Two points - 12 in Marathi Fiction Stories by Kanchan books and stories PDF | दोन टोकं. भाग १२

The Author
Featured Books
Categories
Share

दोन टोकं. भाग १२

भाग १२

विशाखाला काहीच कळायला मार्ग नव्हता. तिचं स्वप्न खरं होतं की काय याची भिती वाटायला लागली होती. त्या दोघांनी खरंच जर मुलं बघायला सुरू केलं तर 🥺....... नाही नाही. मी हे होऊच देणार नाही. हे सगळं स्वप्नच असणार. इतकं चांगलं दोघं माझ्याबद्दल कधीच बोलणार नाहीत 😏, बोललं तरी स्वप्नात बोलतील फक्त.

विचार करता करता बाहेर बघत होती तर लक्षात आलं आज आभाळ पुर्ण भरून आलं होतं. ते आभाळ बघुन आपोआप तिचा चेहरा खुलला. लहानपणापासूनच पाऊस प्रचंड आवडायचा.
आता जर पाऊस पडला तर मस्त गरमागरम कांदाभजी आणि वाफाळलेला चहा घ्यायचा. सायलीला पण घेऊन जाते, असं म्हणून फोन करायला फोन हातात घेतला पण परत ठेवून दिला. काय सांगावं उगच लग्नाचा विषय काढुन डोकं खात बसेल आणि लग्न का करायचं ह्यावर पण लेक्चर देत बसेल. तिला नकोच. राहुदे मी एकटीच जाते. गाडिची चावी घेतली आणि तिच्या घरी आली. आल्या आल्या लगेच चेंज करुन ह्या गाडिची चावी घरी ठेवून बुलेटची चावी घेऊन बाहेर निघाली.

बाहेर पावसाची भुरभुर चालु होती. बारीक थेंब पडत होते. सगळीकडे गार हवा सुटली होती. झाडे त्या हवेबरोबर बोलायला लागली होती. रस्ते पावसामुळे हळुहळु मोकळे व्हायला लागले होते. आणि त्या भिजलेल्या रस्त्यावर विशाखा तीची बुलेट घेऊन फिरत होती. गाडी तशीच दामटवत आणत होती. कुठं चाललोय याच सुद्धा भान नव्हतं. थोड्या वेळाने आजुबाजुला बघितलं तर ती वडकीला आली होती. वडकीची भेळ खुप फेमस आहे असं ऐकलं होतं तीने. तिथेच बाजुला गाडी लावली. पावसात आल्यामुळे ब-यापैकी भिजली होती ती. भेळ फेमस होती पण भिजल्यामुळे तीला आता गरमागरम वडापाव खायची इच्छा झाली होती. हॉटेलमध्ये आली. आणि विचार करतच होती की तेवढ्यात एक मुलगा आला,

" काय घेणार ?? "

" अं........ एक भेळ. "
पण जाणार नाही ना एकटीला मला, खुप असत त्यात. वडापावच खाते. जाणा-या तो मुलाला हाक मारून परत बोलावलं,
" ओय...... शुक शुक. " तीने तसं म्हणल्यावर आजुबाजुचे सगळे तिला बघायला लागले. काय आहे असं म्हणल्यावर परत सगळे आपापल बसले. तो मुलगा जवळ आला,

" काय झालं ?? "
त्याला काहिच बोलुन न देता विशाखा सुरू झाली.

" भेळ नको. दोन वडापाव आण आणि गरम गरम आण. " तो वळणार तर परत " एक दोन नको, एकच आण आणि चहा पण आण. "

" झालं ??? "

" हो झालं ☺️. "
ते येईपर्यंत काय करायचं म्हणून आजुबाजुला बघत बसली होती. बाहेर सगळा रस्ता ओला झाला होता, अंगाला झोंबणारी हवा आणि त्यात वडापाव. वाह !!!!!
प्रेम म्हणजे काय. हेच ना. अजुन काय हवं आयुष्यात. गाव असल्यामुळे सगळं मोकळं मोकळं वाटत होतं. ना गाड्यांची गर्दी, ना माणसांची, ना इमारतींची. होती ती फक्त शांतता.
वडापाव आला तसं खाऊन आणि चहा पिऊन पटकन निघाली. कारण आता सुर्य अस्ताला निघाला होता. आश्रमात जायला उशीर झाला असता तर काकाने फाडुन खाल्ला असता तिला.
आणि घरी लवकर जायचं म्हणून गाडी पळवायला चालु केली. वरून पाऊस आणि त्यात भर अंगाला बोचणारी गार हवा. तरी तशीच जात होती. आता हडपसर ला आली होती. ती सरळच जात होती की डाव्या बाजूने एक मुलगा आला आणि तीची गाडी त्याच्या गाडीला धडकली. तो तर पडलाच पण ही गाडीवरून कोलांटी उडी मारून पूढे जाऊन पडली.
उठुन बघितलं तर लागलं काहीच नव्हतं पण पडली तर ती होती आणि ते पण त्याच्यामुळे.

