kadambari Premaavin vyarth he jivan Part- 14th in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १४

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १४

कादंबरी- प्रेमाविण व्यर्थ ही जीवन

भाग-१४ वा

-------------------------------------------------------------------------------

सर्वांची उत्सुकता न ताणता अनुशाने तिच्या मनात काय आणि कसे ठरवले आहे हे सांगण्यास

सुरुवात केली ..

अभी सुद्धा उत्सुक होता हे ऐकण्यासाठी कारण अनुषा तिच्या कॉलेजच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून कॉलेजसाठी प्रोजेक्ट करणार आहे

..इतकेच त्याला माहिती होते .

आज पहिल्यांदा अनुषा नेमके काय करायचे आहे तिला .. सांगणार हे ठीक आहे ..!

पण, या साठी तिला आपल्या ताईची मदत कशी काय अपेक्षित आहे ?

हा प्रश्न त्याला पडला होता .

ताईने सर्वांसाठी खाण्याचे पदार्थ बाहेर आणून ठेवीत म्हटले ..

अभी आणि अनुषा –आता आपण ..खाता खाता बोलू ..

आणि बोलता बोलता खाऊ या म्हणजे .छान होईल .!

अभी अनुशाला म्हणाला - बघ ,

समोरच्या डीश मधले खूप सारे पदार्थ ,हे आज वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतहा ताईने

घरी बनवले ,कारण जीजूची फर्माईश .

हे सगळे पाहून अभिच्या ताई सुगरण आहेत हे अनुशाला जाणवले ..म्हणजे यांना सगळ्या गोष्टींची आवड आहे ,

नवीन काही करू पहाणार्याला यांच्या कडून अडथळे नक्कीच होत नसतील ..आणि चांगल्या गोष्टी साठी

त्या प्रोत्साहन देनार्यापैकी आहेत असा तिला अंदाज वाटू लागला

म्हणजे .. आपल्या प्रोजेक्टचा एक माध्यम म्हणून उपयोग करणार कसा आणि का करणार आहोत आहोत हे ऐकून

त्यात अभिच्या ताईंना फारसे गैर नक्कीच वाटणारे नाही.

ती म्हणाली ..ताई

माझ्याबद्दल अभिने काय काय सांगितले आहे हे मला माहिती नाहीये ,पण,मी माझ्याबद्दल सांगते की-

मी पत्रकारिता क्षेत्रात काम करते आहे , मिडीया हे खूप मोठे ,लोकप्रिय असे माध्यम आहे ..मी गेली काही वर्षे या क्षेत्रात काम करते ....

आपल्या समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्री –पुरुषांच्या ,वेगळ्या आणि विशेष अशा व्यक्तींच्या

जीवन-गाथा ,संघर्ष-गाथा , त्यांच्या सार्वजनिक आणि पारिवारिक जीवन-कथा “ हे माझे लेखन विषय आहेत.

आपल्या स्थानिक टीव्ही वाहिन्या ,पेपर्स ,यामधून मी घेतलेल्या मुलखाती ,लेख सतत येत असतात .

यातल्या तुम्ही पाहिल्या आहेत की नाही ? याबद्दल मला माहिती नाहीये .

ताईंनी अनुशाचे बोलणे थांबवीत म्हटले ...!

अनुषा -आत्ता आठवले ..मी तुझे लेख वाचले आहेत ,काही मुलाखती पण पाहिल्यात ..

पण टीव्हीवर तू खूप वेगळी दिसतेस ..

आणि आता माझ्यासामोरची तू..!

बाप रे ती तूच आहेस !

मी नाही ओळखू शकले तुला ..

फक्त आवाज तेव्हढा ऐकल्यासारखा वाटत होता ..!

एक मात्र नक्की हं..अभी ..

माझ्या समोर बसलेली अनुषा ..साधी आणि सुंदर दिसणारी .

.मला आवडली बरे का

छान आहे तुझी निवड ..!

आणि अनुषा .आमचा अभिजित सुद्धा खूप चांगला आहे..

हे आता मी तुला वेगळे सांगायची गरज नसेल ना !

अनुशाने ताईकडे हसून पाहिले ..जणू..

तुमच्याशी मी सहमत आहे बरे ताई !..असे तिला म्हणयचे होते.

ताई म्हणाल्या ..अनुषा आपण थोडा ब्रेकच घेऊ या ..

आता दहा मिनिटात ..अभिचे जिजाजी येतील ,

त्यांचे चहापाणी झाले की ..

