लघुकथा -बापुमामा
---------------------------------------------------------------------------------------
गावापासून आपण जितके दुरावतो ,तितके आपले मन गावाकडच्या आठवणीत रमत असते.
आता हेच पहा ना ,किती तरी वर्ष झालीत मला गाव सोडून पण अजूनही माझे मन काही केल्या
मोठ्या शहरात रमत नाही , एखादेवेळी एकटे, निवांत बसलं की, माझे मनपाखरू झेपावते गावाकडे आणि
जाऊन बसते माझ्या गावातील बापुमामाच्या फाट्यावर असलेल्या होटल मध्ये .
याच बापुमामाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे .
माणूस लहान असो, थोर असो ,सामान्य माणसे
आपल्या वागण्या-बोलण्याने ,आचरणाने प्रेरक ,आशादायी व्यक्तिमत्व बनत असतात .
सामान्य माणसात ही असामान्य वाटावे असे प्रेरक गुण असतात ,हे तुम्हाला बापुमामाची
गोष्ट ऐकून नक्कीच वाटेल.
तीस –चाळीस वर्ष तरी होऊन गेलीत .त्या वेळी आमचे खेडेगाव मोठ्या रस्त्यापासून चार किमी .
आत होते .पायवाटेचारस्ता चालत जायचे किंवा कुणाच्या किंवा स्वतःच्या बैलगाडीत
बसून , अशा रीतीने जसे जमेल तसे मोठ्या रोडवर पर्यंत यायचे .
आमच्या गावातील रस्ता या मोठ्यारोडला मिळायचा , आमचे गाव पूर्वेकडे होते , पलीकडे पश्चिमेला समोरच्या बाजूला
रस्त्याच्या आजू बाजूची खेडी होती .या सगळ्यांना तालुक्याच्या गावी जाण्यासाठी बाहेरगावी कुठे जायचे असेल तर ,
या मोठ्या रोडपर्यंत यावेच लागले .असे दोन –तीन रस्ते येऊन मिळाल्याने या जागेला .लोकं .फाटा असे म्हणू लागले ..
रस्त्या वर दोन्ही बाजूला छान मोठाली झाडे होती , या झाडाखाली येऊन सावलीत बसायचे आणि एसटी येई पर्यंत वाट पहायची
.आणि पंधरा –वीस किमी अंतरावरील तालुक्याच्या गावी जाऊन आपापली कामे करून यावे ..असे रुटीन होते.
मात्र एक फार मोठी उणीव या ठिकाणी होती ती म्हणजे वर्दळीच्या फाट्यावर चहा-पाण्याची व्यवस्था
नव्हती ,रोडपासून सगळी गावे तशी लांब अंतरा वर असणारी , तिथे येऊन एखादी होटल सुरु करावी
असा कुणी विचार करीत नव्हते . याचे आणखी एक कारण म्हणजे हॉटेलात जाणे म्हणजे चैनबाजी
करणे “असा विचार करणाऱ्या लोकांचा तो काळ होता , दिवस पण तसे गरीबीचे ,मग कोण करणार
असा धोक्याचा धंदा .
पण , म्हणतात ना, आयुष्यात धोका पत्करून काही नवे करून दाखवण्याचा किडा डोक्यात असणारे
हिकमती आणि हिंमतबाज असतातच . आमच्या गावातले बापुमामा याच प्रकारात मोडणारे ,सतत
काही ना काही नवे उद्योग करण्याची यांना फार खुमखुमी , जे मनात आले ,ते नुसते बोलून न दाखवता
ती गोष्ट करून दाखवण्यात बापुमामा फार तरबेज .
बापुमामाना दोन मुले .दोघांची लग्न झालेली . गावात असलेल्या मोठ्या वाड्यात .बापुमामा ,त्यांची
बायको ज्यांना सगळी मंडळी मामीच म्हणत असायची , आणि त्यांच्या सोबत .दोन्ही मुलांच्या फमिली
असा कारखाना होता .
आपल्या वाड्याच्या समोरच्या बाजूला बापुमामांनी दोन्ही मुलांना दोन दुकाने काढून दिली होती .
आय टी आय केलेल्या दोन्ही पोरांची .त्यातल्या एकाचे इलेक्ट्रिकल वस्तू आणि रेपारिंग चे दुकान ,
आणि दुसर्याचे मशनरी आणि रेपेरिंग चे दुकान ..
आजूबाजूच्या दहा-पाच गावातली या प्रकारची दुकाने नव्हती ,आणि या दोन्ही पोरांनी तर
शिक्षण पण घेतले होते धंद्याचे .त्यामुळे सगळ्या लोकांचा या भावावर,त्यांच्या कामावर विस्वास बसला
सगळी कामे या दोन भावाकडे होती ..त्यांच्या इतके हुशार मेकेनिक दुसरे कुणी नव्हते ..
