कादंबरी – प्रेमाविण हे व्यर्थ हे जीवन ..
भाग-११ वा
--------------------------------------------------------------------------------
अनुषा मैत्रिणी बरोबर कॉलेजमध्ये आली .कॉलेजच्या तासात सर काय शिकवत आहेत ?
याकडे तिचे लक्षच लागत नव्हते . अलीकडे काही दिवसापासून तिच्या मनात आणि डोक्यात एकच विचार चालू असायचा -
तो म्हणजे -
“अभिच्या परिवारात असलेला दुरावा , त्यांच्यात झालेले मन-भेद ,एकमेकांच्या विषयी मनात असलेला रुक्ष
कोरडेपणा ,किती विचित्र आहे ना सारे .
अनुशाच्या मते - “ जिवंत माणसांची नाती कशी रसरशीत असावीत “,
आणि आपल्या अभिच्या जीवनात ,घरात ,
घरातल्या माणसात एक निर्जीवपणा आहे , अर्थहीन ,उद्देशहीन आयुष्य
जगत आहेत “असेच यांच्याकडे पाहून वाटावे .
अभिकडून आत्तापर्यंत जितके काही ऐकले आहे ,त्यावरून तरी अनुशाचा मनात अभिच्या घरातील
माणसांविषयी असेच मत तयार झाले होते . आणि अजून तरी आपण .अभिशिवाय त्याच्या घरातील
कुणाला पाहिलेले नाही, आणि त्यामुळे या कुणाला कधी भेटण्याचा प्रश्नच आलेला नाहीये.
म्हणूनच.आपल्याला वाटते आहे तितके - हे सगळे वातावरण बदलून टाकण्याचे काम सोपे नाहीये ,
त्यासाठी अभिच्या सगळ्या माणसांच्या सहवासात जाऊन पाहावे लागणार ,
त्याशिवाय या सगळ्यांची दुखरी नस आपल्याला सापडणार नाही “,
काय करावे यासाठी ?
अनुषा याच विचाराने आजकाल सतत अस्वस्थ होऊन जायची . रोजचे रुटीन सवयीने पार
पडायचे ,पण, मन ..? ते मात्र काळजीने वेधून गेलेले होते .
अनुशाला वाटायचे ..अभिच्या प्रेमाखातर आपण हे केलेच पाहिजे , त्याला आपण आपला
मानले आहे , एकमेकांच्या आयुष्यात यापुढे आपण सोबती असणार आहोत .
एकमेकापासून दुरावलेल्या या सगळ्यांना आपण पुन्हा नव्याने जवळ आणू शकलो तर किती
छान होईल न !
अभिच्या घराचे नाव ..”प्रेमालय “ आहे म्हणतात , इथे पण अजून गेलेलो नाहीत आपण .
पण अभी बरोबरच्या भेटीत झालेल्या बोलण्यातून .त्याच्या मनातली खंत आणि त्याचे दुखः आपल्या
सतत जाणवते आहे की – त्याच्या घरात ,माणसांच्या मनात प्रेमाचा ,प्रेम-भावनेचा तर अजिबात पत्ताच नाहीये .
या घरचे हरवलेले प्रेम आपण परत आणू शकलो तर ..अभीला किती छान वाटेल.
असे काही विचार मनात आले की .अनुशाला .खूप काही सुचायचे , पण, काही वेळातच हे सगळे
विचार आणि कल्पना हवेतच विरून जायच्या .
खरे म्हणजे तिने आता तिच्या कॉलेजच्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यावे असे महत्वाचे दिवस सुरु झालेले होते
आणि नेमक्या अशा वेळी अनुशाचे मन स्थिर नव्हते . विलक्षण चलबिचल सुरु होती मनात.
तिच्या पीजी कोर्सचे हे शेवटचे वर्ष ,यात अनेक उपक्रम करायचे ते तसेच राहिलेले ,
खूप अभ्यास करायचा होता , तो तर अजिबात सुरु केलेला नव्हता अजून .
एक प्रोजेक्ट करायचे होते ..” या सगळ्या महत्वाच्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागणार होता.
पण अलीकडच्या काही महिन्यात ..तिचा सारा वेळ ,तिचे मन ..तिच्यासाठी नव्हतेच ना ..
अभी आपल्या जीवनात काय आला , त्याच्या प्रेमाने झपाटून गेलोत आपण .
अनुषा विचार करण्यात गढून गेली ..तिची ही समाधी भंगली ,मैत्रिणीने जणू जागे करीत खुणावले
“ ए अनुषा ,जागी हो ,बघ आपले सर काय सांगत आहेत ते ,
महत्वाचे आहे..ऐक जरा .
अनुषा सरांच्या बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली ..
सर सांगत होते ..
विद्यार्थी मित्रांनो –मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे करा ..
आता उरलेल्या काही महिन्यात तुम्हाला सतत काही ना काही उपक्रम करायचे आहेत,सर्व्हे करायचे ,
रिपोर्ट्स बनवायचे , आपल्या समाजातील काही लक्षणीय व्यक्तिमत्वाच्या जीवन –प्रवासावर
एक डिटेल आत्मकथन बनवायचे आहे . ते तुम्ही Audio and Vidio “ अशा स्वरूपात तयार करायचे
आहे .
