Aajaranche Fashion - 1 in Marathi Moral Stories by Prashant Kedare books and stories PDF | आजारांचं फॅशन - 1

Featured Books
  • આંખની વાતો

      પુષ્ટિ  બગીચામાં ફરતી હતી અને પોતાના ભૂતકાળની વાતો યાદ કરત...

  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

Categories
Share

आजारांचं फॅशन - 1

एक बार आजा आजा आजा आजा आजा….

एक बार आजा आजा आजा आजा आजा....

"ओ फोन वाजतोय तुमचा"

अनिल च्या श्रीमती म्हणजे सविता अनिल गोरे चपात्या लाटता लाटताच केकाळल्या.

पोटावरची गोधडी तोंडावर ओढत

"कोण हे बघ"

अनिल झोपेतच बोलला.

“सकाळी उठून मर मर मरा, पोरंबाळं बघा, यांना गिळायला बनवा आणि यांचा फोन पण बघा, आणि काय मेली ती कॉलर टून ठेवलीय एक बार आजा... जस काय आयकून कॉलनीतल्या सगळ्या पोरी यांच्याकडंच पळत सुटणारयेत... आहो शार्दूल हे”

"जाऊदे कट कर अन सायलेंट वर टाक त्याला"

"कोणाला?

"अग माझ्या आई फोनला अन जमलं तर तुझ्या तोंडालापण"

"मला काय हौस नाही आली उगाच बडबडायची"

सविताने फोन सायलेंट करता करता जरा आवाज चढवूनच बोलत परत किचन कडे कूच केली.

हंगम हंगम हंगम, हंगम हंगम हंगम, हंगम हंगम हंगम, हंगम....

“काय मेले हे दुखणं ह्या फोनचं, तोंड दाबलं तर नाकानं कन्हतय, आहो परत आलाय शार्दुलचं फोन"

"आन इकडं"

अनिल डोळे चोळत चोळत बोलला.

"फोन उशाला ठेवून का नाही झोपत ओ?

"अय अग येडी हे का, फोन डोक्याजवळ ठेवून झोपल्यावर मेंदूचा आजार होतो, आन तो इकड"

अनिल बेड वरूनच फोन घ्यायला हात पुढे करत बरमळला.

"हॅलो"

अनिल जरा चिडलेल्या स्वरातच बोलला

"काय रे झोपलाय का अजून?

"नाय मेंढ्या चरायला घेऊन आलोय, काय झालं ते बोल, का सकाळी सकाळी मरायला लागलाय"

"अरे मी नाई मरायला लागलो, तो कापडणे मन्या गेला ना भाई"

"कुठं गेला, तू पण जा ना मग त्याच्या बरोबर, माझ्या गोधडीला का सकाळी सकाळी भोकं पाडायला लागलायस"

"अरे भाई गेला म्हणजे मेला, वारला तो"

"अरे बापरे कसाकाय रे?

अनिल चा चिडलेला स्वर चिंतेत आणि बेचैनीत बदलला.

"अटॅक आला त्याला रात्री, हॉस्पिटल मधीं नेईपर्यंतर खल्लास झाला, चांगला हट्टा कट्टा होता यार"

शार्दूल दबलेल्या आवाजात सांगत होता आणि अनिल सुन्न होऊन चेहऱ्यावरचे हावभाव कुठे तरी गहाण ठेवल्या सारखे ऐकत होता.

"हॅलो, आहे का गेला रे तू पण?

शार्दूल ओरडला.

"हॅलो हॅलो हा बोल आयकतोय"

गाढ झोपेत मधमाशी चावल्यावर कसा माणूस दचकून उठेल तसा अनिल दचकून बोलला.

"अरे काल संध्याकाळी दिसला होता ना मला नाक्यावर, कामावरून घरी चालला होता, हात दाखवून गेला मला चांगला, काय यार माणसाचा काय भरोसाच नई राह्लाय, जाऊदे बॉडी कधी येणार आहे?

