बडी चालाक है तू जिंदगी
कुछ हसी पल देकर
सारे गमो को भुला देती हो ..
कॅनडामध्ये 3 वर्षे झाली नौकरी सुरू करून बरीच प्रसिद्धी मिळवली , पैसे मिळविले पण चैन कधीच मिळालं नाही ..मला काहीतरी करून दाखवायचं आहे , स्वताच अस स्थान निर्माण करायचं आहे याचं नादात ही 3 वर्षे कॅनडामध्ये घालवली ...ना जुन्या मित्रांशी संपर्क , ना कुणाकडे जाणे फक्त ऑफिस आणि घर हाच काय तो जगण्याचा मार्ग ...कधीतरी बाहेर खायला जाणे , मूवी पाहणे हा झाला प्रवास ..स्वताला सिद्ध करण्यात एवढा हरवून गेलो की पैसा , नौकरी या पलीकडेही जग असत हे लक्षातच आलं नाही..कदाचित नशा म्हणतात ती हीच असेल..पण काहीही म्हणा स्वताची ओळख दिली ती याच कॅनडाने ..त्यामुळे इथून पाय काढताना नकळत डोळ्यात अश्रु येत होते ..
गेली 3 वर्ष मी सतत काम करत होतो ..स्वताला सतत कामात गुंतवून घेणे हाच काय तो ध्यास ..पण 3 वर्षानंतर मी पुन्हा एकदा माझ्या मायदेशात जाणार आहे ..आज ऑफिसच काम संपवून लवकरात लवकर घरी जावस वाटत होतं ..ऑफिसला प्रवेश केला आणि केनीने गुड मॉर्निंग विष केलं ..तिलाही जाणवलं होत की माझा चेहरा आज फार खुलला आहे . माझं प्रमोशन झाल्यावर आज पहिल्यांदाच मी एवढा खुश होतो त्यामुळे तो आनंद लपवूनसुद्धा लपवता येत नव्हता ..ऑफिसला गेलो आणि लॅपटॉप सुरू केला तेव्हाच बॉसने त्यांच्या केबिनला बोलवून घेतलं ..पंधरा दिवसानंतर मी जॉईन होणार असल्याने आज उरलेले सर्वच काम संपवायचे होते ..बॉसने देखील एक गोडशी स्माईल देऊन माझं स्वागत केलं आणि कामाच्या फाइल्स देऊन मी सरांचं केबिन सोडलं ...
आज संपूर्ण काम संपवायचं असल्याने सकाळपासूनच पटापट काम करत होतो ..काम लवकरात लवकर संपवाव म्हणून दुपारचं जेवण करनसुद्धा टाळल होत ..तरीही आज काम करण्यात कुठेही थकवा जाणवत नव्हता ..सर्वांसोबत थोडा वेळ घालवता यावा म्हणून कॉफी मात्र सर्वांसोबतच घेतली ..आज सर्वच मंडळी माझी खेचण्यात व्यस्त होती ..शेवटी ऑफिस सुटण्याची वेळ झाली आणि हॅपी जरनी विश करून सर्व घरी गेले ..सायंकाळी 6 ला ऑफिस सुटायचं पण आज शेवटचा दिवस असल्याने काम संपवायला थोडा वेळ लागला ...काम संपलं तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते ..बॅग घेतली आणि घराकडे निघालो ...वाटेतून चालताना आज सर्व काही खास जाणवू लागल ..ऑफिसला आज बराच वेळ लागल्याने स्वयंपाक बनविण्याची मुळीच इच्छा नव्हती त्यामुळे गाडी बाजूला घेतली ...बाजूलाच एक रेस्टॉरंट होत ...आज त्या रेस्टॉरंटची ओपनिंग सेरेमनी असल्याकारणाने संपूर्ण रेस्टॉरंट सजवून होत ..संपूर्ण रेस्टॉरंट ख्रिसमस ट्री , निळे - पिवळे झगमगनाऱ्या लाइट्सनी उजळून निघालं होत ..छान - छान डिश पाहून तोंडाला लगेचच पाणी सुटलं ...ओपनिंग असल्याने सर्वच काही खास होत.. वेगवेगळे गायक गाणी गात होते आणि बाजूला कपल डान्स सुरू होते ...ते सर्व पाहुन मी जाणूनच आज खायला उशीर करत होतो ..पण जास्तही उशीर करणं आता परवडणार नव्हतं त्यामुळे जेवण संपवून घराकडे निघालो ..आज अगदी सर्व काही मनासारखं झालं होतं ...त्यामुळे मी फारच खुश होतो ..रस्त्यावरून जाताना कुणीतरी कपल किस करताना दिसलं की खळखळून हसायला यायचं आज पण तोच नजारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला ..चेहऱ्यावर थोडी कळी उमलू लागली आणि क्षणात डोक्यात विचार येऊन गेला की भारतात देखील असच घडत असेल काय ?? ..काय माहीत किती बदलला असेल माझा देश आणि माझे मित्र ..चल हट !! देश नक्कीच बदलतील पण माझे मित्र काहीच बदलणार नाहीत ..आहेत तसेच असतील साले ..हो पण काही म्हणा त्यांच्यासारखा जीव कुणीच लावलां नाही ..हो पण एकही फोन करत नाही म्हणून ओरडतील ..एकूण घेऊ ..असे कितीतरी विचार डोक्यात होते आणि काही क्षणात घर आलं ..