ज्याचे हे आत्मकथन –प्रोजेक्ट सगळ्यात उत्तम ठरेल ..त्याचे स्क्रीनिंग एक मोठ्या कार्यक्रमात
मान्यवरांच्या समोर करण्यात येईल . आणि तुमच्या वार्षिक परीक्षेत या उपक्रमाचे मार्क्स तुमच्या
एकूण मार्कात एड करण्यात येतील ,ज्यामुळे तुमचा रिझल्ट अधिक चांगल्या मार्कांचा होऊ शकेल.
तेव्हा लागा या कामाला .
या उपक्रमाची रूपरेषा ,तुमच्या कल्पना , कुणाच्या जीवनावर हे आत्मकथन –जीवन प्रवास
लिहनार हे सगळे तुमच्या अर्जात उल्लेख केलेले असावे .
यासाठी तुम्ही आपल्या समाजातील कोणत्याही व्यक्तीवर आपले संशोधनपर काम करू शकणार आहात .
अमुक फिल्ड मधलीच व्यक्ती हवी आहे .असे नियम नाही .
पण ,तुमचे संशोधनपर प्रोजेक्ट नव्या पिढीसाठी प्रेरक असावे , तुम्ही अशी व्यक्ती निवडावी
जी सामाजिक ,सार्वजनिक जीवनात त्याने केलेलेया कार्यामुळे ..एक रोल मोडेल म्हणून ..सर्वांसाठी
उदाहरण असावी.
हे काम विद्यार्थ्यांना तीन महिन्यांच्या अवधीत पूर्ण करावयाचे आहे. नंतर लगेच तुमच्या वार्षिक
परीक्षाचे दिवस जवळ आलेले असतील , तो अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पुरेसा मोकळा वेळ
मिळावा म्हणून ..हे प्रोजेक्ट करण्याच्या तयारीला तुम्ही आता लगेच सुरुवात करावी.
या सगळ्यासाठी तुम्हाला प्रिन्सिपलसरांच्याकडे एक अर्ज आणि आणि करणार असलेल्या उपक्रमाची
रूपरेषा –माहिती द्यायची आहे . योग्य त्या प्रोजेक्ट –फाईलला प्रिन्सिपल aaprove करतील .
ज्यांच्या फाईल नामंजूर होतील ..त्यांना दुसरे आणि वेगळे प्रोजेक्ट करता येऊ शकेल .
तेव्हा ..विचारपूर्वक आपापले अर्ज आणि प्रोजेक्ट फाईल लवकरात लवकर तयार करून .
कार्यालयात दाखल करा.
ज्यांचे प्रोजेक्ट मंजूर होतील ..त्यांना प्रिन्सिपलसर म्हणजे कॉलेजच्यावतीने एक परमिशन लेटर
दिले जाईल ..ज्यात ..विद्यार्थ्याचे नाव , कोणत्या विषयाचे विद्यार्थी आहात ,कॉलेजचे वर्ष
तुमच्या आय -कार्डचा फोटो हे सगळे असेल .
आणि त्या सोबत एक विशेष विनंती-पत्र असेल –
तुम्ही ज्या व्यक्तीचे आत्मकथन –लाईफ सक्सेस स्टोरी करणार आहात
,त्या व्यक्तींनी तुम्हाला सहकार्य करावे “अशी विनंती करणारे हे पत्र असेल ..ज्यावर विभाग –प्रमुख ,
आणि प्रिन्सिपॉल सरांच्या सह्या असतील .आणि तुमची सही-फोटो दोन्ही Attested केलेले असेल.
थोडक्यात ..तुम्ही अधिकृतपणे ..कॉलेजचा उपक्रम करू शकाल .तुमचे कार्य पूर्ण व्हावे म्हणून हे सगळे .
हा हेतू या मागे आहे.
बस .सरांचे हे ऐकून अनुशाच्या डोक्यात एक विचार आणि कल्पना .विजेसारखी लक्खन चमकून गेली ..
आणि तिच्या मनाचा विचार अगदी पक्का झाला ..
आत्मकथा – एका उद्योगपतीची ..सक्सेस स्टोरी –एका सामान्य व्यक्तीची –
आणि ही व्यक्ती ..श्री.सागर देशमुख .
या कल्पनेवर अनुषा स्वतःवर जाम खुश झाली ..या तीन महिन्यांच्या अवधीत ..ती तिच्या मनात
जे जे आहे..ते अजिबात टेन्शन न घेता करू शकणार होती. हा मार्ग नसता तर तिच्यासाठी पुढचे
सगळेच खूप कठीण होऊन बसले असते .
पण ..आज सरांच्या एका उपक्रम –नोटीसने सगळ्या गोष्टी जणू तिच्या मनाप्रमाणे घडू शकणार
होत्या .
