Neela - 2 in Marathi Classic Stories by Harshad Molishree books and stories PDF | नीला... भाग २

Featured Books
Categories
Share

नीला... भाग २

अध्याय २... भीती

पट्टरीवर सकाळी पोलिसांना सुरज ची बॉडी भेटली, "सुरज नागर".... मुंबईतील एका मोठा buisness tycoon "राज नागर" चा एकुलता एक मुलगा... ७०० कोटीचा मालक

मीडिया मध्ये ही बातमी पसरली....

"सुप्रसिद्ध buisness tycoon राज नागर चे सुपुत्र सुरज नागर चा शव मुबईतील अंधेरी रेल्वे क्रॉससिंग च्या पट्टरीवर आज सकाळी सापडलं.... हत्या की आत्महत्या"... ????

पोलिसांसमोर पण हा एक मोठा प्रश्न होता की.... नेमकं हे हत्या आहे की आत्महत्या.…

पोलीस वरती ह्या केस ला घेऊन खूप दबाव होता.... त्यात इन्स्पेक्टर "वैभव पांचाल" च्या हातात हा केस होता, बातमी मिळाली तशीच घटनास्थळ वर पोचून वैभव ने कारवाई ची शुरवात केली....

बॉडीला तिथून मुर्दाघरात पोचवण्यात आलं... वैभव सगळ्यात आधी सुरज च्या घरी गेला....

"I know sir this is not the right time to talk but... I expect your co-operation please"... वैभव

"Yess i can understand.... तुम्ही विचार तुम्हाला जे काय प्रश्न असेल ते"..... राज नागर खूप दुःखात होते, त्यांच्या बोलण्यावरून ते वैभवला कळत होतं पण तरी त्यांनी उतर द्याचं ठरवलं....

"गेल्या काही दिवसात सुरजचं वागणं कसं होतं... म्हणजे त्यांच्या वागण्यात आधी पेक्षा काही फरक, काही stress किंवा अस काही जे तुम्हाला वेगळा वाटलं".... वैभव

"नाही.... बिलकुल पण नाही, सुरजला कसलाच stress नव्हतं, असणार तरी का.... त्याला कुठल्याच वस्तू ची कमी नव्हती, इन्स्पेक्टर हे sucide नाहीये.... आत्महत्या नाहीये, its a damn bloody murder".... राज नागर

"काल रात्री सुरज कुठे गेला होता".... वैभव

"As usual त्याच्या मित्रांसोबत late night party".... राज नागर

"ठीक आहे... जे काही update असेल ते मी कळवेन तुम्हाला".... वैभव

"इन्स्पेक्टर लक्षात ठेवा.... सुरज नागर माझा मुलगा होता, तो जो कोण असेल, त्याला मी सोडणार नाही".... राज नागर

"जर हे मर्डर आहे.... तर तुम्ही काळजी करू नका, गुनेहगार जो कोण असेल त्याला मी सोडणार नाही".... वैभव

वैभव तिथून... पोलीस स्टेशनला आला....

"विजय.... सुरजच्या मित्रांना बोलावलं का"....???? वैभव

"हो सर.... बसलेत बाहेर"..... विजय

"बरं पाटव एक एक करून"..... वैभव

पहीला मित्र आता आला..... समीर रूपांनी, सुरज चा कॉलेज चा मित्र

"बस.... नाव काय तुझं"..... वैभव

"सर समीर.... समीर रूपांनी".....

"काल रात्री कुठे होता".... वैभव

"सर आम्ही Night - Plus क्लब मध्ये होतो, मी सुरज, शुभम, आणि विशाल".... समीर

"Oook.... सुराजचं कालच वागणं कसं होतं"..... वैभव

"सर normal होता तो खूप.... infact तो खूप खुश होता, कालची पार्टी पण त्यानेच दिली होती, पण माहीत नाही का तो पार्टी च्या मधूनच काय तरी १२.३० ला निघून गेला, त्याला कोणाचा तरी फोन आला.... आणि तो आम्हाला by करून निघून गेला"... समीर

"कोणाचा फोन होता".... वैभव

"सर माहीत नाही, तो काय बोलला नाही".... समीर

"सुरज ने काल party का दिली"....??? वैभव

"सर तो उद्या यूरोपला जाणार होता, buisness deal साठी आणि ही त्याच्या आयुष्यातली पाहिली buisness deal होती म्हणून"..... समीर

"Ooook"..... वैभव

वैभव ने एक एक करून..... सुरज च्या सगळ्या मित्रांसोबत बोलणं केलं, पण सगळ्यांचा एकच statment होता.... त्या सगळ्यात एक common होतं की.... सुरजला कोणाचा तरी फोन आला होता....

वैभव ने club ची CCTV FOOTAGE बघितली आणि विजय ने सुरज च्या मोबाईल चे गेल्या एक महिन्या पासुनचे call records काढले.... त्यात शेवटचा फोन त्याच्या बाबांनी केला होता (राज नागर) ने आणि त्याच्या आधीचा एक नंबर होता, जो suspected होता....

त्या नंबर ची विजय ने पूर्ण डिटेल्स काढली, पण तो नंबर स्वामी राजन नावाच्या एका व्यक्ती च्या नावावर होता, ज्याची मृत्यू १.३० वर्षा आधी झाली होती.....

