purane kitabon ke panne in Marathi Short Stories by Dhananjay Kalmaste books and stories PDF | पुराणे किताबो के पन्ने

Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

पुराणे किताबो के पन्ने

आयुष्य हा एक प्रवास आहे. आणि हा प्रवास एकट्याने करायचा म्हणजे थोड अवघडच आहे. पण समजा एखाद्याला जर कोणाची साथ भेटली आणि ती भेटलेली साथ जर कायम आपल्या बरोबर राहणार असेल तर? मला ही अशीच एक साथ भेटली पुस्तकांची... मी चवथीत असताना सुट्टीला मुंबईला मावशीकडे गेलो होतो तेव्हा मी सती अनुसया हे पुस्तक वाचले. आता तुमच्यातले काही जण म्हणतील शाळेत काय वाचत होतास मग? तुमचा प्रश्न बरोबर आहे. मला असे म्हणायचे होते कि अभ्यासाव्यतिरिक्त पाहिले पुस्तक मी वाचले. एवढ्या छोट्या वयामध्ये मला ते समजले सुद्धा. अभियांत्रिकी च्या दुसर्‍या वर्षाला असेल मला एका मित्राने संभाजी राजे हे पुस्तक वाच म्हणून सांगितले. पुस्तक वाचून अंगावर काटा आला. दिवसाला 70 ते 80 पाने अस माझ वाचन होते. ते थोड्याच दिवसात संपवले.. आता असच काहीतरी रक्त उसळत राहावे अशा पुस्तकाच्या शोधात असताना मृत्युंजय माझ्या हाती पडल. माझ भान हरपायला लागल अश्या पुस्तकामुळे..
मी कोणत्याही भाषेला कमी जास्त मानत नाही पण मराठी माझी मातृभाषा असल्याने अर्थातच माझी ओढ त्याकडे जास्त आहे. भाषा हि आई सारखी असते अस मला वाटत. मान आपण सगळ्यांचा देतो पण सगळ्यात छान म्हंटल कि त्यात वादाचा प्रश्न येतो कुठे? - आपलीच आवडणार.
नंतरसुद्धा मी हिंदी, इंग्लिश यांसारखी पुस्तके वाचू लागलो. भाषा बदलल्याने भावना बदलत नाहीत अस माझ ठाम मत आहे. ययाती पुस्तक हातात पडले तर पायाखालची जमीन सरकते कि काय असे वाटू लागले.. त्या राजाला असा एक क्षण आला होता कि त्याला आपली बहीण व बायको यांच्या मधला फरक कळू नये. हे फक्त बोलायच म्हणून नाही, खोट वाटत असेल तर वाचून बघा. माणसाला स्वतःत बदल घडवायचा असेल तर एकच मनुष्य माझ्या मते प्रथम क्रमांकावर असू शकतो. ते म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्याच्या बद्दलची सर्वच पुस्तके जमत नसेल तर श्रीमानयोगी वाचा . यामध्ये अजून एक पुस्तक कसे मागे राहील ते म्हणजे श्यामची आई. माणसाला जर वेगवेगळ्या लाइफ जगायच्या असल्या तर बायोग्राफी वाचून बघा. नेपोलियन, हिटलर, सुभाषचंद्र भोस, सिकंदर, यांसारखी गरूड झेप घेणारी प्रतिभावंत लोक होऊन गेले त्यांची चरित्र एकदा वाचून तर बघा. आणि जर तुम्हाला लेखन, वाचन खूपच आवडत असेल तर मी एका लेखकाचे नाव सुचवतो नक्की वाचून बघा, तो म्हणजे डैन ब्राउन . उत्कृष्ट लेखनशैली असलेले हे एक लेखक .मी वाचलेल्या पैकी द दा विंची कोड व diception point.. त्यानंतर मी चेतन भगत यांची ही पाच पुस्तके वाचली आहेत. मला त्यांची विचार करण्याची पद्धत खूप आवडते. आणि ज्या प्रकारे ते वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करतात ती गोष्ट मला जास्त आवडते. आता हिंदी पुस्तकांबाबत बोलायच झाल तर आमिष त्रिपाठी यांची पुस्तके तुम्ही जरूर वाचून पहा. आपण या सर्व गोष्टी मधून किती घेतो हे महत्वाचे नाही का?. पुस्तक वाचनाचे वेड लागायचे एकच कारण आहे?... ऐकायच आहे तर मग ऐका. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा त्यांच्या घरात 2500 पुस्तक भेटली पण अंगावरचे सूट फक्त 2 का 3 ! .....आता आपण विचार करू तो माणूस कोणत्या पदाला होता.. नसता जमवू शकला का अजून कपडे किंवा बाकीच्या गोष्टी. मग आपण का खटाटोप करत आहोत ईतका... आता ही गोष्ट मी टीव्ही ला बघितली की वाचली एवढ आठवत नाही पण काय फरक पडतो ती खरी असली काय किंवा खोटी मी तरी इनस्पायर झालो त्यामुळे... तेव्हाच निश्चय केला मी ही एवढी पुस्तक वाचनार, आता कुठे 85 झालेत... पण होतील लवकरच...
आता लॉकडाऊन चालू आहे. समजा तुम्हाला कोरनटाईन म्हणून कोणत्या तरी ठिकाणी पाठवले. आणि जेवण पुरवले जाणार असेल खाण्याचा सर्व पुरवठा देण्यात येणार असेल तर तुम्ही काय सोबत घ्याल. मी तर माझ्या साठी पुस्तके घेईल. यावरून आठवले माझी जन्मठेप वाचायला हरकत नाही.. लवकरच मी काही नवीन लेख लिहिल आणि आशा करतो तुम्हाला सगळ्याना आवडतील.


धनंजय कलमष्टे,
पुणे