ती माझ्यासमोर तशीच उभी होती ..मी आता तिची प्रत्येक हालचाल टिपू लागलो ..तिच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझापही आवडू लागली ..तिच्या चेहऱ्यावर अस्खलित तेज होत ..ती गोरी तर होतीच पण त्या तेजाने आणखी चेहरा खुलून दिसत होता ..तिच्यापासून नजरसुद्धा हटायला तयार नव्हती जणू तिला आयुष्यभर साठवून घ्यायची इच्छा नजरेने व्यक्त केली होती ..मी तिच्याकडे एकाग्र होऊन पाहताना सोनाली म्हणाली , " अभिनव झालं की रे बघून तिला नाही तर तुझीच नजर लागेल बघ आणि आपला कलास आहे आता तेव्हा चल बघू "
मी नाराज होऊन म्हणालो , " ए नाही ना थाम्ब हा थोडं !! बघू दे तिला मग जाउया की काय घाई आहे एवढी.."
आणि ती शांतपणे माझ्या बाजूला उभी राहिली ...
मी सोनालीला थांब म्हणालो पण यावेळी मात्र तीच आपल्या मित्रांसोबत कलासला निघून गेली त्यामुळे सोनाली गालातल्या - गालात हसू लागली ...मी तेवढ्याच रागाने तिच्याकडे बघितलं आणि तिने हसन बंद केलं ..शेवटी तिने हाताने आता तरी जाउया असा इशारा केला आणि मी कलासला गेलो ..
आज दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवस होता त्यामुळे सर्व शिक्षकांनी शिकविण्यापेक्षा मुलांचे पेपर कसे गेले याची विचारपूस सुरू केली ..सर्वच पेपर छान गेले असल्याचे सांगत होते ..पण माझं कलासमध्ये मुळीच लक्ष नव्हतं ..आज मी कुठल्यातरी वेगळ्याच जगात वावरत होतो ..मी याआधी असा कधीच वागलो नव्हतो तरीही ते वागणं मला फार आवडू लागलं ...क्लास करून कॅन्टीनला गेलो तरीही मी आज काहीच बोललो नव्हतो ..सर्व मित्र माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते पण मी मात्र माझ्याच जगात हरवलो होतो आणि माझी ती स्थिती पाहून सोनाली हसत होती ..
कॉलेज संपवून घरी गेलो तेंव्हा सायंकाळचे 6 वाजले असावेत ..नेहमीप्रमाणेच फ्रेश होऊन बेडरूमला आलो ..आई दररोज सायंकाळी सिरीयल पाहत बसायची ..तसा मी तिला त्याबद्दल कधी त्रास दिला नाही पण मी टी. व्ही . पाहायला बसलो की तिच्या सिरिअल्स मात्र बंद व्हायच्या ..आज माझा अभ्यास करण्याचा अजिबात मूड नसल्याने टी .व्ही .पाहायला बसलो तसच आईने नाक मुरळण्यास सुरुवात केली ..आज कितीतरी वेळेपासून मी टी .व्ही . पाहत होतो तरी आईच्या आवडीचे चॅनल मी बदलले नव्हते त्यामुळे ती शॉक होऊन माझ्याकडे पाहत होती ..त्यातला त्यात त्यामध्ये घडणाऱ्या रोमँटिक सीन्स पाहून माझ्या चेहऱ्याचे हावभाव बदलू लागले होते हे आईच्या लक्षात येऊ लागलं ..बाबाही एव्हाना घरी परतले होते ..आईने जेवणाचे ताट वाढायला घेतले आणि आम्ही जेवण करायला बसलो ..आईने वाढल्यानंतर बाबांनी जेवणाकडे संपूर्ण लक्ष दिलं होतं तर मी खातानाही गालातल्या गालात हसत होतो . जणू तो क्षण माझ्या आयुष्याचा एक भागच झाला होता आणि मी त्यात हरवल्या गेलो ..माझं आईकडे लक्ष नव्हतं पण बहुदा आज ती माझ्याकडेच पाहत होती ..