आपण तू जे सांगणार आहेस ते ऐकू या..

हो ताई ,चालेल की ..

जीजूंना पण अनुषा काय करणार आहे ..हे माहिती करून घेणे नक्कीच आवडेल

अभिने अनुशाच्यावतीने जणू ताईला सांगून टाकले.

ताई ..माझा भाचा ..आदित्य दिसत नाहीये ..त्याला नाही दिली का सुट्टी ? आईच्या हैप्पी बर्थ डे ची ?

नाही रे - ताई म्हणाली

तो नेहमीप्रमाणे शाळेत ,येईल संध्याकाळी ..शाळा आणि क्लास आटोपून .

अभी –आमच्याकडे बर्थ डे.. साजरा वगेरे होत नसतो ..

आज तू एक आलास आठवणीने .या अनुशाला घेऊन ..म्हणून सेलिब्रेट केल्यासारखे वाटले ..

बाकी .तुझ्या जीजूंना असे समारंभ आवडत नाहीत हे तुला माहिती आहेच.

आज आमच्या संस्थेकडून ..अनेक नव्या सोसायट्यांमध्ये नवी झाडे लावण्यासाठी आम्ही रोपटी देऊन आलोत.

सकाळी-सकाळी तुझे जीजू आणि मी प्रभातफेरी करून आलो .

खरे सांगू ..हॉटेल मध्ये जाऊन आपणच आपला आनंद मिळवण्यापेक्षा हा सार्वजनिक आनंद

देण्याची तुझ्या जीजुंची कल्पना मला महत्वाची वाटते .

अभी अनुशाला सांगू लागला – अनुषा - ..जीजुंचे निसर्ग-प्रेम , पर्यावरण –जागृती मधले त्यांचे कार्य .

त्यांच्या या कार्यात ताई सुद्धा सक्रीय कार्यकर्ती आहे. पण ,ही दोघ ही

कधीच कुणाजवळ आपण काय करतो हे कधीच सांगत नाही.

कुठे ही प्रकाशझोतात न येता , गाजावाजा न करता निष्ठेने कार्य करणारा जीजूंचा ग्रुप ,त्यांचे

कार्यकर्ते , त्यांची शाळा आणि पर्यावरण –रक्षण करणारी संस्था ..या सगळ्या गोष्टी ..यांचे

कितीही कौतुक केले तरी कमीच आहे.

अभिचे बोलणे ऐकून ..अनुषा म्हणाली ..

अरे वा ..अशा आगळ्या-वेगळ्या जीजूंना आज समक्ष भेटण्याचा छान योग आलाय.

ताई –तुम्हाला सांगते ..अहो माझे कार्य-क्षेत्र असे आहे की ..ज्यातून तुम्ही लोकांच्या समोर येता ,

सेलिब्रेटी होता . या गोष्टीसाठी लोक काय काय आयडीया करीत असतात ..हे मी खूप जवळून

अनुभवते आहे .

आमच्यावर लेख लिहा , माझी मुलाखत घ्या ..! असे हात जोडून सांगणारे कितीतरी लोक

माझ्याकडे सतत फोन करतात , माझ्या अनेक संपादकांना सांगतात , तुम्ही अनुषामैडमला

सांगा की साहेब एकदा माझी पण मुलाखत घ्या म्हणून ..!

पण मी अशा “चमको “ लोकांना माझ्या जवळ फिरकू देत नसते .

मी स्वतहा माध्यमातून वेगळ्या व्यक्तींच्या बद्दल माहिती मिळवते , त्यंना समक्ष भेटून

मगच त्यांच्या बद्दल लिहिते ..असे हटके काम करणे मला खूप आवडते .

पण, ताई एक सांगू का ..

जीजुंच्या बाद्दल त्यांच्या कार्याबद्दल .मी कसे काय कधीच ऐकले नाहीये ..

इतके मोठे कार्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल मला माहिती नसावी , हे चांगले नाही !

अनुशाला ताई म्हणाल्या – हा जीजूंचा स्वभाव .. आपण बरे आणि आपले काम भले ..

त्यांची संस्था ,शाळा , निसर्ग –सानिधध्यात भटकंती ..अशा सततच्या कामात त्यांना

मी काय काय करतो ? हे कौतुकाने कुणाला सांगण्यास वेळच नसतो .