अनिलने एक मोठा श्वास घेत विचारलं.

"दुपार पर्यंतर येईल बोलतायत"

''चल येतो मी अंघोळ करून, कॉल करतो तुला बाहेर आल्यावर"

एवढ बोलून अनिल ने फोन ठेवला.

सविता बाजूला उभी राहून सगळं ऐकतच होती तरी बोलली

"काय झालं ओ?

"अग आयकलस ना सगळं तरी परत काय इचारती, तो कापडणे मन्या मेला अटॅक नि, जा पाणी ठेव तापायला"

बैचैन अनिल चे बैचेन पण चिडके स्वर ऐकत सविता ओरडली

"पाणी तापायला ठेवू, आहो गिजर आहे घरात गिजर, माझ्या आईने लग्नात दिलेला, बघा अजून कसा टीप टॉप चालतोय, नाही तर तुमच्या मामानी दिलेलं ते फ्रिज आतून तर गार होत नाही पण बाहेरूनच इस्त्री सारखं तापतंय"

"हा जा मग बटण दाब त्याचं, इथं माणसं मारायला लागलेत अन हिला इच्या आईच्या आहेराच्या फुशारक्या सुचतायत, अन जरा ती बी पी चेक करायची मशीन दे”

अनिलने एका हाताने फोन बाजूला ठेवत दुसरा हात छातीला चोळत चोळत सविताला सांगितले.

“आता तुम्हाला काय झालं?

“काही नई थोडं घाबरल्या सारखं झालाय अन छातीत पण दुखतंय थोडं थोडं, तू आन ती मशीन”

“हं घ्या”

सविताने मशीन अनिल समोर आपटलं.

“अग बोकडाला गवत टाकल्या सारखी काय टाकती ती मशीन माझ्या पुढं, चेक कर ब्लड प्रेशर बरोबर हे का”

“काय मेल कटकट हे, खावा पिवा धडधाकट राहावा तर हे दुखतंय ते दुखतंय”

मशीन चा पट्टा अनिलच्या हाताला गुंडाळत गुंडाळत सविताच्या तोंडाचा पट्टा पण चालूच होता.

“तोंड बंद कर बाई, तुझ्या आवाजानं दहा पंधरा पॉइंट अजून बी पी वाढल माझं”

सविताने मशीनचं बटण दाबलं, हाताच्या पट्ट्यात हवा भरून पट्टा घट्ट व्हायला लागला आणि मशीनच्या स्क्रीन वर आकड्यांची शर्यत जस जशी वरखाली होत होती तसे तसे अनिल च्या चेहऱ्यावरचे हावभाव लेफ्ट राईट, लेफ्ट राईट ची कवायत करत होते.

मशीन थांबलं, स्क्रीन वर १४५/९० बघून अनिल दबक्या स्वरात सविताला बोलला

“बघ वाढलय ना बी पी, दे ती बी पी ची गोळी आता”

“आहो काही नई तुम्ही लई विचार करता, घाबरल्यामुळं होत ते थोडं वर खाली, उठा आंघोळ करा, नाश्ता पाणी खा अन मग घ्या ती गोळी”

सविताने अनिल ला धीर देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला.

“अंग ये बाई तू देना गोळी, नाश्ता कराय पर्यंतर उरलो तर पाहिजेल, गेलो गचकून तर”

सविताला कळून चुकलं की अनिलला समजावणं म्हणजे डेटा पॅक संपलेल्या मोबाईल फोन सारखं आहे, कितीही रिफ्रेश केलं तरी पेज काही लोड होणार नाही.

