Shetkari majha bhola - 6 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | शेतकरी माझा भोळा - 6

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

शेतकरी माझा भोळा - 6

६) शेतकरी माझा भोळा!
वावराचा बैयनामा झाला आन् तात्यासायबाच्या वळखीन दोन हजारात बेण्याचा सौदा झाला. बेण आणून त्येनं वावरात लावल. तात्यासायेबाच्या वळखीनच कोंडबाला बैंकनं जीपसाठी बी रीन देलं. पच्चीस हजार रुपै भरावं लागले पर काम झालं. धाव्या दिशी गणपतच्या घराम्होरी जीप ऊबी ऱ्हायली. तव्हा गणपत, यस्वदा, कोंडबा आन् सखीला बी आसमान ठेणगं झालं. सीतापूरात ह्ये बी येक नवलच झालं. समदं गाव जीप फायला उल्टलं. जसा काय गणपतीच्या घरी कोन्ता मोठ्ठा महाराज आला व्हता. सांच्या पारी आबासायेबाचं बलीवण आलं.
गणपतला फाताच आबा म्हन्ले, "या, गणपतराव या. जीप घेतली म्हणं."
"व्हय मालक. कोंडबालं जीप चालवता येत्ये. त्येचा लैयच हाट व्हता बगा."
"जिमीन बी ईकली म्हण. त्या वक्ती आमची सय न्हाई आली."
"मालक, सम्द कस अच्यानक झालं बगा."
"आच्यानक न्हाई का? मला कळू देयाच न्हवतं म्हणं की. आम्ही काय तुहे दुस्मान न्हवतो. आस्सी हज्जार मोजले असते."
"मालक, त्येचं असं..."
"काही सांगू नगस. समदं ठाव हाय मला. झालं ते झालं. पर महा पैका कव्हा देणार हायेस?"
"मालक, हे काय भलतं बोल्ता? तुमचा पैका? म्या कव्हा घेतला?"
"भडव्या, मोटार आन् पाईप घेतले न्हाईत?"
"पर त्ये तं समदं सरकार..."
"सरकार का येडं हाय रे? आरं, तुमची आन् तुमच्या गरिबीची कीव आली म्हून म्याच देलं ते समदं."
"ते ठीक है, पर माझा क्यानालचा पैका..."
"गणपत्या, याद राख, त्या पैक्याचं नाव काढायचं न्हाई, त्यो पैका ज्येचा त्येला तव्हाच देला."
"पर मालक मला तं खडकू मिळाला न्हाई.''
"तुही जिमीन म्या घेत्ली न्हाई. सरकारनं घेतली हाय."
"मालक, आमच्यासाठी तुमीच सरकार हायेसा. तुमीच सांगलं म्हून...''
"म्या मोप सांगील पर तू तुहा ईच्यार करुनशानी येवहार करायचा व्हतास."
"त्यो सायेब त्या दिसी म्हणत व्हता की सरपंचांनं..."
"त्यो भडवा काय बी म्हणल. तुला मी जवळचा की त्यो सायेब. कोण काय बी सांगल आन् तू ईश्वास ठेवशील?"
"तरी बी मालक, म्या तं पुरता नागवलो की."
"ते मला ठाव न्हाई. म्या तुही जिमीन घतली न्हाई एवढच मला ठाव हाय. त्ये सर्कार आन् तू गधीच्या...जा. तुव्हा-मव्हा संबंद न्हाई जा. मला मझं काम करु दे."
समद लुटल्यावाणी गणपत घरी आला. घराफुडे पोलीस फाताच त्याच्या काळजात चर्रर झालं. त्यो बिगी बिगी गेला. तव्हा येक पोलीस ईच्यारत व्हता,
"कोणाची रे ही जीप?"
"महीच..." गणपत म्हणाला.
"कव्हा आणलीस?"
"आजच.. "
"खर सांग."
"खरच सांगतो सायेब, आज दोपारीच आणली."
"काय करणार? धंदा?"
"व्हय. गाव त्ये स्टेंड आन् पुना गाव."
"म्हंजी पैंसिजर भरणार हायेस तर? हप्ता देवाव लागल."
"त्यो कहापायी?" गणपतन ईचारलं.
