले .
बाईक वरून उतरणाऱ्या अनुशाकडे ताई पहात होत्या - ब्ल्यू जीन आणि मरून कलर कुर्त्यामध्ये अनुषा
खूप सुरेख दिसत होती . पहिल्या भेटीतली अनुषा आणि आजची अनुषा .दोन्ही वेळा त्यांना सुंदर
रुपात दिसली होती . रूपाने सुंदर असणारी अनुषा ..मनाने त्यापेक्षा जास्त गुणवान आहे “ तिचे हेच
रूप आपल्याला जास्त आवडले आहे..असे ताईंना सारखे वाटत होते.
आणि म्हणूनच ..आपल्या बाबांच्या समक्ष भेटी अगोदर ..तिला आपल्या घरातील
काही गोष्टी बद्दल सांगणे हे अभिची मोठी बहिण म्हणून आपले कर्तव्य आहे “, आणि अनुशाच्या
सोबत आपण आहोत “..ही जाणीव सुद्धा या मुलीला खूप मानसिक बल देणारी असेल.
दोघी हॉटेल मध्ये येऊन बसल्या ..
ताईंच्या परिचयाचे हे हॉटेल असावे .समोर आलेल्या म्यानेजरला त्या म्हणाल्या ..
आम्हला बराच वेळ बसायचे आहे ,गर्दी नसलेला टेबल दिलात तर बरे होईल .
मोठ्या अदबीने .म्यानेजर म्हणाले –
मैडम- काही हरकत नाही ..असे म्हणून ..एका निवांत कोपर्यात त्या दोघींना दोनच खुर्च्या आणि
टेबल लावून देत ..वेटरला सुचना दिली ..
हे कस्टमर असे पर्यंत तू फक्त हाच टेबल बघशील ..!
बसण्याची अशी छान व्यवस्था झाली ..
ताई आणि अनुषा समोरा समोर बसले ..चहा घेत ताईंनी विचारले ..
अनुषा ..तू तुझ्या प्रोजेक्टसाठी बाबांच्या संदर्भात कसे नि काय काय करणार आहेस , हे सांगितले
तर ,त्यात तुला काही सुचना मी करू इच्छिते ..ज्याचा तुला तुझ्या या कामात नक्कीच खूप उपयोग
होईल .
अनुशाने ताईंचा हात हात घेत घट्ट धरून ठेवीत म्हटले ..
तुम्ही अगदी माझ्या मनातले बोललात , मीच येणार होते तुमच्याकडे .
त्याआधी तुम्हीच या साठी बोलावून घेतलेत ..
खरे सांगू का ताई ..बाय ऑल मीन्स ..तुमचा अधिकार आहे ..
तुम्ही मला कधी ही बोलावून घेऊ शकता ,
आणि तुम्हाला प्रतिसाद देणे इज माय ड्युटी ..!
अनुशाच्या हाताच्या स्पर्शातून ..ताईंना तिच्या मनातील आपलेपणा , नात्याचा विश्वास जाणवला
आणि त्या अधिकच आनंदून म्हणाल्या ..
अनुषा ..म्हणून तर तुला लगेच बोलावून घेतले ..
ताईंना अनुषा सांगू लागली ..
मी ज्या क्रमाने हे काम सुरु करणार आहे ते असे आहे..अगोदर तुम्ही हे पूर्ण ऐकून घ्या आणि मग
त्यात मी कधी कधी , कसे कसे आणि काय काय केले पाहिजे ?
हे सांगावे ..ज्या मुळे ..माझ्या प्रोजेक्टच्या हेतू विषयी सागर देशमुख यांच्या मनात निदान अगदी
सुरुवातीलाच अजिबात काही शंका आली नाही पाहिजे ..याची काळजी घेतच मी माझे काम करणार
आहे ..
कारण ..अभिने मला सागर देशमुख यांच्या संतापी –स्वभावाची कल्पना दिली आहे ..
म्हणून मला भीती वाटते की..
मी कोण ,आणि कशा करता हा उद्योग करते आहे “..याची कुणकुण जरी त्यांना लागली तर ,
अगोदर तिथून माझी हकालपट्टी होईल ..आणि प्रोजेक्ट अधुरे राहील ..ते मी सहन करू शकणार नाही.