सविताने गुपचूप गोळी आणि पहिल्यांदा न सांगता पाणी देखील आणून अनिलच्या हातात दिले, एखाद्या लहान मुलाने जेम्सची गोळी जशी आवडीने आणि कोणी हातातून घेण्याआधी पटकन तोंडात टाकावी तशी अनिलने बी पी ची गोळी लगबगीने तोंडात टाकली, पाण्याचे दोन घोट घश्यात ओतले आणि पाण्याचा ग्लास सविताच्या हातात देत बोलला

“चल आंघुळीला जातो, मयताला जायचंय”

अनिल गोरे यांचा स्वभाव जरा वेगळाच होता, वेगळा म्हणजे थोडा घाबरट, कुणाला उंचीची भीती वाटते, कुणाला पाण्याची, कुणाला आगीची, कुणाला कसली तर कुणाला कसली, तशीच अनिलला आजारांची किंवा मरणाची भीती वाटते, आणि ही भीती इतकी तीव्र स्वरूपाची असते की अर्ध्या पेक्षा जास्त वेळ शरीरा बद्दल विचार किंवा चिंता करण्यात आणि अर्ध उत्पन्न दवाखान्यात जात. सभोवताली कुणालाही कसलाही आजार झाला किंवा कोणीही कुठल्याही आजाराने मृत्यू पावले कि अनिलला हि तो आजार होईल किंबहुना झालाच आहे असे तो गृहीत धरून चालतो आणि मग त्या आजारा साठी वेगवेगळ्या डॉक्टरांच्या किंवा दवाखान्याच्या चकरा मारत असतो, वेगवेगळ्या डॉक्टरांच्या याच्या साठी कि कुणी एका डॉक्टरांनी त्याला काहीही आजार नाही अशी ग्वाही जरी दिली तरी त्याला मात्र खात्री पटत नाही उलट त्याला असे वाटू लागते कि ह्या डॉक्टरलाच काही कळत नाही, आणि मग दुसरा, तिसरा, चौथा अशे डॉक्टर चक्र सुरु होते.

अनिल हा चांगला सुशिक्षित तरुण, आय टी आय करून मोटार मॅकेनिक झालेला आणि स्वतःचा गॅरेजचा सुरळीत चाललेला व्यवसाय, वडील सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त होऊन गावाकडे अनिल ची आई आणि ते सध्या शुद्ध हवेत उरलेलं आयुष्य आनंदाने घालवतात, सहा सात वर्षा पूर्वी अनिलचे सविता सोबत लग्न झाले आणि आता एक पाच वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी असा अनिलचा नजर लागावा असा सुखी संसार.

असो सध्या विषय सुरु आहे मनोज कापडणे यांच्या आकस्मित निधन आणि अंतयात्रेचा.

अनिल लगबगीने अंघोळ करून बाहेर आला आणि देव पूजा सुरु झाली, अनिलची देव पूजा करण्याची पध्दतही थोडी वेगळीच, एक विशिष्ट प्रकारे देवाचे दर्शन घेणे, मान वेगळ्या प्रकारे तीन चार वेळा गोलाकार फिरवणे, आठ दहा वेळा हात कपाळा पासून छाती पर्यंत वर खाली करणे, जणू काही त्याचे असे मानने होते की जर ह्या प्रकारे देव पूजा नाही झाली आणि काही ठराविक वेळा देवाच्या पाया नाही पडलो तर देव रागवेल आणि मला काही तरी होईल.

अनिलने देव पूजा आटपून कपडे घालून बाहेर पडण्याची तयारी केली तसे सविताने चहा आणि नाश्त्याचे ताट आणले.

"नको नाश्ता, खायची काय इच्छा नई, च्या दे फक्त"

अनिल केसांवर फणी फिरवत आरशातूनच सविताला बोलला.

"अहो अस काय करता, घ्या खाऊन दोन घास, तिकडं किती वेळ लागतो काय माहित, आंघोळ पण एवढ्या घाई घाई करून बाहेर आलात"

सविताच्या आवाजात काळजीचा स्वर होता.

"नको राहुदे दुपारी येतो घरी जेवायला"

चहाचा शेवटचा घोट पीत अनिलने कप टेबल वर ठेवला आणि चप्पल घालून घराबाहेर पडता पडता परत एकदा देव्हाऱ्या कडे पाहत मनातल्या मनात देवाच्या पाया पडुन घरा बाहेर पडला.