पूर्णा नदी काठी वसलेलं रामपूर नामक गाव. यंदा पाऊस न पडल्यामुळे गावातील प्रत्येकाची परिस्थिती हलाकीची होती. म्हणून गावातील सावकाराकडून काही लोक कर्ज घेत असत.सावकार देखील जमिनीच्या बोलीवर कर्ज द्यायचा.
गावातील बाळासाहेब पाटील हे सरपंच.सलग पाच वेळा ते गावचे एकमेव सरपंच. घरी अमाप संपत्ती अन 50 एकर शेतजमिनीचे एकमेव मालक. त्यांचा स्वभाव एकदम हळवा. प्रत्येकजण त्यांच्याशी प्रेमाने बोलत असत. दर रविवारी ते ग्रामपंचायत मध्ये ग्राम सभा बोलवत. ग्रामसभेत गावातील प्रत्येकाच्या अडचणी ते समजून घेत अन शक्यतोर मदत करायला नेहमी पुढाकार घेऊन पुरेपुर मदत करत.
बाळासाहेब पाटील यांना एकुलता एक मुलगा.कुलभूषण, एकुलता एक असल्या कारणाने सरपंचाच्या घरातील अन कामाला येणाऱ्या प्रत्येक जणांच्या लाडाने तो मोठा झाला. त्याने त्याचे पूर्ण उच्च महाविध्यालायचे शिक्षण हे बाहेर दुसऱ्या देशात केले. ते पूर्ण करून तो घरी आलेला.
माहाविध्यालायच्या जीवनात कुलभूषणचे एका सुरभी नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सुरभीला BLOOD CANCER होता. हे कुलभूषण ला माहिती होत, पण प्रेमापुढे सर्व आजार हार मानतात म्हणून ते लग्न करण्यासाठी तयार झाले. पण प्रश्न होता तो घरच्यांचा.घरचे त्यांच्या प्रेमाला स्वीकारतील का....?
सुरभी ही वडिलांची लाडकी लेक. सुरभीचा प्रत्येक हट्ट हा वडील पूर्ण करत असत. अन कुलभूषण देखील एकुलता एक असल्या कारणाने वडील प्रेमाला मान्यता देतील या गोष्टीवर तो पूर्णतः ठाम होता.
कुलभूषण घरी आल्यावर त्याने आपल्या प्रेमाचा प्रस्ताव घरच्यापुढे ठेवला. सुरभी बद्दल सर्व काही सांगितले. वडील थोडे रागावले, आई देखील समजूत घालून सांगू लागली. पण कुलभूषणचा हट्ट इतका वाढला की त्याने जवळपास 3-4 दिवस आई वडिलांना न बोलण्याचा निश्चय केला. जेवन देखील त्याग केला.
आईची ममता आईलाही करमत नव्हते, की आपला मुलगा 3 दिवसापासून आजारी आहे, जेवण करत नाहीये.
( आईने सरपंचाकडे विनवणी केली की)
विजयाताई :- अहो, पोरग तीन दिस झालीत भाकरीचा एक कण सुद्धा खाल्लं नाही,
बाळासाहेब :- मग आता म्या काय करू..? त्याच्या तोंडात घास भरवू का....?
विजयाताई :- अहो एकुलत एक आहे हो, द्या की परवानगी लग्नाला ,आमचे पण सपान आहे न की घरात लहान बाळ खेळावं, बागडाव,
तुम्हाला नाही वाटत का...?
बाळासाहेब :- विजयाताई आम्हाला सुद्धा वाटत की घरामध्ये वंश जन्माला यावं
विजयाताई :- मग...?
बाळासाहेब :- पण त्या मुलीला BLOOD CANCER आहे. जर आज लगीन लावून दिल अन उद्याच्यान मेली तर काय करावं. गावामध्ये एवढ मोठा मान आहे उदयाला अपमान व्हायला नको...
विजयाताई :- लगीन सुद्धा एकदाच होते हो, बघून घेऊ पुढचे पुढे .
( विजयाबाई यांच्या अफाट प्रयत्नांतर बाळासाहेब राव कुलभूषण अन सुरभीच्या लग्नाला मान्यता देतात .)
विजयाताई अन बाळासाहेब दोघेही जेवनाच ताट घेऊन कुलभूषण च्या खोली कडे जातात. मात्र कुलभूषण हा एका कोपऱ्यात रडत रडत झोपेलला असतो. विजयाबाईंनी त्याला उठवलं, कुलभूषण उठला पण जरा नाराजच होता.
