kadambari jeevlagaa Part -27 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी- जिवलगा ..भाग -२७ वा .

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

कादंबरी- जिवलगा ..भाग -२७ वा .

कादंबरी – जिवलगा

भाग -२७ वा

----------------------------------------------------------------

सोनिया आणि अनिता या दोन्ही मैत्रिणींच्या कहाण्या ऐकून नेहा मनातून खूप दुखी

होऊन गेली होती . गेले काही महिने या दोघींच्या सोबत ऑफिसमध्ये काम करतांना

कधी या दोघींच्या बोलण्यातून स्वतःच्या आयुष्य बद्दल कधी तक्रार , किंवा आयुष्याचे

रडगाणे ऐकवून त्यांनी स्वतःच्या दुखाचे कधी प्रदर्शन केले नव्हते .

एका अर्थांने ..उध्वस्त झालेल्या आयुष्याला समर्थपणे त्यांनी मोठ्या हिम्मतीने सामोरे

जात आपल्या जगण्याची लढाई सुरूच ठेवलेली होती .

सोनिया आणि अनिता ..दोघीजणी अगदी कणखर मनाच्या झाल्या आहेत ..जीवनात

त्यांना खूप वाईट अनुभवातून जावे लागले आहे, त्यांच्या ..जिवलग माणसांनी ..मानसिक

धक्के दिलेत ..तरी कच न खाता , न हारता या दोघी ताठ मानेने जगत आहेत.

सोनियाला तर तिच्या ..शैलेशने अर्धा संसार झाल्यावर दगा दिला आहे..,त्याचे आणि सोनियाचे

प्रेम होते न एकमेकावर .!

मग ..असा कसा हा सोनियाचा ..फसवणारा ..धोकेबाज जिवलग शैलेश

सोनियाला ..तिच्या जीवलगाने-शैलेशने प्रतिसाद तर दिलाच नाही , उलट तिच्या प्रेमाची

फसवणूक केली ,प्रेमाचा मोठाच अपमान केला आहे .

प्रेमाचे हे असे फसवे रूप सोनियाला दुक्ख आणि वेदना देणारे ठरले.

शैलेशला घटस्फोट देऊन ती तिची सुटका करून घेते आहे ..हे तिच्या बाजूने विचार करून

पाहिला तर अगदी योग्यच आहे असे म्हणावे लागेल.

अनिताला रोहनच्या रुपात एक चांगला साथीदार मिळाला आहे, यापुढे या जोडीची साथ –

सोबत अशीच राहावी “ अशी प्रार्थना नेहा मनोमन करीत होती.

तसे पाहिले तर ..आता तिघींचे सूर मस्त जुळून आले होते , अनिता आणि सोनिया ..नेहापेक्षा

सर्वार्थाने सिनियर होत्या ..ऑफिसमध्ये आणि रूमवरसुद्धा .

नेहाने आपणहून छोट्या रुममेटचा रोल स्वीकारीत ,

..रूम आवरणे , वाशिंग मशीन लावणे , चहा करणे ..ही कामे स्वतःकडे घेत

दोघी मैत्रिणींचा वर्क लोड हलका करून टाकला .

नेहाच्या या समजदार स्वभावाचे अनिता ,सोनिया

खूप कौतुक करीत . आपोआपच रूममधल्या कामाची छान विभागणी केली गेली ..

सकाळचे जेवण ..अनिता बनवणार , आणि रात्रीचे जेवण बनवण्याची जबाबदारी ..सोनियाची .

हॉटेलमधले खाणे , बाहेरून पार्सल मागवणे बंद ..”नेहाची कल्पना दोघींनी आनंदाने मान्य केली.

अनिता सोनियाला म्हणाली –

या नेहाच्या येण्याने आता आपण आपल्या रूममध्ये राहत नसून ..

मस्त आपल्या घरात राहतो आहोत असे फील होते आहे मला .

नेहा लव्ह यु ग ..!

असे हसत खेळत दिवस जाऊ लागले ..ऑल इज वेल .!.वाटावे असे ..

रोजच्या प्रमाणे ..तिघी ऑफिसमध्ये आल्या ..आपापल्या सेक्शन –टेबलवर जाऊन बसल्या ..

आणि नेहाला टीम लीडर –ने, तिच्या बॉसने बोलावले ..

अनिता आणि सोनिया पण तिकडे पाहू लागल्या ..

बॉस.म्हणाले ..नेहा -

आता तू इथे बसायचे नाही , काम तर मुळीच करायचे नाही ..

मला तशी ऑर्डर आहे..तुला इथे काम करू द्यायचे नाही..

बॉसचे हे शब्द ऐकून ..नेहाचा चेहेरा रडवेला होऊन गेला , डोळ्यात पाणी येते की काय ?