" अभि प्रेमात पडलास की काय ? " , आईचा प्रश्न ...
तिचा प्रश्न एकताच मी गोंधळलो आणि ठसका बसला ..आईने पाण्याचा ग्लास समोर केला ..मी पाणी पिऊन घेतलं पण आईने आताही माझ्याकडे पाहून हसन बंद केल नव्हतं ..मी मात्र जाणूनच तिच्या प्रश्नाचं उत्तर देण टाळलं ..तशा ती माझ्या प्रत्येक हालचाली टिपू लागली ..जणू ती मनातल्या मनात म्हणत असेल बेटा मै भी तेरी मा हु ..इतना तो समजही सकती हु तुझे ..आईच्या नजरेला नजर देणंही आता कठीण होऊ लागलं म्हणून जेवण लवकर आटोपून बेडरूमला गेलो ..तिथेही तशीच स्थिती ..आईनेही सर्व आवरलं आणि स्वतःच्या रूमकडे जाताना म्हणाली , " लवकर झोप रे बाळा ..नाही तर या दिवसात लवकर झोप लागत नाही .. " मी आईला गोड स्माईल दिली आणि लाईट ऑफ करून बेडवर पडलो ..
बेडवर पडलो तरीही झोप काही येईना ..सकाळी घडलेला तो प्रसंग जसाच्या तसा समोर उभा होता ..तीच ते बिस्कीट भरवंन असो की तीच वागणं असो ..त्या प्रत्येक गोष्टीने मला वेड लावलं होत ..आज झोपही जणू कुठेतरी पळाली होती आणि मला त्या क्षणांच्या सहवासात सोडून गेली ..मला इकडे झोप येत नव्हती तर दुसरीकडे दिवस केव्हा उगवेल आणि तिला पाहता येईल याची आतुरता वाटू लागली होती ..शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर झोपी गेलो ..
दुसरा दिवस सकाळी 9 वाजले होते ..शॉवर घेऊन बाहेर निघालो ..आईने आधीच कपडे इस्त्री करून ठेवले होते ..तेव्हा ते परिधान केले आणि आरशासमोर उभा झालो ..तस आरशात स्वताला रोजच पाहायचो पण आज काहीतरी विशेष होत ..केसांना नीट करण्याचा बराच प्रयत्न करत होतो पण मनाला समाधान काही मिळत नव्हत ..पुन्हा एकदा केसांना थोडं पाणी लावलं आणि केस नीट केले ..दररोज टाय बांधताना नाकी नऊ यायचे पण आज मात्र फार आनंदाने बांधला होता ..स्वतःलाच कितीतरी वेळा आरशात बघून झालं होतं पण तरीही काहीतरी अपूर्ण असल्याचं जाणवत होतं ..तयार होण्याच्या चक्करमध्ये अर्धा तास उलटून गेला हेसुद्धा कळाल नाही .नंतर आईच्या आवाजाने भानावर आलो ..तसाच ब्रेकफास्ट करण्यासाठी डायनिंग टेबलकडे वळालो . तसा मी नेहमीच खाण्यासाठी नखरे करायचो पण आज संपूर्ण नाशता संपवला ..हे पाहून आई सरप्राइज झाली होती ..लगेचच बॅग भरून मी कॉलेजकडे निघालो ..एक तर मला आधीच निघायला उशीर झाला होता त्यात ट्रॅफिकनेसुद्धा मूड खराब केला . शेवटी कसतरी कॉलेज गाठलं ..