अनुशाने ..आपले आत्मकथन –एका व्यक्तीचे ..सक्सेस स्टोरी ऑफ अ कॉमन ...
हे प्रोजेक्ट ..फ्रेमवर्क सहित अर्ज दाखल केला आणि..तो कधी मंजूर होतो ?
याची अधिरतेने वाट पाहू लागली ..
तो पर्यंत याबद्दल अभिला काहीही सांगायचे नाही असे तिने ठरवले होते .
त्या दिवशी संध्याकाळी ..अभिजितचा फोन आला ..वेळ असेल तर भेटू या , नेहमीच्या ठिकाणी ,
नंतरचे काही दिवस एका मोठ्या कामात बिझी असणार आहे, तुझेपण कोलेज आणि परीक्षेचे दिवस ,
आज भेटू या न प्लीज !
अनुषा म्हणाली .. अरे राजा ..इतकी कारणे द्यायची गरज का वाटली रे तुला ,
तू फक्त ..ये अनुषा , एव्हढेच म्हणत जा ..
बघ ..मै आई आई ..गाणे म्हणतच सुटते तुझ्याकडे.
ठरलेल्या वेळी..नेहमीच्या जागी .अभी येऊन बसला असणार ..अनुषा तयार होतांना हाच विचार
करीत होती. प्रेमात पडलेल्या दोन जीवांना ..आपल्या छोट्याशा जगाशिवाय .बाकी इतर कुठल्याच
गोष्टीत अजिबात गोडी वाटत नाही..
बस..समोरासमोर बसून ..शेजारी बसून .बघत राहायचं , बोलायचं प्रेमाचे , करायचे सुद्धा फक्त प्रेमच .
निळ्या रंगाची प्लेन साडी ..अभिने गेल्याच आठवड्यात गिफ्ट दिली होती .कारण काय होते ?
तर दोघांच्या ..पहिल्या भेटीचा दिवस .आणि .तारीख योगायोगाने सेम ..आली होती या महिन्यात पण.
अनुशाला हा नीला रंग .फारसा आवडत नसायचा ..पण ..अभिला .आवडतो म्हणून ..हा नीला रंग .
तिला पण आवडू लागला
तयार होताना तिच्या ओठ्वर नकळतपणे .गाण्याच्या ओळी येऊ लागल्या ..
सजना है मुझे सजना के लिये ...
तयार झाल्यावर आरशातले स्वतःचे सुंदर प्रतिबिंब पाहून अनुशा मनोमनी फुलून आली.
अभिची कॉम्प्लिमेंट तिला आठवली
अनुषा –किलर ब्युटी यु आर ..!
खरेच अभी खूप रसिक मनाचा ,सौदंर्य –वेडा आणि आपल्या “प्रेमाचा ..प्रेम-पुजारी ..!
अभिला कधी पहाते आणि भेटते ..असे तिला झाले होते ..
त्याची प्रियतमा ..त्याला त्याच्या आवडीच्या निळ्या साडीत आलेलीआहे हे पाहून ..
त्याच्या डोळ्यातली चमक , चेहेरवर उमटणारा आनंद पहाण्यास अनुषा अधीर झाली होती ..
अनुषा नेहमीच्या ठिकाणी पोंचली ..नेहमीप्रमाणे तिच्या आधी अभी येऊन बसलेला दिसला .
ती त्याला सॉरी म्हणणार होती ..
पण ..निळ्या साडीतल्या सुंदर अनुशाला पाहून अभी
चकित झाला ,अनादित झाला आहे हे तिला दिसले ..
आणि मग ..ती त्याच्या जवळ जाऊन बसत ..
त्याच्याकडे पाहत म्हणाली ..
बघ ..तुझ्या आवडी किती लक्षात ठेवतेय मी .
.खुश ना आता तू अभी ...?
अनुशाचा हात हातात घेत तो म्हणाला ..तुझ्या या स्वभावाने तर मला तुझ्या प्रेमात पार
दिवाना करून टाकलाय .
प्रेमाला पारखा होतो मी .आणि तू भरभरून माझ्यावर प्रेम करते आहेस..
आय लव्ह य अनुषा ..!
भावूक झालेल्या अभिला जवळ घेत ती म्हणाली ..राजा
आय लव्ह यु ...सो मच ..
ती संध्याकाळची वेळ ..मावळतीचे रंग आसमंती विखुरलेले , आजूबाजूचे जग त्याच्या व्यापात
गढून गेलेले ..आणि
अभी ..आणि अनुषा ..दोन वेडे या सार्या जगाला पार विसरून गेलेले ..
चंद्राची कोर आकाशी नुकतीच उगवली होती ..सोबत ..त्याची चांदणी ..
किती छान दृश्य आहे हे ..बघ अनुषा ..अभिने तिला दाखवले ..
पण.. तिचे लक्षच नव्हते ..ती तर अभिच्या मिठीत ..डोळे मिटून ..उद्याची बहारदार
स्वप्ने पाहत होती..
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी –पुढच्या भागात ,
भाग -१२ वा लवकरच येतो आहे.
-----------------------------------------------------------------
कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------