premavin vyarth he jeevan Part- 12 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १२

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १२

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

भाग-१२ वा

---------------------------------------------------------------------------------

त्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्या गेल्या .अनुशाला तिच्या फ्रेंड्सनी आवाज देत बोलावून घेत म्हटले..

हे अनुषा –

अगोदर कॅन्टीन मध्ये घेऊन चल आम्हाला , तुझ्याकडून पार्टी हवी आहे ,आत्ताच्या आत्ता ..

अनुषा गोंधळून गेली ..फ्रेंड्सनी घातलेला घेराव , आणि पार्टी हवी ..म्हणून सुरु केलेला गोंधळ .

ती म्हणाली ..अरे हो हो ..पार्टीला मी कधी नाही म्हटले का ?

पण,मला कारण तर सांगा ना यार कुणी तरी ..!

तुम्हाला न्यूज माहिती झाली म्हणून तुम्ही खुश झालात ,

पण, मी ? मला यातले अजून काहीच माहिती नाहीये ..

एक फ्रेंड म्हणाली ..

मग ऐक तर , मागच्या महिन्यात आपल्याला प्रोजेक्ट बद्दल नोटीस आलेली आठवते ना ..

त्याची लिस्ट लागली आहे ..

ज्यांनी अर्ज दिले होते ,फाईल सबमिट केली होती ..त्याची लिस्ट लागली आहे..

याच studantsनी हे काम करायचे आहे.

बहुतेकांचे नॉर्मल प्रोजेक्ट अप्रूव्ह झाले आहेत ..

पण, जरा हटके , आणि वेगळा असा अप्रूव्ह झालेला प्रोजेक्ट .फक्त तुझा एकटीच आहे ..

अभिनंदन अनुषा ..!

सगळ्यांनी पुन्हा कल्ला सुरु केला ..पार्टी , पार्टी ..!

न्यूज ऐकून ..अनुषा खूपच आनंदित झाली . मनोमन तिने देवाचे आभार मानले .

याच प्रोजेक्टमुळे तर तिच्या मनातील सगळी स्वप्ने पूर्ण होण्याची सुरुवात तिला करायची होती.

कॅन्टीनमध्ये सगळ्यांनी मन मानेल तितके खाऊन घेतले ..आणि मग, म्हणाले ,

चला आता क्लास मध्ये

जाऊन थोडे शिकू या .

हो, हो, चला रे चला ..असे म्हणत दोस्तकंपनीसहित अनुषा वर्गात येऊन बसली.

सोशल वर्क कम्युनिकेशन हा विषय शिकवणारे सर वर्गात आले..

तास शिकवून झाल्यावर ,ते अनुशाला बोलावत म्हणाले ,

कॉलेज संपल्यावर ..अगोदर मला भेट ,

आपल्या दोघांना प्रिन्सिपल सरांनी बोलावले आहे..

ते तुला काही प्रश्न विचारणार आहेत ..

त्यांना योग्य वाटले तरच ..तुला तुझे काम सुरु करता येईल ..अशी त्यांची अट आहे.

अनुषा ,मला वाटते ..सर सहजासहजी परमिट नाही करणार तुला , एका मोठ्या माणसाचे आत्मकथन ,

सक्सेस स्टोरी ऑफ ए कॉमन पर्सन “ तुझे हे प्रोजेक्ट ,

,त्याचे व्हिदिओ शुटींग .. त्यांनी नकार दिला तर ..अवघड आहे

सरांचा हा खुलासा ऐकून ..अनुषा खूप नाराज होऊन गेली ..

तिच्या मनात निर्माण झालेला आशेचा फुगा फटकन फुटलाय असेच तिला वाटू लागले .

पण, काही असो, प्रिन्सिपलसरांना भेटणे आवश्यक होते ..

त्यांच्या सूचनेप्रमाणे ..करावे लागणार होते .

आणि मुख्य म्हणजे ..

श्री.सागर देशमुख यांनी अनुशाला यासाठी होकार दिला तरच “ ती प्रोजेक्ट करू शकणार “होती .

नेमके हे असे काही असेल ? हे तिला आधी सुचले नव्हते ..मग आता ?

अरे देवा ..हातातून निसटून जाणार कि काय संधी ?

कल्पनेने अनुषा मनोमन नाराज होऊन गेली ..

तिचा उतरून गेलेला चेहेरा पाहून सर ,

तिची समजूत घालीत म्हणाले .

अनुषा ,अशी ऑफ –मूड होऊन जाऊ नकोस .

प्रिन्सिपल सरांना भेटल्यावर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यावर यातून नक्की काही तरी मार्ग ..निघेल .

