सागर संध्याकाळी हॉस्पिटलमधून फ्लॅटवर परततो. सागरला मंदार कुठेच सापडत नाही. त्याच्या ठरलेल्या तिन्ही जागी जाऊन तो त्याचा शोध घेतो. पण तरीही त्याचा पत्ता लागत नाही, त्याचा फोनही वारंवार Not Reachableच येतो. त्याचं असं अचानक निघून जाणं कुणालाच कळत नव्हतं. दुसरा दिवसही पूर्ण शोधण्यातच निघून जातो. पण मंदार बाबत कोणालाच खबर नसते. शेवटी सागर पोलिस स्टेशन मध्ये Missing Complaint देण्याचं ठरवून झोपून जातो.
सकाळ होते आणि सागरला मंदारचा एक मेसेज दिसतो. मंदारनी त्याला पाठवलेलं लोकेशन दिसतं. आणि सागरला मंदारचा पत्ता माहीत पडतो. मंदार बद्दल मानसी आणि पूजाला तो कॉल करून सांगतो. तिघेही मंदारला भेटायला निघायचं ठरवतात. मानसीच्या जखमा अजून बऱ्या व्हायच्या असतात. तरीही तिच्या आग्रहास्तव तीला बरोबर घेतात. पूजाला जसं माहीत होतं की मंदारने सागरला लोकेशन पाठवलंय.पूजा विनयला कॉल करून खबर देते. विनय पूजाला त्या दोघांनाही नव्या जागेवर आणायचं सांगतो.सागर, मानसी आणि पूजा यांचा प्रवास सुरु झालेला असतो. शिताफतिनं पूजा जेव्हा सगळे जण चहासाठी थांबतात, तेव्हा लोकेशन बदलून टाकते. पूजाचा खरा रंग अजून त्या दोघांना कळायचा असतो. मानसी साठी पूजा चांगलीच जवळची असते त्यामुळे तिच्याकडून असा काही घडेल असं तिला कधीच वाटतं नाही.
तिकडे मंदार समोरही बंदिस्त राहण्याशिवाय पर्याय नसतो. तीन-चार तासांच्या प्रवासानतंर सागर, मानसी आणि पूजा एका ठिकाणी पोहचतात, कदाचित विनयचा हा दुसरा अड्डा असावा. इथे डिलर्स सोबत डिल्स होत असाव्या अस दिसून येत होतं. सगळीकडे शांतताच शांतता पसरलेली होती. सगळे गाडीच्या बाहेर आले. मानसीचा पायही जरा बरा झालेला होता, पायांची सरकलेली हाडे आता ठीक झाले होते. ती बऱ्यापैकी चालू शकतं होती.
थोडा वेळ निघून गेला सागरला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं होता. सागरने मोबाईल काढला आणि लोकेशन चेक केलं. त्याला दोन्ही लोकेशन्स वेगवेगळी दिसली. अर्थातच लोकेशन कसं बदललंय हे त्याला कळतच नव्हतं. एका मोठया शेड खाली ते उभे होते. सागर पूजा आणि मानसीला विचारणार तेवढ्यात तिथं तीन गाड्या आत आल्या. सागर आणि मानसी जरा घाबरलेच, तिन्ही गाड्यातून कोयते, बांबू इत्यादी हत्यार घेऊन गुंड बाहेर पडले. आणि एका गाडीतून विनय बाहेर आला, विनय तिघांकडे पाहून मनासी आणि सागरकडे पाहत ,"घेर लो ऊन दोनो को ,भागने ना पाये". अशी कमांड सोडत आपल्या गुंडांना कामावर लावतो. समीक्षा त्याच्या मागेच उभी असते. विनय पूजाला पाहून म्हणतो,"क्या खूब काम किया हैं ! शेवटी माझी मुलगी तू.असा म्हणताच पूजा विनयला आलिंगन देते. सागर आणि मानसीला आश्चर्याचा चांगलाच धक्का बसतो. त्यांचा विश्वासच बसत नाही आपल्या सोबतीची पूजा विनयची मुलगी असेल म्हणून. ह्याचा अंदाज मानसीलाही कधी आला नव्हता. तेवढ्यात समीक्षा मागून बोलून जाते."भाई शोभली हा पोरगी तुमची, तुमच्याच सारखी हुशार आहे पूजा"! पूजा विन च्या भेटी गाठी घेऊन होतात आणि सागर पूजाला विचारतो,
सागर:- पूजा तू. तू लोकेशन बदललंस,तू आणलं इथं आम्हाला ?
(मानसी तेवढ्यात बोलते)
मानसी:- पूजा. तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला.