तिची अवस्था पाहून ..अनिता आणि सोनिया दोघी तिच्याजवळ जाऊन उभ्या राहत म्हणाल्या ..

काय झालाय बॉस ?

नेहाला काम करण्यापासून तुम्ही असे अचानक कसे काय रोकु शकता ?

आणि ही काय सांगायची पद्धत आहे ? बघा ,काय अवस्था झालीय तिची..

अनिता ,सोनिया आणि नेहा ..या तिघींचा गभीर अवतार पाहून बॉस म्हणाले ..

अरे बापरे , मामला एकदम सिरीयस होऊन बसला की हा ...!

ओके ओके..नेहा ..शांत हो ..

आता मी काय सांगतोय ते नीट ऐकून घे. हायपर होऊ नकोस.

हे पहा .अनिता आणि सोनिया ..तुम्हाला वाटला तसा काही उद्देश नाहीये माझा.

आणि काम करण्यापासून कुणाला कधी रोकण्याची आपल्याकडे पद्धत नाही ..

अरे देवा ..!

मलाच कुठून दुर्बुद्धी झाली ,कळलेच नाही ..या नेहाची गंमत करण्याची ...

नेहा – तुझी बदली करण्यात आली आहे ..आता तू ऑफिस मेंटेनन्स department ला

जॉईन करशील . सिस्टम मनेजर म्हणून ..

आता तिथे तुझे बॉस असतील ..इंजी. हेमकांत पांडे –

जे हेमू पांडे नावाने सगळ्यांना परिचयाचे आहेत.

तू नवीन आहेस ..तुझा परिचय नाहीये हे माहिती आहे मला.

तुला दुपारी ..म्हणजे लंच ननतर त्यांना रिपोर्ट करायचा आहे.

तो पर्यंत इथला काम आटोपून टाक आणि मग ,

माझ्याकडून रिलीव्ह लेटर घेऊन टाटा करायचा मला .

ठीक ना ?

नेहाने मान डोलवित .हो सर ,असेच करीन मी .

अनिता म्हणाली -

काय हो सर ..इतकी छान बातमी आहे ही तर...

आणि ती तुम्ही ..छान शब्दात सांगायची सोडून .

गम्मत करायची म्हणून तुम्ही भलताच सस्पेन्स केला .

पण जे झाले ते छानच झाले आहे. कॉम्प्युटर इंजीनियरींग केलेल्या नेहाला

तुम्ही कॅश-पेमेंट करायला लावले ..आता तिला तिच्या आवडीचे काम मन लावून

करायला मिळेल .

काही असो .. नेहासाठी हा बदल खूप म्हणजे खूपच छान आहे.

हो अनिता –

मला तर नेहाची ही बदली म्हणजे ..काही तरी छान घडण्याची सुरुवात तर नाही ना ?

असे वाटायला लागले आहे.

अनिता आणि सोनियाचे बोलणे ऐकून ..नेहा गोंधळात पडून गेली ..

तिच्या पाठीवर थाप देत सोनिया म्हणाली

नेहा – दुपारी तू तुझ्या नव्या सेक्शनला जाणार , ७ व्या मजल्यावर

,आणि आम्ही आपले थेट खाली एकदम तळमजल्यावर

.तू असमान मे आणि हम ..जमीन पर ....

तू आमच्यापासून दुरावणार ..

नेहाने मध्येच बोलणे थांबवीत म्हटले ..

तुम्ही दोघी हे असे का आणि काय बोलत आहात ,,मला काही एक कळत नाहीये..

या बदलीमुळे ..असे इतके काय बदलून जाणार आहे .?

असे सेक्शन -बदल तर होतच असतात , सगळ्यांच्या अशा बदल्या होतात ..

मग

आज, माझी बदली झाली, या बातमीने तुम्ही इतक्या हायपर का झाल्यात..दोघी पण ?

सोनिया म्हणाली ..नेहा , आज याचे कारण, आम्हाला सांगता येणार नाही ,कारण तुझ्या

स्वभावाचे काही सांगता येत नाही ..म्हणून आधीच अंदाज नाही करणार आम्ही.

महिनाभराने तुझ्यात खूप फरक पडेल ,तेव्न्हा आपण बोलू या आजच्या विषयावर ...

यावर नेहा त्या दोघींना म्हणाली ..

हे बघा अनिता आणि सोनिया ..

तुम्ही कोड्यात काय बोलता आहात ? मला कसे कळावे ?

मी तर इथे बोलून-चालून नवखी , इथे काम करा .केले .

आता तिथे काम करायचे ..करते !

हे इतकेच बोलू शकते मी.

अनिता तिला समजावीत म्हणाली

जाऊ दे नेहा ..तू उगीच तुझ्या मनाचा गोंधळ वाढवून घेऊ नको .

छान काम कर .

तुझे बॉस- हेमू पांडे खूप छान व्यक्ती आहेत .