सकाळपासून काम करून फार थकलो होतो ..त्यामुळे घरी आलो आणि फ्रेश होऊन सरळ बेडवर पडलो ..आज टी. व्ही. पाहण्याची मुळीच इच्छा नव्हती त्यामुळे बाजूला पडलेले एअरफोन कानात टाकले ..हळूहळू हात आवडीच गाणं शोधू लागले आणि अचानक हात तिथे जाऊन थांबला जिथे मी क्वचितच थांबतो ..ते गीत ऐकल्यावर जुन्या आठवणी जशाच्या तशा समोर येतात ..मला उद्या आपल्याच देशात जायचं असल्याने आता जून सर्व काहीच आठवू लागलं आणि ते गितही आपलस होऊन गेलं ..गाणं सुरू झालं आणि डोळे आपोआप बंद झाले ...
जुदा होके भी
तू मुझमे कही बाकी है
पलको मे बनके आसू तू चली आती है
जुदा होके भी ...
वैसे जिंदा हु जिंदगी बिन तेरे मे
दर्द ही दर्द बाकी रहा है सिने मे
सांस लेना भर ही यहा जिना नही है
अब तो आदत सी है मुझको
ऐसें जिने मे
जुदा होके भी
तू मुझमे कही बाकी है
अचानक कॉलच्या रिंगटोनमुळे घट्ट मिटलेले डोळे खुलले..समोर आईचा कॉल येत असल्याच जाणवलं ...
" बोला मातोश्री , आज कशी काय आठवण काढली आमची " , गमतीच्या स्वरात म्हणालो ...
आईनेही थोडं खेचतच उत्तर दिलं , " आम्ही करतो तरी , काहिलोक तर ते पण करत नाही ..मला वाटत माझ्या लेकाला सुनबाई मिळाली असेल म्हणून बोलायलासुद्धा सवड मिळत नाही वाटत ."
" ए काहीही हा आई !! अस काहीच नाही , दररोज बोलून - बोलून काय बोलणार म्हणून नाही करत रोज आठवण " , थोडं नाराजीच्या स्वरातच म्हणालो ...
" अरे हो हो , मी गंमत करत होते ..मला माहित आहे तू खूप काम करतोस ते ..बर ऐक तू उद्या किती वाजता येणार आहेस " , आई सर्व सावरत म्हणू लागली ..
" दुपारपर्यंत पोहोचेन , का ग काय झालं ? " , मी म्हणालो ..
" काही नाही तुला मुलगी दाखवायची आहे ना म्हणून विचारते " , ती हसून म्हणाली ..
" ए नाही हा ! मी नाही करणार इतक्यात लग्न ..मी नाही करणार लग्न एवढं म्हणताच तिने फोन कट केला " ...
मला आईचा थोडा राग आला पण पुन्हा स्वताला गाण्यात गुंतवून घेतलं ..
साथ मेरे है तू हर पल
शब के अंधेरे मे
पास मेरे है तू हर दम
उजले सवेरे मे
दिलं से धडकन भुला देना
आसान नही है
अब तो आदत सी है मुझको
ऐसें जिने मे
जुदा होके भी
तू मुझमे कही बाकी है
पलको बनके आसू
तू चली आती है
जुदा होके भी....
जुदा होके भी ....