बापुमामा ..दोन्ही दुकानांवर लक्ष ठेवून असायचे ..पोरांना त्यांनी धन्दापानी करतांना पैसा जरूर
कमवा ,पण, त्याच बरोबर ..एकदा आलेलें गिराहिक .दुसरीकडे गेले नाही पाहिजे .अशी सर्विस दिली
पाहिजे ..अशी शिस्त आणि सवय लावली ,
त्यामुळे .कधी पण बघा .मामाची पोर त्यांच्या दुकानात काम धंदा सोडून कुणा बरोबर
रिकम्या बाता करीत बसले आहेत . असे कधी कुणी पाहिले नव्हते सतत राबता असायचा दोन्ही दुकानात .
मामींनी .बापुमामाच्या सांगण्या प्रमाणे दोन्ही सुनाना त्यांनी कोर्स करायला लावले .
आणि एकीला .शिवणकामाचा क्लास आणि शिलाई मशिनी घेऊन देत ..कपडे शिवण्याच्या कामात गुंतवून टाकले .
मोठ्या सुनेची पोर आता तशी मोठी झालेली होती ,मग रिकाम्या वेळेत काय करायचे ?
बापुमामांनी वाड्यातल्या मागच्या मोकळ्या जागेत ..मोठ्या सूनबाईला अंगणवाडी सुरु करून दिली
दोन्ही सुना दिवसभर आपापल्या कामात गुंतून गेल्या . ,अशावेळी वाड्यातल्या सगळ्या कामावर मामींची देखरेख असायची ,
सगळ्यांचे खाणे-पिणे , पोरांकडे लक्ष देणे ..आल्या-गेल्याचा स्वागत ,चहापाणी ही कामे मामी अगदी कडक शिस्तीत करीत.
बापुमामाचा एकूण मामला असा मस्त चालू असतांना .त्यांना कल्पना सुचली ..तसे एकदिवस त्यांनी
वाडा ,वाड्यातल्या सगळ्या गोष्टी .दोन्ही पोरांच्या ,त्यांच्या बायकांच्या हातात देत म्हटले ..
पोरांनी -आमची जबाबदारी आता संपली .आम्हाला मोकळं करा यातून .
तुम्ही हे सगळं खूप छान संभाळून घेताल याची खात्री पटली आम्हाला .
बापुमामाचे हे असे बोलणे ऐकून .पोरांनी ,सुनांनी घाबरून विचारले ..
अन बाबा , हे हो काय काढलाय नवीन ? तुम्ही
काय विचार चालूय तुमच्या मनात ?
बापुमामा म्हणाले ..पोरांनो ,घाबरू नका , मी कुठेही जात नाहीये तुम्हाला सोडून .
पण, मी ठरवलंय .. आपल्या गावाच्या फाट्यावर मी माझी चहाची होटल सुरु करणार आहे.
आणि आता हा बापुमामा आणि त्याच्या सोबत ही मामी ,
आम्ही दोघे फाट्यावर राहायला जाणार आहोत . गेल्यावर्षी मी तिथे थोडी जागा घेऊन ठेवलीय ,
राहण्यासाठी खोल्या बंधू आणि समोर भागात होटल काढू .
अरे एवढा वर्दळीचा फाटा आहे आपला , पण, भकास आणि उघडा –बोडखा, भर दुपारी एसटीची
वाट पाहतबसून राहायचं तर उन की उन ,झाडाखाली सावलीत बसायला कधी कधी जागा नसते .
हे सगळे पाहून मी ठरवलंय ..कुणी करो न करो ..
फाट्यावर आता .या बापुमामाचे होटल सुरु होणार म्हणजे होणार , लोक दुवा देतील पोरांनो
पाणी पिण्याची सोय केली म्हणून, आणि चहाची तल्लफ भागली तर जीवाला बरे वाटेल त्यांच्या .
बापुमामाचे हे बोलणे ऐकून पोरांना खात्री पटली की आता आपले आई-बाप वाड्यात न राहता
फाट्यावर जाऊन राहणार , बापुमामा होटल चालवणार आणि मामी त्यांना बरोबरीने काम करू
लागणार .
आणि तसेच झाले ..बघता बघता ..फाट्यावर बापुमामाचे घर तयार झाले ,
चांगला दिवस पाहून .एक दिवस बापुमामाचे होटल जे सुरु झाले म्हणता .एकदम एक्ष्प्रेस्स .