अनुषा ..अशा स्वभावाचे जीजू काही एकटेच नाहीत ..आपल्या भवताली बारकाईने

पाहिले तर .असे ..निर्लेप मनाने आयुष्यभर कार्य करणारे अनेक लहान –थोर माणसे

दिसतील , आपल्याला तशी नजर असली पाहिजे ,मग असे नक्कीच दिसतील.

अनुशाला राहवले नाही ती म्हणाली –

अरे वा ताई ..तुम्ही तर किती महत्वाचे अगदी सहज सांगत आहात , याचीच तर गरज

आहे, तरच आमच्या सारख्या नव्या पिढीसमोर चांगले आणि उदात्त व्यक्ती- आणि त्यांचे

कार्य ..आदर्श –उदाहरण म्हणून येण्यास मदत होईल.

अभिजित ..आपल्या संस्थेच्या कार्यात तुझा उत्स्फूर्त सहभाग ..आणि तुझ्या भावना ..

हे सगळ मला वाटते ..या ताईंच्या आणि जीजुंच्या सहवास संस्काराचा परिणाम आहे.

अभी म्हणाला – अनुषा –यस ,

तू बरोबर ओळखलेस ..या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या समोर ताई आणि जीजू आदर्श आहेत.

ताई म्हणली – अभी आणि अनुषा ..या सगळ्या गोष्टी ..शेवटी तुमच्या मनात असतील तरच

होतात ,

नुसत्या पाहण्याने , कुणाच्या बोलण्याने ..थोडाफार प्रभाव नक्कीच होतो ,शेवटी आपले मन

तयार असेल तरच या गोष्टी आपल्या हातून होत असतात .

गेट समोर बाईक थांबल्याचा आवाज आला ,ताई म्हणाली .अभिचे जीजू आले .

भटकंतीचे वेड असणाऱ्या ,फिरस्ती माणसासारखा ड्रेस, डोक्यावर मोठी हैट,

गळ्यात मोठ्ठा कॅमेरा , पाठीवर प्रवासी bag..पायातले शूज ...गोर्यापान जीजूंना काळीभोर दाढी

खूप छान शोभून दिसते आहे..

अनुषा जीजुंच्याकडे पाहतच राहिली .

आत आलेल्या जीजूंना अभी आणि अनोळखी अनुषा पाहून क्षणभर कळलेच नाही,

ताई त्यांना म्हणाली --

अहो ..ही कोण आहे नवी पाहुणी ? माहितीये का ..

आपल्या आभीची मैत्रीण ..अनुषा ..

माझ्या बर्थ –डे निमित्त अभिने खास तिला आपल्या भेटीसाठी आणले आहे.

जीजूंनी अभिचे अभिनंदन केले ..

तुला भेटून आनंद झाला अनुशा , आमच्या घरात तुझे स्वागत आहे.

अभी आणि अनुषा दोघांनी जीजूंना ..थान्क्स म्हणाले.

ताईने जीजुंच्या हातात फराळाची डीश देत म्हटले ..

आता ही अनुषा स्वतः बद्दल काही सांगणार आहे, त्याबद्दल आपण ऐकूया ..

आणि तिची अपेक्षा आहे की .आपण तिला या तिच्या कार्यात मदत करावी.

जीजू म्हणाले ..अनुषा तू तुझी कल्पना संग, त्या आधीच मी तुला आश्वासन देतो की आमच्या कडून

तुला फुल सपोर्ट असेल.

ताई ,जीजू आणि अभी –

मी मास –कम्युनिकेशन या विषयात पी जी .डिप्लोमा करते आहे ,आता हे शेवटचे सेमिस्टर आहे.

यात मला सामजिक क्षेत्रातील ..एखाद्या नामवंत व्यक्तिमत्वावर त्यांच्या प्रत्यक्ष्य मुलाखतीवर

आधारित Audio –VDO - एक सक्सेस स्टोरी ..आणि आत्मकथन “वाटावे असे प्रोजेक्ट करायचे

आहे .. आणि यासाठी येते तीन महिने मला तुम्हा सर्वांचे कौटुंबिक पातळीवर सहकार्य हवे आहे .

अभी म्हणाला ..

अनुषा – तुझे कॉलेज प्रोजेक्ट ..तू खुशाल कर, पण, त्यासाठी असे फमिली –रिलेशन्स .या मध्ये

कसे काय येतात ?

ही मात्र मला न समजणारी गोष्ट आहे..

अभिची ताई म्हणाली ..अरे बाबा , तिला अगोदर सांगू तर दे ,मग आपण ठरवू या ..