बाळासाहेब :- अरे कुलभूषण ,काय झालं ..?ती नाही तर दुसरी करू..? त्यात काय एवढं
कुलभूषण :- बाबा, मी लगीन करीन तर तिच्याशीच नाहीतर जीव देऊन टाकील.
बाळासाहेब :- अरे, केली असती आपण ती पण तिला बिमारी आहे नव्ह ते BLOOD CANCER.
कुलभूषण :- बाबा, तिला पुरेपूर ठीक करण्याची जबाबदारी माझी.
बाळासाहेब गालातल्या गालात हसत म्हणाले, ठीक आहे मग आनुया सुनबाई घरात....त्याच.
कुलभूषण हे ऐकताच त्याच्या हाताने दोन्ही डोळे पुसले आनंदाने बाबाला मिठी मारली. आईला सुद्धा बाप लेकाला पाहून उर दाटून आलेला.
आता कुलभूषण च्या घरचे पूर्णपणे लग्नाला तयार झाले अन सुरभीच्या लग्नाचे देखील अगोदरच तयार झालेले होते.
अखेर दिवस उजाडला.
लग्न थाटामाटात आटोपलेले, दोन्ही घराची मंडळी आनंदात असतात.
जवळ एक वर्ष उलटून गेलं , सुरभी अन कुलभूषण हे त्यांच्या परिवारात गुण्यागोविंदाने वावरत असत.सुरभी आता आई होणार होती म्हणून सर्वजण तिला लाडाने बोलत असत. तिची देखभाल करत असत.
सुरभी बाहेर पाळण्यावर बसून वृत्तपत्र वाचू लागली. तेवढ्यात अचानक तिची तब्बेत बिघडली. तिला पोटाचा त्रास जास्त जाणवू लागला.पोटामध्ये कळा येऊ लागल्या. ती ओरडू लागली...
"आई ग ...आई ....कुलभूषण..."
तिचा आवाज ऐकून कुलभूषण धावत आला.तेवढ्यात सुरभी पाळण्यावरून खाली पडली होती.कुलभूषण जे तिचे डोके मांडीवर घेतले. अन बोलू लागला..
"आग काय होतंय तुला सांगतरी.."
कुलभुषण रडू लागला सुरभीचा त्रास बघून. कुलभूषण ने बाबाला आवाज दिला.बाबा गाडी काढा हिला दवाखान्यात हलवायचे आहे. की तोच बाळासाहेब धावत आले अन ड्रायव्हर ला गाडी काढायला सांगितली. विजयाताई सुद्धा गोंधळ ऐकून बागेतून घरापुढे आल्या. तर त्याना सुरभीचा त्रास हा जाणवू लागला.
कुलभूषण ने सुरभीला जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखान्यात हलवले.
BLOOD CANCER मुळे सुरभीला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या.
सुरभी माता होणार होती, हे सर्वांना माहिती होते. पण तिचा होणारा त्रास बघून सर्वजण चिंतेमध्ये गुंतले होते.
दवाखान्यात ऍडमिट केलं.जवळपास दोन तीन तास उलटून गेली.सुरभीचा त्रास कमी होत नव्हता. अन रक्ताच्या उलट्या होत असल्या कारणाने तिला अशक्तपणा जाणवू लागला.
तीन चार तासानंतर आनंदाची वार्ता मिळाली. सुरभीने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. घरामध्ये वंश जन्माला आलेला. हे ऐकताच बाळासाहेब अन विजयाताई या दोघांना आनंदाचे भान राहिले नाही. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसू लागले. अन आपल्या आई वडीलांना पाहुन कुलभूषण हा सुद्धा आनंदात विलीन झाला.
पण सुरभीला BLOOD CANCER ही बिमारी असल्या कारणाने तिला रक्ताच्या मोठ्या प्रमाणात उलट्या झाल्या.म्हणून डॉक्टरांनी कुलभूषन ला सांगितले की,
जर बाळाला सुरभीचे दूध पाजले तर बाळाला सुद्धा BLOOD CANCER चा धोका होऊ शकतो.अन बाळ सध्या तान्हे आहे म्हणून याला गाईचे वा शेळीचे कोरे दूध देखील देऊ नका. बाळाला एका मातेचेच दूध पाजावे लागणार आहे. जेणेकरूम बाळाला आईकडून मिळणारी जीवनसत्वे ही मिळतील अन बाळाची तब्बेत देखील सुधारेल.
डॉक्टरांचा सल्ला ऐकून, कुलभूषण अन घरच्यांचा धीर खचला. कुलभूषण रडू लागला काय करावे त्याला काहीच कळत नव्हते. बाळासाहेब देखील प्रश्नात
पडले.