गाडीवरीउन उतरलो ..एकदा रुमालने चेहरा साफ करू घेतला आणि गाडीच्या आरशात बघून केस नीट केले आणि कलासकडे जाऊ लागलो ..आज मी फारच खुश होतो ..पार्किंगमध्ये माझी नजर फक्त तिलाच शोधत होती तरीही ती कुठेच दिसत नव्हती ..हळूहळू पावले कलासच्या दिशेने निघाली तरीही डोळ्यांनी तिचा शोध घेण्याचे थांबवले नव्हते ..आता कलासपासून फक्त 40 पावले अंतरावर होतो आणि समोरच दृश्य पाहून राग अनावर होऊ लागला ..आज आमच्या कलासमधल्या मुली तिच्या कलासच्या मुलींची रॅगिंग घेत होत्या ..त्यात तीही होती ..ती मागे होती पण ती या सर्वांमुळे फार घाबरली होती..काही वेळात आपलाही नंबर येईल आणि आपल्याला रॅगिंगला समोर जावं लागेल याची भीती तिच्या चेहऱ्यावर सतत दिसू लागली ..मी जड पावलांनी तिकडे वळालो ..रागाचा पारा फार चढला होता तरीही स्वताला सावरण्याचा प्रयत्न करू होतो ..हळूच तिच्या समोरून पावले टाकत वैष्णवीसमोर उभा राहिलो ...
" वैष्णवी शेम ऑन यु यार ..सिनियर तुमच्यासोबत असे वागले म्हणून तुम्हीही आपल्या जुनीयरसोबत असच वागणार आहात का ..तुम्हाला नाही माहिती का किती त्रास होतो त्याचा ? ..तरीही तसेच वागणार आहात का ?? " ...
माझे डोळे रागाने लालभडक झाले होते ..माझ्या बोलण्याने वैष्णवीचा चेहरा पडला होता शिवाय माझ्या सर्व कलासमेंट्स तोंड पाडून माझ्याकडे पाहू लागल्या ..मलाही त्याबद्दल वाईट वाटलं त्यामुळे आता स्वतःच हळू आवजात म्हणालो , सोडा ग त्यांना आणि हो सॉरी वैष्णवी सर्वांसमोर रागावण्यासाठी " .
वैष्णविलाही तिने केलेल्या गोष्टीच वाईट वाटलं ..ती मला सॉरी म्हणत कलासला निघून आली ..माझाही मूड आता फार खराब झाल्यामुळे मी मागे न पाहताच सरळ कलासमध्ये निघून गेलो ..काही क्लास अटेंड केले पण शिकण्यात मन लागत नव्हतं त्यामुळे कुणालाच न सांगता घरी परतलो ..आईही मला अस पाहून गोंधळली होती पण तिने मला काहीच विचारलं नाही ...शेवटी दुपारी शांत झोप घेतली आणि राग शांत झाला ..
अलीकडे सर्व काही बदलू लागलं होतं ..मुळात मी प्रेमात पडलो आहे की हे केवळ आकर्षण आहे या प्रश्नाचं उत्तर आताही शोधन गरजेचं होतं ..हो पण ती समोर असली की फार आनंदी असायचो ..तिचा येण्याचा वेळही आता मला माहित झाला होता त्यामुळे अगदी त्याच वेळी तिच्या कलाससमोर एका कोपर्याला उभा राहायचो पण ती मात्र माझ्याकडे लक्ष देत नसल्याने फारच वाईट वाटत होतं ..सकाळी तिलाच पाहून दिवसाची सुरुवात व्हायची तर सायंकाळी तिला पाहूनच घरी परतायचो ..आता हे रोजच होऊ लागलं होतं पण तरीही तीच माझ्याकडे लक्ष गेलं नव्हतं त्यामुळे स्वतःवरच रागावू लागलो होतो ...
आज मी कॉलेजला लवकरच आलो होतो त्यामुळे स्वतःच्याच विचारात कलासमध्ये एकटा बसून होतो ..तेवढ्यात सोनाली आतमध्ये आली ..तिने गुड मॉर्निंग विष केलं तरीही मी तिला उत्तर दिलं नव्हतं ..
" ए हिरो काय झालं असा का बसून आहेस ? " , ती म्हणाली ..