"समजल. समद समजल. जीपीतून पेंसेजर भरायचे असतील तर हप्ता देवाव लागल. न्हाई देलास तर ठाण्यात डांबील हां... लक्षात ठेव." असं म्हणत त्यो पोलीस गेला. तेव्हड्यात तात्यासायेबांची फटफटी ऊबी ऱ्हायली.
"गणपत, आरं उंद्या खटल्याला घिऊन तुळजाभवानीला जायचं हाय तव्हा जीप मिळलं का?"
"तात्यासाब, ही जीप तुमचीच तं हाय बरं. आस्सं उधार काबून बोलता. घिऊन जा की. कोंडबा फाटे लौकर तैयार व्हय." गणपत म्हन्ला आन् कोंडबानं मान हलवली. तशी तात्यासायेबानं फटफटीला किक् मारली.
दिसा मांघून दिस जात व्हते. जीपीचा धंदा म्हणाव तसा चालत नव्हता. तात्यासायेबानं तुळजापूरसंग पंढरपूर, देहू, आळंदी आसे लै देव केले पर पैक्याचं नाव मातर काढलं न्हाई. उल्टे गणपतनं कोंडबाला देलेले हजार रूपै बी डिझेलात गेले. धा-आठ दिस जीप फिरुन आली पर खाया पिया कुछ नही गिलास फुटा साठ पैयसा परमाने भवानीला जावून जीपीची भवानी झालीच न्हाई. कोंडबा जीपसंग गाव ते स्टेंड आन् स्टेंडपासून गावापस्तोर दिसभर येरझारा घालायचा. गिऱ्हाईक गावायचे पर आरदे अधिक फोकटे आसायचे. कधी काळी गणपतला अगर कोंडबाला केलेली मदत लोकायला जीबीतून उतरल्याबरुबर आठवायची आन त्ये काय बी न देता निंघून जायचे. पोलीसचा हप्ता मातर पैली तारीक टळू देयाची न्हाई.
क्यानालला पाणी मातर येळच्या येळी येत व्हतं. आस्ते आस्ते ऊस वाढत व्हता. ऊस लावून बी येक-दीड येकराचा तुकडा उरला व्हताच.
"अवो, येक कराव का?" यस्वदान ईच्यारलं.
"आता आणिक काय तुला आठीवलं म्हणायचं?"
"क्यानालच्या वरल्या आंगाच रान रिकामं हाय. त्येथं काय तरी लावावं म्हंते?"
"काय लावायच हाय?"
"त्या रानात झंडू टाकला तं?"
"फुलांच्या माळा घालायच्या कोन्ला? तुला का मला?"
"बापू, माय म्हन्ते त्ये खरं हाय. दसरा-दिवाळीला शेहरात पन्नास-साठ रुपै किलुच्या भावानं झंडू ईकतो."
"आरं पर ईकावं कोन्ही? तुमी तर सिकल्याले आन वर पुना जीबवाले तव्हा..."
"अहो, म्या आन् सखी दोघी जावूत की इकायला."
"करा जसं तुमच्या मनालं यील तसं करा." म्हन्ताना गणपत बाहीर निघून गेला...
क्यानालला पाणी सुटलं व्हतं. ऊसाला पाण्याची पाळी देयाची म्हून गणपत रातभर शेतातच व्हता. फाटे फाटे त्यो घरी आला. यस्वदा ऊठली व्हती. वतलाखाली सनकट्या घालीत व्हती. गणपत आलेला फाताच तिने ईच्चारलं,
"का व्हो, भिजवील का वावर?"
"काहाचं भिजवनं आलं आन् काय?"
"काय झालं व्हो?"
"रातभर लैट डीम व्हती. दोन मिन्ट बी मोटार चाल्ली न्हाई. समदा गाव बोंबलतया लैटवाल्याच्या नावानं."
"ह्ये काय झालं म्हणाचं? समदं कसं झ्याक चाललं व्हतं. मंदेच ह्ये कोन्त घोंगडं आलं म्हणावं? यील आज ना उद्या लैट."
दोन चार काय पर धा दिस झाले तरी बी लैट रात-दिस डीमच. धा दिसात कुणाचीबी मोटार मिनीटभरबी चालली न्हाई. समदा गाव चिंतेत व्हता. ज्येच्याकडे बैलायच्या पाच-धा जोड्या व्हत्या त्येंनी रडत पडत का व्हईना पर आरद-मुरद पाणी पाजलं व्हतं पर गणपतवानी ल्हान्या कास्तकारायनी काय करावं? लोकायनं लैटच्या अधिकाऱ्याला गाठलं. मोरच्या नेला, घोसण्या देल्या. हापीसवर धोंडे मारले तव्हा कोठ लैट फुल्ल आली. मातर तव्हर क्यानालचं पाणी गेलं. गणपतच्या छातीपस्तोर आलेल्या ऊसाला पाणी मिळालच न्हाई...