म्हणून मी त्यांच्या समोर फक्त एक कोलेज विद्यार्थिनी आणि शिकाऊ –पत्रकार ,पत्रकारितेच्या क्षेत्रातील
एक नवोदित उमेदवार “ या स्वरूपात असणार आहे.
ताई ,मी त्यांना कधी पाहिलेले नाही, आणि कधी भेटलेले पण नाही .
खरे सांगू का , मी आता पर्यंत ज्यांच्या बद्दल लिहिलेले आहे, टीव्ही वर ज्यांच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत “
त्यातील बहुतेक जन हे दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहेत पण त्यांचे कार्य खरेच खूप मोठे आहे.
आणि सागर देशमुख “म्हणजे एक वलायाकिंत असे व्यक्तिमत्व , त्यांचे जग ,आणि त्यातील वातावरण यात माझ्या सारख्या सामन्य स्तरातील एखाद्याला प्रवेश मिळणे असंभव .
म्हणूनच त्यांच्या सारख्या मोठ्या नामवंत व्यक्तीला माझ्या सारख्या एखाद्या पोरसवदा विद्यार्थ्य बद्दल काही माहिती नसणार हे पण उघडच आहे.
ताई ..मी आणि अभी ..आमच्या सामाजिक कार्याच्या समान आवडीमुळे परिचित झालोत ,
आमच्या छोट्याश्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही नव्या पिढीतली पोरं –पोरी मिळून समाजाविषयी काही केलेलं पाहिजे या विचाराने एकत्र आलोत आणि या आस्थेतून आमचे कार्य चालू असते .
असाच सहवासातून ..मैत्रीचे रुपांतर आमच्या प्रेमात झाले ..पण, यासाठी पुढाकार मलाच घ्यावा लागला .
ताई ..तुमच्या लाडक्या बंधुराजाने ,,माझ्या प्रेमाचा स्वीकार करण्यास खूप खूप वेळ घेतला ,
माझा जीव नुसता टांगणीला लागला होता ..या अभिच्या प्रेमात .
अभी मला खूप आवडला म्हणून तर त्याच्या प्रेमात पडले . दर भेटीत अभी मनाने मोकळा होत गेला
आणि त्याच्या बोलण्यात ..तुमच्या सगळ्यांच्या बद्दल मला जाणून घेता आले..
आणि तेव्हाच मी ठरवले ..
अभिच्या आयुष्यात ..जे नाहीये ..ते प्रेम ..वडिलांचे ,आईचे ,बहिणीचे .. आपण पुन्हा आणून द्यायचे ,
आणि मग ..यातून .मला या प्रोजेक्टची कल्पना सुचली .
किती किती सांगू असेच अनुशाला झाले आहे ..हे जाणवल्यामुळे ..ताई तिच्याकडे प्रेमाने आणि कौतुकाने
पहात म्हणाल्या ..
अनुषा ..तुझ्या या सगळ्या भावना मला खूप आवडल्या , मला तुझ्या या विचारांचे आणि कल्पनांचे
खूप कौतुक वाटते आहे. किती मनातून आणि मनापासून तू हा विचार करते आहेस ..
तुझ्या वयाच्या अवखळ ,बिंधास मुली मी पहाते पण अशी परिपक्वता मला फारशी कधी कुणात पाहायला
मिळालीच नाही.
माझ्या मते तर ..आमचा अभी खूप नशीबवान आहे..ज्याच्या जीवनात तू तुझे प्रेम घेऊन आली आहेस.
thanks-ताई ..माझ्याबद्दलच्या तुमच्या मनातील या भावना ऐकून मी खूप सुखावून गेले आहे.
मी दोन दिवसांनी सागर देशमुख यांच्या कॉर्पोरेट ऑफिसला जाणार आहे.
कॉलेजचे परमिशन लेटर , प्रोजेक्ट फाईल , माझे आय कार्ड ,आणि या क्षेत्रातील कार्यानुभव आहे “
याबद्दल सांगणाऱ्या माझ्या वर्क –फाईल ..असे सगळे घेऊन जाणार आहे.
माझा laptop, VDO कॅमेरा ..रेकॉर्डिंग साठी लागणारे आवश्यक ते सारे काही ..
अशा तयारीनिशी ..मी रिपोर्ट करणार आहे.
