भाग ८
आता हे नेहमीचच झालं होतं. सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी बोलल्याशिवाय विशाखा आणि सायली दोघींना चैन पडायचा नाही. सायलीचही अकरावीला अॅडमिशन झालं होतं. त्यामुळे कधी कधी तिला वेळच मिळायचा नाही विशाखाला बोलायला आणि बोलणं नाही झाल तर दोघींना पण काहितरी चुकल्यासारखं वाटायचं सतत.
विशाखा आता सायलीच ऐकून दिवसातून एकदातरी काकाला फोन करायचीच. त्यामुळे काका पण खुश होता 😁.
प्रत्त्येक शनिवारी थोडा वेळ का होईना पण सायली आश्रमात यायचीच आणि तिला भेटायला दर शनिवारी विशाखा हाफ डे टाकत होती तर कधी एक दोन तासच जायची हॉस्पिटलमध्ये.
ह्या सगळ्या एक गोष्ट प्रकर्षाने बदलत होती ती म्हणजे विशाखा च वागणं. तीचा चिडचिडेपणा आता बराच कमी झाला होता. आधीपेक्षा जरा आता जास्त हॅप्पी रहात होती.
आज सोमवार. आठवड्याचा पहिलाच दिवस. कंटाळवाणा. विशाखाला उठायला आज बराच उशीर झाला होता. उठून आवरणार की पंडितचा फोन आला इमर्जन्सी साठी. पटकन आवरून हॉस्पिटलमध्ये गेली. गेल्या गेल्या मोबाईल केबीन मध्ये ठेवून लगेच ऑपरेशन थिएटर मध्ये दाखल झाली.
इकडे काका मात्र विशाखाला फोन लावत होते. आणि ती फोन उचलत नव्हती तर अजुन चिडचिड करत होते. खुपदा ट्राय केलं पण तीने फोन उचललाच नाही म्हणून मग कंटाळून काकांनी शेवटी सायलीला फोना केला. तीने दोन तीन रिंग झाल्यावर लगेच उचलला.
" सायली लवकर घरी ये. परी सारखी रडतीये. मला काही सांगतच नाहीये. लवकर लवकर ये. विशाखा फोन उचलत नाहीये. पण तु ये पटकन. लवकर ये. "
" हो ठीक आहे. येते मी लगेच. " सायली ने काकांचा फोन ठेवून विशाखाला लावला पण तिचा फोन लागतच नव्हता. आणि लागला तर ती उचलत नव्हती. सायली तशीच घाईघाईत कॉलेज बंक करून तिकडे निघाली.
आश्रमात आली तसं काकांनी सुरूच केलं.
" आत्ता शाळेतून आली. येताना पण रडतच आली. आत जाऊन बसलीये दार लावून. कधीच उघड म्हणतोय दार तर उघडतच नाहीये आणि रडतीये सारखी. मी विचारलं तर मला पण काहीच सांगितलं नाही. "
" थांबा मी बघते. " सायलीने दरवाजाजवळ जाऊन जोरात दारावर थाप मारली.
" परी मी आहे. दार उघडं ना. "
" नाही. मी ना....ही उउउघडणारर " रडत रडत तीने आतुन सांगितल.
" मला पण नाही सांगणार का ?? दिदी आहे ना बाळा मी तुझी. "
" टीचर नी सांगितलं कीकी आआआईला सांगायचं. "
" मग काका पण तुझी आईचं आहे ना सोना. दार उघडल्याशिवाय कसं कळणार आम्हाला. आणि बघ काका किती काळजीत आहे. आता तो पण रडेल बघ. चालेल का तुला. "
असं म्हणल्यावर परीने दार उघडल आणि जाऊन सायलीला बिलगली.
" काय झालं तुला. शाळेत टिचर ओरडल्या का ?? " तिच्या डोक्यावरून हात फिरवून सायली ने विचारल.
तसंच हुंदके देत तीने नाही मन हलवली.
" मग कोणी मारल का ?? की कोणी त्रास दिला ?? "
परत नाही.
" मग काय झालं ?? "
" टीचर म्हणाणाल्या आआआईला सांग " हुंदके देत कसंबसं बोलत होती.
