propose - 6 in Marathi Horror Stories by Sanjay Kamble books and stories PDF | प्रपोज - 6

Featured Books
Categories
Share

प्रपोज - 6

कोण असेल ती आकृती...? विचार करून करून डोकं दुखायला लागलं... कोणाला सांगाव का या बद्दल...? पण कोणाला...? आणी हे एवढ्यावरच थांबणार होत की पुढे आणखी काही नशीबान वाढून ठेवलेलं....

*****

सकाळी आवरून कामावर गेलो खरा पन लक्ष लागत नव्हत... रात्रीच ते स्वप्न कधीच डोक्यातुन गेलेल.... पन स्वता:च्या मुर्खपनावर राग येत होता.. मी तीच्या निखळ मैत्रीला आता कायमच मुकलो होतो. आजही तीचा एक ही मेसेज नव्हता की मिसकॉलही नव्हता... इतका तिरस्कार करत होती माझा.. इतका राग आलेला तीला माझा...? खरच मी तीच्या मैत्रीला समजुन घेतल नाही, पन मी ही प्रेम केल तीच्यावर , म्हणुन तर तीच्या अप्रत्यक्ष नकारानंतरही तीच्याबद्दलचा आदर , प्रेम , भावना कमी झाल्या नव्हत्या....

कामावरून रात्री उशीराच घरी आलो... कामामुळे खुपचं थकवा जाणवत होता.. बॅग ठेवतच सोफ्यावर अंग टाकल आणि डोळे बंद करुन तसाच बसुन होतो..

"संज्या..... इतका राग मनात धरायचा....?"

कानावर पडलेल्या त्या शब्दांत राग होतो आणी आदेशही होतो...

" हो ना.... खुपच राग आहे त्याला..." पुस्तकातून किंचित वर डोकावत माझी छोटी बहीन पुजा देखील थोडी रागातच म्हणाली.... चौकोनी फ्रेमच्या चष्म्यातून दिसणा-या तिच्या किलकिल्या डोळ्यांमधे पहात मी किंचित हसून म्हणालो..
" पुजा.....बाळ तु अभ्यास कर, आणी आई कसला राग...? काय बोलतेस....?"

माझं बोलणं संपत न संपत तशी आई बोलतच किचनमधून बाहेर आली..
" मग पाहुन तरी ये तीला..."
" म्हणजे .... कोणाला....? आई... जरा निट सांगशील का....?"
"म्हणजे .... तुला काहीच माहीत नाही...?"
माझ्या काळजात चर्रर्रर्र कन झाल....
" आई.... कोणाला...? काय झाल.....?"

" काल रात्रीच दवाखाण्यात नेल.. पोरीच सार अंग आकडुन गेलेल... काल रात्री तु यायच्या आधीच नेल प्रियाला..."

आईच बोलण ऐकताच डोक सुन्न झाला... प्रियाला दवाखाण्यात नेल..? आणी मला माहीतीही नव्हत..! झटकन उठलो आणी गाडीला किक मारली... सुसाट वेगाने माझी गाडी त्या हॉस्पीटलच्या दिशेने धावत होती...

काय झाल असेल तीला...? पुन्हा तोच त्रास तर...? कशी असेल ती...? एक ना अनेक प्रश्नांनी डोक्यात काहूर माजवलेल... हॉर्न देतच रस्त्यावरून गाडी वेगात जात होती... रात्रीची लोकांचं आॉफिस सुटण्याची वेळ असल्यान रस्त्यावर ट्रॅफिक पण खुपचं होत...त्यातूनच सगळ्यांना मागे टाकत.... दोन वेळा ट्रकला‌ आणी एकदा व्हॅनला ठोकता ठोकता वाचलो.... हॉस्पीटल समोरच गाडी लावत आत शिरलो प्रियाचा भाऊ समोरच होता.. त्याच्या डोक्यालाही पट्टी बांधलेली...

" हे काय झाल रे तुला.... आणी कुठ आहे प्रिया...?"

"त्याच्या डोळ्यातल पाणी पाहुन माझ्या काळजात धस्स झाल..."

