Human v s Robot - 3 in Marathi Love Stories by Hemangi Sawant books and stories PDF | ह्यूमन v s रोबोट-पार्ट-३ (अंतिम)

Featured Books
Categories
Share

ह्यूमन v s रोबोट-पार्ट-३ (अंतिम)

हे ऐकून मी चांगलीच घाबरी आणि त्याचे आभार ही मानले.. "थँक्स... तु आज नसतास तर माझ काय झालं असत." एवढं बोलून ती त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही एक स्माईल देत . "इट्स ओके" एवढंच बोलला. मीच स्वतःचा हात पुढे करत विचारले...,"फ्रेंड्स..?" माझ्या हाताला बघून त्याने ही आपला हात पुढे केला. पण लगेच काढून घेतला. मला जरा वेगळं वाटलं. पण हे श्रीमंत लोक काही ही करु शकतात म्हणुन मी सोडून दिलं. पण त्याच्या हाताचा स्पर्श वेगळा जाणवला. थोडावेळ बसून तो बाहेर निघुन गेला.




मी देखील माझे कपडे बदलुन खाली आले. त्यांचा बंगला एखाद्या पिक्चर्समधल्या बंगल्यासारखा होता. मी खाली येताच एक नोकराने मला डायनिंग टेबलाजवळ घेऊन गेला. त्या टेबलावर खूप काही खायला ठेवलं होत ते बघून माझ्यातर तोंडाला पाणीच सुटलं.. आणि मी सगळं अक्षरशः तोंडात कोंबत होते. हे बघुन कधी नव्हे तो राविश खळखळून हसत होता. हे बघुन मी ओशासळतच हसले. सगळं करून त्यानेच मला घरी सोडलं. आता आमची छान फ्रिएन्डशीप झाली होती. पण एक होत तो कॉलेजमध्ये असताना माझ्याशी कधीच बोलत नसे. पण बाहेर मात्र खुप काळजी घ्यायचा.



त्याने त्या मुलांना ही पोलिसांच्या हवालि केलं ज्यांनी माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. पण ते देखील श्रीमंत असल्याने बेलवर बाहेर आले होते. एके दिवशी मी आणि राविश बाहेर गेलो असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यांच्या गाडीने आमच्या गाडीला घेरलं आणि काही लोकांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. हे सगळं राविशने छान सांभाळून घेतलं. पण शेवटच्या एका गाडीतल्या एका माणसाने पिस्तुल मधली गोळी माझ्या दिशेने झाडली असता ती राविशने स्वतःच्या हातावर झेलली आणि त्या माणसाला त्याच्याच गनने मारल. पण यासर्वांत त्याला दुखापत झालेली बघून मी त्याला गाडीत बसवलं आणि पोलिसांना कळवलं. मी लगेच त्याला त्याच्या घरी घेऊन आले.



घरी घेऊन येत असताना माझ्या हाताला त्याच्या पाठीचा स्पर्श होत होता आणि मला तिथे जाणवलं की, काही वायरि सारखे पार्ट्स बाहेर आले होते. आणि त्याची स्किन देखील फाटली होती.., पण त्यातुन रक्त काही येत नव्हतं. तर त्या जागेतून आतील भाग दिसत होता जो एखाद्या स्टील सारखा होता. हे सगळं बघून मी चांगलेच गोंधळे होते. काही वेळाने आम्ही घरी पोहोचलो. त्याला पोहोचुन मी माझ्या घरी आले. पण डोक्यात विचार थैमान घालत होते. आज आपण जे पाहिलं ते खरच खर होत की भास हे काही केल्या कळत नव्हतं.



असेच दिवस जात होत. पण त्या दिवसापासून आमचं भेटणं काही केल्या होत नव्हतं. मी जेव्हा राविशला कॉल करायचे तो घेत नव्हता. तो मला इग्नोर करू लागला होता. त्याच्या इग्नोर करण्याचा मला मात्र त्रास होत होता..,कारण राविश मला आवडू लागलेला.. पण त्याच असं इग्नोर करण मला हर्ट करत होतं. अशीच घरी बसले असता दारात एक गाडी येऊन थांबली आणि त्यातून एक ड्राइव्हर बाहेर आला. मला बंगल्यावर राविश ने भेटायला बोलावल होत. मी लगेच तय्यार होऊन निघाले.



मी रूममधे गेले असता राविश लॅपटॉप वर काहीतरी करत होता. मी जाताच त्याने ते थांबवलं. "कशी आहेस..?" त्याने जवळ येत विचारल. मी मानेनेच ठीक असा इशारा केला. "मी उद्या पॅरिसला जातो आहे कायमचा.., यापुढे आपण फ्रेंड्स म्हणून नाही राहू शकत. मला विसरून जा" त्याने समोर बघत त्याचं वाक्य पूर्ण केलं. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसत मी तिथून निघून जात असताना त्याने माझा हात धरला आणि मला घट्ट मिठित घेतलं. मी देखील जोर जोरात रडु लागले. "काय झालं रडायला...??" त्याने प्रेमाने विचारल असता मी त्याला लटक्या रागात मारल. "तु का जातो आहेस मला सोडुन.. एवढी वाईट आहेत का मी" मी रडत बोलले.



