tarevrchi kasrt - 2 in Marathi Short Stories by Swapnil Tikhe books and stories PDF | तारेवरची कसरत - २

Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

तारेवरची कसरत - २

तारेवरची कसरत – २

(वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा)

(अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.)

या वेळी मी व्यवस्थित तयार होऊन बाहेर पडलो, दार उघडले आणि जिना उतरू लागलो. जिना उतरताना घरात नक्की काय घडतंय याचाच विचार माझ्या मनात सुरू होता. आई आणि रोहिणी दोघींचे आवाज ऐकल्यामुळे त्यांच्या आठवणी उफाळून येऊ लागल्या होत्या. इतक्यात खाली ढोलकी वाजवल्याचा आवाज येऊ लागला. मी ही आकर्षीत होऊन ढोलकीच्या आवाजाकडे चालू लागलो. तारेवरच्या कसरतीची तयारी एक डोंबारी कुटुंब करत होते. खेळ सुरू करण्याआधी ढोलकी वाजवून सगळ्यांना निमंत्रण देत होते. मी ही गर्दीत मिसळून गेलो. त्या गर्दीत आणि त्या ढोलकीच्या नादातच मला माझी शांतता मिळून गेली आणि हळू हळू मी भूतकाळात हरवून गेलो.





*****



आधी लग्नाआधीचे दिवस आठवले, तेव्हा आई किती दिवसांनी खुष दिसत होती. माझ्यासाठी तिला पटेल अशी मुलगी तिला मिळाली होती. माझाही होकार तिला कळला होता म्हणूनच ती पुढच्या प्लॅनिंग मध्ये रमून गेली होती, तिच्या आनंदाला कोणाची दृष्ट लागू नये हीच माझी देवाकडे प्रार्थना होती. पण एखाद्याच्या नशिबात नुसतंच सुख लिहिलं तर माणूस किती बिघडू शकतो हे त्या देवाला कदाचित चांगलंच ठाऊक असावं, म्हणूनच तो प्रत्येकाला सुख आणि दुःख अगदी तोलून मापून देत असावा. आमच्या आईच्याबाबतीतही तेच घडलं, तिच्या आनंदावर पाणी फिरवण्याचं पाप माझ्या हातूनच घडलं.

त्या दिवशी रोहिणी बरोबर फिरताना वेळेचे भानच राहिले नाही, अगदीच मी काही तिच्या डोळ्यांत वैगेरे हरवून गेलो नाही पण परत निघायची वेळ आली की 'अजून थोडा वेळ.' असा लाडिक हट्ट माझं मन त्या दिवशी माझ्याकडे करत होतं. तेव्हा, पहिल्यांदाच मी मनाला अडवलं नाही आणि वेळेची आठवण होऊ नये म्हणून हातातलं घड्याळ काढून खिशात ठेवून दिलं. आपण रोहिणीच्या प्रेमात पडलोय, आणि आपलं मन तिच्यात गुंतत चाललंय याची पहिली जाणीव मला तेव्हा घडली. मग पुढं काय घडलं हे वेगळं सांगायची गरज नाही, मन प्रेमात पडलं की ते जरा जास्तच हट्टी बनतं. रोहिणीबरोबर कितीही वेळ घालवला तरी माझं मन मला परत फिरू देत नव्हतं. शेवटी तिनंच माझी परिस्थिती ओळखली आणि घरी जाण्याचा हट्ट करू लागली. त्या वेळी खिशातलं घड्याळ हातात घातले आणि मला वेळेचं भान आलं. घरी पोचायला भलताच उशीर झाला होता. आई चांगलीच खरडपट्टी काढणार अशी माझी खात्री होती, एकूणच मी मनाची पूर्वतयारी करून घरी पोचलो. आई सगळी तयारी करून, आवरून माझी वाट बघत होती. मी घरी गेल्यावर तिने फक्त घड्याळाकडे नजर टाकली आणि कपडे बदलून घरकामात व्यस्त झाली. त्या वेळी उशीर झाला असल्यामुळे आईबरोबर बाहेर जाता आलं नाही, रोहिणी बरोबर वेळ घालवताना मी घरी आई वाट बघते आहे हे विसरून गेलो. मा‍झ्या अशा वागण्याने, आई निश्चितच नाराज झाली होती पण या वेळी ती मला ओरडली नाही. प्रथमदर्शनी मला ते बरे वाटले पण तिथून पुढे प्रत्येक भेटीत मी घरी वेळेत पोचेन याची काळजी माझ्यापेक्षा रोहिणीला जास्त वाटू लागली तेव्हा मला आईच्या शांत बसण्याची जादू समजून आली.