पूजा:- हो आणि तुझ्यामुळे आमचं एवढं नुकसान झालं, आम्हाला एवढं तुला झेलाव लागलं त्याचं काय मग!
(विनय मध्येच बोलतो)
विनय :- बस खुप झालं आता. अन्या बांध त्या दोघांना, सडून इथेच मेले पाहिजेत दोघेही.
विनय अशी कमांड देताच अन्या त्या दोघांना बांधतोच की सागर त्याला ठोसा मारतो. आणि इथून सागरला मारायला सगळेच सरसावतात, सागर पळायला लागतो आणि त्याच्या मागे मानसीही, विनय बंदुकीने सागरकवर नेम लावायचा प्रयत्न करतो, पूजा, समीक्षाही त्यांच्या मागे धावतात सागर मानसीला घेऊन पळतो, मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मारत सुटतो, सागर गाडी शोधतो, गाडी अजून थोडी दूर असते. तिथवर पोहचुन मंदारच्या लोकेशनवर पोहचण्याची सागरची कल्पना असते. इतक्यात विनय सागरच्या दिशेने गोळ्या झाडायला सुरुवात करतो, हे पाहून सागर मानसी एका खांबाच्या मागे लपतात, सागर मानसीला गाडीत जाऊन बसायला सांगतो, मानसी तिथून गाडीकडे धावते, तेवढ्यात विनय मानसीच्या दिशेने गोळ्या झाडतो काही, गुंड सागरच्या अंगावर धावतात, विनय मानसीला गोळी मारतोय हे सागरच्या लक्षात येतं, समीक्षा आणि पूजाही मानसीच्या मागे असतात सागरही मानसी च्या मागे मागे धावतो, सागरच्या समोर पूजा आणि पुजाच्या समोर मानसी असते, सागरला गोळा झाडण्याचा आवाज येतो तो सरळ जाऊन मानसीला लागेल कळताच सागर पळत जाऊन मानसीला धक्का देतो दोघेही जाऊन खाली पडतात आणि गोळी थेट पूजाला लागते पूजाला गोळी लागून जमिनीवर पडते विनय, मानसी आणि समीक्षा एकदम पूजाच्या नावाने हाक मारतात, पूजा जमिनीवर कोसळताच मरण पावते. सागर मानसीला उभं करतो आणि गाडीकडे नेतो, विनय धावत धावत पूजापाशी येतो पूजाला मेलेलं पाहून विनय धाय मोकलून रडतो, समीक्षा आणि इतर गुंड सागरच्या मागे धावतात पण तो वर सागर पुढे निघून गेलेला असतो.
समीक्षा परत विनय पाशी येते विनयचं पूजा कडे पाहून रडणं सुरू असत तेवढ्यात समीक्षा बाजूला जाऊन एक कॉल करते, तिचा कॉल आटपतो आणि ती परत विनय कडे परतते, विनयच्या आता चांगलाच पारा चढलेला असतो, तो रागात त्यांना ठार मारण्या बद्दल बडबडत असतो, समीक्षा त्याला सावरण्याचा प्रयत्न करते, विनय उठतो आणि गाडी काढायला सांगतो पूजाला तेथेच ठेऊन विनय , समीक्षा , आणि गुंड सागरच्या मागे निघतात.
घडलेला प्रकार पाहून सर्वांनाच एकदम धक्का बसला होता, विनयने त्याची मुलगी समीक्षाने तिची सहकारीन आणि मानसीने तिची जवळची मैत्रीण गमावलेली असते.
सागर आणि मानशी बरेच पुढे निघून आलेले असतात दिलेल्या लोकेशन पाहून जवळपास 500 मीटर अंतरावर पोहचतात की सागरचा मोबाईल बंद पडण्यावर येतो. ठिकाणाच्या जवळपास पोहचतातच की मोबाईल स्विच ऑफ होतो. सागर आणि मानसी समोर एक नवीन प्रश्न उभा राहतो. ते गाडी बाजूला लावून त्याला पायीच शोधायचा प्रयत्न करतात, त्यांना मंदारचा पत्ता लागत नाही. ते इतक्या जवळ असूनही त्यांना मंदार मिळत नाही तेवढ्यात सागरला मागुन येणाऱ्या गाड्याचा आवाज येतो. आणि ते गाडीच्या मागे लपतात. ते जिथे लपतात तिथून पुढच्या प्लॉटवर जाऊन त्या तिन्हींही गाड्या जाऊन उभ्या राहतात समीक्षा, विनय आणि गुंड गाडीतून उतरतात आणि आत जातात, इकडे सागर आणि मानसीला मंदारचा ठिकाणा सापडतो, हळूहळू सागर आणि त्याच्या मागे मानसी त्या ठिकाणकडे वळतात...
