MAZYA LOVEMARRIAGECHI GOSHT - 23 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 23

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 23

२३

विसरली हार ती का घरी?

बाईकवर टांग मारून, प्यार का संदेसा घेऊन, एका ध्येयाने प्रेरित होऊन, वेडात दौडल्यासारखा निघालो मी. वै चा तो सोन्याचा हार नि माझे ते पहिलेवहिले प्रेमपत्र किंवा प्रेमचित्रपत्र घेऊन. आज विचार करून वाटते की तेव्हा आजच्या सारखे मोबाईल असते तर .. सारे किती सोपे झाले असते. टाकले दोन मेसेजेस की झाले काम! पण तरीही हे असले 'हार्ट टू हार्ट' संदेश पाठवणे कठीण कामच नाही का? तरीही हे होतच आले आहे. अगदी मोबाईलच काय .. पत्रे टाकणारे पोस्टखाते नव्हते तरीदेखील ही प्रेमपत्रांची देवाणघेवाण होतच होती ना! कबुतरे पण या कामी जुंपली जायची. आणि त्याही आधी पत्रे लिहित नसतील तरीही ही ह्रदयांची देवाणघेवाण होतच असणार ना! थोडक्यात हे संदेशांचे दळणवळण होत आले आहे अनादि कालापासून नि पुढेही होत राहिल. तरीही ह्यासाठी कुणी गाईडलाईन्स बनवू नयेत आजवर? म्हटले ना जीवनोपयोगी असे शिक्षण तसे फारच कमी दिले जाते आपल्याला! मेडिकलच्या शिक्षणात हृदयाची रचना शिकवतील, त्याचे कार्य शिकवतील, पण त्याचा कारभार चालतो कसा नि चालवायचा कसा ते कुणीच नाही शिकवत. थोडक्यात हे कठीण काम करायला निघालेलो मी.

ह्या हे ह्रदयीचे ते ह्रदयी घालण्याबद्दल मुलभूत आणि मौलिक चिंतन करत.. हे सारे चिंतन ती बाईक हाकता हाकता मी मुंबईतल्या एका घराचे दार ठोठावे पर्यंत संपवले.

एका श्रीयुत डाॅ. श्रीधर श्रीपाद श्रीयान, एम. ए. एम. कॉम. डि.लिट. नावाच्या नेमप्लेटी मागचा दरवाजा उघडला.

"कोण तुम्ही?"

“मी.. मोदक.. नाही आमोद.. बुरकुले आलेत त्यांना भेटायला आलोय..”

“अरे या.. या.. तुम्ही लग्नघरातून?”

“हो.. उद्या जायचीत ना मंडळी म्हणून..”

“पण ते तिकडूनच तर आले..”

“हो.. पण वै.. देही तिचा ..”

इतक्यात वै ची आई बाहेर आली..

“ओ हो.. अरे आमोद तू.. इतक्या लांबवर.. इकडे असा घाईघाईत कसा?"

आता वै च्या आईला काय म्हणावे म्हणजे डायरेक्ट आई की काकू की आंटी की अजून काही.. या गोंधळात पडलो मी. म्हटले ना प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडेल असे शिक्षण कुणी देतच नाही.

“काही नाही हो .. वैदेही तिचा हा हार तिकडे विसरून आली.. म्हणजे चुकून.. विसरून आली.. म्हटले उद्या तुम्ही जाणार.. मग परत येणे कधी होईल.. तो द्यायला आलो..”

तिच्या आईच्या हातात ती बॅग देत मी म्हणालो..

तिने बॅग घेताच माझ्या लक्षात आले.. ती गुलाबी चिठ्ठी मी त्याच बॅगेत ठेवली आहे. माझा जन्मजात वेंधळेपणा असा या वेळीही!

“वेंधळी आहे हो वैदेही.. बिचाऱ्याला इतकी लांबची फेरी पडली..”

“त्याचे काही नाही हो..”

इथे मी 'इट्स माय प्लेझर' म्हणणार होतो.. नशीब नाही म्हणालो.. कुठे काय बोलावे या इतकेच कुठे काय बोलू नये हे ही महत्त्वाचे..

“पण जरा एक सेकंद ती बॅग देता का.. माझा महत्वाचा कागद राहिलाय त्यात..”

