ती आली... क्लासवरून थेट ठरलेल्या ठिकानी... नेहमीसारखीच सुरेख दिसत होती... ब्लॅक जीन्स . पिंक टॉप, चमकदार सोनेरी केस जे आजही नेहमीप्रमाणेच मोकळे सोडलेले. कानात छानशा रिंग तर कपाळावर बारीकशी टीकली.. दुरूनच स्माईल करत पुढ आली...
" आज सुट्टी तुला....?" बॅग बाजुला ठेवत बाकड्यावर बसली....
" नाही ग.... एक खुपच Importent काम होत म्हणुन सुट्टी घेतली.."
थोडा वेळ काय बोलाव सुचेनास झाल ..
ती मात्र नेहमीच्या गमती सांगण्यात दंग होती हसता हसता दोन वेळा माझ्या पाठीवर नेहमीसारखीच चपाट मारली, पन माझ लक्ष कशातच नव्हत.. मी तीच गोड हसण ,बोलण मन लाऊन ऐकत होतो.. पन तीला 'प्रपोज' करायच आहे या विचारान काळीज मात्र धडधडत छातीतुन बाहेर येतय की काय अस वाटु लागल..
" काय झालय तुला....असा गप्प का...?"
शेवटी सारा धीर एकवटला.. डोळे बंद केले , माझ्या शर्टमधे हात घालत ते गुलाबाच फुल बाहेर काढल आणी तीच्या निरागस ,
गोड चेह-याकडे पहात म्हणालो
" प्रिया.......तु....तु...मला खुुप , खुप आवडतेस ग... I love you. प्रिया......"
आयुष्यातल आजवरच सर्वात मोठ धाडस केल होत...ते म्हणजे 'प्रपोज'... काही काळ जणु सार जगच थांबल होत, मघापासुन होणारी झाडांची हलचाल, संथ हवेचे झोके, पाण्याच वेग काही क्षण सार काही थांबल.. आवाज येत होता तो काळजाच्या धडधडण्याचा. अगदी स्पष्ट , अतिशय वेगाने, तीच उत्तर काय येतय हे श्वास रोखुन ऐकत होतो आणी मला जे आपेक्षीत होत तेच झाल. तीच्या चेह-याचा रंग उडाला, ती अगदी शांत बसुन होती, खाली शुन्यात पहात.. पुढचे काही सेकंद ही जिवघेणी शांतता तशीच राहीली ,
तीच्या अस्वस्थ चेह-याकडे पहात माझ्या डोळ्यात पाणी आल, कारण मला माझ उत्तर भेटल होत. ती काही वेळात निघुन गेली पन मी मात्र त्या तलावातील संथ पाण्याकडे पहात तसाच बसुन राहीलो... किती वेळ, माहीत नाही. पन आता सार काही संपल होत.. काही भावना ह्या मनातच छान , सुंदर , सुरेख स्वप्नातल्या चांदण्यासारख्या असतात..पन जेव्हा त्याच भावना ओठावर येतात तेव्हा त्यांची सत्यता किती वेदनादायी आहे हे समजत पन तेव्हा खुप उशीर झालेला असतो.
रात्रीचे दहा वाजले होते... तलावातील पाणी किती सुरेख वाटत होत.... आजुबाजूच्या लाईटचा प्रकाश परावर्तीत होउन चमकत होत, पाणी... माझ्या डोळ्यातही होत.. खारट पाणी.. एकतर्फी प्रेमात अपयश आल्यानंतर डोळ्यात दाटुन येणार पाणी...
खुप खुप वाईट वाटत होत, ती मला आपला चांगला मित्र समजत होती पन मी.. प्रपोज केल तीला ? गमाऊन बसलो तीला...! माझ्या आयुष्यात तिच सर्व काही आहे.. माझ सर्वस्वच... पन संपल हे सार काही..
घरी आलो पन जेवण्याची ईच्छा नव्हती..
"आई .... मी जेऊन आलोय ग....." एवढ म्हंटल आणी तसाच बेडवर पडलो... मिनीटा मिनिटाला येणारा तीचा मेसेज आज आला नव्हता... झोप येत नव्हती... या कुशीवरून त्या कुशीवर , पन विचार डोक्यातुन जाईना आणी डोळ्यातल पाणी थांबेना... रात्र पुढे सरकत होती फक्त रोजची स्वप्न आजच्या रात्रीत नव्हती, होता तो एकटेपना, आयुष्याला ग्रहण म्हणुन लागलेला एकटेपना.... डव्या कुशीवर झालो इतक्यात दारावर टकटक झाली.. किती वाजलेले माहीत नाही पन बाहेर कोणीतरी आल होत... डोळे नीट पुसले आणी बेडवरून खाली उतरलो... लाईटच बटन ऑन करून दरवाजा उघडला पन बाहेर कोणीच नव्हत.. अगदी निरव शांतता आणी बाहेरचा काळोख किंचीत दुर करणारा सरकारी खांबावरील ट्युबचा पांढरा प्रकाश तेवढच बाहेर होता... कदाचीत भास झाला असेल... मी दरवाजा बंद करून घड्याळ पाहील.. दीड वाजुन गेलेला.. बाजुच्या टेबलवर ठेवलेल्या जार मधल घोटभर पाणी प्यायलो आणी बेडवर आडवा झालो.... भुक लागलेली, त्यामुळे झोप लागेना... डोळे बंद केले तसा तीचा हसरा चेहरा नजरेसमोर आला आणी पुन्हा दरवाजावर टक टक झाली... कोणीतरीे दरवाजा वाजवत होत... पुन्हा दरवाजा उघडला पन कोणीच नव्हत... कोण मस्करी करतय समजेना.... दरवाजा पुढ केला आणी मागेच उभा राहीलो... म्हणजे झटकन दरवाजा उघडुन जो कोणी आहे त्याला फोडायचा या उद्देशाने .. काही वेळ श्वास रोखुन बाहेर काही चाहुल जाणवते का पाहु लागलो. पन अगदी माझ्या संथ गतीन धडधडणा-या काळजाची धडधड ऐकु येईल इतकी ती रात्रीची निरव शांतता पसरलेली..