अनुषा जे काही करणार आहे..त्यात आपला काय रोल असणार ,आणि तिच्या या प्रोजेक्टला ,

कार्याला आपण किती महत्व द्यायचे ,कि महत्व द्यायचे नाही ..हे आपण नंतर ठरवू .

जीजू पण अभिला म्हणाले ..

अरे तिला तिचे प्रोजेक्ट तर सांगू दे..

सांग अनुषा –

सक्सेस स्टोरी ऑफ ए कॉमन मैन.. आणि आणि पारिवारिक आत्मकथन “

हा माझा विषय आहे ..!

जीजू म्हणाले ..विषय तर छान आहे.. मी सुचवू का तुला काही नावे ?

जीजू- अहो, आम्ही विद्यार्थ्यांनी कुणावर हे प्रोजेक्ट करायचे ? हे अगोदर ठरवून मग,

फाईल सबमिट करायची होती ,आणि प्रिन्सिपल सरांनी मंजुरी दिली की ..तीन महिन्यात

हे प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहे.प्रिन्सिपल सरांनी तसे पत्र्पण दिले आहे आमच्या नावाने

ताई आणि जीजू दोघांनी एकदमच विचारले ..

तू कुणावर हे प्रोजेक्ट करायचे ठरवले आहे अनुषा ?

प्रसिध्द उद्योगपती ..श्री सागर देशमुख “यांची सक्सेस स्टोरी ,आत्मकथन मी लिहिणार आहे.

माझा त्यांचा परिचय नाहीये , मी कोण आहे हे त्यांना माहिती नाहीये , खरे तर मी यांना

पाहिलेले पण नाहीये ..

तरी ..अभिच्या बोलण्यात त्यांच्याबद्दल मी जे ऐकले ,जे मला माझ्या मना पर्यंत पोंचले ..

त्यावरून मी स्वतःशी ठरवले ..

बस ..सागर देशमुख यांच्यावर प्रोजेक्ट करायचे आणि या तीन महिन्यात ..त्यांना पटवून

द्यायचे ..

सागर देशमुख ..आयुष्यात ..आपली माणसे आणि त्यांचे प्रेम हीच खरी आपली संपत्ती आणिखरी

कमाई असते “

आणि मी त्यांना या दरम्यान एक कोलेज विद्यार्थिनी म्हणूनच भेटणार ,बोलणार ,

अभी आणि मी ..आमच्या मैत्रीच्या नात्याबद्दल एक अक्षर त्यांना कळू द्यायचे नाहीये मला .

अभी नेहमी म्हणतो ..

आमच्या वास्तूचे नाव ..प्रेमालय “आहे, पण, यात प्रेमच नाहीये ..!

ताई..हे प्रेम .ही माणसे एकत्र आणायची आहेत मला ..

आणि हे पूर्ण झाले तरच ..

मिसेस अनुषा अभिजित देशमुख ..म्हणून प्रेमालय मध्ये येईन..

असे आज तुमच्या समोर हे सांगते आहे.

अभिजित ,त्याची ताई ..अनुशाचे शब्द ऐकून थक्क झाले, नि:शब्द झाले ..

अरे बाप रे , हे काय भलतेच करू पाहते आहे अनुषा ,

फार मोठी दिव्य—परीक्षा देऊ पाहते आहे ही तर .

जीजू मात्र म्हणाले ..

अनुषा ..तुझा हेतू खूप उदात्त आहे, मला आवडला ..

आम्ही दोघे सदैव तुझ्या पाठीशी आहोत ,तुला कार्य-पूर्तीसाठी शुभेच्छा

यशस्वीभव !

अभी –तुझे अभिनंदन .. अनुषा सारखी साथी तुला मिळाली ,यु आर लकी .

अभिची ताई आज खूप खुश झाली होती ..!

आपला भाऊ वाढदिवस लक्षात ठेवून भेटायला आलाय

आणि सोबत अनपेक्षित अशी सुंदर गिफ्ट ..अनुशाच्या रूपाने दिली ..

आणि जास्त आनंद याचा आहे की -

आपल्या माहेराच्या घराचे धागे नव्यान जुळावेत अशी इच्छा असणारी एक व्यक्ती आहे ही.

ताईने अनुशाला जवळ घेत म्हटले ..

अनुषा –खूप खूप थांक्यू .

मिसेस अनुषा अभिजित देशमुख ,होण्यासाठी तुला आमचे आशीर्वाद.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग – १५ वा लवकरच येतो आहे ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ ही जीवन ..

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------