तिने माझा स्वीकार केल्याचे मला सांगितले मी हि खुश झालो.फोनवर फोन चालू झाले.एव्हाना तिच्या घरच्यांशी ही माझं बोलणं सुरु झाले.तिच्या वडिलांशीही मी आता थोडा मनमिळाऊ बोलू लागलो होतो.एक घटना ऐकून मला तिच्या आईचा अजूनच अभिमान वाटू लागला.खूप वर्षापूर्वी जेव्हा सपना लहान होती तेव्हा त्यांना एक लहान मुल भेटल होते त्यांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवला होता.त्या मुलाच्या आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. मी त्या कुटूंबाशी जोडलो गेलो होतो. ते मलाही एक कुटूंब वाटत होते.
सपना व मी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला होता व त्यानंतर मी घरच्यांना भेटायला पण जाणार होतो.तिचे गाव कोल्हापूर असल्यामुळे मी तिला रंकाळा या तलावाजवळ भेटण्याचे ठरवले.
पदमराजे गार्डन व शालिनी पॅलेस यांची सोबत लाभलेल रंकाळा तलाव. कोल्हापूरची चौपाटी जणू.. कंबरेपर्यंत भिंती असलेले रंकाळा तलाव. आजूबाजूला असलेल्या जागेत एक सुंदर गार्डन प्रेमी युगुलांना फिरण्यासाठी असे हे ठिकाण. तळाव्यातल्या पाण्यामध्ये काही लहानसहान बोटी फिरत होत्या त्यामुळे एकंदरीत दृश्य डोळ्याला नयनरम्य वाटत होते. आजूबाजूला पाणीपुरी, रगडा पुरी, पॅटिस यांचे ठेले... आणि तोंडाला पाणी येणारे उकडलेल्या शेंगा, काकडी यांची लहान लहान गाडे... ..
ठरलेल्या वेळी आम्ही दोघे तिथे पोहचलो. प्रथम गेल्या गेल्या काही मिनिटे आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो. याआधी मी इतका खुश कधीच नव्हतो. पहिल्यांदा कोणाला तरी भेटायला आलो होतो. कदाचित तिची पण पाहिलीच वेळ असावी किंवा दुसरी पण !... खूप दिवसानंतर भेटल्यामुळे दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले व खूप वेळ गप्पा मारल्या. काहीवेळा उभा राहून… काही वेळ फिरत... काही वेळ बसुन..
आम्ही दोघांनी एकमेकांसाठी भेट आणलेल्या होत्या.मी तिच्यासाठी swisstone कंपनीचे silver plated bracelet एका बॉक्समध्ये पॅक करून आणले होते.तिनेही माझ्यासाठी लॉकेट व एक डायरी ज्यात तिचा भूतकाळ होता ती मला देऊ केली.व मला सांगितले की घरी गेल्यावर वाच. रंकाळावर संध्याकाळचे सहा वाजले असतील आम्ही बोलण्यात मग्न असताना एक स्त्री तिथे आली तिच्या रूपावरून ती जोगतीण भासत होती. हिरवीगार लुगडे नेसलेली व कपाळाला मळवट फसलेली एक जोगतीण .
मी न विचारताच मला भविष्य सांगू लागली." मुला तू खूप मोठा माणूस होशील ,भविष्य उजळेल ………..मुलगी थोडी हट्टी आहे पण एखादा आवडला तर त्याच्यासाठी सगळे सोडून पण द्यायला तयार होईल……….सुखाने संसार कराल "…..असं म्हणून तिने तिच्या टोपलीतला गंध आमच्या डोक्याला लावला. "
“किती टक्के खर होते तुम्ही बोललेल ?" मी पन्नास रुपयांची नोट तिच्या हातात देत म्हणालो.ती निघून जाता जाता हासली व म्हणाली, खर झाल तर माझ्या देवीला साडी घेऊन ये,नाही झालं तर शिव्या देशीलच… मी इथेच भेटेल तुला परत.ती निघून गेल्यानंतर आम्ही ही तेथून काढता पाय घेण्याचे ठरवले. सपना माझ्या जवळ आली व जाता जाता माझ्या गालाचा किस घेऊन निघाली. जाताना तिचे पाण्याने भरलेले डोळे होते.
(चालू वेळ)
निशाला हि आता सुरजच्या कहाणी मध्ये आता ओढ निर्माण झाली होती. शेवटचं किस घेतलेलं वाक्य मात्र तिला थोड खटकल .पण सुरजकडून आतापर्यंत कुठलाही गैरव्यवहार अजून घडला नव्हता त्यामुळे ती शांत होती.अचानक तिची नजर त्याच्या डायरी कडे गेली जी मगाशी त्यांने टेबलावर ठेवली होती.तिने पहिले पान उघडले तर त्यात ‘सपना पाटील ‘हे नाव होते यावरून तिच्या लक्षात आले की हि तीच डायरी होती जी सपना ने तिला दिली होती.
सुरज ने मान हलवून तिला ती वाचण्याची परवानगी दिली.
सपना ला दररोज डायरी लिहायची सवय नसावी हे निशा च्या लक्ष्यात यायला वेळ लागला नाही. कारण तिने प्रत्येक दिवसाची डायरी न लिहिता फक्त महिन्याची डायरी तीपण मोजक्या शब्दात लिहिली होती. निशा सपनाची डायरी वाचू लागली