. भींतीवरील घड्याळाचे काटेही अगदी स्पष्ट ऐकु येत होते.. कानात प्राण आणुन मी बाहेरुन येणारा आवाज ऐकु लागलो.
आणी पुन्हा दरवाजावर 'टक टक' झाली......................
तसा क्षणाचाही विलंब न करता मी दरवाजा उघडला, आणि अंगावर सर्रर्रर्र कन काटा आला... बाहेर कुणीच नव्हते.. होती ती एक जिवघेणी शांतता... आता मात्र भीती वाटु लागली.. कसलीच हलचाल न करता मी हळूच दरवाजा बंद करू लागलो त्यासरशी एक आवाज कानावर पडला.. कोणातरी कण्हत होत, शरीराला होणा-या असह्या यातनांनी रडत होत.. माझी नजर समोरच्या रस्त्यावर गेली, धुळ मातीन माखलेल्या रस्त्यावर एक सावली पडलेली.. आडवी... जीला शरिर नव्हत पन तरी एक सावली जमिनीवर होती.. दाराच्या चौकटीच्या आत मी उभा त्या सावलीकडे पहात होतो तोवर त्याच्यात किंचीत हलचाल जाणवली... ते अखुड होता होता तडफडत असल्यासारखे शरिराची हलचाल करू लागले...
जमिनीवर पाय आकडुन घेत सार शरिर गोळा करत पुन्हा झटक्यासरशी सरळ केले . समोरच ते भयान दृश्य पाहुन भितीन अंग थरथर कापत होते, सर्वशक्तिनीशी ओरडाव किंचाळाव वाटत होत पन दातखिळी बसल्यासारखी अवस्था झालेली.. पाय जमिनीत रूतल्यासारखा मला जागेवरून हालता येईना.. संपुर्ण शरिराला जणु लकवाच मारला... उघड्या डोळ्यांनी फक्त पहाण्याशिवाय काहीच करता येत नव्हत. अस वाटत होत की असह्य वेदनेन कण्हत होती, तळमळत होती आणी त्यामुळे रस्त्यावरचे खडे आजुबाजूला सरकत होते.. आता ती सावली माझ्याकड सरपटत येत असल्याच लक्षात आल... इतक्यात चरर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करत बाहेरच्या खांबावरची ट्युब फट्टकन गेली तशी बाहेरची ती भयान शांतता दुरवर पसरलेला काळोख आणखी गडद्द झाला... आकाशातल चंद्रबिंबाच्या नितळ प्रकाशात ती सावली आता आणखी गडद , काळीकुट्ट दिसु लागली... तीचा आवाजातली घरघर काळजाचा थरकाप उडवत होतीे... ती काळीतुट्ट आकृति तशीच जमिनीवरून माझ्या दिशेने सरकत पुढ येऊ लागली... मी मागे सरकण्याचा प्रयत्न करत होतो पन व्यर्थ... त्या आकृीतीन दरवाजा जवळ येत माझा डावा पाय घट्ट पकडला... एक घट्ट पकड जस एखाद्या श्वापदाच्या जबड्यात माझा पाय सापडला होत...घट्ट, आणखी घट्ट पकड करत ते मान वर करून माझ्याकड पाहु लागले.. लाल तांबुस रंगाचे डोळे माझ्यावर रोखले होते.. मी डोळे विस्फारुन त्याला पहात होतो की झट्टकन माझा पाय खेचला आणी मी जमीनिवर आपटलो... माझ लकवा मारल्यासारख शरीर कसलीच हलचाल करण्याच्या स्थितीत नव्हत... ते आता माझ्या अंगावर तसच सरपटत येत होत... त्याच्या घरघरणा-या आवाजान मेंदु बधीर होत निघाला...माझ्या पोटावर उभ रहात त्या आकृतिन आपले दोन्ही हात हवेत पसरले आणी झटक्यासरशी माझ्या शरिरात घुसली तसा खाडकन जाग झालो.. अंग घामान भिजलेल...उठुन बसलो.. अंग थरथर कापत होत... पन मी माझ्या बेडवर नव्हतो तर बंद दरवाजाच्या जवळ होतो... लाईट सुरूच होती.. हे स्वप्न होत..?डाव्या पायावर काहीतरी चरचरत होत.. दाह होत होता... मी नाईटपैंट वर करून पाहील आणी व्रण दिसत होता... हातांच्या पंजाचा.... अंग अजुनही थरथर कापत होत... माझ्या सोबत नक्की काय घडलं..? कोण असेल ती आकृती...? विचार करून करून डोकं दुखायला लागलं... कोणाला सांगाव का या बद्दल...? पण कोणाला...? आणी हे एवढ्यावरच थांबणार होत की पुढे आणखी काही नशीबान वाढून ठेवलेलं....
*****
क्रमशः