माझ्यापासून दूर जात...., एक दीर्घ श्वास घेत तो बोलु लागला. "रेवती मी माणूस नाहीये... मी माझ्या बाबांनी बनवलेला एक रोबोट आहे. त्यांच्या मुलाचा कार ऍकसिडेंटमध्ये मृत्यू झाला हे ऐकून त्यांच्या बायकोने म्हणजे माझी आई देखील हे जग सोडून गेली. हे माझ्या बाबांना सहन नाही झालं आणि त्यांनीच माझा शोध लावला.



माझे बाबा एक साइन्स्टिस आहेत. खुप वर्ष मेहनत करून त्यांनी मला बनवल आहे. माझ्यामध्ये ते सगळं आहे जे इतर मुलांमध्ये असतात. भावना, बुद्धी, विचार करण्याची शक्ती.., ते आता पॅरिसमध्ये आहेत. त्यांना त्या दिवशीच्या हमल्या बद्दल कळल्यापासून त्यांनी जास्तच टेंशन घेतलं आहे. म्हणून मला जावं लागेल." एवढं बोलून तो बेडवर बसला.



सगळं ऐकून मी मात्र स्तब्ध झालेले. कारण आपण एका रोबोटवर प्रेम केलं. स्वतःशीच पुटपुटले. "अजून एक..., तो माझ्याकडे बघत बोलला.., "माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे रेवती. पण मी तुझी साथ नाही देऊ शकत. मला माझ्या बाबांकडे जावं लागेल. उद्या सकाळची माझी फ्लाईट आहे आणि मी जाणार आहे कधीही न येण्यासाठी.,म्हणून आज तुला बोलावून घेतलं." एवढं बोलून तो देखील रडु लागला. त्याला रडताना बघून मी धावत जाऊन त्याला मिठीत घेतलं.



काही वेळ त्याच्याच मिठीत होते. त्या वातावरणात राविशने त्याचे मऊ उबदार ओठ माझ्या ओठांवर कधी टेकवले हे देखील मला कळलं नाही. पण त्या क्षणी मी स्वतःला थांबवु शकले नाही आणि त्याच्या ओठांमध्ये हरवून गेले.. जाग आली ती दरवाजा ठोकवण्याच्या आवाजाने. मग जेवुन आम्ही परत गप्पा मारत बसलो. मी त्याला डोळेरून बघून घेत होते. कारण तो परत कधीच मला दिसणार नव्हता. काही वेळाने त्याने मला घरी सोडलं.




ती रात्र त्याच्या आठवणीत गेली. जाग आली तेव्हा घडाळ्यात दहा वाजून गेले होते. मी तशीच बाहेर आली. समोर बाबांनी टीव्हीवर न्युज लावली होती. त्यावर पॅरिसला जाणाऱ्या प्लेनच्या अपघाता बद्दलची हेडलाईन बघून मला तर चक्करच आली.




मी स्वतःला सावरुन आत आले आणि राविश ला कॉल करायचा प्रयत्न करू लागले. पण त्याचा कॉल काही लागत नव्हता. मी सारख ट्राय करून ही तो घेत नव्हता.. तशीच बेडवर पडुन खूप रडले... त्याच माव मोबाईल वर झळकल म्हणून मी आनंदने कॉल घेतला. पण पलीकडून आवाज मात्र अनोळखी होता.. "तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती व्यक्ती आता या जगात नाही." हे ऐकून तर मी खालीच कोसळले.



जेव्हा शुद्धीमध्ये आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. तिथे कळलं की मला दोन दिवसांनी जाग आली आहे. स्वप्न असेल म्हणून मी माझा मोबाईल घेतला आणि राविशला कॉल केला पण त्याचा नंबर बंद येत होता. बाजूला पडलेल्या न्यूजपेपर मध्ये त्याचा मोठा फोटो आणि त्याच्या अपघाताची बातमी छापून आली होती. ते बघून मी अजून ही रडत होते.



आज राविश जाऊन दोन वर्ष उलटली होती.. पण मी अजून ही त्याच्या आठवणीत रमून असते. भले तो रोबोट होता.., पण त्याच्यावर जिवापाड प्रेम मी केलं होतं. आणि एका रोबोटने माझ्यावर केलेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नव्हते. समोर आभाळ भरून आलेलं. हातातला वाफळलेला चहा तसाच ठेवुन दिला... स्वतःचे डोळे बंद केले असता आठवले ते..., राविशचे ते गहिरे हिरवे डोळे. आणि मी सुखावले. समोर पाऊस कोसळत होता आणि मनात राविशच्या आठवणींचा पाऊस बाहेर पडु पाहत होता.

प्रेम हे असच असत. सांगता नाही येत कोणासोबत, कधी प्रेम होईल.



■■◆●■■