सुरभीला BLOOD CANCER असल्या ने डॉक्टरांनी तिला दुसऱ्या दवाखान्यात हलवले.अन बाळाला काचेमध्ये ठेवले.
बाळासाहेब कुलभूषण दोघेही घरी आले. दोघेही बाळाला घेऊन चिंताग्रस्त होते.धीर सावरला बाळासाहेबांच्या डोक्यात एक युक्ती सुचली. त्यांनी गावात दवंडी द्यायला सांगितली की गावामध्ये जेवढ्या स्त्रीया गर्भवती आहेत ज्यांचे बाळ हे एक ते 2 वर्षापर्यत आहे .त्यांनी उद्या सकाळी ठीक 10 वाजता सरपंच यांच्या वाड्यात उपस्थित राहायचे आहे.
दवंडी पूर्ण गावभर पसरली,सर्व स्त्रियांमध्ये हळहळ झाली. की कशाला बोलावलं असलं सरपंच साहेबाने.ही बातमी गोदावरीच्या कानावर पडली.
गोदावरी कासतोडे ही अति गरीब, तिचा नवरा पांडुरंग हा उच्च शिक्षित पण पैसे अभावी तो शेतीमध्येच कामे करत.या नवविवाहित दाम्पत्यांना एक 3 वर्षाची मुलगी छकुली नावाची गोड मुलगी होती. अन आता गोदावरी ही गरोदर होती. गरोदर असताना देखील ती पांडुरंग ला शेताच्या घरकामात थोडाफार हातभार लावत असत.
गोदावरी ने दवंडी ऐकताच सायंकाळी पांडुरंगला घरी आल्यावर विचारणा केली.
गोदावरी :- अहो, सरपंच साहेबांनी गरोदर असणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या घरी बोलावलंय....जावं का..?
पांडुरंग :- अस व्हय, पण नेमकं कशाला बोलवलं..?
गोदावरी :- अहो, मला तरी अस वाटतंय की,गरोदर मातांना एखादी नवीन स्कीम आलेली असेल. बाळाच्या संगोपनासाठी.
पांडुरंग :- हा असंच असेल काही. जावा की मग उद्या...!
गोदावरी :- अहो, तुम्ही पण चलाना की सोबत.
पांडुरंग :- घरची कामे बाकी आहेत. कोण करणार ..? तू ये जाऊन..!
गोदावरी :- अहो, फक्त एका घंट्याची तर बाब आहे... चला की,
पांडुरंग :- बर ठीक आहे, येतो म्या उदयाला संगतीला.
गोदावरी आज पांडुरंग दोघेही सकाळी सरपंचाच्या घराकडे निघाले. तिथे गावातील जवळपास 20 ते 30 महिला उपस्थित होत्या. महिलांची कुजबुज चालुच होती.एकच प्रश्न होता कशाला बोलावलं असेल साहेबांनी....?
काही वेळात सरपंच बाहेर आले, सर्ग स्त्रियांनी उभे राहून नमस्कार केला.मग सरपंचांनी त्यांना खाली बसायचे सांगितले.
सर्व वातावरण एकदम शांत झालेले. तेवढ्यात पंचाबाई ने विचारलं साहेब, कशाला बोलावलं आम्हांसनी ..?
सांगतो...!( सरपंच म्हणाले)
बाळासाहेब :- " आमच्या लाडक्या मुलाच्या पत्नी म्हणजेच आमची सुनबाई. यांना काल पुत्ररत्न प्राप्त झाले. हे ऐकताच सर्व स्त्रिया सरपंचाचे अभिनंदन करू लागल्या. सरपंचाने सर्वाना पेढे खायला दिले.
मग काही वेळानंतर,
बाळासाहेब :- तर तुम्हाला सर्वाना बोलवले यासाठी की, आमच्या सुनबाई यांची प्रकृती ही अत्यंत खराब आहे. गरोदरपणात बाळाला जन्म दिल्याने त्यांच्या शरीरातील पूर्ण रक्त हे बाहेर वाया गेले आहे.त्यामुळे डॉक्टरांनी दूध पाजण्यास सक्त मनाई केली आहे.अस सांगताना सरपंचाचा उर दाटून आलेला.तर तुमच्या पैकी या घराण्यातील वंशाला कुणी दूध देईल का...?
सर्व स्त्रिया एकदम शांत झाल्या.
तेवढ्यात पंचाबाई बोलली, साहेब दुसऱ्याच्या ऑलादीला आम्ही कस दूध पाजनार..? बर वाटल का ते...?