विनय आत जातो. त्याला मंदार बांधलेला दिसतो, आणि शेफर समोर सिगरेट ओढत असतो. सगळं काही शांतच दिसतं. कुठे धावपळ नाही. कुठे घाई गडबड नाही. पावलांचा आवाज ऐकून शेफर ताडकन उठतो. विनय त्याला म्हणतो
विजय:- मी यायच्या आधी इथं कोणी आलं होतं का?
शेफर:- नही...नही तो.यहाँ सिर्फ हम दोनों ही हैं कब से .
विजय:- अच्छा हुँआ, इसकी अच्छे से खातीरदारी की या नही.
शेफर:- हा की ना भाई, बस वो थोडीसी गलती हो गई थी मेरी आँख लग गई थी तब इसने मोबाईल हाथ में लिया था भाई.
विजय:- हाँ, पता चला, साले तेरे गलती की वजह से इसके दो और दोस्त यहाँ आ चुके हैं.
और पूजा भी मर गई.
शेफर:- क्या भाई, पूजा मर गई आपकी बेटी?
विजय:- हाँ ? पर तेरे को इतना शाँक क्यू लग रहा हैं.
शेफर :-नही भाई कुछ नही.
( मंदार एकदम जागा होतो त्याच्या कानावर आपले दोन मित्र आल्याचं पडतं)
मंदार:- काय सागर मानसी आलेत का. आता तुमची खैर नाही आणि बरं झालं पूजा मेली ती .
( मंदारच बोलणं ऐकताच शेफर त्याचा अंगावर धावून येतो)
शेफर:- चूप बैठ भोस_के नहीं तो अभी तेरा game खतम कर डालूगा।
विनय:- छोड दे उसे .इसे और इसके दोनो दोस्तो को ठीकाने लगाना पडेगा। यही आसपास ही होंगे वो लोग।
शेफर:- समीक्षा जाओ धुंडो उन डोनो को निकाल के लाओ उनको, तब तक मे इसको देखता हू।
सगळे बाहेर निघून जातात विनय मंदार च्या समोर येऊन बसतो.
विनय:- बोल भाच्या काय म्हणतोस.
मंदार:- तुमचा हा खेळ जास्त वेळ टिकणार नाहीये!
पळायची तयारी ठेवा.
विनय:- हा हा हा ( जोरात हसतो) अरे मोजून माणसं तुम्ही दोघे त्यात ती अर्धं मेली मानसी, काय वाकडा कराल तुम्ही आमचं. अख्या दिवस इथ डांबून ठेवल तुला. पण पळता काय आलं नाय. आणि काय तू आमचा खेळ संपवायला निघालास.
(सागर तिकडे एक एक गुंडांना मारत आत मध्ये येत असतो. आणि शेवटी सागर, मंदार आणि विनय समोर येऊन पोहचतात. विनय थोडा दरवाज्यामुळे सागरला दिसून येत नाही. तो थेट मंदार कडे पाळतो. त्याला पाहून विनय म्हणतो.
विनय:-ओहह तर साहेब पोहोचलेत इथपर्यंत. जरा दम धरा इतकी काय घाई झाली, खरा खेळ तर आता सुरू झालाय.
(सागर मंदारचे हात पाय बांधलेले सोडतो मंदार आणि सागर दोघेही त्याच्या समोर उभे असतात. तेवढ्यात समीक्षा मानसीला पकडून आत घेऊन येते.)
समीक्षा:- भाई ही मानसी बाहेर लपून बसली होती.
विनय:- क्या बात है। सब के सब एक ही जगह पर अब मारने मे मजा आयेगा!
(समीक्षा मानसीला सागर आणि मंदार पाशी ढकलते. आता तिघेही विनयच्या पुढे उभे राहतात.)
विनय:- साला वाटलं नव्हतं कधी हे तिघे माझा एवढा विषय करतील. एवढा loss होईल माझा म्हणून.
मंदार किती दिवसांनी मानसीला पाहत असतो. मानसीवर त्याचा विश्वास बसलेला असतो. मंदारला पाहताच तीच्याही डोळ्यांतून पाणी पडायला सुरुवात होते. हे पाहताच विनय चिडतो आणि समीक्षाला कमांड सोडतो.
विनय:- समीक्षा घेऊन जा हिला इथून नाहीतर इथेही हिचं लफडं सुरू होईल.
