lag aadhichi gosht - 10 in Marathi Love Stories by Dhananjay Kalmaste books and stories PDF | लग्नाआधीची गोष्ट (भाग 10)

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 70

    નિતુ માટે જન્મેલ નવીનનું નાનકડું આકર્ષણ દિવસેને દિવસે પ્રબળ...

  • દાદા ભિષ્મ

    પૌરાણિક દ્રષ્ટાંત કથા –                      પિતામહ ભીષ્મની...

  • અધુરો પ્રેમ

    જિગ્નાસુ ખુબ જ સરળ અને શાંત છોકરી.... પરીવાર મા વડિલ અને નાન...

  • વહુના આંસુ

    સવીતા રસોડામાં રસોઈ કરતી હોય છે,  ત્યાં જ છાંયા બહેન જોરથી ચ...

  • ભાગવત રહસ્ય - 164

    ભાગવત રહસ્ય-૧૬૪   પિતાજી નામદેવને કહે છે- કે “સવારે વહેલા જા...

Categories
Share

लग्नाआधीची गोष्ट (भाग 10)

लग्नाआधीची गोष्ट

(भाग 10)

ऑक्टोबर(2 वर्षानंतर परत)-

एवढ्या दिवस मला लिहायला काही जमल नाही. काही विशेष घडलेच नाही. कॉलेज व रूम… तीच रात्र ,तीच सकाळ…. काही दिवसांनी इंटर्नशिप सुरू होणार अस समजलंय. मला पुण्याला पिंपरी चिंचवडला वाय. सी. यम मध्ये जाव लागेल. सहा महिने कसे जातील तिकडे या मैत्रिणी सुद्धा नसणार. असणार तो फक्त एकटेपणा. आता कुठे मी थोडीशी येथे रमायला लागली होती.

फेब्रुवारी-

स्मृती मधून संजयच्या आठवणी मधून बाहेर आले होते. तोच आज सूरज नावाचा एक जण भेटला. त्याच्याशी बोलून खूप बरे वाटले. नंतरसुद्धा योगायोगाने हॉस्पिटल मध्ये आमची भेट झाली व त्याने प्रपोज केला. संजय पासून खूप दिवस मी लांब होते. पण आता तसंपण तो मला भेटणार नाही. सूरजला खूप दिवस मी टाळत होते पण तो मात्र मनापासुन प्रेम करत होता त्या दिवशी मी त्याला हो म्हणाले.

मार्च-

मी परत घरी येऊन जवळ जवळ एक महिना झाला होता. सूरज व मीदररोज एकमेकांशी बोलतो. आज पुन्हा पुण्याला जायला निघाले तेव्हा अचानक संजयने एस .टी थांबवून मला खाली बोलावले व मला मिठी मारली. कारण तो खूप दिवसातून मला बघत होता. मी त्याला मागे ढकलून दिले. मी त्याला म्हणाली,"मी आता तुझ्यावर प्रेम नाही करत मी दुसर्‍या एका वर प्रेम करते ". त्याला हे सहन झाले नाही ……त्याने माझा हात धरून माझ्या कानाखाली मारली व मला म्हणाला,"मी तुझ्यासाठी पोलिसांचा मार खाला, जेल मध्ये गेलो, माझ्या गावांत पण माझी बदनामी झाली आणि तू..." नंतर तो निघून गेला पण माझ्याकडे एक प्रश्न राहून गेला मी हे का केल?

सूरजला मी आवडते गाणे विचारले तर त्याने मला मी ‘आफरिन’ हे गाणे दररोज ऐकतो अस सांगितल. मी पण ते गाणे ऐकल इतके अप्रतिम होते ते की काय सांगू.... मी माझ्या डायरीच्या पहिल्याच पानावर ते गाणे लिहिले. जेव्हा जेव्हा डायरी उघडते तेव्हा ते एकदा म्हणावेसे वाटते आणि गाणे चालू असताना मला फक्त सूरज दिसतो का कुणास ठाऊक?

संजय त्यामधे नसतो.

