लग्नाआधीची गोष्ट
(भाग 13)
कालच्या प्रवासाचा थकवा व ही अनपेक्षित घटना यामुळे मी पुरता हादरून गेलो होतो. राऊत माझ्या जवळ आले व म्हणाले’ कदम ‘आम्हाला सगळीकडे लक्ष द्यावे लागते. कोण खर ?कोण खोट ? हे अगोदरच सांगता येत नाही. नंतर हवलदार गायकवाड यांना आवाज देऊन मला चहा द्यायला सांगितला.. फोरेन्सिक रिपोर्ट यायला जवळ जवळ एक दिवस लागणार होता असे मलायांच्याकडून कळाले .मला एक रात्र काढायला लागल्याने मला संजय व सपनाचा खूपच राग आला होता.
दुसर्या दिवशी फोरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर समजले कि त्याचा मृत्यू विष खाल्ल्यामुळे झाला होता त्याने सकाळी 2 ते 3 च्या दरम्यान ग्लास मध्ये विष टाकून त्याचे प्राशन केले होते. त्याचे बोटाचे ठसे त्या ग्लास वर पोलिसाना मिळाले..
तसेच त्याने मला पाठवलेले मेसेज व लोकेशन सुद्धा मी त्यांना दाखविले. त्यांनी उलट तपासणी करण्यासाठी संजय च्या मोबाईल मध्ये सुद्धा चेक केल.
संजयच्या मोबाईल वर सुद्धा त्याच्याच बोटाचे ठसे होते आणि असणारच होते ,कारण दरवाजा आतून बंद होता. तेव्हा मी किंवा दुसरा कोणीही तेथे जाऊन काही करणे जवळ जवळ अशक्य होते. …मी जेव्हा त्यांना अजून काही पुरावे दाखविले, जसे कि त्या रात्री काढलेले बसचे तिकीट तेव्हा त्यांना विश्वास बसला.
त्यांना विश्वास बसला म्हणजे त्यांनी उलटतपासणी केली म्हणुनच मी सुटलो.
कदाचित मला त्यामधे अडवण्यासाठी संजय ने मला बोलावले असेल असे यांनी मला सांगितले व मला सोडले.
सपना व निशा
(चालू वेळ)
निशाच्या चेहर्यावर थोड हसू आल व मनात आपल्या नवरयाबद्दल थोडा अभिमान वाटू लागला. तो या गोष्टीचा कि त्याने सर्व खर सांगितल व कोणतही वाईट काम केल नाही याचा.
निशा नंतर म्हणाली, "की माझ्या डोक्यात अजून एक प्रश्न आहे तो हा की या सगळ्या गोष्टीला म्हणजे संजय मेल्यानंतर ते आज पर्यंत जर वेळ लक्ष्यात घेतली तर माझ्या एक वर्ष होऊन गेले तोपर्यंत ही सपना होती कुठे?"…….
सूरज म्हणतो, "या बद्दल मलाही काही माहीत नाही, पण ती तिच्या घरी सुद्धा नव्हती कारण मी तिच्या घरच्यांशी अधून मधुन बोलत होतो. ते ही तिला शोधत होते. "निशा चकित होऊन म्हणाली," म्हणजे संजय वर कमी वयात प्रेम केल खर तिने, पण ते दोघांना निभावता आले नाही. आणि आपले आईवडील यांना सोडून गेल्यामुळे परत जाण्याचे धाडस तिच्याकडून झाले नसावे. "
बेडरूम मधून काही तरी हालचाल होत आहे म्हणून दोघे तिकडे धावले तर सपना शुद्धीवर आलेली होती. सपनाची सूरजकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती.
त्याला बघताच तिच्या डोळ्यातून पाणी आले. विषय जास्त वाढायच्या आधीच सूरजने सपनाची व निशाची ओळख करून दिली.
सपनाची अवस्था पाहून निशाने आपले चांगले कपडे सपनाला घालायला दिले. सपना कोणीही असली तरी एक स्त्री होती तिची ती अवस्था निशाकडून सहन होत नव्हती. अर्थातच दोघांनी तिला ती कोठे होती? व स्टेशनवर अश्या अवस्थेत कशी आली? याबद्दल विचारले. सगळ्यात आधी सपनाने हात जोडले व सूरजची माफी मागू लागली. तिनेही घडलेला प्रसंग त्यांना सांगायला सुरुवात केली.
(चालू वेळ)
सपना सांगती झाली-
तूला भेटायला जेव्हा मी आले तेव्हा संजय सुद्धा आपल्या बाजूला होता. तो मला घेऊन आधीच पळून जाणार होता पण मला एकदा तूला भेटायचे होते. त्यामुळे मी तूला भेटायला आले होते. लॉकेट व माझा भूतकाळ असलेली डायरी तुला दिल्यानंतर मी तेथूनच संजय सोबत मुंबईला गेले. जाताना सुद्धा माझा व त्याचा वाद झाला. मी तूला शेवटच भेटणार होते म्हणून मी तूला केलल किस व माझ्या डोळ्यांतील पाणी हे त्यांनी बघितल. तेव्हा तो विषय जास्त वेळ राहिला नाही, पण त्याच्या डोक्यात ही गोष्ट जास्त दिवस होती अस मला वाटत.
******