Prem he - 23 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 23

Featured Books
Categories
Share

प्रेम हे..! - 23

....... अखेर Coimbatore express स्टेशन वर आली... आणि निहिरा आणि टीम त्यात चढली...
तिने आई बाबांचा निरोप घेतला आणि आपल्या जागेवर येऊन बसली... आपण विहान ला भेटणार या कल्पनेनेच तीचं अंग शहारलं...!!! ❤️

इकडे विहान बँगलोरला आला होता.. त्याने स्वतःला कामामध्ये बिझी करून घेतलं होतं... पण तो एक क्षण ही निहिरा ला विसरू शकला नव्हता... 😖
बाकी बिझनेस तो उत्तम सांभाळत होता.. त्याच्या वडिलांना आता इकडची अजिबात चिंता राहिली नव्हती... त्या दोघांनाही विहान ची खूप आठवण यायची... ते बर्‍याचदा त्याला परत येण्यासाठी विचारायचे.. पण विहान अजूनही त्याच्या निर्णयावर ठाम होता... 😐 म्हणूनच त्याच्या मॉम, डॅड ने त्याच्या लग्नाचं मनावर घेतलं होतं... एकतर लग्न झाल्यानंतर तो परत येण्याचे चान्सेस होते.. किंवा जरी तो तिथेच राहिला तरी तो एकटा नसणार होता.. शिवाय बायको सोबत असेल तर त्याच्या खाण्यापिण्याचे ही हाल होणार नव्हते... त्यामुळेच लवकरच ते बँगलोरला जाऊन त्याचा होकार मिळवणार होते....!

- - - - - - - - XOX - - - - - - -

संपूर्ण एक दिवसाच्या प्रवासानंतर Coimbatore express Bengalore Cantt स्टेशन ला थांबली... निहिरा आणि टीम खाली उतरले.... आपण बेंगलोर पर्यन्त तर आलो म्हणून निहिरा खुश झाली😄😄...तिच्या मनात आत्तापासूनच आनंदाची कारंजी उसळू लागली...!! ती ट्रेन चा प्रवास करून इथपर्यंत तर आली होती.. पण या पुढचा तिचा जीवन प्रवास करताना तिला काय काय सहन करावं लागणार आहे याची तिला जराही कल्पना नव्हती...!!

तिच्या टीम गाईड सोबत सर्वजण ऑफिस बस ने त्यांना अलॉट केलेल्या रूम्स वर आले.. स्टेशन पासून hardly पंधरा मिनिटांच्या अंतरावर त्यांचं ऑफिस होतं.. आणि रूम्स ही ऑफिस पासून जवळच होत्या... पाच पाच जणांसाठी एक रूम alott केली होती.. तिने यायच्या आधीच गूगल मॅप वर विहान च्या ऑफिस चं लोकेशन सर्च केलं होतं..सोनिया ने तिला address देऊन ठेवला होता... तिच्या ऑफिस पासून विहान चं ऑफिस साधारण पाऊण तासाच्या अंतरावर होतं...

दुसर्‍या दिवशी Sunday होता म्हणून त्यांना आराम करायला वेळ मिळाला.. प्रवासात सर्वजण थकले होते.. सर्वजण उशीराच उठले... आंघोळ वगैरे उरकून सर्वजण ग्रुप ग्रुप ने जवळच्या हॉटेल मध्ये गेले.. ते जिथे रहात होते ती बिल्डिंग रोड ला लागूनच होती.. त्यामुळे खाली बरीचशी हॉटेल्स होती.. इतरही बरीच दुकाने होती.. त्यामुळे काही लागलंच तर टेन्शन नव्हतं... निहिरा ही तिच्या ग्रुप सोबत नाश्ता करण्यासाठी बाहेर पडली... आजूबाजूचा परिसर त्यांनी बघून घेतला.. त्या रोड पासून पुढे पूर्ण मार्केट एरिया होता.. त्यामुळे लोकांची वर्दळ चालूच असायची.. चालता चालता ती लोकं त्यांच्या भाषेमध्ये बोलत जात होती .. निहिरा ला त्यातलं काही कळत नव्हतं पण तिला खूप गम्मत वाटत होती.. 😃😃

जवळपास च्या एरियातच थोडं फिरल्यावर ती फ्रेंड्स सोबत एका हॉटेल मध्ये गेली... जेवणाचा किंवा नाश्त्याचा खर्च सध्या त्यांना करावा लागत असला तरी त्यांची कंपनी त्यांना परत आल्यानंतर त्यासाठी होणारा खर्च देणार होती....