एक बिझिनेस पर्सन म्हणून त्यांच्या प्रवासा बद्दल मी जाणून घेण्यासाठी त्यांना बोलते करणार आहे,
त्यांना या बद्दल सांगणे नक्कीच आवडेल “असा माझा अंदाज आहे.
आणि हे करीत असतांना ..साधारण महिन्या भराच्या माझ्या कामा नंतर मी त्यांच्या वयक्तिक आयुष्याच्या बद्दल ..त्याना व्यक्त होण्याची विनंती करीन ..
तेव्हा ..तिथ पासूनच्या कामात मला वेळोवेळी तुमची मदत लागणार आहे.
ताईंनी अनुशाची योजना ऐकून घेतल्यावर म्हटले ..
वा ..अनुषा ..तुझे पेपर –वर्क अगदी अचूक आहे.. अगदी याच पद्धतीने तू सुरु ठेव तुझे काम ..
सागर देशमुख यांना तुझ्या हेतू बद्दल शंका यावी ..असे काहीच नाहीये.
आणि महिनाभरात तुला आणखी कसे करायचे ..हे पण सुचू लागेल .
एक मात्र सांगते .. बाबा प्रचंड “इगो वाले आहेत , स्वतःचा अहंकार , इगो “ जपणे त्यांची
सर्वात आवडती गोष्ट आहे. त्यांच्या भवताली असणार्यांना याची कल्पना आहे.. त्यामुळे ..
बाबांचा दरबार म्हणजे ..त्यांनी जमवलेल्या त्यांची खुश-मस्करी “ करणाऱ्या चमचे –बहाद्दर
लोकांचा आहे.
बाबांना हे सगळे आवडते ..कुणी काही म्हणो ..त्यांना फरक पडत नाहीत ..त्यांच्या मनावर धुंदी
आहे ती स्व-कर्तुत्वाची , असलेल्या श्रीमंतीची .यासमोर बाकीचे सगळे कचरा –पट्टी .
यात आम्हीच सगळ्यात आहोत ..हे आमचे दुर्दैव ..कारण ..
मी आणि अभी ..त्यांचे चमचे झालो नाहीत , माझ्या प्रेमास , माझ्या प्रेम-विवाहास बाबांचा सक्त
विरोध होता ,तो अजून आहे आणि यापुढे त्यांचा विरोध आणि माझ्यावरचा रोष कमी होणारा नाहीये.
लग्नानंतर माझी आणि बाबांची भेट नाहीये ..जणू त्यांच्या आयुष्यातून त्यांनी मला आणि माझ्या
नवर्याला बेदखल करून टाकले आहे.
त्यांना एक मुलगी आहे, तिचा परिवार ..याचा उल्लेख देखील ते करीत नाहीत ..असे मला कळाले आहे.
आणि आमच्या आईवर तर बाबांचा फक्त राग आणि रागच आहे “,
एकच छताखाली राहणारे माझे आई-बाबा ..म्हणजे ..दोन यंत्रवत पण जिवंत माणसे आहेत .
अभी म्हणतो तेच खरे आहे..
आमच्या घराचे ..वस्तूचे नाव ..प्रेमालय “ एक मोठा पुअर जोक आहे.
नाव मोठे पण लक्षण खोटे ...!
ताईंच्या बोलण्यातली खंत आणि त्यांच्या आवाजातली वेदना अनुशाला जाणवली .
ती म्हणाली ..
ताई . असे निराश होऊ नका . माझा तर तुमच्या कुणाशी काहीही संबंध नव्हता ,
पण अभिच्या प्रेमाने मला ही शक्ती दिली, आणि एक जिद्द निर्माण केली .
तुम्ही फक्त आशीर्वाद द्या , जीजू आणि तुम्ही सोबत असा माझ्या ..
आय विल डू..! प्रोमीस आहे हे अनुशाचे .
डोळ्याच्या काठी आलेले आनंदाश्रू लपवत ताई अनुशाला म्हणाल्या ..
तू परीराणी आहेस ..तुझ्या जादूने नक्कीच छान होईल .
गुड लक ..सुरु कर तुझ्या कामाला .
आम्ही तुझ्या सोबत कायम आहोत.
god ब्लेस यु डियर अनुषा ..
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात ..
भाग -१६ वा लवकरच येतो आहे..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------