सगळ्यांना सांभाळून घेतात ,तुला ही शिकवतील सारे काम .

सोनिया म्हणाली –

अनिता –तुला माहिते आहे का ..की ..हे हेमू पांडे सर फार एक्स्पर्ट आहेत सिस्टीम वर्क मध्ये .

त्यामुळे आपल्या कंपनीच्या सगळ्या ऑफिस मध्ये त्यांना कायम डिमांड असते . आणि

मेन तर सांगायचे राहिलेच अजून ..

हेमू पांडे ..सर .अजून .बैचलर आहेत हो .........!

त्यामुळे त्यांच्या भोवती आपल्या ओफिसातील सुंदर सुंदर मुलींचा घोळका कायम असतो.

हे पाहून तर मला वाटते ..

या मुलींना कॉम्पुटर वर्किंग मध्ये सारखे इतके प्रश्न का बरे पडत असतील ?

सोपे आहे याचे उत्तर ..अनिता म्हणाली..

हेमू पांडे सर समजावून सांगणारे असल्यावर या पोरीना पडणारे प्रश्न थोडेच संपणार आहेत.

नेहा – आता तुझे बॉस असणार आहेत हेमू सर , जरा लक्ष असू दे ..त्यांच्या भोवती पोरींचा

गराडा पडता कामा नये ..,कामा शिवाय उगीच बसू देऊ नकोस ..या स्मार्ट आणि सुंदर पोरी

बसतात हेमू सरांना डोळे भरून पहात .

नेहा म्हणाली –

हे असले काही ऑफिस मध्ये कसे असेल ?

मला नाही खरे वाटत .त्या पोरींना तसे करीत असतील ?

करीत असतील ? ग नेहा राणी .

.तू किनई पक्की येडी आहेस..तुला नाही समजायचे असे काही .

आता तू तिथे जाणारच आहेस , बघ तुला काही करता येईल का ?

मला ? मी काय करणार यात? नेहाने उलट प्रश्न विचारला

तेव्हा सोनिया म्हणाली ..

आग वेडा बाई ..उद्यापासून त्या हेमू पांडेला दुसर्या पोरीकडे पाहावे वाटू नये ..इतकी छान

सजवून ..पाठवत जाऊ तुला आम्ही . मग, काय हिम्मत आहे त्या पोरींची ..हेमू कडे येऊन

बसण्याची ,

आणि तू समोर असतांना ..त्या हेमुला इधर –उधर पाहण्याची गरजच उरणार नाहीये .

हो की नाही ग अनिता ..!

नेहा न राहवून म्हणाली ..तुम्ही दोघी गप्प बसाल का ?

काय चालू आहे तुमची ही बडबड ?

या असल्या गोष्टीत मला काडीचा इंटरेस्ट नाहीये .. !

मी आणि माझे काम बस ..!

त्यावर अनिता म्हणाली ..

नेहा ..तुला नाहीये इंटरेस्ट ..कबुल

पण, तुझ्या बॉसलाच जर तुझ्यात इंटरेस्ट वाटू लागला तर ?

मग काय करशील ..?

हे पहा अनिता आणि सोनिया ..तुम्ही असे खयाली पुलाव खाणे बंद करा ..!

तुमच्या बोलण्यावरून असे वटते आहे की ..ओफिसातील ..स्मार्ट आणि सुंदर मुलींना भाव न देणारे

हेमू पांडे सर, माझ्या सारख्या साधारण आणि बावळट मुलीला पाहून

मनातल्या मनात नक्कीच म्हणतील ..

अरे देवा – हे असे ध्यान !

पश्चताप होईल त्यांना ,ही नवी कलीग पाहून ..!

सोनिया म्हणाली ..नेहा ,

तुमची भेट अजून व्हायची आहे , एकमेकांना पाहिलेले नाही अजून

तरी आजच मी सांगते ..तुझे मत आणि मन ..

लवकरच बदलते की नाही ,पहाच तू..!

लाव बेट...हजार रुपयाची ..!

अनिता ,म्हणाली –

माझी शर्यत वेगळी आहे ..

या नेहाच्या सहवासात तो हेमू पांडे बदलून जातो की नाही ,हे पहाच तू..

तसे नाही झाले तर ..

मी या नेहाला हजार रुपये देईन ..मी हरले म्हणून..!

हे असले हवेत फुटणारे फुगे पाहून ..नेहाला हसू आले ..

ती म्हणाली ..

हे बघा ,अजून मी इथेच आहे तुमच्या सोबत ,आणि तुम्ही पोंचला सातव्या मजल्यावर .

तुम्ही हवेतच राहा .. ही नेहा .अजिबात बदलणार नाही.

अनिता आणि सोनिया ..तिला म्हणाल्या ..

बेबी ..अब दिल्ली दूर नही ...

--------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढील भागात ..

भाग -२८ वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------