दोघेही चालत I.C.U. रूम जवळ आलो.. तीची आई , बाबा दोघेही बाहेरच उभे होते. मला पाहुन तीच्या आईला अश्रु अनावर झाले... दरवाजा जवळ जात आत पाहील... ती आत बेडवर पडुन होती.. निपचीप , निस्तेज, एका असाध्य रोगान ग्रस्त रूग्णासारखी कोमेजून गेलेली ...हळूच दरवाजा उघडत आत गेलो पन ती शुद्धीवर नव्हती... तीची अवस्था पाहुन खळ्ळकन डोळ्यात पाणी तराळल, फक्त दहाच दिवस झालेले तीला याच हॉस्पीटल मधुन घरी जाताना आमची किंचीतशी ओळख झालेली आणी तीच्या स्वभावाचा फॅन झालो.. तीची मस्करी, बोलण सार एकदम नजरेवर आल...

" काय झालय प्रियाला...? का अस होतय तीला..? आणी मला कोणीच का नाही सांगितल....?"

बोलत मी तीच्या बाबांकडे पाहील

"प्रिया म्हणाली होती.... आपल्यामुळे कुणाला त्रास नको व्हायला..." तीच्या बाबांच उत्तर ऐकुन काळीजच फाटल.
तीच्यासाठी इतका दुरावलो मी...?
तीला प्रपोज करून इतकी मोठी चुक केली का मी...?
स्वताचाच तीरस्कार वाटावा अस वागलो होतो मी.. I.C.U. चा दरवाजा उघडुन डॉक्टर आत आले..
" रिपोर्ट आणले का सांगितलेले...."

" हो साहेब...." तीच्या भावाने रिपोर्ट फाईल डॉक्टरांच्या हातात ठेवली... फाईल हातात घेत एकएक रिपोर्ट चाळू लागले... तसे अनुभवी , नावाजलेले डॉक्टर होते... विरळ होत चाललेले पांढरट केस, किंचीत सुरकुतलेला उभा चेहरा , सरळ नाकावर चौकोनी फ्रेमचा जाड चश्मा, जाड पांढरट मिशा, चकचकीत दाढी...

भुवया किंचीत आकसत त्यांनी रिपोर्टची सारी पानं पुन्हा पुन्हा पाहीलित आणी डोळ्यावरचा चष्मा काढला.. आम्ही सर्वच गंभिर मुद्रेने त्यांच्याकडे पहात होतो... माझ्या तर काळजाचा क्षणाक्षणाला ठोका चुकत होता... ते काय सांगतील...

' परमेश्वरा जे काय व्हायच ते मला होऊदे. ती बरी होऊदे..'
मनातुन माझा ईश्वाराचा धावा सुरू होता..
" सगळे रिपोर्ट तपासलेत, जुने नवे... सगळ्या टेस्ट करून झाल्या पन कुठच काही प्रॉब्लम दिसत नाही आहे...."
डॉक्टरांचे शब्द ऐकुन आयुष्यातल सर्वात मोठ समाधान भेटल्यासारख वाटल...
" पन तरीही त्यांना त्रास होतोय... केस बरीच कॉम्पलिकेटेड वाटतेय..."

डॉक्टर तीच्या बाबांशी बोलत बाहेर पडले , मी ही तीच्याकड पाहील आणी बाहेर पडायला I.c.u. चा दरवाजा उघडणार तोच त्या काचेत काहीतरी दिसल ज्याने माझ लक्ष वेधुन घेतल... मी जागेवरच थबकलो... तसच निरखुन पहाताना काळजाचा थरकाप उडाला... डोळे विस्फारून मी मागे वळून पाहील तर प्रिया तशीच पडुन होती आणी पुन्हा समोर पाहील तर मागे बेडवर झोपलेल्या प्रियाच प्रतिबींब समोर दरवाजावरील काचेत दिसत होत तीच्या अंगावर उभी एक धुसर आकृती दीसत होती... जशी एक सावली , पुरषाची.. तीच्या बेडवर उभी, दोन्ही हात हवेत पुर्ण पसरलेले आणी वर छताकडे पहात तोंडाचा जबडा पसरलेली ती आकृति पाहुन अंगावर शहारा आला... मी त्या आकृतिची होणारी हलचाल पहात होतो त्या आकृतीने हवेत पसरलेल्या आपल्या दोन्ही हातांच्या मुठी करकचुन आवळल्या आणी झटक्यासरशी प्रियाच्या शरिरात सामावली त्या आघातासरशी प्रियाच्या तोंडातुन आर्त किंकाळी बाहेर पडली... सर्वांग आखडुन गेल असह्य वेदनेन गुडघे आखडुन घेतले आणी सार शरीर गोळा करत रडु लागली.. किंचाळू लागली... आणी तीची आई तीला सावरु लागली पन काळीज पिळवटून टाकणार तीच किंचाळण सुरूच होत.. काय कराव सुचेना.. तसाच धावत डॉक्टरांना बोलवून आणल.. इकडे तीच्या वेदना वाढतच होत्या . मासा पाण्यावीना जमिनीवर तडफडावा, झटके खावा तस तीच सार शरीर तडफडत होत क्षणाक्षणाला झटके खात होत आणी पुन्हा बेशुद्ध झाली.. डॉक्टरांनी तीची अवस्था पाहीली आणी शांतपने म्हणाले