आज तेच ते गाणं वारंवार ऐकत होतो तरीही मन काही मानेणा ...जेव्हा केव्हा कॉलेजच्या त्या क्षणांची आठवण व्हायची तेव्हा - तेव्हा याच गाण्याने मला सहारा दिला होता ..आजही ते गीत एकूण फार प्रसन्न वाटत होतं ..गाणं एकता - एकता केव्हा झोप लागली तेसुद्धा कळल नाही ...
सकाळी - सकाळी उठून फिरायला बाहेर जाण मला फार आवडत ..त्यामुळे हा दिनक्रम मी न चुकताच पाळतो.. मुळात ती एकच वेळ असते जेव्हा थोडी का होईना पण ताजी हवा खायला मिळते..सकाळच्या वातावरणात सर्व काही शांत जाणवत होत ..पार्कमध्ये लहान - मोठे , तरुण - वृद्ध सर्वच खेळत होते ..त्यामुळे दिवसाची मस्त सुरुवात झाली होती ..शिवाय काही तरुणीदेखील आल्या होत्या ..त्यातली एक फारच सुंदर दिसत होती त्यामुळे तिच्याकडे न राहता लक्ष जात होतं ..काही वेळ मी तसाच तिच्याकडे पाहू लागलो ..बहुदा तीच लक्ष माझ्याकडे गेलं असावं आणि तिने माझ्याकडे पाहून हात हलविला ..मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसेना ..मी विश्वास करून घेण्यासाठी तिच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं तर ती आता पण हात हलवीत होती ..मीही घराकडे निघालो होतो ..ती तशी नेहमीच येते पण आज मैत्रिणींसोबत आल्याने थोडा हिरमुसलो होतो ..मी त्यांच्या मागे तर त्या समोर अस करत - करत रस्ता सर करू लागलो ..तीही मी तिच्याकडे पाहावं म्हणून थोड्या मोठा आवाजात बोलत होती शिवाय तिच्या अदा होत्या त्या वेगळ्याच ..शेवटी ती घराकडे निघाली आणि जाताना नकळत फ्लाईंग किस द्यायला विसरली नाही ..मीही तिच्याकडे पाहून हसलो आणि घरात गेलो ..आज दिवसाची सुरुवात फार मस्त झाली होती ..तोच आनंद घेऊन घरी परतलो ..बॅग पॅकिंग करून घेतली आणि शॉवर घ्यायला आतमध्ये गेलो ..शॉवर घेऊन परत आलो ..आज खूप दिवसांनी थोडं सजावस वाटत होतं ..नेहमीचं फॉर्मल लावून मी फार कंटाळलो होतो त्यामुळे आज जीन्स शर्ट परिधान केला ..त्यात फारच सुंदर दिसू लागलो ..काही क्षणांसाठी स्वतःवरच ईर्षा व्हायला लागली .जिमने कमावलली ती पिळदार शरीरयष्टी पाहिली की मुली आपोआपच आकर्षित व्हायच्या त्यामुळे भारतात कुण्या मुलीची खैर नाही असा विचार लगेच मनात आला ..हा ..स्वतःचीच स्तुती करण योग्य नाही पण माणूस सुंदर असलं की शब्द आपोआपच बाहेर येतात ..रूम सोडण्यापूर्वी सर्व काही चेक केलं ..रूम लॉक केली आणि काकूंना चावी देऊन एअरपोर्टकडे निघालो ...
एका तासाने फ्लाइट होती ..गेल्या - गेलीच फ्लाइट लागून असल्याची सूचना मिळाली त्यामुळे घाईने तिकीट काढण्यासाठी पळू लागलो ..जात असताना अचानक असा प्रसंग घडला की मागे वळून पाहू लागलो ..माझ्या हातांना कुणाच्या तरी हाताचा स्पर्श झाला आणि मला तिची आठवण झाली ..तो स्पर्श ज्याने मला प्रेमात पाडलं ..तो स्पर्श ज्याने मला सर्वात सुंदर भावना दिल्या ..काही वेळेपर्यंत त्या मुलीकडे बघत राहिलो पण तिने काही पलटून पाहिलं नाही आणि मी समोर गेलो ..,तिकीट काढून घेतल्या आणि प्लेनमध्ये बसलो ..विमानात बसल्यापासून फक्त तोच स्पर्श आठवत होता ..काय जादू होती त्या स्पर्शात ? ..कुणाचा होता तो स्पर्श ...
क्रमशः ...