सूरजने त्याला समजल्यावर मला सांगितले तू दोघांमध्ये कोणाचाही स्वीकारकर. पण सूरज ला रिजेक्ट करण्याचे काहीच कारण मला सापडत नव्हते. मी विचार न करता सूरज ला तुझा स्वीकार केला ,असे त्याला सांगून टाकले.

मी याआधी सूरजला खूप वेळा म्हणाले होते की मी ज्याच्यावर प्रेम करेल त्यालाच हे लव असलेले लॉकट देईन. उद्या मी त्याला भेटायला जाणार आहे.

तेव्हा मी हे लॉकेट व माझा भूतकाळ असलेली डायरी त्याला देईन.

NOTE: माझ प्रेम कोणावर आहे यापेक्षा माझ्यासाठी कुणी काय गमावलं याचा विचार करून मला सध्या संजयकडे जावेच लागेल. सूरज तुला काय वाटेल माहीत नाही. कदाचित मी चुकले असेल पण मला क्षमा कर. मी त्याच्याकडे जात आहे.

माझ काही चुकल का ? कधीकधी आयुष्यात नको असलेले मार्ग पण स्विकारावे लागतात.

(चालू वेळ)

निशाने सूरजकडे बघितले व विचारले,"तू हे केव्हा वाचलेस मग…." गाडीमध्ये बसल्यापासून डोक्यात एकच गोष्ट चालली होती सपना ने काय काय लिहिले असेल यात. असो तीने दिलय म्हणजे वाचायलाच हव.

आणि मला हक्क आहे तो

वाचनाचा. सूरज म्हणाला,"जेव्हा मी तिला भेटून सकाळी स्वारगेटला पोहोचलो तेव्हा हे वाचून माझ्या लक्ष्यात आले की ती आमची शेवटची भेट होती, आणि त्यामुळेच त्या दिवशी तिच्या डोळ्यात का पाणी होते हे माझ्या तेव्हा लक्षात आले.

"नंतर सूरज ने टेबलवरचा पेपर तिच्या पुढे केला. बातमी वाचून तिचे डोळे फिरले.

त्यावर मघाशी बघितलेला फोटो म्हणजे 'संजय' चा फोटो होता व बातमी होत," इस्लामपूर मध्ये एका तरुणाचा राहत्या घरी मृतदेह आढळला. दि.

18 ऑक्टोबर 2018" आणि वर हेडिग दिलेली होती खून का आत्महत्या?. व खाली एक संशयित तरुण मृतस्थळी सापडला असल्याचे ही लिहिले होते त्याचे नाव होते-

सूरज कदम.

निशाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. आतापर्यंतच्या कहाणीमध्ये सूरज एक साधा सरळ माणूस वाटत होता. निशाच्या डोक्यात विचार यायला सुरुवात होतात,

"आपल्या आई वडिलांनी चांगला मुलगा म्हणून आपला हात सूरजच्या हातात दिला होता. आणि आज या गोष्टी घडल्या नसत्या तर कदाचित आपल्याला या गोष्टी कळल्या सुद्धा नसत्या. ह्याला आज आल्या आल्या एक खुशखबर द्यायची म्हणून केव्हाची वाट बघत होते मी आणि आता..." प्रेम हे ज्या मार्गाने करायला हवे त्या मार्गाने करतो कोण आजकाल. प्रेमा मध्ये काम, क्रोध, संशय, मत्सर यांसारख्या क्रूर गोष्टी आल्या कि मग ते प्रेम कसे.. आजकाल प्रेमामुळे किती तरी जण एक तर स्वतः चा जीव घेतात किंवा दुसर्‍याचा. का कुणास ठावूक प्रेमाची एवढी भयाण व्याख्या या लोकांनी करून टाकली.

आपल्या झालेल्या फसवणुकीमुळे तर त्याने संजयला मारले नसेल ना? अशा अनेक प्रकारच्या शंका मनुष्याच्या डोक्यात येण साहजिकच आहे. त्याला ती तरी कसा अपवाद असणार. परत सूरजने तिच्याकडे बघितले व म्हणाला,

"आधी मला सांगू दे मग तू ठरव काय ते. " सूरज पुढे बोलू लागला.

******