त्या दिवसा पासून माझी एक नवीनच तारेवरची कसरत सुरू झाली होती. आई की बायको? एकीचे मन राखावं तर दुसरी नाराज होणार आणि दुसरीला समजवावं तर पहिलीच मन मोडणार अशा कठीण परिस्थितीत मी अडकत चाललो होतो. या कठीण प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला माझ्या संसाराच्या कारकिर्दीत मिळालेच नाही. उलटपक्षी, त्या दिवशी उशिरा घरी येण्यापासून सुरू झालेली माझी तारेवरची कसरत पुढे अधिक कठीण होत गेली असंच म्हणावं लागेल.



दोघीजणी माझ्यावर जीवापाड प्रेम करत आणि माझ्यावर हक्क गाजवत असत. दोघींचं मन मोडणं मला नेहीमीच कठीण जात असे. लग्नानंतर सुरूवातीला काही दिवस निश्चितच बरे गेले. दोघींनी खूप समजूतदारपणाने घेतले. पण या जगात प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट म्हणजेच कालमर्यादा असते. त्या दोघींच्या माझ्याबद्दलच्या तडजोड करण्याबाबतच्या समजूतदारपणाची कालमर्यादा खुपच कमी होती असच म्हणावं लागेल. कारण लग्नानंतर अगदी काही दिवसातच दोघींचाही समजूतदारपणा कालबाह्य झाला आणि माझ्यावर प्रेम दर्शवून हक्क गाजवण्याची स्पर्धा सुरू झाली.



सुरुवातीला दोघींनी मला खुष करून आपल्या पक्षात ओढून घेण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. म्हणूनच जेव्हा रोहिणी पिझ्झा बनवायची तेव्हा आई मुद्दाम बाबांना पिझ्झा वैगेरे पटत नाही या बहाण्याने मला आवडती भाजी करायची. तर जेव्हा आई लाडाने माझा लहानपणीचा फोटो काढून दाखवायची तर दुसऱ्या दिवशी रोहिणीने आमच्या दोघांचा एकत्र फोटो फ्रेम करून आणायची. असे मला खुष करण्याचे वेगवेगळे प्रकार करण्यात आले.

त्यावेळी मला माझ्या दोन्ही हातात लाडू असल्याचे भाग्य मिळाले होते. पण दोन्ही हातातील लाडू आनंदाने खाताना, 'कुठला लाडू अधिक आवडला?' असा निरागस भासणारा पण अत्यंत खोचक असणारा प्रश्न आपली वाट बघत असेल अशी कल्पना मी कधीच केली नव्हती. प्रामाणिक पणे सांगायचं तर मला लाडू आवडतातच, कधी हा आवडतो तर तर कधी तो. त्यामुळं मी सुरवातीला अगदी निरागस मनाने मनातील प्रामाणिक उत्तर देत असे. पण, या स्पर्धेत एक जिंकला तर दुसरा हरणार, आणि पर्यायाने दुखावला जाणार हे समीकरण मला पहिल्या काही अनुभवातच समजले. आई आणि बायको दोघींनाही खुष ठेवण्याची तारेवरची कसरत कोणी एका दिवसात शिकत नसतो. माझंही तसंच झालं. सुरुवातीला मी फार धडपडलो. मग काय कधी आई नाराज तर कधी रोहिणी नाराज. कधी या बाजूला तोल जाई तर कधी त्या बाजूला.

मग काय? आईची बाजू घेतली तर मी 'गायीचा बछडा' आणि बायकोची बाजू घेतली तर 'म्हशीचा टोणगा' बनू लागलो. हे टोमणे ऐकून कितीही राग आला तरी त्याला उत्तर नेहमीच हसतमुखानेच द्यावं लागतं हे सुद्धा मला काही कटू अनुभवातूनच शिकावं लागलं. माझी अगदी आजपर्यंत ही बिरुदावली मला वेळोवेळी अनुभवायला लागते.