क्यानालचं उद्घाटन झाल्याबरुबर साखर कारखान्याचा फुडाऱ्यांनी साखर कारखान्याचा घाट घातला व्हता. आबासायेबाला अध्यक्स केलं व्हतं. शेयर गोळा करायचा आबासायबानं तडाका लावला व्हता. कारखान्याची साईट पक्की झाली. त्या परिसरातले लोकायचे वावर सरकारने घेतले व्हते त्याचा मुआवजा बी देला. क्यानालच्या पैक्यावानी या बी वक्ती काही लोकायला हिसका दावलाच. गरीब, भोळ्या लोकायचा पैका आबासायेबानं गिळला. कारखान्यासाठी जिमीनी घेताना त्या घरचा येक माणूस नवकरीला लावू आसा सबुत आबासायेबानं सम्द्याना देला.
सीतापूर आन साकारकारखाना हेच्या मदोमद येक कलाकेंद्र बी झाल. तेथल्या बाया जाणाऱ्या येणाऱ्या लोकायला ईशारे करु लागल्या. रातच्याला तेथ बारी व्हयाची, नाच-गाण्याची मैहिफल भरायची. येक-दोन कर्ता कर्ता सीतापूरचे न्हाई तर आजुबाजुच्या खेड्यामदले लोक नेमानं त्या बारीला जमू लागले. राती लाईटाच्या भक ऊजेडात त्वांडाला काही बाही फासलेल्या बायाचं समद्यांना येड लागलं मातर भर दोपारी त्याच बायांकडं फावू बी वाटायचं न्हाई. पर वासनेनं आंदळ बनलेल्या लोकायचं काय? तिकडे कार्खान्याच बांदकाम जोरात सुरु व्हत. येणाऱ्या हंगामात कारखाना सुरु झालाच फायजेत आसा परयत्न आबाचे व्हते. मुंबईला त्येंच्याच पक्शाचं सरकार व्हत आणिक इलेक्सन त्वांडावर आसल्यामुळे मुंबईच सरकार बी सढळ हातानं मदद करत व्हतं.
"उद्या क्यानालला पाणी येणार हाय..." गावात बातमी पसरली आन जो तो कामाला लागला.
"अहो, म्या काय म्हन्ते?"
"काय म्हन्तीस?"
"न्हाई म्हन्ल, मांघल्या खेपेला ऊसाला पाणी मिळाले न्हाई."
"न्हाई ते न्हाई. पाणी मिळाल न्हाई म्हून काही आडल न्हाई. पावसाचा येक सडोक पडला आन् ऊसाची त्हान भागली. देवाची किरपा न्यारीच राहते म्हन्त्यात त्येच खर. ऊस कसा दिमाकात ऊबा हाय. मह्या डोस्क्याच्या वर गेलाय."
"म्हून तर म्हते.... सम्दे लोक खत देयालेत तव्हा..."
"आता आणिक खताची काय गरज हाय? आगं त्येचा ऊस कसा शेळपट हाय."
"पर म्या म्हन्ते देला तर नुक्सान तर व्हणार न्हाई ना? ऊस आजूक भरल ना? "
"खत आणाय पैका कोठून आणायचा?"
"तुमाला कस काय बी ठावूक न्हाई वो. गावात सोसायटी हाय की. आजपस्तोर आपून कंदी सोसायटी ऊचलली का?"
"काय येकेक नवच खूळ काढती झाल. तुम्हा बायकाच्या आकला म्हजी वाळका पालापाचूळा! थोडं बी वारं लागलं ना की गेला उडून.."
"ते ऱ्हाऊ द्या. पर मझं खोटं हाय का?"
"न्हाई. न्हाई. तुव्हं कसं खोटं आसल?"
गणपत सोसायटीत गेला. तेथं तोबा गर्दी व्हती. सोसायटीच्या चेरमनचा कागुद लागत व्हता. चेरमन व्हते तुकापाटील! गणपत त्येंच्या बैटखीत गेला. त्यास्नी फाताच चेरमन म्हण्ले, "या. या. गणपतराव या. तुमाला आमची कसी काय सय झाली. बोला?"