उठा ग बायांनो चला घरी..!
दुसऱ्याची औलाद जगवायची अन आमच्या स्वतःच्या औलादीला तसच वाऱ्यावर मरू द्यायच...?
चला ग.!
पंचाबाईच्या या उत्तरावर पाच ते दहा स्त्रिया निघून गेल्या. अन काही जणी राहिलेल्या तर त्या सर्व तिथेच एकमेकिंमध्ये संवाद साधू लागल्या.
गोदावरी देखील पांडुरंग ला बोलू लागली.
गोदावरी:- अहो, काय करावं? ते बाळ आईच्या दुधावाचून मरेल..
पांडुरंग:- थांब थोडं ह्या बायकांचं बघुयात काय मत येते तर.
तेवढ्यात एका स्त्रीने धाडस करून विचारलं.
"साहेब, समजा आम्ही दूध पाजलं तर आम्हाला काय फायदा ?
सरपंच:- मी प्रत्येक स्त्रीला तिच्या बाळाच्या संगोपनासाठी दर महिने 1000 रुपये देईल.
सरपंचाच हे उत्तर ऐकताच, गोदावरी हसली, तिने पांडुरंग ला आनंदात विचारले अहो, सांगाना काय करू..?
पांडुरंग ने गोदावरीला हसताना लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच पाहिलेले
म्हणून तो देखील तयार झाला.
गोदावरी:- साहेब ,म्या हाय तयार बाळाला दूध पाजायला.
सरपंच ने गोदावरीचे बाळ हातात घेतले अन विचारले काय नाव ठेवलं आहे बाळाच. ?
गोदावरी :- साहेब, अजून नाव नाही ठेवलं.
सरपंच :- का..?
गोदावरी:- आमच्या मुलांच नाव कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीने ठेवाव अशी आशा होती.
सरपंच:- ठीक आहे, आज ह्या बाळाच नाव मी ठेवतो
सरपंचाने 'भूषण' हे नाव सुचवले.
पांडुरंग अन गोदावरी हे दोघेही आनंदात वावरू लागले..
पुष्पाबाई :- साहेब, बाळ सध्या कुठे आहे
सरपंच :- तो सध्या दवाखान्यामध्येच आहे. डॉक्टरांनी त्याला काचमध्ये ठेवायला सांगितलेलं.
पुष्पबाई :- मग आम्ही दूध पाजणार कस..?
तेवढ्यात कुलभूषण म्हणाला,
माझ्या डोक्यात एक युक्ती आहे,
आपण एक MILK FOUNDATION अशी एक संस्था उभारू,त्यामध्ये ज्या स्त्रियांना दूध द्यायचे आहे त्यांनी नाव नोंदणी करून दूध द्यायचे. अन दूध दिल्यावर त्यांना प्रत्येकी फळफळावळ हे खाण्यासाठी देण्यात येईल आणि दर महिन्याला 1000 रुपये बाळाच्या संगोपनासाठी दिल्या जाईल.
तिथे जमलेल्या सर्व महिलांनी होकार दिला.
त्याच दिवशी बाळासाहेब पाटील यांनी MILK FOUNDATION संस्था बांधायला सुरुवात केली.
एका हप्त्यामध्ये संस्था उभी राहिली.
आणि सुरभी देखील BLOOD CANCER या रोगातून मुक्त झाली.तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले. अन तिला दवाखाण्यातून घरी जायला परवानगी दिली.
सुरभी घरी आली, महिलांच्या दुधातून तीच बाळ मोठं होऊ लागलं.बाळाच्या बारस्यावेळी नाव सुद्धा गावातील सर्व महिलांनी मिळून ठरवलं
गोदावरी ने बाळाच्या कानात 'युवराज' हे नाव पुकारले.
बाळाचे नाव ऐकून बाळासाहेब पाटील, विजयाबाई, कुलभूषण सर्व जण आनंदात होते अन सुरभी देखील खूप खुश होती.
सरपंच साहेबानी पांडुरंग अन गोदावरीला MILK FOUNDATION चालवायला आणि पांडुरंग ला त्यांच्या शेतमाळ्यात काम करायला मुभा दिली......
पात्र....
●श्रीमंत व्यक्ती/ सरपंच :- बाळासाहेब पाटील
●पत्नी :- विजयाताई पाटील
●मुलगा(एकुलता एक) - कुलभूषण
●सून( बिमारी blood cancer) - सुरभी
●गरीब स्त्री :- गोदावरी
पवन बालाराम तिकटे
राहेरी ,सिंदखेड राजा
7350942506
pawantikte123@gmail.com