अदृश्य भाग २
ट्रिइंग ट्रिइंग...ट्रिइंग ट्रिइंग विभा चा फोन वाजत होता,ती अचानक उठली पोलीस स्टेशन मधून खडसे चा फोन होता. अरे विभा मॅडम तुमच्या बेल ची वेळ गेली आता तुम्ही त्या जेहेन ला आणा येता येता रस्त्यात वडा पाव दिसेल बघा तो हि आणा असे म्हणून त्याने फोन ठेवला.
विभा ला आता काही उमजत नाही होत,ती जेहेन च्या घरी गेली . जेहेन अजून हि झोपली होती, कारण विभा ला तिच्या घरी जाऊन १ तास उलटून गेला होता. अखेर जेहेन आली, नशेच्या हालत मध्ये होती, अगदी पेंगत होती.विभा ने तिला सांभाळलं आणि तिला सांगितलं की तिला आता पोलीस स्टेशन ला जावं लागेल. जेहेन जोर जोरात ओरडू लागली, नाही मी काय केलंय तो नायब एक तर त्याचा मुलाला मी सांभाळलं आणि तो , तो मलाच या केस मध्ये गुंतवतोय.
विभा ला धक्काच बसला, अर्णव अरोरा हा नायब अरोरा चा मुलगा होता.जेहेन शुद्दीवर आली, आणि लगेच विभा म्हणाली "जेहेन का तू एवढं लपवत आहेस मला तू नाही सांगणार तर मी तुझी मदत कशी करू तूच सांग".जेहेन शांत होती अगदी आधी होती तशीच. १५ मिनीट होऊन गेले, विभा म्हणाली "अगं बोल तरी तू का तुझ्या भावाची चूक लपवली?!". हो,मी लपवली कारण अरोरा कुटुंबाची इज्जत धोक्यात होती, नायब अरोरा,म्हणजे माझा भाऊ खूप मोठा माणूस आहे तर त्याच साठी मी हे केलं असं जेहेन म्हणाली. प्रत्येक वेळेस जेहेन चे उत्तर एक नवीन प्रश्नांना जन्म देत होते.विभा म्हणाली "ठीक आहे आपण नंतर बोलू तू चल आता माझ्या बरोबर". जसे ते दोघी बाहेर पडले , प्रेस चे लोकं त्यांची वाट बघत होते.विभा ला ते सवय होती या सगळ्याची, तिने जेहेन ला सांगितलं की तू शांत राहा,काळजी नको करू. प्रेस वाले ओरडून बोलायला लागले,विभा निगम, हिला मानसिक आजार आहे याच मोठं उधारण तुमच्या समोर आहे ते म्हणजे जेहेन अरोरा ची केस. अर्थातच त्या प्रेस वाल्यांना नायब ने विकत घेऊन पठवलंय असं जेहेन म्हणाली.
अचानक प्रचार करणारे खूप बायका तिथे जमले आणि त्यांनी जेहेन ला दगड मारले, ती ओरडून रडायला लागली. ते बोलत होते की एक तर लग्न न करता मुल होऊ दिल आणि त्याला हि मारून टाकलं. विभा ने तिला सांभाळलं आणि आत घेऊन गेली.खडसे,बोरसे,हे सगळे ते तिची खिल्ली उडवत होते,ते म्हणाले अरे विभा निगम , तुम्ही तर खरंच पागल आहात, कशाला या बाई ला त्रास देताय सोडा हीचा नाद.विभा चा पारा चढला, ती संतापली, खडसेच्या दिशेने वळली आणि टेबल वर हाथ आपटून म्हणाली," तुम्हाला एक बाई ची काही किंमत वाटत नाही, इज्जत नाही, तिने गुन्हा केला असो की नसो तुमच्यावर जबाबदारी होती तिचं रक्षणाची पण तुम्हाला तर वडा पाव आपल्या पोटात टाकायचं आहे का तुम्हाला नायब ने पैसे दिले नाही का"."हे बघ निगम जास्त डोकं चालवलं ना तर या नालायक बाई बरोबर तू हि आत जाशील" असं खडसे म्हणाले.तिथे जेहेन रडत बसली होती, विभा ला वाटलं आता जर नीट लक्ष दिलं नाही तर ही केस अजून गुंतून बसेल.ती बाहेर पडतानाच तिच्या डोक्यात एक शंका आली की जेहेन ने अर्णव ला दत्तक घेतले खरं पण या मागे हि काही तरी कारण नक्कीच असेल. विभा ने शोध घ्यायचं ठरवलं.विभा ने ठरवलं की ती त्या बार मध्ये जाऊन बघेल जर तिला कोण असं भेटलं ज्याला जेहेन च्या मागच्या आयुष्या बद्दल माहित असेल तर बरंच होईल.ती त्या बार मध्ये गेली तिथे तिने सगळयांना विचारलं पण तिला तिचे उत्तर नाही मिळाले. पण तिला एक माहिती मिळाली जेहेन चा त्या बार मध्ये एक मित्र झाला होता खूप जवळचा मित्र केणी डिमेलो, अचानक त्याला नौकरी मधून काढून टाकलं होतं. विभा केणी ला भेटायला गेली, केणी च घर छोटंसं असं होत,कसा बसा तो जगत होता, दमडी नव्हती त्याच्या कडे.विभा ने हाक दिली, केणी, तो बाहेर आला,विभा ला म्हणाला इथे नको मी उद्या भेटतो तुला कॅफे ९ मध्ये सकाळी १० वाजता हे सांगून त्याने दार बंद केलं.