"'प्रिया... काळजी करू नकोस बाळा.."
हुंदका आवरत तीची आई जवळ बसुन तीला शुध्दीवर आणायचा प्रयत्न करत होती...
*****
काही वेळातच तीला हॉस्पीटलमधे दाखल केल..
तीची आई आणी बाबा दोघे हॉस्पीटल मधे होते तर भाऊ बाहेरगावी पाहुण्यांच्या घरी गेलेला... त्यांना गरज लागेल म्हणुन मी तीथच थांबलो..
डॉक्टर तपासून जायचे आणी नाना त-हेचे रिपोर्ट तयार करत होते , मेंदुच काय संपुर्ण शरीर स्कॅन केल, ब्लड रिपोर्ट तपासु लागले... मी मात्र बघ्याच्या भुमिकेत सर्व लांबूनच पहात होतो.. रात्रीचे दोन वाजुन गेले होते.. जांभई देतच मी दोन्ही हात पैंटच्या खिशात हात घालुन चालत येत दरवाजावर लावलेल्या काचेतुन आत पाहील तर 'प्रिया' अजुनही बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडून होती.. बाजूच्या लोखंडी स्टैंडला अडकवलेल्या पारदर्शी बॉटल मधुन थेंब थेंब ग्लुकोज तीच्या शरीरात जात होत तर बेडच्या मागे ए.सी.जी मशीनचा अखंड बीप बीप आवाज येत होता.. बेडशेजारील एका प्लास्टीकच्या ट्रे मधे काही औषधांची पाकीट , ग्लुकोजच्या बाटल्या, प्लास्टीकच्या कागदात बंद असलेली इंजेक्शनची सेरींज वगैरे बरच काही दिसत होत. आणी इतक्यात माझी नजर तीथच कोप-यात गेली, औषध ठेवण्याच्या छोट्या टेबल पलिकडे किंचीत हलचाल जाणवली... माझी नजर तीथच स्थिरावली... अगदी श्वास रोखुन मी पहात होतो.. काहीतरी होत तीथ... भुवया आकसुन मी नजर स्थिरावली आणी काळजात धस्स झाल.. त्या I.C.U. रूमच्या आतल्या ऊजव्या कोप-यात एक सावली दिसत होती... कोणतरी उभ असल्याची सावली आत कोणी डॉक्टर नर्स नव्हत्या पन तरी एक सावली होती , अगदी स्थीर, गंभीर , निश्चल धुसर अशी.... त्या काचेतून माझी नजर सर्वत्र फिरू लागली पन त्या पारदर्शक सावलीच रहस्य उलगडेना,
मी तीच्या बाबांना सांगायच या उद्देशान त्यांना जवळ बोलवल..
"काका. त्या कोप-यात काही दिसतय का ?''
''कोणत्या कोप-यात...? काय आहे..?''
मी पुन्हा पाहील तर मघापासुन तीथ घुटमळणारी ती सावली आता दिसत नव्हती.. त्यांनी माझ्याकड पाहील.
''तुम्ही आराम करा इथे.. दिवसभर कामाने थकवा आला असेल म्हणुन अस काहीतरी भास होत असतील...''
त्यांनी नम्रतापुर्वक सांगीतल आणी मी ही बाजुच्या बेंचवर आडवा झालो...
*****
"hello..... "
एका आवाजान हल्की जाग आली.. डोळ्यावर अजुनही झपड होतच...
"Hello....उठताय का....?"
"आई झोपू दे ना ग... आज सुट्टी आहे...."
कोणीतरी तोंडावर किंचीत पाणी शिंपडल तसा सर्रर्रर्रर्रर कन अंगावर शहारा आला... झटकन उठलो.. तर समोर ती म्हणजे प्रिया उभी होती.. केस मागे बांधलेले तर अंगात पांढरट रंगाचा पंजाबी ड्रेस. हाताला पांढरी चिकटपट्टी सलाईन लावलेल्या शिरेवर.. मी तर पहातच राहीलो
" sorry तुम्ही...! तुम्ही इथ काय करताय....? चला आत बेडवर आराम करा....नर्स...( मी एका नर्सकडे पहात हाक दिली...) यांना आता घेऊन जा..."
" त्यांना डिस्चार्च दिलाय." नर्स म्हणाली
"काय..... डिस्चार्ज......?"
"हो....." ती नर्स निघुन गेली....
" हो आपन घरी जातोय..." प्रिया म्हणाली
"हे काय चाललय समजेल का प्लिज...?" मी भारी कन्फुज होतो....पन तीच्या तब्बेतीत बदल मात्र दिसत होता.
" चला...... रिक्क्षा आणलीय....." तीचे बाबा चालत येत मला बघुन बोलु लागले....
" तुमच बरच जागरण झालय... आमच्यामुळ खुप त्रास झालाय तुम्हाला......"
मी चक्राऊन गेलेलो..... एक मुलगी जी रात्री I.C.U. मधे होती आणी आता घरी जातेय... व्यवस्थीत... इथले बरेच कर्मचारी, नर्स त्यांच्या परीचयाचे होते..