समीक्षा तिच्यापाशी जाते तर मानसी मंदारचा हात धरून रडायला सुरवात करते. ती एैकत नाही हे पाहून विनय शेफरला मंदारला पकडायला सांगतो.
शेफर जवळ येताच मंदार शेफरच्या तोंडावर ठोसा मारतो आणि तिथून एकमेकांमध्ये हाणामारी सुरू होते मंदार ठोसा मारत पुढे निघतो, मानसीला ओढतो आणि सागरही मंदारच्या मागे धावतो, सागरने आधी कितीतरी गुंड झोपवलेली असतात त्यामुळे गुंड आता फारच उरलेली असतात, मंदार आणि सागर मानसीला लपवत गुंडांशी हाणामारी करतात, 10-20 मिनिटे ती हाणामारी चालूच राहते मंदार आणि सागर मानसी सोबत बाहेर पडतात. प्लॉट समोरच्या मोकळ्या जागेवर येऊन पोहचतात. तेवढ्यात मागे असलेली मानसी समीक्षा च्या हाती लागते, मंदार सागरला कळताच तेही थांबतात समोर समीक्षा मानसीच्या डोक्यावर बंदूक लावून उभी असते मागुन विनय येतो आणि मंदारच्या जवळ हळूहळू एकदम तोऱ्यात जाऊन उभा राहतो, आणि त्याची उडवतो, काही मिनिटे असच चालत राहतं, अचानक मंदार विनयच्या हाताला झटका देतो आणि त्याच्या हातातली बंदूक आपल्या हाती घेऊन डाव्या हाताने त्याच्या मानीला वळसा घालत बंदूक त्याच्या डोक्यावर लाऊन ठेवतो आणि बोलणं सुरू होतं
मंदार :- आता समीक्षा मॅडम आपली बंदूक मुकाट्याने जमिनीवर टाका नाही तर विनाकारण तुमच्या so called पोरी पळव्या Boss ची अंतयात्रा निघेल.
विनय :- समीक्षा Baby ह्या गोष्टी करायचा काहीच गरज नाहीये ह्यात Trigger दाबायची थोडीही हिम्मत नाहीये
समीक्षा :~ Boss ह्या गोष्टी होतील ह्याच्या मला आधीच अंदाज होता. boss तुम्ही काळजी करू नका आपला Back up plan तयार आहे.
फक्त काही वेळ आणखीवाट बघायची आहे.आणि या सटवीला तर तिथेच बघून होईल. विनय तिला सारखा सारखा धमकावत राहतो पण ती ऐकत नाही तेवढ्यात तिथे जवळ उडत येणाऱ्या चॉपरचा आवाज येतो. चॉपर काही वेळात थोड्या अंतरावर उभं राहतं त्यातून एक माणूस डोकावून पाहत असतो. समीक्षा आणि विनयला सिग्नल मिळतो. तेवढ्यात चॉपर मधून गोळ्या झाडायला सुरुवात होते. सगळीकडे तारांबळ उडते. विनय मंदारला धक्का देतो आणि आदित्य पारेकर अस ओरडतो आणि गाडयांचा, Blocksचा आडोसा घेऊन चॉपरकडे पळतो. चॉपर हळूहळू हवेत उडायला सुरु होते. समीक्षाही मानसीला चॉपरकडे ओढत नेत असते. मंदारचं गोळ्या झाडणं चालूच असतं. लपत लपत विनय चॉपरच्या सोडलेल्या दोरीवर चढतो. मंदार, आणि सागर विनयच्या मागे मागेच धावतात. त्यांना समीक्षा मानसीला घेऊन वर चढताना दिसते. मंदार ओरडतो आणि तोच नेम लावत बंदूकीतून गोळी झाडतो. चढता चढता चढलेली समीक्षा गोळी लागून मानसी सहीत जमीनीवर पडते. विनय तोवर चॉपरमध्ये जाऊन बसलेला असतो आणि गोळीबारही थांबलेला असतो. विनय फरार होतो आणि समीक्षा जखमी अवस्थेत जमिनीवर पडून असते. सगळं काही एकदमचं शांत होतं. मानसी समीक्षाला धीर देत तिच्या शेजारी बसलेली असते. पण विनय हातात येता येता निसटून जातो. धावता धावता विनय आदित्य पारेकर नावाने ओरडत होता. तो व्यक्ती नेमका कोण होता, ज्याने समीक्षालाही जागीच सोडून विनयला फरार केलं...
सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून, कथेचा कुठलाही भाग प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य...
मयुर श्री बेलोकार
9503664664
Insta@shabd_premi