" काही खास नाही बस थोडा मूड खराब आहे " , मी उत्तर दिलं ..
" का ? काय झालं ? " , तिने पुन्हा एकदा विचारलं ..
बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात काही गोष्टींनी घर करून ठेवल होत शिवाय सोनाली एकमेव होती जी या कामात मला मदत करू शकणार होती ..त्यामुळे तिला सर्व काही सांगणं गरजेचं होतं ..
" ए यार मी कितीतरी दिवस झाले तिला पाहतोय , तिने माझ्याकडे पाहावं म्हणून तिच्यासमोर देखील जातो पण ती एकदाही मला पाहत नाही त्यामुळे खूप राग येतोय स्वतःचा ..इतका वाईट आहे का ग मी ? .." , मी नाखूष होऊन बोलत होतो ..
" अस व्हय !! बघ अभि मला तरी ती खूप साधी वाटते तेव्हा ती तुझ्याशी एवढ्या सहजासहजी बोलणार नाही " , ती काळजीने बोलू लागली ..
" मग आता ? " ...मी सांशक नजरेने तिच्याकडे बघू लागलो .
" तू खूप टॅलेंटेड आहेस तेव्हा हीच गोष्ट तुला तिच्या जवळ नेऊ शकते ..एखादी संधी येईल अशीही फक्त वाट पहा ! तिलाही कळेल तुझं प्रेम म्हंटट्स सबर का फल मिठा होता है सो वाट पहा होईल सर्व तुझ्या मनासारखं .. " , ती उत्तर देऊन बाहेर निघून गेली
मलाही तीच बोलणं पूर्णपणे पटलं होत आणि आता फक्त एका संधीची वाट पाहू लागलो ...ती संधी जी मला तिच्या हृदयात स्थान देणार होती ...
बहोत नसीब से
मिलती है मोहब्बत
उसको पाना नही
उस मे खो जाना चाहता हु ..
काही दिवस गेले असतील ..सर्व काही तसच सुरू होत ..मी तिला पाहायचो आणि तीच माझ्याकडे लक्ष नव्हत..मलाही कधीतरी आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळेल या आशेवर दिवस काढू लागलो आणि शेवटी ती संधी मिळाली ..
आज मला घरी थोडं काम असल्याने कॉलेजला यायला उशीर झाला होता ..इकडे - तिकडे बघितलं पण कुणीही नजरेस आलं नाही ..आज सर्व कलासही शांत होते ..समोर गेलो आणि चपराशी सांगून गेला की आज सेमिनार हॉलमध्ये बोहरे मॅडमच भाषण आहे ..खर तर मला त्यांना खूप आधीपासूनच भेटायची इच्छा होती त्यामुळे धावतपळत सेमिनार हॉल मध्ये पोहोचलो ..जवळपास संपूर्ण हॉल गच्च भरला होता ..त्यामुळे आम्ही काही मुलं दाराजवळच उभे झालो ..बोहरे मॅडम म्हणजे संगणक क्षेत्रात काम करणार नावजलेलं व्यक्तिमत्त्व ..त्याचे दर हफत्याला पेपरला लेख यायचे आणि मी ते न चुकताच वाचायचो ..कठिनातली कठीण गोष्टही त्यांच्या तोंडून अगदीच सोपी वाटायची शिवाय वाचनशैली अफाट होती त्यामुळे तासंतास बोलत असत ..मधात कुठेतरी गंमत करून सर्वाना हसवायच्या त्यामुळे मुलांना सहसा कंटाळा येत नसे आणि वातावरण बहरलेल असायचं ..सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या बोलत असताना प्रश्न खूप विचारायच्या त्यामुळे कार्यक्रमाला खूप मजा येणार होती..कार्यक्रमाला सुरुवात झाली ..