त्यांनी नाश्ता ऑर्डर केला... पण निहिरा चं मात्र खाण्यात अजिबात लक्ष नव्हतं... ती एकच विचार करत होती.. 'विहान ला कसं आणि कधी भेटायचं.. 😓 दोघेही एकाच शहरात आहोत पण तरीही दोघांमध्ये बरंच अंतर आहे..' हा दुरावा आता तिला सहन होत नव्हता... विहान ने कसे दिवस काढले असतील इथे माझ्यापासून दूर येऊन... 😥.. विचार करूनच तिला खूप वाईट वाटलं... 😥😥

- - - - - - - XOX - - - - - - -

दुसर्‍या दिवसापासून निहिरा ची ट्रेनिंग सुरू झाली... सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत ट्रेनिंग असायची... मध्ये एक लंच ब्रेक आणि एक टी ब्रेक असे दोन ब्रेक दिले जायचे... पण पूर्ण दिवस तिचा ट्रेनिंग मध्येच जायचा.. त्यात ती तिथे पूर्णतः नवीन होती...लोकल लोकांसोबत Language प्रॉब्लेम ही होताच.. हिंदी ही सर्वांनाच कळत नव्हतं.. मराठी तर दूरच...

अशा स्थितीमध्ये तिला विहान पर्यंत पोहोचायचं होतं..
😓 ती रोज थोडी थोडी माहिती गोळा करत होती... तिथल्या रस्त्यांची नावे.. एरिया ची माहिती.. कोणती बस कुठे जाते.. शिवाय ऑफिस मधल्या एका लोकल मुलीसोबत...आरती सोबत.. दोन दिवसांतच मैत्री करून ती तिच्याकडून काही लोकल शब्द शिकून घेत होती.... विहान च्या ऑफिस पर्यंत जायचं असेल तर कुठे उतरावं लागेल... सर्व माहिती ती तिच्याकडून काढून घेत होती... कारण तिला एकटीलाच तिथपर्यंत पोहोचायचं होतं... तिच्या सोबतीला कुणीही नव्हतं... त्यात ती पहिल्यांदाच एखाद्या अनोळखी शहरात अशी आली होती... 😔😔.... अशातच एक आठवडा गेला... Sunday च्या दिवशी तिला सुट्टी होती...पण विहान चं ऑफिस ही तेव्हा बंद असणार... सोनिया कडून तिने त्याच्या घरचा address घेतला... पण सोनिया ने तिला तो आज घरी नसल्याचं सांगितलं... काल रात्रीच तिचं बोलणं झालं होतं त्याच्यासोबत... त्यामुळे त्या दिवशी ही तीचं जाणं राहिलं... पुढच्या Sunday पर्यंत वाट बघण्याएवढा वेळ नव्हता तिच्याजवळ... 😓 तिने मधल्या दिवसांतच ट्रेनिंग संपल्यावर तिकडे जायचं ठरवलं...

तिने काहीही करून मंगळवारी जायचं ठरवलं...! त्यादिवशी ती तब्येत ठीक नसल्याचं कारण सांगून चार वाजताच ऑफिस मधून बाहेर पडली.... जवळच्या स्टॉप वरुन तिने ऑटो रिक्षा केली... बस साठी थांबणं म्हणजे वेळ वाया घालवल्यासारखं झालं असतं.... आरती कडून शिकल्याप्रमाणे तिने त्या ऑटो ड्रायव्हर सोबत तोडकं मोडकं बोलून त्याला कुठे जायचंय ते सांगितलं.... त्यानेही भाडं किती होईल ते सांगितलं... याक्षणी तिला पैशांपेक्षा जास्त महत्वाचं विहान चं भेटणं होतं...😑😑

- - - - - - - XOX - - - - - - -

साधारण पाऊण तासाने ती विहान च्या ऑफिस समोर पोहोचली... ऑटो वाला पैसे घेऊन निघून गेला... आता निहिरा च्या समोरच विहान च्या ऑफिस ची बिल्डिंग होती..
विहान ग्रुप ऑफ़ कंपनीज् - बिल्डिंग वर नाव झळकत होतं... निहिरा च्या घशाला कोरड पडली... थंडीच्या दिवसांत ही तिला दरदरून घाम फुटला.. 😓😓 हृदय जोरजोरात धडधडायला लागलं... ती गेट मधून आत शिरली.. गेटवरच्या वॉचमन ने तिच्या नावाची तिच्या सही सह एंट्री करून घेतली.. ती आत गेली.. काचेचा मेन डोअर उघडून तिने आत प्रवेश केला.. समोर बसलेल्या receptionist ने तिचं हसून स्वागत केलं...