बाहेरच्या बाजूला बेंच मांडलेले पत्रे टाकलेली शेड ,आत खुर्च्या
पाण्याने भरलेले रांजण ,आणि आतल्या बाजूला चहाची भट्टी आणि चहावाला ,
भज्जे , चिवडा ,पेढा ,करणारा कारागीर ,असे लोक ,
आलेल्या गिर्हाईकाला मामा स्वतहा पुढे येऊन काय पाहिजे विचारीत,
,आणि मग वेटरला टेबलवर द्यायला सांगत
हॉटेलच्या गल्ल्यावर खुर्चीत स्वतहा बापुमामा , त्यांच्या समोर गोळ्या –बिस्किटाच्या बरण्या ,
असा मस्त देखावा केलेला होता
महिना –पंधरा दिवसात बापुमामच होटल, इथे मिळणारा पिव्वर गोल्डन चहा , खमंग चटकदार
भज्जे आणि चिवडा .सगळीकडे फेमस झाला ..रस्त्याने जाणारे ट्रक, आणि एसटी बापुमामाच्या
होटल मध्ये नाश्ता करून पुढे जाऊ लागले .
त्याकाळी आजच्यासारखे, प्रायवेट गाड्या , आणि कार यांची ये-जा बिलकुलच नव्हती .मोजक्या
एसटी गाड्या ,आणि दूर दूर माल घेऊन जाणरे मालट्रक .हेच काय ते या रोडवरून जाणारी वाहने
होती. आणि आजच्या सारखे ..धाबे ,हॉटेल .यांचे नामोनिशान नव्हते.
अशा काळात बापुमामाची होटल आणि त्यांचा गोल्डन कडक मिठ्ठा चहा ..या गोष्टी ..
फाट्यावरचा चहा म्हणून फेमस होऊन गेले .
मी तेव्हा कोलेज शिक्षण संपवून नोकरीसाठी थेट मुंबई गाठली होती. सुट्टीत गावाकडे आल्याशिवाय
करमत नसायचे .
एकदा असेच गावाकडे आलो , एस्तीतून उतरलो ..तो समोर पहिल्यांदा .. होटल दिसली ..
याचे .. मालक .गावाचे बापुमामा आहेत असे कळले .
बापुमामा म्हणजे पंचक्रोशीचे ..बापुमामा .आणि त्यांची बायको ..सगळ्यांची मामी.
फाट्यावर राहायला आले .
बापुमामाचा गोल्डन पिव्वर चहा फेमस व्हायला काहीच वेळ लागला नाही.
पब्लिक म्हणू लागली ..बापुमामाचा चहाचा फाटा “इथला चहा एकदम बेस्ट..!
सांगी- वांगीने .बापुमामाचे होटल -चहाचा फाटा .चांगलाच स्थिर झाला . पाहिल्यादिव्सापासून
बापुमामच्या सर्विसने गिर्हाईक खुश .ते पुन्हा पुन्हा येत राहिले .
बापुमामाचे हॉटेलात स्वतहाचे असणे, तिथे जीवतोडून रात्रंदिवस राबणे , लोकांच्या नजरेत भरायचे.
बघता बघता बापुमामाने फाट्याच्या आजूबाजूची जमीन घेतली शेती घेतली , विहीर केली....
उन्हाळ्यात तिथे येणाऱ्या लोकांची तहान भागवण्याचे काम बापुमामाच्या शेतातली विहीर करू लागली.
एका वर्षी ..बापुमामाने पोरांच्या हातात हॉटेलाचा कारभार देऊन टाकला ...आणि स्वतहा बाहेर अंगणात
खुर्ची टाकून येणाऱ्या जाणर्याशी बोलत बसू लागले.
बापुमामा आणि मामी दोघेही नशीबवानच म्हणयला पाहिजे..
बापुमामाने गरिबीत असतांना .आपल्या भाकरीतील .अर्धी भाकरी येईल त्या भुकेल्याला खाऊ घातली ,
आता कशाची काही कमी नव्हती ..तरी बापुमामा बदलले नव्ह्ते ..,उलट आता अगदी सढळ हाताने ,
मोठ्या मनाने ते मदत करू लागले .
त्यांनी सचोटीने धंदा केला , माणसे जोडली , त्यांच्याकडे मदत मागायला आलेला ..रिकाम्या हाताने कधी माघारी जाऊ दिला नाही.
बापुमामाच्या दोन्ही पोरांनी ..बापाचे गुण बरोबर उचलेले होते. आपल्या पोरांच्या हातात
कारभार देतांना ..बापुमामाने स्पष्ट .सांगितले
पोरांनो ..तुम्ही राजीखुशीनं करणार असलात तर हे काम
हा धंदा पुढे न्या ..तुमच्यावर बळजबरी नाहीये अजिबात !