" तुमच्या मुलीचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत सगळ चेकअप करून पाहीलय.. मुंबईच्या , पुण्याच्या डॉक्टर्सचे पन रिपोर्ट पाहीलेत त्यांनीही तेच लिहीलय.... नॉर्मल...तरी काहीतरी घडतय ... "

" डॉक्टरसाहेब आता तुम्हीच सांगा... पुण्यातुन इकडे कोल्हापुरला आलो. मागच्या सहा महीण्यापासुन सहन करतीये ती....."
तीच्या वडीलांनी आपल्या शुद्ध हरपलेल्या मुलीकड पाहील.....

" एक विचारू का......?"
" हो विचारा ना साहेब....."
डोळ्यावर लावलेला चश्मा काढत डाक्टरांनी एक कटाक्ष प्रियाकडे टाकला.....
" गैरसमज करून घेऊ नका.... मी फक्त माहीत असाव म्हणुन विचारतोय...."
"बोला साहेब... परमेश्वरान मुलीचा बाप बनवताना सहनशक्तिही दीली आहे.. विचारा.."

" एक तर ती आजारी असल्याच नाटक करतेय किंवा तीला एखाद्या मानसिक आजारान ग्रासलय ...."

डॉक्टरांच बोलण ऐकताच माझा पारा चढला..
" डॉक्टर... ती वेडी नाही आणी नाटकही करत नाही...."
एकापेक्षा एक माझ्याकड पहात होते...
" आणी हो... या जगात जशा आडचणी आहेत तसे उपायही आहेत.... ती बरी होईलच... तुमच्याकडून काही होईल का ते सांगा....?"

मी आवेगात बोलुन गेलो पन सर्वच निरूत्तर झाले.. डॉक्टरांनी एक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणी बाहेर निघुन जात तीच्या बाबांना सोबत यायला सांगितल...
" आई...." त्या केविलवाण्या यातनेन भरलेल्या आवाजान आम्हा तीघांच लक्ष वेधुन घेतल...
तीची आई धावतच तीच्याजवळ जात तीचा हात आपल्या हातात घेत म्हणाली ...
"बोल बाळा...."
" मी कधीच बरी होणार नाही का ग..?"
तीच ते वाक्य मनाला चाटका लाऊन गेल... मी दुरूनच तीला पहात होते...
"बरी होशील ग बाळा.. आम्ही आहोत ना.."
" खुप त्रास होतोय ग आई... आता अस वाटतय या वेदना माझ्या प्रेतासोबतच संपतील ग...."

" अस नको बोलु बाळ... आपन आणखी चांगल्या डॉक्टरकडे जाऊ..." आई तीला धीर देत होती..
" नाही सहन होत आता..." प्रिया मनापासुन थकली होती...
" आई.... खुप स्वप्न पाहीली होती ग... डॉक्टर व्हायच होत.. वाचवशील का ग मला...?"
काळीज पिळवटपन टाकणारा तीचा शब्द नी शब्द मनात घर करत होता....
"काही गोष्टींवर औषधांबरोबरच आणखी एक उपाय करावा लागतो..."
तीच्या भावाने माझ्याकडे पाहील,
"कसला उपाय....?"
" जेव्हा डॉक्टरही हतबल होतात तेव्हा स्वता:सांगतात.. 'आता सर्व काही परमेश्वराच्या हाती आहे.'.."

" कुठला परमेश्वर.. आमचा आता कशावरच विश्वास राहीलेला नाही... आमच हसत खेळत सुखी कुटुंम्ब आज मुलीचा जीव वाचवायला मागच्या सहा महीण्यांपासुन एका शहरातुन दुस-या शहरात फिरतोय... का त्याला दया नाही येत...?"
तीच्या आईची ती तक्रार योग्यच होती,
प्रिया आपल्या आईला शांत व्हायला सांगु लागली पन त्याच्या डोळ्यातुन पाणी येतच राहील....


क्रमशः