"मालक, ऊसाला खत देवाव म्हन्तो."
"व्वा! चांगला ईचार हाय पर तुव्हा ऊस तं लै चांगला हाय म्हण."
"ते हाय पर खताची येक पाळी झाली म्हंजी ऊस आणिक भराल आन् वजनदार बी हुईल आसा ईच्यार हाय, तव्हा सोसायटीकडून..."
"आरं बाबा, सोसायटीच्या फंदात कहाला पडतो? तुला काय कमी हाय? पाच लाकाची जीप हाय आन् दोन-चार धैयल्यासाठी..."
"तसं न्हाई. जीप आजूक चालाय फायजे तश्शी चालत न्हाई. दिसाकाठी धा-ईस रुपै ऊरत्यात."
"बाबारे, धंदा कोन्लाबी जमत न्हाई. येरगबाळ्याने थेट जीपीच्या धंद्यात पडूच न्हाई रे. पर तुमास्नी सांगाव कोण आन तुमी ईच्यारता कोन्ला? किती थैयले पायजेत?"
"ह्येच की पाच येक थैले."
"काढ मंग तोनशे रूपै..."
"पर मालक..."
"गणपत त्यापायीच म्हन्लो तू करजाच्या फंदात पडू नगस. आर सोसायटीचं खत म्हणजे काय तर कोपनावरची साखर वाटली व्हय? आरं, खताचे थैले मिळवायसाठी थैयल्यामांघं पन्नास रूपै देवाव लागत्यात तव्हा कुठे त्यो गोदामाचा सायेब थैयले देत्यो न्हाई त काही बी कारण सांगून आज-उद्या कर्तो."
"मालक, काय बी करा आन ह्ये दोनसे रुपै घिवून थैयले द्या."
"आण." आस म्हणत दोनशे रुपै घिवून तुका पाटलानं येक कागद घेतला. त्या कागुदावर चार दोन ओळी लिवल्या आन् त्यो कागोद गणपतम्होरी धरला. त्यो कागूद घिवून गणपत पुना सोसायटीच्या हापीसात आला. तेथं बरीच पातळाई झाली व्हती. तुका पाटलाच्या चिट्टीनं त्येच काम झालं. पाच थैयले खताचे त्येनं शेतामंदी नेले.
ऊसाला खत देयाला दोन दिस लागले आन् त्याच सांच्याला क्यानालला पाणी आलं. राती पुना गणपत वावरात आला. धा-साडे धा ला त्येनं मोटार पावली पर मोटार थंडगार! दोन-तीन-पाच मिन्ट बी झाले पर मोटार काय बोलाय तैयारच व्हईना. पाण्याचं तं दूर ऱ्हायल पर आवाज बी देईना. मोटार बंद करुन गणपतने पुना बटन दाबल पर पुना त्येच. तिचा आवाज कोन्ही दाबला की काय? त्यो परकार पंद्रा- ईस येळा करुन गणपत घरी पोचला. त्येचा आवाज ऐकून सखीनं दरुजा काढला तव्हर यस्वदाबी जागी झाली.
"काय झालं व्हो? तुमी मांघारी कावून आले?"
"मोटार जळली की काय? आवाजच करना झालीय."
"अव्हो जरा येळ वाट फावून पुन्यांदा लावाची व्हती."
"आगं, येईस्तोर पच्चीस खेप लावून फायली पर छ्या घुर्रर कराच नावाचं घिईना."
"ह्ये कोन्त ईघन आल म्हणावं?"
त्या राती दोघांचाबी डोळा लागला न्हाई. फाटे फाटेच गणपत लैनमनकडं गेला पर त्यो ऊठलाच न्हवता. गणपतच्या आवाजानं लैनमन कुरकुरत ऊठला. त्येला घिवून गणपत वावरात आला. लैनमननं मोटारीचा खटका दाबला पर मोटार घुम्मी गप्. धा-पाच मिन्टानी त्येनं पुना पुना तस्सच केलं आन म्हन्ला, "गणपतराव मोटार जळली की हो."
"काय म्हन्ता जळाली? अव्हो, नईच हाय की."