मी बॅगेतून ते गुलाबी पाकिट हळूच काढून कुणाला दिसू नये असे पटकन माझ्या खिशात सरकवले. वै एक वेंधळी असेल तर मी दहा वेंधळा होतो!

मग इकड तिकडच्या गप्पा झाल्या. चहापाणी झाले. मी चुळबुळत बसून होतो. म्हटले.. नथिंग डुईंग ..

आता मिशन वैदेही. ती कुठेच दिसेना. माझा बावळटावतार आता त्यागण्याची वेळ आली होती. तिचे नाव घेणे भाग होते आता.

“वैदेही दिसत नाही?”

मी खिशातल्या पाकिटावर हात ठेवत विचारले. आणि ते वाक्य संपता संपता माझ्या वेंधळे कम विसराळूपणाची आठवण आली. कृत्तिका म्हणालेली, तू जाशील तेव्हा वैदू खाली बागेत बसलेली असेल! मी हे पार विसरून गेलो?

आणि इकडे माहिती मिळाली की वै गेलीय तिच्या मैत्रिणीकडे! म्हणजे ती खोटे सांगून गेलीय बागेत! म्हटले ना 'सत्यमेव जयते' वगैरे थियरी म्हणून ठीक आहे.. अजून कुठेकुठे ठीक असेलही पण प्रेमी जिवांच्या भानगडीत चोरटेपणाच नैसर्गिक!

निरोप घेऊन आतुरतेने मी खालच्या बागेत आलो. अंधार झालेला. बाग तशी मोठी होती. थोडे शोधले आणि जवळच्या बाकड्यावर वै दिसली. मनाशी म्हटले.. गुरू हो जा शुरू.. बोलबच्चन नसशील तू पण कमीत कमी आजतरी..

“वैदेही.. ” मी हाक मारली.. “डियरी वै..”

वै ने चमकून पाहिले. एकतर मी आलेलो.. त्यात परत ही अशी हाक..

वै च्या डोळ्यातून पाणी आले. काल रात्र बिचारीने जागून काढली. कृत्तिका आणि ती.. दोघांचे जागरण आता असे फलद्रूप झाले म्हणायचे.. शेवटी काय असे युद्धस्तरावरील निर्णयश्रा अर्ध्या रात्रीतच घेतले जातात म्हणे!

मग मी खूप बोललो.. इतका की तिच्या डोळ्यांतून हसून हसून पाणी आले.

“आय हॅड हर्ड यू टॉक सो मच.. दॅट वॉज..”

“ॲब्सोल्यूटली राईट.. ॲंड फ्यू मोअर राईट थिंग्ज टू डू..”

“व्हॉट?”

“जस्ट टू टेल यू.. आय वॉंटेड टू से ऑल धिस .. युअर मेहंदी वॉज ब्यूटिफुल.. बट नॉट ॲज मच ॲज यू.. इन द मून लाईट आय कुड नॉट टेल यू.. बट यू वेअर द वन अबाऊट हूम आय वॉज थिंकींग.. यू लुक्ड सो ब्युटिफुल इन दॅट रेड सारी.. व्हेन यू सेड यू वुड हॅव बिन हॅपियर.. आय थॉट आय गॉट द हिंट.. व्हेन यू सेड यू ऑल्सो वॉंट मॅरेज धिस वे.. वेल ..नाऊ यू विल.. आय वुड इम्प्रिझन यू इन द केज ऑफ माय हार्ट.. इन द लेफ्ट व्हेंट्रिकल..”

मी बेधडक बोलून गेलो.. माझ्या आतून येत होते तेव्हा विचार करायची जास्त गरज पडली नाही मला.

“ॲंड आय मीन एव्हरी वर्ड आय सेड.. जस्ट फील सो ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड.. यू नो.. आय वॉंट टू टेल यू समथिंग..”

तिच्या हाती ते गुलाबी पाकिट देत मी म्हणालो..

“ओह! क्यूट डार्लिंग..”

त्या पेसमेकर वै च्या हृदयाकडे पाहात ती म्हणाली..

“हू? मी?”

“ओह.. धिस हार्ट.. सो क्यूट.. स्टुपिड.. बट आय नो.. वन स्टुपिड इडियट हॅज ऑलरेडी सेड इट.. ॲंड डू यू रियली वॉंट टू हियर फ्रॉम मी.. व्हॉट्स द एक्स्पोझर डिफरन्स बिटवीन बकी फिल्म ॲंड नॉर्मल फिल्म..?”