" मी दिदु आहे ना तुझी. मला नाही सांगणार ?? " असं म्हणल्यावर तीने मान वर करून बघितलं आणि ड्रेसचा मागचा भाग पुढे करून दाखवला. पुर्ण ड्रेस मागुन रक्ताने भरला होता. सायली ने एकदा काकांकडे बघितलं आणि परीला आत घेऊन गेली.
इकडे विशाखा तिच काम झाल्यावर केबीनमध्ये आली. मोबाईल बघितला तर काकाचे १० आणि सायलीचे ५ missed call पडले होते. एवढ काय अर्जंट काम आहे काय माहिती म्हणून तीने काकांना फोन लावला तर त्यांनी उचलला नाही. परत सायलीला लावला तर तीने ही उचलला नाही. पंडितला सांगुन लगेच घरी जायला निघाली.
सायली १५ मिनिटांनी बाहेर आली तोपर्यंत काका भितीने घामाघूम झाले होते. ती बाहेर आल्या आल्या विचारलं,
" काय झालं ?? काही झालं नाही ना.... म्हणजे शाळेत वैगेरे काही..... "
" काहिही काय विचार करताय काका. तसं काहीच नाहीये. मोठी झालीये ती आता. "
पटकन सोडल्यावर बसत म्हणाले,
" असं होतं. मला वाटलं शाळेत काही झालं की काय .."
" काहीपण. कसलाही विचार करू नये. कधी ना कधी मोठी होणारच आहेत पोरी. "
" तसं नाही. पण बाहेर कसल्या कसल्या बातम्या ऐकायला येतात मग मनात तशे विचार येतात. आणि एकट्या पोरी, आई-बाप नाही म्हणल्यावर कोणी पण फायदाच घेणार ना गं. बरं. झोपलीये का ती ?? "
" हो. रडून रडून डोळे सुजलेत. एक झोप झाली की बरं वाटेल. " असं बोलेपर्यंत तर मागुन धावत विशाखा आली.
" काय झालं. काय झालं. किती फोन केलेत मला. काय प्रॉब्लेम झालाय. मी ओटीपीमध्ये होते आणि फोन केबीनमध्ये ठेवला होता. त्यामुळे कळलंच नाही. सॉरी. आता सांगा ना काय झालं. अरे बोला ना. दोघेपण गप्प बसलेत. एवढा वेळ झाला विचारतीये मी. सांगा ना काय झालं. काही लागलं का कुणाला. मग पडलं का कोण. अरे असे माझ्याकडे काय बघताय. मी भाषण देतीये का ?? बोला ना राव. "
" तु बोलु दिवस तर आम्ही बोलणार ना 😒. कंटिन्यु बडबड करतीये आणि आम्हालाच म्हणतीये बोलत नाही . "
" काका यार. तु टोमणे मारणं बंद कर. आणि सांग काय झालंय. मला टेन्शन येतंय बघ. "
" काही नाही. परी मोठी झाली. " काकांनी सांगितलं.
" मोठी झाली म्हणजे 🙄. ती तर असही मोठीच आहे ना. आता आठवीत आहेत मग काय लहान आहे का ? "
" तसं नाही. अगं म्हणजे ते आपलं monthly problem. " सायलीने हळुच तिच्या कानाजवळ येऊन सांगितलं.
" मग periods सुरू झाल्या. असं सरळ सरळ सांग ना. आपलीच गोष्ट आहे तर सांगायला लाजायला का पाहिजे. जगातल्या सगळ्या मुलींना येत ते. मग. "
" चोरून पोळी वाढली तर बोंबलून तुप मागतीये ही "
" असं तोंडात पुटपुट नाही करायचं. जे आहे ते मोठ्याने बोल. "
" काही नाही. " आणि ह्यांच्या आवाजाने परी बाहेर आली.
" झाली झोप बाळा. पोटात नाही दुखत ना तुझ्या " विशाखा ने जवळ जाऊन विचारलं.
तीने नाही मान हलवतच सांगितलं.
" बर. बस. काकाला सांगु आपण मस्त काहितरी खायला करायला. " विशाखा ने असं म्हणताच काका तिच्याकडे 😒🤨 बघायला लागला.