हे सगळं कळल्यानंतर वैभवला खात्री झाली होती, की सुरज ने आत्महत्या नाही केली, त्याच्या मर्डर झाला आहे, पण प्रश्न होता की का....????

सूरज ला काय गरज पडली की तो पार्टी मधून लवकर निघाला, फोन त्याने असं काय ऐकलं की तो तिथून कोणाला काही न सांगता निघून आला..... ???? ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर वैभव ला शोधायचे होते, ते पण लवकरात लवकर.... कारण शिरीष च्या लिस्ट मध्ये दुसरं नावं होतं..... "समीर रूपांनी"

सुरजच्या मृत्युला दोन दिवस झाले, होते त्याचे घरचे व त्याचे मित्र आधीच shock मध्ये होते तेव्हाच.... समीर ला unknown number वरून कॉल आला....

"जर तुला जाणून घायचं आहे की सुरजला कोणी मारलं तर आज संध्याकाळी ठीक ५.३० वाजता ठाणे कळवा लिंक ब्रीज वर येऊन थांब".... इतकं बोलून शिरीष ने फोन ठेवून दिला....

समीर हे ऐकून घाबरला.... त्याला भीती वाटत होती पण सोबतच त्याला हेही जाणून घ्याच होतं की त्याच्या मित्राला कोणी मारलं आणि का.... आणि त्या साठीच त्याने ठरवलं आणि संध्याकाळी तो ब्रिज वर पोचला...

ब्रिज वर पोचून त्याने गाडी थांबवली, तेव्हाच त्याच्या फोन वाजला.....

"Hello".... समीर

"वेळेवर आला"..... शिरीष

"हो... कोण आहेस तू, मला आणि सुरजला कसं ओळखतो.... कोणी मारलं त्याला"... समीर

"अरे.... अरे थांब थांब जर.... धीर धर, लय घाय आहे तुला, जाणून घ्याची तर ठीक आहे तुला पण तुझ्यामित्रा कडे पाठवतो".... शिरीष

"म्हणजे".... ???? समीर

"म्हणजे.... तुम्ही जे कांड केला होता ना १३०३ मध्ये माझ्याकडे त्याचे सर्व proof आहे... तुझा कडे दोन चॉईस आहे, मी हे proof पोलिसांना देऊन टाकतो, मग आयुष्यभर जेल मध्ये मर.... किंवा मी सांगतो तसं कर"... शिरीष

"काय.... कसलं कांड, काय proof".... समीर १३०३ ऐकून आधीच घाबरला होता, बोलताना त्याची बोबडी वळत होती

"शाणा बांतोय बाळा.... ठीक आहे पोलिसांसमोर जे सांगायचं आहे ते सांग".... शिरीष

"नाही नाय.... बघा तुम्ही जे कोण आहात तुम्हाला जितके पैसे पाहिजे मी देतो, पण मला जाऊद्या, please"..... समीर

"पैसे नको रे मला, जीव हवा आहे तुझा... बघ जर पोलिसांनी पकडलं तर एवढं मारतील की तुला सहन नाही होणार वरतून त्या नंतर जेल मध्ये सडशील, इतकं कष्ट घेण्यापेक्षा.... गप गाडीतून उतर आणि ब्रीज वरून खाली उडी मारून ताक"..... शिरीष

"नाही.... मी असं नाही करणार"..... समीर

"ठीक आहे.... your choice, जर असा मेला असता तर लोकांना वाटलं असत की sucide आहे तुझा कांड पण कोणाला कळलं नसत आणि.... पण जाऊदे मी हे proof देऊन टाकतो पोलिसांना, त्यानंतर तुझी... तुझ्या बापाची काय इजत रहाणार..??? देवा माफ कर रे मला"..... शिरीष

समीर विचारात पडला.... तो रडायला लागला, त्याला काय सुचत नव्हतं, शेवटी त्याने डोळे पुसले आणि शांत झाला, समीर फोन कानाला लावून गाडीच्या बाहेर उतरला.....

समीर ने शिरीषला समजावण्याचा खूप प्रयत्न केलं पण शेवटी समीर ने हार मानली...

"शाबास..... आता आधी फोन खाली फेक आणि मग.... रडतोय कशाला, हसता हसता जा, शेवटी आत्महत्या करतोय तू".... शिरीष

समीर ने फोन ठेवला आणि ब्रिजच्या खाली फोन फेकला पाण्यात आणि मग डोळे बंद करून स्वतः पण पाण्यात उडी मारली त्याने.....

शिरीष त्याच ब्रिज जवळ एक बाजूला गाडीत नीला सोबत बसला होता.... नीला ने समीरला वरतून उडी मारताना पाहून आनंदाचा स्वाक्ष घेतला.....

"नीला.... हा तर एक नंबर चा घाबरट होता, म्हणजे एवढा घाबरला की मला काय करायची गरज पण पडली नाही".... शिरीष

नीला हे ऐकून हसायला लागली..... "हो शिरीष आणि ही भीती असली पाहिजे ह्याच्या सारख्या प्रत्येक मुलाचा मनात गुन्हा करण्याच्या आधी ही भीती असली पाहिजे, मनात हा विचार आला पाहिजे".......

--------------------------------------------------------- To Be Continued -----------------------------------------------------------------