माझ्या अंगावर बुक्क्यांनी मारत ती म्हणाली.. “युझलेस नॉनसेन्स.. यू गेव्ह मी सच टेन्स मोमेंट्स.. व्हेन आय केम फ्रॉम अमेरिका आय हॅड नेव्हर थॉट आय वुड गेट सच अ डील..”

“डील?”

“या.. डील ऑफ सच अ स्टुपिड इन एक्सचेंज ऑफ हार्ट्स.. बट ॲम सो हॅपी..”

मग आम्ही बागेतच गप्पा मारत बसलो.. जवळच आईस्क्रीम पार्लरमध्ये एक आईस्क्रीम वाटून खाल्ले..

“नाऊ व्हॉट मोदक?”

“नथिंग.. आय डोण्ट वॉंट कॉफी ऑन आईसक्रीम वै..”

“स्टुपिड मंकी.. आय वॉज आस्किंग समथिंग एल्स..”

हातात हात घेऊन तिला म्हणालो..

“हेन्स फोर्थ दॅट्स माय जॉब.. आय विल गेट ऑल डन.. आय विल मॅनेज.. माय डार्लिंग.. यू आर नाऊ माय हेडेक..”

“व्हॉट..? कम अगेन..”

“आय विल.. डिअर.. आय विल कम अगेन.. इफ इट इज पॉसिबल.. इव्हन डेली .. टू युवर युएसए..”

मी माझ्या नेहमीच्या फॉर्ममध्ये येत .. म्हणजे तिच्या भाषेत.. कमिंग इन माय एलिमेंट्स .. म्हणालो. ती थोडी उदास होत म्हणाली,

“ओह.. टुमॉरो वुई आर फ्लाईंग..”

“नेव्हर माईंड माय डियर स्वीटहार्ट.. आय कॅन हॅंडल इट..”

“व्हॉट..?”

“फ्लाइट.. डियर.. आय कॅन फ्लाय द प्लेन ऑफ माय थॉट्स..”

“यू? कॅन यू इव्हन स्पीक..”

“ओह.. डोन्ट चॅलेंज.. आय थिंक आय हॅव प्रूव्हन हाऊ मच आय कॅन स्पीक..”

तिचा मेंदीने रंगलेला मुलायम हात हातात घेऊन तिला तिच्या त्या बिल्डिंगपर्यंत सोडले.. म्हणालो, "यू नो व्हाॅट आय वाॅज इमॅजिनिंग यस्टरडे?"

"काय?"

"यू न मी इन प्लेसेस आॅफ रागिणी..अँड हर ग्रूम."

"स्टुपिड, काल तू हे काय नाय बोलतो? आम्ही किती टेन्स."

"बेटर लेट दॅन नेव्हर.."

"यू आर सुपर स्टुपिड डिअर.."

"कृत्तिका पण हेच म्हणाली."

"हेच म्हंजे?'

"हेच, स्टुपिड.."

"आॅब्व्हियसली, जो तू आहे ते सगळ्याला वाटणार की नाय.."

"असू दे, नाऊ यू हॅव नो चाॅइस डार्लिंग .. धिस स्टुपिड इज हिअर .. फाॅर लाईफटाईम.."

"आय नो.. स्टुपिड."

लवकरच भेटू असे वचन देत घेत तिथून निघालो.

सारे जगच आता बदललेले वाटू लागले मला..

रात्री उशीरा परतलो. तिचा तो मुद्दाम विसरलेला हार द्यायला इतक्या लांब मी तातडीने गेलो म्हणून काका त्याची बाईक त्याला न मी विचारता घेतली हे विसरला.. वर परत त्या मुंबैकरांच्या घरात माझ्या ह्या यातायातीचे प्रचंड कौतुक झाले.. हे मला कसे ठाऊक.. अर्थातच पुढे भारत अमेरिका पत्रव्यवहारात प्रचंड वाढ नोंदवली गेली..त्यातून हे निरीक्षण नोंदवण्यात आले.. हो त्या काळी आम्ही पत्रे लिहीत असू.. आजच्या इन्स्टंट मेसेजिंगवर पोसलेल्या कुणास ठाऊक नसेल म्हणून सांगतो.

पण ही सगळी त्या विसरलेल्या हाराची किमया!