"हॅलो मॅम 😊... गुड इव्हिनिंग .. व्हॉट कॅन आय डू फॉर यू ??"

"आय वाॅन्ट टू मीट मिस्टर. विहान अभ्यंकर .." निहिरा चेहर्‍यावर उगीच स्माईल आणत म्हणाली..

"ओह्के.. व्हॉट इज युअर गुड नेम ? .. अ‍ॅन्ड फ्रॉम व्हेअर आर यू ??"

निहिरा ने एक आवंढा गिळला...

"मिस सोनिया .. फ्रॉम मुंबई .." सोनिया ने सांगितल्या प्रमाणे तिने घाबरतच तिचं नाव सोनिया असं सांगितलं..

" ओके.. वेट अ मिनिट.. प्लीज हॅव अ सीट... 😊" ती निहिरा ला हसतच म्हणाली..

निहिरा ही स्माईल करून जवळच्या सोफ्यावर बसली... बसल्या बसल्या तिने आजूबाजूला नजर फिरवली.. ऑफिस खरंच खूप छान होतं.. समोरच्याच भिंतीवर विहान आणि त्याच्या डॅडींची फ्रेम होती.. त्यांना मिळालेले कसले कसले अवॉर्डस् स्वीकारतानाचे फोटोज् होते.. छोटी छोटी शो ची झाडे जागोजागी कुंड्यांमध्ये उभी होती... खूप शांतता होती तिथे.. ही शांतता तिथल्या स्टाफ च्या शिस्तबद्ध असण्याची ग्वाही देत होती.. 😊 तिथलं वातावरण निहिरा ला खूपच आवडलं..

रिसेप्शनीस्ट ने विहान च्या इंटरकॉम वर कॉल केला..

"येस रिया ..." पलीकडून विहान बोलला..

"सर.. सोनिया मॅम फ्रॉम मुंबई वॉन्टस् टू मीट यू.."

विहान ला आश्चर्य वाटलं.. सोनिया? अशी अचानक? तो हसला.. ह्म्म्म.. सरप्राईज वाटतं.. 😅

"ओके.. सेंड हर... 😊" विहान म्हणाला..

"ओके सर.." म्हणून तिने फोन ठेवला.. आणि तिथल्या एका पियून ला तिला विहान च्या केबिन जवळ सोडायला सांगितलं.. निहिरा रिया ला थँक्स म्हणून पियून च्या मागोमाग गेली.. थर्ड फ्लोअर वर एका दरवाज्याच्या जवळ आल्यानंतर तो थांबला.. तशी तीही एका बाजूला थांबली.. त्याने दरवाज्यावर नाॅक करून दरवाजा उघडला..

"सर.... मॅम.." तो बाहेरच्या दिशेने बघत म्हणाला.. निहिरा दरवाज्याच्या आड एका बाजूला उभी होती.. विहान ला ती दिसली नाही.. सोनिया समजून त्याने तिला आत पाठवायला सांगितलं..आणि त्याने आपलं डोकं फाईल मध्ये घुसवलं.. निहिरा ला आत जायला सांगून पियून निघून गेला.. धडधडत्या हृदयाने ती आत शिरली...

"कम सोनिया.." विहान मान वर न करताच म्हणाला..

निहिरा काहीच न बोलता त्याच्या टेबल समोर येऊन उभी राहिली... विहान ने मान वर करून बघितलं... आणि...... समोर निहिरा ला बघून तो शॉक झाला.. 😦😧 आणि खाडकन उठून उभा राहिला... निहिरा ने घाबरतच त्याच्या डोळ्यांमध्ये बघितलं... 😓 दोघांच्याही डोळ्यांत आसवे जमा झाली😢...काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत तसेच हरवून गेले......

🎵💗

आँखों से ख्वाब रूठे.. अपनों के साथ छुटे..
तपती हुई राहों में.. पैरों के छालें फुटें...
प्यासे तडप रहें हैं साहिल करीब रे.....
खुदाया वे.. हाय.. इश्क है कैसा ये अजीब रे.... 😢

To be continued..
🙏
#प्रीत