सरांनी धीर दिल्यावर अनुशाला बरे वाटले . आता कधी कॉलेज सुटेल आणि आपण प्रिन्सिपल

सरांना भेटून बोलुत असे तिला झाले होते . अशा वेळी आज घड्याळ सुद्धा हळूहळू चालू आहे असे तिला

वाटू लागले होते.

एकदाचे कॉलेज सुटले ..आणि अनुषा तिच्या सरांना जाऊन भेटली .सर वाटच पाहत बसले होते.

दोघे मिळून प्रिन्सिपल –सरांच्या केबिन मध्ये गेले. सरांनी त्या दोघांना बसण्यास सांगितले .

आणि म्हणाले ..

अनुषा – तुझी प्रोजेक्ट फाईल एकदम आगळी-वेगळी आहे ,या आधी कधी कुणा विद्यार्थ्याने

असा प्रोजेक्ट केलेला नाही . तू तयारी दाखवलीस .. मला आनंद वाटतो आहे .

पण, यात एक मोठाच प्रोब्लेम ..आहे तुझ्यासाठी.

तो म्हणजे ..श्री .सागर देशमुख यांनी त्यांच्यावरील या आत्म-कथन , जीवन-प्रवास .

लाईफ स्टोरी उपक्रमास यास संमती देण्याची .ते देतील याची शक्यता फार कमी आहे

त्यामुळे तुला ही परमिशन मिळण्याची अजिबात शक्यता नाही “,

हे महाशय साधीसुधी व्यक्ती नाहीये . मी त्यांना खूप जवळून पाहिले आहे .

कारण सागर देशमुख ..इज माय कोलेज डेज फ्रेंड .

आम्ही विद्यार्थी असतांना एकाच कॉलेजात होतो . नंतर आमचे रस्ते वेगळे वेगळे झाले , तो

पहिल्यापासूनच खूप वेगळा माणूस आहे, व्यक्ती म्हणून तो -सो कोम्प्लीकेटेड पर्सन आहे “,

पण, या माणसाच्या हातात जादू आहे.. हात लावीन त्याचे सोने होते “,

आम्ही आज ही भेटतो ..पण, फार कमी वेळा ..कारण ..त्याच्यात आणि आमच्यात आता खूप

अंतर निर्माण केलाय त्याने ..स्टेटस चे “. असो.

पण एक गोष्ट नक्की अनुषा ..लाईफ –स्टोरी “करावी अशी ही व्यक्ती नक्कीच आहे.

आणि तू हे करण्यास तयार आहे , हे प्रोजेक्ट आपल्या कोलेज साठी एक युनिक प्रोजेक्ट

असणार आहे” असे मला मनापासून वाटते.

म्हणून तुझा प्रोब्लेम मीच सोडवण्याचे ठरवले

आणि .कोलेजच्या वतीने ..आणि प्रिन्सिपल म्हणून..मी सागर देशमुख यांच्याशी बोललो

त्यांना तुझ्या प्रोजेक्टबद्दल सांगितले ..आणि तीन महिन्यासाठी .तुम्ही आमच्या अनुषा

या विद्यार्थिनीला सहकार्य करावे अशी विनंती केली..

आश्चर्य म्हणजे ..

सागर देशमुख यांनी ..आमची विनंती मान्य केली ..

आणि अनुशाला .सर्वोतोपरी सहकार्य करेल असे कबुल केले .

ते म्हणाले ..

अरे वा ..माझ्याबद्दल असे काही आपणहून करणारे कुणी तरी आहे तर ..

मला ही यात आनंदच आहे.. कारण ..

लोकामध्ये या सागर देशमुखबद्दल ..गैर समजच जास्त आहेत ..

निदान या उपक्रमामुळे ..मी नक्की कसा आहे हे लोकांच्या समोर येईल एकदाचे.

आणि मी कसा आहे “, मी कसा असावा .?

.याचे मलाही आकलन होईल .

आणि सागर देशमुख यांनी ..माझ्या मैत्रीची आठवण ठेवीत म्हटले ..

एका मित्राला तरी माझ्याबद्दल काही चांगले सागितले जावे अशी इच्छा झाली आहे.

त्यांनी माझे, कॉलेजचे आणि अनुषा या न पाहिलेल्या विद्यार्थिनीचे आभार मानले आहेत.

प्रिन्सिपल सर .काय सांगत आहेत ..यावर अनुशाचा विश्वासच बसत नव्हता ..

ओ माय god.. देवाने जादूची कांडीच फिरवली कि काय ?

कॉलेजचे परमिशन लेटर ..देत प्रिन्सिपल सर म्हणाले ..

हे बघ अनुषा .. हे मोठे काम आहे . गंभीरतेने आणि जबाबदारीने करशील तू हे संपूर्ण काम..

कारण सागर देशमुख यांचा लहरी स्वभाव ..

तुझ्या कामात अडथला होण्याची मला भीती वाटते .