मा‍झ्या लग्नानंतर सुरू झालेली, मला खुष करण्याची आई आणि बायकोची स्पर्धा मला वरकरणी आनंद देणारी जरी भासत असली, तरी या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना नेहमीच माझी त्रेधातिरपीट होत असे.

यावर उपाय म्हणून, काहीच दिवसात या स्पर्धेचा निकाल नेहमीच बरोबरीत लावावा या निर्णयाप्रत मी येऊन पोचलो. पर्यायाने तेव्हापासून, रोहिणीचा पिझ्झा खाल्ल्यावर सुद्धा, "वांग्याची भाजी केली आणि मी ती खाल्ली नाही असे कसे होईल?". असे वाक्य बोलून परत भाजी-पोळीसुद्धा खाउ लागलो. माझा आणि रोहिणीचा फोटो शिताफीने आमच्या बेडरूममध्ये तर आई बरोबरचा फोटो लॅपटॉपवर सजवु लागलो. एकूणच एकीला खुष करताना आपण दुसरीला दुखावणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होतो. पण कालांतराने ते ही अवघड वाटू लागलं.

मला सांगा, लहानपणी आईच्या मांडीत बसून, आणि अश्रू न आवरता बघितलेला 'मदर इंडिया', आणि बायको बरोबर प्रेमाची कबुली दिल्यावर पहिल्यांदा एकत्र पाहिलेला 'दिल तो पागल हे' हे दोन्ही सिनेमे रविवारी संध्याकाळी जेव्हा एकत्र टीव्हीवर लागतात आणि आपल्याला त्यातील एकाची निवड करून तो सिनेमा पूर्ण कुटुंबाबरोबर एकत्र बघावा लागणार असेल तेही आई किंवा बायको यातील एकीलाहीन दुखावता.... आशा वेळी हा सामना एक निरागस पुरुषाने बरोबरीत कसा सोडवावा?



अशा अवघड प्रसंगी कोणत्याही निरागस पुरुषाची धांदल उडणारच... त्या प्रसंगी खरं तर मला मनापासून शूमाकरची एफ वन रेस बघायची होती कारण त्या दिवशी तो नवीन ट्रॅक रेकॉर्ड सेट करण्याची दमदार शक्यता होती. पण तरीही कटुंबाच्या शांततेसाठी मला मनावर दगड ठेवून ब्रेकमध्ये चॅनल बदलत दोन्ही सिनेमे एकत्र बघावेच लागले, आणि तेही मदर इंडिया बघताना डोळ्यातून अश्रू गाळत तर दिल तो पागल हे बघताना प्रेमरसात भिजून...



कठीण असतं हो हे करणं....



असले प्रसंग मला मुळीच सवयीचे नव्हते, नव्हते कसले किंबहुना अजूनही नाहीत. त्यामुळं हा सामना दरवेळी बरोबरीने सोडवणं मला दिवसेंदिवस कठीण जाऊ लागलं. तेव्हाच मी काही अनुभवी पुरुषांसोबत याबाबतीत सल्लामसलत करावी या निर्णयाप्रत आलो. मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना गाठलं. पण त्यांची आई त्यांच्या लग्नापूर्वीच देवाघरी गेल्यामुळे त्यांना हा कठीण प्रश्न सोडवावाच लागला नव्हता. म्हणून मी काही वेळाने माझ्या मित्रांच्या वडिलांशी चर्चा केली, माझ्या सासऱ्यांशी सुद्धा चर्चा केली. बहुतेक वेळेला अशी चर्चा निरर्थक ठरली, कारण 'कालाय तस्मै नमः', म्हणजे त्यांच्या वेळी यांच्यावर त्यांनी वापरलेली पद्धत आजच्या काळाला अनुसरून नव्हती किंबहुना आजच्या काळात मला ती पद्धत वापरता येणार नव्हती. कालानुरूप समाजाचे नियम, सामाजिक मान्यता बदलल्या असल्याचे आम्हाला आमच्या चर्चेतून जाणवले. त्यामुळे हा प्रश्न माझा मला सोडवावा लागेल असा उपदेश ओळखीतल्या सर्व जेष्ठ पुरुषांनी दिला होता. एकूणच मी सर्वांचे सल्ले ऐकून भलताच निराश झालो होतो माझ्या प्रश्नाचे उत्तर मला कोणीच देऊ शकत नाही हे पचवणं मला खूपच जड गेलं.

- क्रमशः