लग्नाआधीची गोष्ट
(भाग 15)
सपनाच्या घरी पोहोचल्यावर आपल्या मुलीला बघून तिच्या घरच्यांना खूप बरे वाटले. सूरजने निशा व काकूंची म्हणजेच सपनाच्या आईची ओळख करून दिली.
कारण त्यांच्याच रूपाने त्याला आई वडील मिळाले होते जेव्हा त्याच्याकडे कोणीच नव्हते. सपनाच्या आईने सूरजचे आभार मागितले. जाता जाता सपनाला सूरजने दोन गोष्टी दिल्या. डायरी व लॉकेट. सूरज सपनाला म्हणाला, "मी हे फेकून किंवा जाळून टाकू शकलो असतो, पण मला कोणाच्या प्रेमाचा अपमान करायचा नव्हता. " जपून रहा, काळजी घे.
नंतर सूरज व निशा दोघे तेथून निघून गेले.
घरी जाता जाता
घरी जाता जाता सूरज निशाला म्हणतो, "चल तूला एक ठिकाण दाखवतो. गाडी 80 ते 100 च्या वेगाने धावत असते. सूरज निशाला म्हणतो, "तुला अस वाटत असेल ना सपना माझ्या ओळखीची होती म्हणून आम्ही तिची मदत केली, तिच्याजागी कोणीही असते तरी त्यावेळी आम्ही तिला मदत केलीच असती. तिच्या जागी दुसर कोणी असत तर फक्त तिला घरी न आणता आम्हाला पोलिस कडे जाव लागल असते. पण ती ओळखीची असल्याने तिला घरी न्यावे अस मित्रांनी मला सुचवलं.
मला माझा भूतकाळ पुन्हा पुढे आणायचा नव्हता, पण तिची अब्रू ही माझ्या भूतकाळपेक्षा महत्वाची होती. "आम्ही त्या दिवशी तेथे नसतो तर काल अजुन एक निर्भया हत्याकांड किंवा हैद्राबाद सारखाच गुन्हा घडायला वेळ नसता लागला.
एखाद फुल आवडत म्हणून त्याला फांदीवर बघून आनंद घेणारे वेगळे आणि ते फुल आपल्याला पाहिजे म्हणून त्याचा चोळामोळा करून त्याचा वास घेण वेगळे.
प्रत्येक मुलीला भाऊ असेल व तो संकटकाळी धावून जाईल याची वाट बघत बसण्यापेक्षा त्या क्षणापुरता तिचा भाऊ किंवा मित्र होणे माझ्या दृष्टीने काही वाईट नाही", अस म्हणत म्हणत सूरज ची गाडी रंकाळा या ठिकाणी आली. दोघे गाडीतून खाली उतरतात व मोकळ्या जागी हवेचा आस्वाद घेऊ लागतात. दोघे जण भिंतीला टेकून संध्याकाळच्या वेळी आजूबाजूला असलेल्या जोडप्यांना बघून जुने दिवस आठवून गालातल्या गालात हसू लागतात.
अचानक समोर कोणीतरी दिसल्यामुळे निशा सूरज कडे बघून म्हणाली,"
माझ्या सगळ्या शंकाच निरसन झाल पण एक गोष्ट अजून उलगडली नाही ती त्या जोगतीण ने दिलेल्या भविष्याची." सूरजला पण ती गोष्ट लक्ष्यात यायला वेळ लागला नाही त्यांच्या दिशेने तीच जोगतीण येत होती.
हिरवीगार लुगडे नेसलेली व कपाळाला मळवट फसलेली एक जोगतीण त्यांच्या समोर उभी होती. जोगतीण ने पुन्हा एकदा हात आपल्या टोपलीत घातला व गंध लागण्यासाठी हात पुढे केला. सूरज ने हात आडवा करत तिला थांबायला लावले व म्हणाला, "नवीन काही सांगू नका प्लीज आधी पण खूप सांगितल आहे तुम्ही.
"जोगतीण पण सूरजचा चेहरा बघून चकित झाली. कदाचित तिला त्याचा चेहरा लक्षात असावा. जोगतीण हसून म्हणाली, "काय मग झाल का खर? "
सूरज निशाकडे बघत म्हणाला, "कशाच खर?" सगळे उलट झालय. "
जोगतीण हासत हासत म्हणाली, "बाळा माझ्या आईने कोणाचच कधी वाईट केल नाही आणि करणार नाही (आई म्हणजे टोपलीत ठेवलेली तिची देवी ). तुझ्या घातलेल्या कोटा वरुण व तुझ्या बायकोच्या राहणीमान बघून आणि त्या तिथे उभ्या असलेल्या गाडीवरून तर कोणीही सांगेल की तू मोठा माणूस आहेस.
निशा हासत म्हणाली," बरोबर आणि दुसरी गोष्ट पण खरी निघाली - ही मुलगी हट्टी आहे एखादा मुलगा आवडला तर त्याच्यासाठी सगळे सोडून द्यायला तयार होईल, पण तिसरी गोष्ट मात्र चुकली तुमची. "
जोगतीण आश्चर्याने म्हणाली, "सुखाने संसार कराल हीच ना? " सूरज व निशा यांना अजून ही गोष्ट लक्ष्यात आहे हे बघून आश्चर्यचकित होऊन मान हलवतात.
जोगतीण परत जाण्यासाठी वळते व मागे वळून म्हणते," तुम्ही दोघेच सुखाने संसार कराल अस थोडीच म्हणाले होते, फक्त सुखाने संसार कराल असच म्हणाले होते.
" आणि तुमच्याकडे बघून तरी तुमचा व बाई साहेबांचा संसार सुखात असेलच असे वाटते. जोगतीण गेल्यानंतर निशा सूरजला म्हणते की मला तुला काल आल्या आल्या काहीतरी सांगायचे होते. सूरज मान हलवून तिला परवानगी देतो. नंतर निशा सूरजचा हात हातात घेऊन आपल्या पोटावर ठेवते. आणि आपण आई बनणार असल्याचे सांगते.
हळूहळू सूर्य पश्चिमेकडे मावळतीला लागतो, इकडे पण एक प्रेमाचा संसार उमलायला नुकतीच सुरुवात झालेली असते…….
*** समाप्त ***