आधी सर्व शिक्षकानी थोडक्यात आटोपलं आणि मॅडमच्या भाषणाला सुरुवात झाली ..त्यांनी अगदी पहिल्या सेकंदापासून सर्व विद्यार्थाना भांभावून सोडलं .प्रत्येक गोष्ट त्यांना हवी तशी समजावून सांगत होत्या त्यामुळे मुले कुठलीही गडबड न करता शांत बसून होती ..तेवढ्यात मॅडमने एक प्रश्न विचारला ..आधीच शांत असलेला हॉल पुन्हा शांत झाला ..पिन ड्रॉप सायलन्सची स्थिती निर्माण झाली आणि पुन्हा एकदा मॅडम म्हणाल्या , " इथे कुणी असा आहे का ज्याला या प्रश्नाचं उत्तर येत ? "
मॅडमने सर्वांकडे पाहिलं पण कुणालाच बहुदा उत्तर माहिती नव्हतं ..मी त्यांच्या फार जवळ उभा होऊन सर्व एकत होतो त्यामुळे हळूच त्यांना उत्तर दिलं आणि त्या उद्गारल्या , " अगदी बरोबर , वेरी गुड !! "..आणि शांत झालेला हॉल माझ्याकडे पाहू लागला ..पुन्हा मॅडमने बोलायला सुरुवात केली ..मॅडमने कुठलाही प्रश्न विचारला की मी आधी सर्वांकडे पाहायचो आणि कुणालाच उत्तर आलं नाही की मी द्यायचो ..सुमारे दोन तास असच सुरू होत ..आता मॅडम कुठलाही प्रश्न विचारायचा असला की माझ्याकडे पाहायच्या आणि मी उत्तर द्यायचो ..सर्वांच्या नजरा फक्त माझ्या आणि मॅडमकडे होता त्यामुळे थोडी लज्जा येऊ लागली ..शेवटी कार्यक्रम संपला ..सर्व मुले हॉल सोडून निघून गेली होती ..तिला बहुतेक मॅडमशी काहीतरी बोलायच असल्याने ती तिथेच थांबली होती तर मला मॅडमना मोबाइल नंबर मागायचा असल्याने मीही थांबलो होतो ..मॅडम तिथेच उभ्या होत्या ..त्यांना मी दिसलो आणि त्यांनी मला स्वतःकडे बोलवून घेतलं ..मॅडम तिच्यासमोरच माझी खूप प्रशंसा करीत होत्या त्यामुळे पहिल्यांदा अस झालं की तिची नजर फक्त माझ्यावर होती ..मी मॅडमचे लेख वाचतो , पुस्तक वाचतो हे ऐकून त्या फार खुश झाल्या होत्या ..त्यांनी शेवटी नंबर दिला आणि मी बाहेर आलो ..ती आताही मॅडमशी बोलत होती ..मी मात्र माझ्याच आनंदात हरवलो होतो ..तो क्षण घडून काही वेळ झाला होता .कॅन्टीनला जायला बाहेर निघालो आणि ती समोर आली ..नेहमी अस व्हायचं की तीच माझ्याकडे लक्ष नसायचं पण यावेळी मात्र तिने माझ्याकडे पाहिलं आणि मीही तिला हलकी स्माईल दिली आणि तीसुद्धा हसून समोर निघून गेली ..आज माझ्यासाठी खूप सुंदर क्षण होता .कितीतरी दिवस मी या क्षणांची वाट पाहत होतो आणि आज तो घडला ..मला माझ्या प्रश्नाचं उत्तरही सापडलं होत ..मी तर नक्कीच तिच्या प्रेमात पडलो होतो पण तीही माझ्या प्रेमात पडेल का ?? .. आज तिच्या बघण्याने तिच्याकडून मैत्रीची आशा तर निर्माण झाली होती पण आताही बरेच प्रश्न मनात घर करून होते ..पण आज तरी मला खूप समाधान मिळालं होतं ..आणि एक विचार मनात येऊन गेला कदाचित हीच तर प्रेमाची सुरुवात नाही ??
क्रमशः ...