lag aadhichi gosht - 11 in Marathi Love Stories by Dhananjay Kalmaste books and stories PDF | लग्नाआधीची गोष्ट (भाग 11)

Featured Books
Categories
Share

लग्नाआधीची गोष्ट (भाग 11)

लग्नाआधीची गोष्ट

(भाग 11)

खून का आत्महत्या

सुरज सांगता झाला-

मी सपनाच्या मोबाईल वर फोन केला तर फोन लागत नव्हता. नंतर मी तिच्या आई ला फोन केला. तिच्या आईने ती पळून गेली असल्याची बातमी दिली.

तिची आई खूपच नाराज होती. मला जी शंका होती तेच घडले होते. माझी फसवणूक झाल्याचे मी मान्य केले. मी तिच्याशी बोलणे बंद केले व तिच्या घरी सुद्धा फोन करणे बंद केले. मी एकटा पडलो होतो पुन्हाएकदा…..

एक दिवस सपना च्या आईचा मलाफोन आला. काकू मला म्हणाल्या,"तिने नाते तोडले म्हणून तू आम्हाला सुद्धा

विसरणार आहेस काय?,आम्ही काय चुकीच केलय ?" त्यांच्या त्या मातृत्वाकडे बघून मलाच माझी कीव आली. त्यांची मुलगी त्यांच्यापासून लांब गेली होती तरीही मी माझ्या जिवाला बरे वाईट करून घेईल अशी चिंता त्यांना होती. आणि मी मात्र पोरका असूनही त्या आईची माया जानू न शकणारा दरिद्री मुलगाहोतो …. त्यामुळे

मी त्यानंतर सुद्धा त्यांच्याशी बोलणे चालू ठेवले.

मध्ये एकदा मला सपना च्या घरी जाण्याचा योगायोग आला होता. घरी गेल्यानंतर मला जाणवलं की काकूंची तब्येत खरच खूप खालावलेली होती. घरातील मुलगी पळून गेली म्हणून घरातले वातावरण खूप बिघडलेले होते. गावत लोकांनी जवळजवळ वाळीतच टाकले होते. पण माझ्या प्रति त्यांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो.

काही दिवसानी मला समजले की काकूंना आधी होणारा त्रास पुन्हा व्हायला लागला आहे. त्याच्या डोक्यात रक्ताच्या गाठी होत्या. दवाखाना चालू होता.

मला त्याची चिंता लागलेली असायची मी अधून मधून फोन करायचो. त्यांच्यावर उपचार चालू होते त्यांची तबेत आता थोडी सुधारली होती. आता सगळे व्यवस्थित चालू होते ती निघून गेल्या पासून सात महिने उलटून गेले होते.

एक दिवस संजय ने मला भेटायला त्याच्या घरी बोलावले. माझी कोणती तरी वस्तू मला द्यायची आहे व काहीतरी महत्वाचे काम आहे असे तो म्हणाला.

आणि मला सुद्धा अचानक ऑफिसच्या कामानिमित्त कोल्हापूरला जावे लागणार होते त्यामुळे त्याला भेटून मग ऑफिसच्या कामासाठी जायच अस मी ठरवल.. आणि सपनाच्या वस्तू पण मला देऊन टाकायच्या होत्या.

मी याबद्दल फोनवर काकूंना सांगितले व काकू मला म्हणाल्या,

"सपना मला फोन करती कधी कधी, मी तिच्याशी बोलण बंद केल होत पण काय करणार आईच काळीज, ती सांगत होती तो खूप त्रास देतो, मारामार करतो, दारू पिणे तर दररोजच चालू आहे." मला काकूंच्या पण काही गोष्टीचा राग आला होता मी त्यांना म्हणालो,"तुम्ही फक्त जात वेगळी म्हणून त्याला नकार दिलात, तुम्ही खूप चुकीच केलत." …यावर काकू मला म्हणाल्या," जातीसाठी आधी माझा विरोध होता पण त्याचे व्यसनाचे गुण बघता मला त्याला माझी मुलगी द्यायची नव्हती."………

मलाही त्यांचे म्हणणे पटले कारण मी फोनवर संजय च उद्धट बोलण ऐकल होते.

*******