" काय झालं बघायला ?? मला तर येत नाही ना. मग बनवणार तुच. आता बनवणारच आहेस तर जरा गोड बनव काहितरी 😝. "
" हो नक्की. अजुन काही फर्माइश 🤨 "
" नाही. आत्ता एवढंच ठीक आहे. " तीने असं म्हणताच काकाने उठून तिच्या पाठीत एक बुक्की घातली आणि किचन मध्ये गेला. बाहेर सगळे हसत गप्पा मारत बसले होते. पण मुलींमध्ये सगळ्यात छोटी जी होती ती काकांकडे गेली.
" तु काय करतोय " उंची पोहचत नसताना, टाचा वर करून ती काका काय करतोय हे बघायचा प्रयत्न करत होती.
" शिरा करतोय सगळ्यांसाठी. "
" माऊ दिदीला काय झालं. ती का रडत होती. "
" तिला कावळा शिवलाय म्हणून रडत होती. " काकाने आपल्या बाजूने उत्तर दिल पण तीच समाधान झालं नाही.
" मग तिला कावळा चावला का ?? "
" हो. तु बाहेर जाऊन बस बरं. काय करू दे मला. उगाच प्रश्र्न विचारू नको. "
तीने बाहेर येऊन परीला विचारलं,
" माऊ दिदी तुला कावळा चावला का गं ?? म्हणून तु रडत होती का ??
" कावळा ?? 😕. हे कोणी सांगितल. ?? " विशाखा ने विचारल.
" मला काकानी सांगितलं. "
" हो तिला कावळाच शिवलाय. " आता विशाखा अजून जास्ती तिला सांगत बसेल म्हणून सायली नेच मध्ये पडून पटकन उत्तर दिलं.
" चला. शिरा खायला. " काकांनी आवाज दिला म्हणून विषय तिथेच थांबला नाहीतर विशाखा अजून काहितरी बोललीच असती. पोरी शिरा खाऊन बाहेर खेळायला गेल्या तेव्हा विशाखा ने जाऊन काकाला विचारलं,
" हे काय नवीन. त्या बारकीला तु परीला कावळा शिवलाय म्हणून सांगितलं. 🤨 "
" हो मग काय सांगायला पाहिजे होतं. "
" अरे........ "
" सॉरी, मध्ये बोलतीये. पण ती लहान आहे अजून विशाखा. एवढ्या लहान पणी का सांगायचं " सायली ने मध्येच विशाखाला थांबवत स्वत: विचारल.
" अरे पण म्हणून तसं तरी का सांगायचं ना. आपण सांगत नाही म्हणून त्यांना कळत नाही असं होतं नाही. त्यांना बाहेर मैत्रिणींकडून कळत. मला पण तसच कळालं होतं ना. मग curiosity म्हणून मुलं मोबाईल वर सर्च करतात. आणि त्यातुन ते काय बघताय आपल्याला सुद्धा कळत नाही. परवाच एका मुलीची तशी केस आली होती काउन्सलिंगला. "
" अगं. खरं सांगु ना. पण आत्ता नको. अजून खुप लहान आहे ती. एवढ्या लवकर सांगुन तरी काय कळणार आहे तिला. मान्य की सांगायला हवं पण आत्ता नको. परीला तरी कुठं माहिती होतं. पण मघाशी सांगितलं ना मी. तसंच तिलाही नंतर सांगु. " सायली ने असं म्हणताच विशाखा तशीच तणतणत बाहेर गेली.
" कसं सांभाळतोस रे हिला. 😣. ऐकुनच घेत नाही अजिबात. "
" लहानपणापासून तशीच आहे. तसं तीच बरोबर असतं गं पण फार स्पष्ट बोलते. असं मनात ठेवण वैगेरे तो प्रकारच माहिती नाही तिला. मग हे पटकन बोलुन जाते. सासरी कसं होणार काय माहिती. " मागुन मोबाईल विसरला म्हणून घ्यायला आलेल्या विशाखा ने फक्त शेवटचचं ऐकलं.
" सासरी सगळे तुझ्यासारखे असतात का ?? असं असेल तर मला जायचच नाही 😒. हु्मममममम " जोरात ओरडुन मोबाईल घेऊन गेली.
" बघ अशी आहे. आता गेलीये रागात पण थोड्या वेळात लगेच शांत होती तिचा राग. मग फोन करेल बघ."
" अवघड आहे रे हिच. "
" हिच नाही. हिच्या नव-याच अवघड आहे 🤭. " काकाने असं म्हणताच दोघंही हसायला लागले.