गाडी जवळ गेली आणि हात पुढे केला. त्या मुलाला वाटलं त्याला उठवायला हात केलाय म्हणून त्याने पण हात दिला तर हिने गाडी उचलली आणि गाडीला काहि झालं की नाही हे बघत बसली.

" गाडीला काही झालं असतं म्हणजे 😤. हळु यायचं ना. असं डायरेक्ट कोण येत का ?? " गाडीला बघुन झाल्यावर तीने त्या मुलाला फैलावर घ्यायला सुरू केलं.

" मी तर हळुच येत होतो. " तो शांतपणे म्हणाला पण विशाखा परत ओरडलीच त्याच्यावर,

" हळु यायचं. एकदम फास्ट आल्यावर हे असंच होणार"

" एक मिनिट. हळु यायचं म्हणजे. मी बरोबरच येत होतो. तुम्ही माझ्या गाडीसमोर आलात. " आपण हळु बोलतोय पण ही आपल्यावरच ओरडतेय हे बघुन तो पटकन बोलला.

" 🤨. मी नाही. तुच आला माझ्या गाडीसमोर. तुझ्यामुळे मी पडले आणि माझी गाडी पण. तरी काही झालं नाही गाडीला हे बरं. "

" म्हणजे मला काही झालं असतं तर चाललं असतं का 🤨. "

" मला काय करायचय तुला काहिही झालं तर. 😏😏. मला माझी गाडी महत्त्वाची आहे. "

" काय खडुस आहे ही‌ " तो हळुच पुटपुटला पण तिला लगेच ऐकायला आलं.

" कोण खडुस ?? मी 😳😳. मीस्टर ...... "

" आकाश "

" जे कोणी असाल मला घेणं देणं नाही. मी फक्त इतकंच सांगते की तुम्ही मध्ये आलात आणि त्यामुळे मी पडले."

" मग मी पण पडलोच ना. "

" मग मी नाही म्हणाले का ?? "

" काय डोकेखाऊ आहे यार ही. 😖😖 "

" ओय हॅलो. जाऊदे मी का सांगत बसली ये. खड्यात जा. 😡😡😡😤 " आणि गाडी घेऊन सरळ घराचा रस्ता धरला.

घरी गेल्यावर काकाने शाळा घ्यायला सुरू केली.
" ही कुठली पद्धत झाली 😡. एकतर सांगुन जायचं नाही त्यात फोन केले तर ते पण उचलायचे नाहीत. विकला का मोबाईल ?? "

" एएएएएएएए काय झालं रे. "

" फोन कुठं आहे तुझा. "

" घरी. "

" तिथे कशाला. देवा-यात ठेवायचा ना. 😤😤😤 "

" काय झालं. "

" किती फोन केले पण एक उचलला तर शप्पथ. सगळ्यांनी जीव घ्यायचा ठरवलंय का माझा. "

" झाली सुरू दया भाभी. 🤦 " तीने असं म्हणल्यावर मागे सगळ्या मुली तोंडावर हात ठेवून हसायला लागल्या.

" दात काढायला काय झालं. हसा हसा. मी नसेन ना तेव्हा माझी किंमत कळेल मग रडताल माझ्यासाठी. "

" तु कुठे जाणार आहेस. जाणार असशील तर नंतर जा. आत्ता मस्त आल्याचा चहा करुन दे ना. प्लीज. " असं म्हणून त्याला बोलायची संधीच न देता पटकन आत पळून गेली.

" हो तेच करतो आयुष्यभर. पण तु काही लग्न करू नको. वाटलं होतं सासरी जाशील तर त्रास कमी होईल माझा. पण नाही. "

आत गेलेली विशाखा बाहेर येऊन जोरात ओरडली,
" ह्या जन्मात तर नाहीच कमी होणार. "

" हो माहितीये मला 😤😤😤😡 " पुढचं त्याच बोलण ऐकायला थांबलीच नाही ती.