पण, माझी इच्छा आहे, हे सगळे मेहनत करून आम्ही जे उभ केलय
..ती विकायची वेळ “
केवळ तुमची इच्छा नाही , म्हणून आणि तुम्ही आम्हाला नाही “म्हणले
म्हणून आली तर खूप वाईट वाटेल आम्हाला .
पण असे काहीच झाले नाही.
बापुमामा नशीबवानच ..पोरांनी मोठ्या आनंदाने .बापाने टाकलेली जबाबदारी आपल्या अंगावर घेतली
आणि .बापुमामामाचा पिव्वर गोल्डन चहा ,खमंग लसणी चिवडा , शेव, भजे ..या जुन्या गोष्टी
टाकून दिल्या नाहीत ..उलट कौतुकाने त्या चालू ठेवल्या .
आणि आजच्या नव्या जमान्यातला नवा मेनू चालू करीत हॉटेल अप टू डेट केल्याचे .बापुमामा पाहत होते.
नशीब फक्त माणसांचेच बदलत नसते तर. रस्त्याचे सुद्धा नशीब उजळते .
आता बघा ना ..
आमच्या गावासामोरचा रस्ता .आता चक्क राष्ट्रीय रस्ता ..हाय-वे झालाय. पाहता पाहता ..रस्त्यापासून
आत असलेली गावे आता रस्त्यच्या दोन्ही बाजूला दिसू लागली, दुकाने सजली , रात्री तर सगळ्या प्रकरच्या हॉटेल आल्या .
आमच्या गावाचा चहाचा फाटा “हाय-वे मध्ये गुडूप होऊन गेला ..खूप सारे बदलून गेले आता ..
कायम टिकून आहे ते..बापुमामाचा पिव्वर गोल्डन , आणि बापुमामा ,जसे होते तसेच आता आहेत.
बापुमामाला मामीसारखी घर-धनीण मिळाली , मामीनी कधीच कुणावर अधिकार गाजवला नाही.
सगळ्यांना माया लावली , प्रेम दिले .
सासू -सुनेचे नाते म्हणजे तडतडीचे फटाके , कधी कानठळ्या बसतील सांगता येत नाही .पण,
इथे मामींनी आणि बापुमामांनी आपल्या सुनाना गृहलक्ष्मीचा मान देत , त्यांच्या मनात घराबद्दल
घरातील माणसा बद्दल ,सगळ्या बद्दल आपलेपणाची भावना निर्माण केली.
तसे म्हटले तर – बापुमामा काय आणि मामी काय, दोघे ही आयुष्यभर खेड्यातच राहिलेली माणसे.
शाळा –कोलेजचे शिक्षण त्यांना मिळण्याचा तो काळ नव्हता .
बापुमामानी ..अनुभवातून आणि चार लोकात राहून जगायचे कसे ? याचे शिक्षण घेतले
.आणि आयुष्यभर आपल्या आचरणात आणतांना ..नव्या पिढीवर संस्कार केले ..की बाबांनो..
माणसाने माणुसकीने वागावे , माणसे जोडावी , पैसा कामा पुरता ठीक आहे ,त्याचा लोभ,नको
लोभा पायी माणसातला माणूस संपतो .
पोटापाण्यासाठी आपण जे करतो ..ती नोकरी, काम-धंदा ,रोजगार यातले काही असो ,त्यात फसवा फसवी
लादी-लबाडी करू नये . चांगल्या मार्गाने कमावलेला पैसा आयुष्याला बरकत देतो .
मी जेव्हा गावाकडे जातो ,बसमधून उतरल्यावर ..समोरच बापुमामच्या मुलांनी बांधलेले भव्य
हॉटेल दिसते ..बाहेर मोकळ्या जागेत रिकम्या खुर्च्या असतात ..मध्यभागी ..
थकलेले बापुमामा ,कधी कधी मामी ,दोघे ही बसलेले असतात . चार शब्द बोलून .बरे वाटते .बापुमामा आग्रहाने गोल्डन चहा
आणून द्यायला सांगतात .चहा घेत घेत .मी बापुमामा कडे पाहत असतो ..
“माझ्यासाठी बापुमामा कार्यरत व्यक्तिमत्वासाठीचे प्रेरक आणि आदर्श व्यक्तिमत्व आहे.
मित्रांनो आमच्या बापुमामाची –आणि मामींची हे गोष्ट कशी वाटली ? तुमचे अभिप्राय जरूर द्या.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा – बापुमामा
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे .
९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------