"मंग काय झालं? मान्साचा ईस्वास न्हाई राव. ही तर मिसनरी हाय. काय बी नेम न्हाई. आपल्या गावात लैटीचा खेळ चालू हाय. येकदम प्रिशर आलं आसल."
"बर मंग दुरुस्तीला काय लागल?"
"मोटार खोलावं लागलं, वायरींग...तेल....पाणी....समदे मिळून हजार रुपै..तर मग? सांगा बिगीन?"
"अव्हो, हज्जार लै झाले व्हो. जरा..."
"गणपतराव, करायची आसल तर खोलून घरी आणा. म्या चाल्लो."
धा-ईस मिन्टात मोटार खोलून गणपतने ती लैनमनच्या घरी आन्ली व म्हन्ला, "कव्हा मिळल?"
"चार दिस लागतील."
"चार दिस? क्यानालला पाणी आलं हाय."
"त्ये मला ठाव हाय. म्या तरी काय करु? ह्या फा पैयल्याच चार मोट्री हाता."
"मातर चार रोजाच्या वर लावू नगसा."
"न्हाई लावणार." लैनमन म्हन्ला.
पाव्हणा मेल्याचा सांगावा आल्याप्रमाणे त्वांड घेऊन आलेल्या गणपतला फाताच यस्वदा म्हन्ली, "काय झालं?".
"काय व्हयाचं? मोटार जळाली. हजार रुपये लागतात."
"हजार? आता कोठून आन्ता?"
"काय करावं त्येच समजत न्हाई. येक निस्तराय जाव तर दुसर आ वासून ऊबं हाय. मझं तं डोस्कच चालना झालय."
"तुमचं डोस्क चालना तं त्या आबासायेबासचं तं फोडा की. मेला पस्तेचाळीस हज्जारावर कुंडली मारुन बसलाया. त्या तात्याच्या धा हजारावर बी पाणी सोडल्यावाणी कावून गप्प बसलासा? जा आणा दोघांपासून." यस्वदा संतापानं म्हण्ली.
गणपत आबासायेबाच्या घरी पोचला. सम्दा गाव जसा आबाच्या घरी जमला व्हता. आबासायेबाला आमदारकीचं तिकीट मिळाल व्हतं. सरपंच रातीच तिकीट घेवून मुंबईहून आल्ते. दीड म्हैन्यानं ईलेक्सन व्हतं. तेव्हड्या गर्दीत कसं बोलाव या ईच्चारात गणपत तेथून तडक तात्या साहेबांच्या घरी गेला पर त्ये बी तिकिटासाठी मुंबईला गेलते. गणपत गेला तसा हात हालवीत मांघारी आला. घराफुड पोलीसाची जीब ऊबी व्हती. जमादार कोंडबाला म्हणत व्हता,
"हये बग आत्ता जीप बंद ठिवायची हाय. पँसीजरला चालवायची न्हाई.''
"पर कावून? मझा हफ्ता तं..."
"चूऽप ! पुना हप्त्याचं नाव काढायचं न्हाई. आता निवडणुका हाता. आचारसंहिता लागलीय तव्हा जीप जर रोडवर दिसली तर जीप जप्त करुन तुला जेलात डांबीन. हां. आगुदरच सांगून ठिवतो. ईलक्सन होईस्तोर जीप बंद!"
चार दिस म्हन्ता म्हन्ता लैनमननं धा दिस लावले. सावकारापासून याजान हजार रुपै काढून त्ये लैनमनला देले. मोटार आणून वावरात फिट केली आन् खटका दाबला. मोटार बोलाय लागली आन् पाणी बी आलं. मोटारीन येक दोन चूळ भरले आन् पुना मोटार गप्प झाली. गणपतनं फायल लैट गेली व्हती. त्या दिसी दिसभर आन् रातभरबी लैट आलीच न्हाई. दुसऱ्या दिसी फाटे लैट आली. गणपत वावरात पोचला. खटका दाबताच मोटार गुलूगुलू बोलाय लागली पण कोरडी फाक् ! येक थेंबभर बी मूतना गेली ! गणपत बेगी बेगी क्यानालवर गेला. त्येनं क्यानालात लवून, क्यानालमंदी फायलं, जीव देवावं म्हनलं तं तेव्हढबी पाणी क्यानालमंदी न्हवतं. गणपतनं कपाळाला हात मारुन घेतला...
०००नागेश शेवाळकर