अॅडमीट पेशंटच्या जवळ जात त्यांची विचारपुस करायची तर एखाद्या पेशंटला स्वता:च आय.व्ही. लावायला मदत करायची... मनमोकळी, हसरी , तीचे वडील काऊंटर शेजारी उभे बील भरत होते तर तीची आई आणी मी बाजुला उभे तीला पहात होतो...
"प्रिया... चल बाळा...."
तीच्या वडीलांनी हाक दिली तशी ती ही नर्स ना बाय म्हणत चालत आली. प्रश्न खुप होते पन विचारू तरी कस....?
" काल तुम्ही इतक्या सिरीयस कंन्डीशन मधे होतात आणी काही तासात पुन्हा व्यवस्थीत जस काही झालच नाही...? "
ती थोडी अस्वस्थ झाली... माझ्याकडे पहात शांतपने म्हणाली
" सांगेन नंतर... तुमचा नंबर द्या ... एकाच गल्लीत रहातो ना... तसेही तुमचे खुप उपकार झालेत..."
" उपकार..? मदत करण म्हणजे उपकार का..?" माझ्या बोलण्याला तीची आई उत्तर देत म्हणाली.
" हो . उपकारच.. , ज्या अपार्टमेंट मधे रहात होतो तीथ अनुभवलय आम्ही.... ते स्वता:च्या बंद दरवाजाच्या कीहोल मधुन माझ्या मुलीची अवस्था पहायचे, आमची होणारी धावपळ पहायचे..! पन कोणीच मदतीला येत नव्हत....आमच्या मुलीची अशी अवस्था बघुन रक्ताची नातीही दुरावलीत..."
" अवस्था म्हणजे ....? " मी आश्चर्यान , विचारल....
" डॉक्टर म्हणतात तीला....." त्या पुढ बोलणार तोच तीचे वडील समोरून येत म्हणाले....
"चला ... रिक्शा आणलीये...."
सर्व रिक्शाने घरी पोहोचलो... या घाईत प्रियाचा नंबर मात्र आठवणीन घेतला...
*****
व्हॉट्सअॅप बनवणारे पन ग्रेट खरच... म्हणजे तीच्यासोबत आता व्हॉट्सअॅप वर बोलण रोजचच...खुप छान मैत्री झालेली आमची... आमच्या जॉबवर मोबाईल वापरायला बंदी होती पन मी online नसताना ही ती मात्र मेसेज, व्हिडीओ पाठवत रहायची.... मला तर तीची जणु सवयच झाली.. कुणास ठाऊक कस पण ती मला आवडु लागली होती... छान बोलका स्वभाव होता तीचा... बोलायची... मस्करी करायची... रागवायची आणी पुन्हा मी रागात आहे का पहायला पुन्हा मेसेज करून सॉरी म्हणायची... एखादा नवीन पदार्थ केला की तो कसा झालाय बघायला मलाच बोलवायची.. मी एकदा म्हंटल..
" तु खुपच छान जेवण बनवतेस आणी नवीन पदार्थ केलास की मलाच खायला देतेस , मग बाकीच्यांना.. thanks.... खर सांगु का आई..." प्लेटमधला पदार्थ खात तीच्या आईकडे पहात म्हणालो
"एवढा रिस्पेक्ट कोण देत नव्हत मला......"
त्यावर प्रिया म्हणाली
" मेडिकल ची स्टुडेंट आहे... आपला प्रयोग कसा झालाय हे एखाद्या प्राण्यावर टेस्ट करून बघायची जणु सवयच झालीये...."
त्यावर तीच्या घरात चांगलाच हाश्या पिकला... माझ केविलवान तोंड पहात हळुच स्वताचे कान पकडुन माफी मागितली...
पन राग नव्हता , तीच्या कसल्याच बोलण्याचा, मस्करीचा.... ती काही बोलुदे.. किती मस्करी करूदे छान वाटायच... तीला पाहील की सार जग हरवुन जायचो.. कारण माझ्यासाठी ती आता जगातली सर्वात आवडती होती , स्वताच्या जीवापेक्षा ही.. पन ते इथ आणखी किती दिवस आहेत हे माहीत नव्हत....
*****
तीला प्रपोज करायच ठरवल... तीच्या मनात काय आहे माहीत नव्हत पन ते अचानक हे शहर सोडून गेले तर.....? दिवस फिक्स केला... मेसेज टाकला...
' रंकाळा. 11, am '
रिप्लाय आला.. ' वाढदिवस आहे वाटत...'
'हो..' मी ही मेसेज चिकटवला..
मी जरा अधिकच उतावळा झालेलो... अर्धातास आधीच पोहोचलो..
एक छानस गुलाबाच फुल शर्टच्या आत लपवुन मी तीची वाट पहात बसलेलो..
ती आली... क्लासवरून थेट ठरलेल्या ठिकानी... नेहमीसारखीच सुरेख दिसत होती... ब्लॅक जीन्स . पिंक टॉप, चमकदार सोनेरी केस जे आजही नेहमीप्रमाणेच मोकळे सोडलेले. कानात छानशा रिंग तर कपाळावर बारीकशी टीकली.. दुरूनच स्माईल करत पुढ आली...
क्रमशः