त्यांच्या मूड प्रमाणे काम कर, तू जास्त फोर्स करशील तर जमून आणलेला हा प्रोजेक्ट तुला

अर्धवट सोडून द्यावा लागेल हे पण लक्षात असू दे.

त्यांनी जर तुझा अपमान केला तर तो तो माझा पण अपमान असेल आणि कॉलेजचा अपमान

असेल !

अनुशाचे सर प्रिन्सिपल सरांना म्हणाले ..

अहो सर , इतके अवघड काम असेल तर ,

आपण अनुशाला हे नको करूस असे म्हणू शकतो ना,

सागर देशमुखला इतके महत्व का द्यायचे आपण, ?

इतर ही व्यक्तिमत्व असतील ना आपल्याला .

अरे बाप रे ..आपले सर तर दुसरीच काही सुचना करीत आहेत ..

घाई घाईने ती म्हणाली ..

सर , तुम्ही अजिबात काळजी करू नका . मी माझ्या जबाबदारीवर हे काम ,सगळ्या गोष्टी लक्षात

ठेवून करील.

प्रिन्सिपल सर म्हणाले ..आय नो अनुषा , तू ही फाईल सादर केलीस ..त्यावरूनच तुझ्या मनातील

निर्धाराची मला कल्पना आली. मला विश्वास आणि खात्री आहे तुहे छान करशील .

पण, मुदत फक्त तीन महिने ..यात वाढ मिळणार नाही . यावर पुन्हा वाद घालायचा नाही.

ठीक आहे ?

यस सर, मी काटेकोरपणाने प्रोजेक्ट करीन . अनुशाने पुन्हा सांगितले ..

गो अहेड अनुषा , बेस्ट लक .

पिंसिपाल सर आणि अनुशाच्या सरांनी तिला शुभेच्छा दिल्या ..

कॉलेजचे परमिशन लेटर पर्स मध्ये ठेवतांना .अनुषा जणू हवेत तरंगत होती .

हे प्रोजेक्ट म्हणजे ..तिच्या आयुष्याला वळण देणारे ठरणार होते..

पण...?

अभिला या बद्दल सांगायचे की नाही ? याचा खूप सारा गोंधळ तिच्या मनात सुरु झाला होता .

काही वेळा वाटायचे ..

आपण हे काम सुरु करू या ..आणि काही दिवसा नंतर अभिला शेअर करू ..म्हणजे प्रोग्रेस

पाहून त्याचा विश्वास बसेल.

कारण आपण असे करणार आहोत ? यावर एक तर त्याचा विश्वासच बसणार नाही ,आणि

उगाच हे असला आगाऊपणा करायचा नाही

असे बजावून टाकले तर ,? आपल्या मनात जे जे काही

ठरवले आहे ते सगळेच ओम फास होणार .

नकोच ..यातले काहीच सांगायचे नाही ..

आधी आपण थोडे काम करूनच दाखवू अभिला .

असे ठरवून टाकले तेव्हा अनुशाला बरे वाटले.

घरी आल्यावर तिने ..कागदावर मनातले विचार लिहून काढले ..स्टेप बाय स्टेप .एकेक

पाउल पुढे टाकीत जायचे ..आणि सागर देशमुख यांच्या मनात जागा मिळवायची .

चालू महिना संपण्यास आठवडा बाकी होता .. नवा महिना सुरु होण्या अगोदर सागर देशमुख

यांना समक्ष भेटून ..पुढील महिन्याच्या एक तारखे पासून मी सागर देशमुख –अ लाईफ स्टोरी

प्रोजेक्ट सुरु करण्याची विनंती करावी लागेल.

त्यसाठी ..सागर देशमुख यांच्या बद्दल काय काय माहिती गोळा करायची याचे तीपण अनुशाने

तयार केले .

मीडियाशी संबंधित असलेल्या अनुशाला ..सागर देशमुख यांचे बाद्द्ल खूप सारी सार्वजनिक

स्वरुपाची माहिती तिच्या सर्व क्षेत्रातील मित्र-मैत्रिणीनी लगेच दिली . खरेच ..या इंटरनेट मुळे

किती सोय झाली न !

नाही तर अशी माहिती गोळा करण्यातच महिना गेला असता .

अनुषा विचार करू लागली ..

एक यशस्वी उद्योजक व्यक्ती म्हणून ..आपण सागर देशमुख यांची लाईफ स्टोरी करता करता

आपल्याला त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल खूप जाणून घ्याचे ,हाच तर आपला खरा हेतू आहे.

आज अनुशाच्या मनाला खूप मोठे समाधान मिळाले होते ..

सागर देशमुख यांना ..ते पटवून देणार होती ..की

प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ...!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात ..

भाग -१३ वा लवकरच येतो आहे.

-------------------------------------------------------------------

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------