lag aadhichi gosht - 14 in Marathi Love Stories by Dhananjay Kalmaste books and stories PDF | लग्नाआधीची गोष्ट (भाग 14)

Featured Books
Categories
Share

लग्नाआधीची गोष्ट (भाग 14)

लग्नाआधीची गोष्ट

(भाग 14)

मुंबईला गेल्यावर त्याच्या एका मित्राच्या मदतीने आम्ही एका ठिकाणी रूम घेतली. व तेथे राहू लागलो त्याने घरून येताना काही पैसे पण आणले असल्याने चार महिने आम्हाला काहीच वाटले नाही. पण जसजसे पैसे कमी व्हायला लागले तसतसे आम्ही आता काम शोधावा असा विचार केला. पण माझ कॉलेजचे काही महिने बाकी असल्याने मला माझा रिजल्ट व डॉक्युमेंट न मिळाल्याने काम भेटत नव्हते. मला माझ्या या निर्णयाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे चिडचिड होऊ लागली.

आता भांडण दररोज चालूच झाली. एके दिवशी आजारी असल्यामुळे एका दवाखान्यात गेलो असता मला माझी एक मैत्रीण भेटली. संजय गोळ्या आणण्यासाठी केमिस्ट कडे गेला होता. मी पूनम ला विचारले कि "इकडे कशी काय तू? " …..ती म्हणाली "मी इथेच राहते व या हॉस्पिटल मध्ये काम करते. "... तो दवाखाना जास्त मोठा नव्हता पण तेथे आलेल्या पेशंट कडे बघता तेथे नर्स खूप कमी होत्या. मी माझा डॉक्युमेंट चा प्रोब्लेम सांगून पूनमला मला काम बघायला सांगितल.

तेवढ्यात संजय तिकडून आला व माझ्या शेजारी उभा राहिला. तेव्हा पूनम अचानक म्हणाली," हा सूरज का ग ?"....सूरजचा चेहरा अचानक उतरला.

घरी गेल्यानंतर आमच खूप जोरात भांडण झाल. तो माझ्यावर संशय घेऊ लागला..त्याच्यासाठी घरदार सगळे सोडून मी इकडे आले आणि आता माझ्या संगे असे घडत होते कि मी घरी पण जाऊ शकत नाही आणि इथे पण राहू शकत नाही.

चारपाच दिवस बोलण पूर्णपणे बंद होते. पण याच काही तरी चालले आहे हे मला जाणवत होते. एक दिवस तो अचानक घरातून निघून गेला व एक चिठ्ठी ठेऊन गेला त्यात मला तुझे तोंड पण बघायचे नाही अस लिहिल होते. मला आता कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता. मी सगळे घरातले सामान सोडून पुण्याला आले. एका मोठ्या शहरात एकटीने राहणे म्हणजे अवघड असतं. त्याच्यात काही पुरुष लांडग्यांच्या नजरेने बघत असतात.

राहण्याची सोय एका कॉलेज होस्टेलमध्ये कशीतरी केली. पण एका दिवशी दौंडला गेले होते. परतायला उशीर झाला होता. तेवढ्यात काही जण याच गोष्टीची वाट पहात होते कि कधी मला पकडता येईल व......

नंतर मी जिवाच्या आकांताने पळत सुटले रेल्वे स्टेशन वर थोडी लोक दिसले म्हणून माझा जीव वाचवण्यासाठी मी पळत सुटले. ते चौघे पण माझ्या मागे पळत होते.. वाघाने बकरी वर झडप घालावे तसे माझ्या मागे ते पळत होते. माझे कपडे फाडायला पण त्यांनी मागे पुढे बघितले नाही. मदत मागावी म्हणून सगळ्यांकडे गेले, पण त्या द्रौपदीची जी अवस्था झाली ती माझी त्या वेळी झाली होती. तिथे तरी तिला वाचायला कृष्ण आला होता येथे कोणी येईल याची अपेक्षा नव्हती म्हणून मी एका चालत्या गाडी मध्ये चढले व बेशुद्ध पडले.

तेव्हा निशा सपनाला जवळ घेऊन म्हणते तुझ्यासाठी तर किती कृष्ण आले होते मदतीला. संपूर्ण बोगीमधली लोक तुझ्या मदतीला आले होते. कदाचित तू बेशुद्ध असल्यामुळे तुला माहित नसेल.. अजूनही चांगली लोक या जगात आहेत..

सपनाच जीवन म्हणजे आता परिघाबाहेर घुटमळत्या पाखरासारखं.

सूरजचे जरी सपनावर आधी प्रेम असले तरी तो एका बंधनात अडकला होता. त्याने त्या गोष्टी सपना सोडून गेल्यावरच मागे सोडल्या होत्या.. आता निशा त्याच्या आयुष्यात होती. खरच भुतकाळात काही हरवत का ? तिथे कधीही नबदलता येणार स्मृतीच वलय साठलेलं असतं. सुरजला एक मार्ग सुकर वाटत होता. तो म्हणजे सपनाला तिच्या आई वडिलांकडे पोहचवून देण्याचा.

सहकुटुंब

थोड्या वेळाने एक कार कोल्हापूरला रवाना होते. जाता जाता सूरज गाडी मध्ये गाणी सुरू करतो. मध्येच गाणे सुरू होते. सूरजला कसेतरी वाटायला लागते.

कारण गेल्या तीन वर्षांपासून तो हे गाण ऐकायच टाळत असलेला असतो. तो गाण बदलण्यासाठी पुढे जातो तेवढ्यात सपना त्याला थांबवते व म्हणते, "राहूदे छान आहे गाण..."

******