विभा ला तर फार विचित्र वाटलं असं कोण करत नाव गाव ना विचारता काही न जुमानता निघून गेला. विभा त्या कॅफे मध्ये त्याची वाट बघत होती तो आला, तू विभा आहेस ना-केणी,विभा-हो पण तुला कस माहित. केणी-मला सगळं माहित आहे,मी बातमी मध्ये पाहिलंय तुला,एक पागल बाई असच म्हणतात ना तुला.विभा-मला काम होत जरा आपण त्या बाबतीत बोलूया का. केणी-हो नक्की, काय माहिती हविये तुला.विभा-तू जेहेन च चांगला मित्र आहेस,मला सांग तिने अर्णव ला दत्तक का घेतलं.केणी- कारण त्या रात्री ती खूप नशेत होती एवढी कि तिने एक मुलगी ला ठोकून दिल होत, रात्रीच्या १ वाजता तिने त्या मुलीला तिथेच सोडून दिलं आणि ज्या रस्त्यावर तिने तिला सोडून दिलं तो जंगलाचा रस्ता होता त्या मुळे त्या मुलीला काही कावरेल कुत्र्यांनी खाऊन टाकलं, खूप मोठी केस होती ती पण जसं नायब ला समजलं त्याने हि केस दाबून टाकली.विभा-का?!, केणी- कारण तो तेव्हा खूप मोठा व्यवसायी होत होता, जर तेव्हा त्याच्या कुटुंबाची बदनामी झाली असती तर त्याच नुकसान झालं असत म्हणून.विभा-तर असं आहे सगळं पण तू मला का सांगितलं कारण जेहेन ने मला नाही सांगितलं तरी तू सांगितलं.केणी- हो कारण आता जी काही माझी हालत आहे ती त्या जेहेन मुळेच आहे, माझी नौकरी हि गेली.विभा-मी तुला पैसे देईन, मला सांग काय झालं नक्की.केणी-मी तिला म्हटलं की निदान तू त्या मुलीचा घरी जा नाहीतर एकदा तिच्या कबर वर फुल व्हाहून माफी माग,शेवटी तू गुन्हा केलाय,तर उलट मला ऐकून गेली , आणि तिला आणि तिच्या भावाला वाटलं की मी माझं तोंड परत उघडलं तर म्हणून मला हाकलून लावलं.विभा- धन्यवाद, तू खूप माहिती दिली आहेस मला हे घे पैसे जर वाटलं तर मी परत भेटेल तुला.केणी-हो नक्की आणि एक त्या जेहेन पासून सांभाळून राहा कधी काय करेल काय माहित चल मी निघतो बाय.विभा चे प्रश्न तर वाढतच होते.विभा ने डायरी उघडली आणि सगळं लिहून काढलं.दुसऱ्या दिवशी ती जेहेन ला भेटायला गेली. जेहेन म्हणाली, "अरे विभा किती वाट बघितली मी, बाकी काय सेहेम कशी आहे?!". विभा-जेहेन मी केणी ला भेटून आली आहे तर आता जर तू सगळं सांगशील तरच मी थांबते नाहीतर काय उपयोग नाही आहे. जेहेन- ओह, तर तुला विश्वास नाही आहे तर माझ्यावर , असो, सांगते मी.
विभा-मला सांग त्या मेडिकल मध्ये बाई होती की माणूस होता?!
जेहेन- माणूस होता, जॅकेट घातलं होत,गॉगल्स होते.
विभा-ठीक आहे,मला सांग कधी तुझं कोणत्या माणसाबरोबर खूप भांडण झालंय.
जेहेन-हो, त्या दिवशी मी एका मुलीला नशेत ठोकून दिल होत,मला चालता हि नव्हतं येत म्हणून मी कार पुढे जाऊन कुठेतरी थांबवून दिली आणि केणी ला फोन करून दिला.तो येत होता,तेव्हाच एक माणूस आला मदत मागायला हॉस्पिटल मध्ये जायचं होत त्याला,मी जर त्याला मदत केली असती तर पोलीसांना समजलं असत कि मीच तिला उडवून दिलंय,म्हणून मी त्याला म्हटलं की मी नाही मदत करू शकत, तो विनवण्या करू लागला,मी खूपच नशेत होती मी त्याच बरोबर खूप घान वागले , मला आठवतय मी त्याला वेळ घालवायला हे हि म्हटलं की माझ्या बरोबर फोटो काढ मग मी मदत करते.चूक झाली माझ्या कडून,पण मी काय करू माझं नाईलाज होता.
विभा-एवढंच कि अजून काही
जेहेन-तो जायला लागला होता , रडत होता,एकदा वळून त्याने पाहिलं आणि म्हणाला की मी पाया पडतो,ती मरून जाईल, तरी मी त्याला म्हटलं की अरे तू असं समज कि मी अदृश्य आहे,या मुळे त्याला अजून राग आला आणि तो तिथून निघून गेला.
विभा-जरी तू अर्णव ला नाही मारलंय पण तू गुन्हा तर केलाय ना
जेहेन-म्हणून मी तुला नव्हते सांगत.
विभा-ठीक आहे मी तुला वचन दिलंय तर मी हि केस लढेल मी शोध लावते त्या माणसाचा.
जेहेन-चूक झाली अदृश्य म्हणून आता तर त्याने सगळे पुरावे, मेडिकल,सगळंच अदृश्य करून टाकलं.
विभा-लवकरच अदृश्यातलं दृश्य दिसेल.