मग की देखील बाहेर आले. हे सर्व तो लांबून बघून हसत होता. त्याच्याजवळ येत मी त्याला ओरडणारच होते की, माझा पाय सरकला आणि मी पडणारच होते की, त्याने मला झेलले. एक क्षण काहीच कळत नाही की काय होतंय. त्याच्या त्या डोळ्यात मी हरवून गेली काही क्षणांसाठी आणि तो आला. सोबतीचा पाऊस. पण तो क्षण अजूनही आठवला तरी अंगावर शहारे येतात.
आम्ही परतीच्या वाटेला लागलो.. आता तो शांत होता आणि माझी बडबड चालु होती. कदाचित मी आता जास्त कम्फर्टेबल झाली असावी. त्याने एक ठिकाणी जातानाचा रस्ता बदलला तो कळताच मी त्याला विचारले. पण त्याच्या तोंडातुन एक शब्द फुटेनात. मला आता भीती वाटू लागली. पण काही केल्या तो बाईक थांबवत नव्हता. बाईकची स्पीड आता वाढत चालली होती. एक क्षण वाटलं आपणच चुकलो, उगाच अनोळखी वर विश्वास ठेवला. त्याला विनवणी करून ही तो काहीच ऐकत नव्हता. मी मनात गणुकडे धाव घेतली. मनात प्रार्थना करायला सुरुवात केली. आता जे होईल त्याला सामोरे जायचे हे मनाशी पक्के करून मी माझे डोळे बंद केले. मला माझे मरण दिसत होते. तोच बाईक थांबल्याची जाणीव झाली.
डोळे उघडले तर आम्ही एका जागी होतो. त्याने मला वर हात करून काही तरी दाखवायचा प्रयत्न केला. मी पाहिले आणि बघतच राहिले. ते बघताना माझ्या डोळ्यातून कधी अश्रु आले कळलंच नाही. माणसाचे मन काहीही विचार करू शकते हे मला तेव्हा जाणवले. आम्ही पायऱ्या चढुन वर आलो आणि समोर होता तो भलामोठा गणपती. हो माझा लाडका गणु. अक्षरशः आकाशाला पोहोचेल एवढा मोठा होता. त्याचे रूप मी डोळ्यात भरत होते. आणि माझ्या गालावर एक थेंब येऊन विसावला. तो आलेला. सोबतीचा पाऊस.
काय करणार सोबतीचा मित्र तो. जिथे आपण तिथे तो. असा हा पाऊस. एक क्षण मी सर्वकाही विसरून त्या पावसात उभी राहून फक्त आनंद घेत होती त्या आकाशा एवढ्या गणुच. आणि सोबत मुसळधार पावसाच. मग अनय पूढे येत त्याने मला मंदिरात नेलं. "काय मॅडम घाबरला ना तुम्ही..??"तुम्हाला काय वाटलं किडण्याप करतोय तुम्हाला हो ना...? आणि तो जोर जोरात हसु लागला. एक क्षण मला ही हसु आले स्वतःच्या विचारांवर. मी ओशाळातच हसले. " अरे तू अचानक अस केलंस ना म्हणून घाबरले.." सॉरी हा"
मी लगेच कान धरून माफी मागितली. 'पण एक सांग तुला मधेच गणु कसा आठवला.' "अहो तुम्ही बोलता बोलता खुपदा त्याच नाव घेतलं म्हणून इकडे घेऊन आलो." छान वाटलं मला कोणीतरी आपल्याला आवडत म्हणुन काही तरी केलं. हा असा पहिलाच वेक्ती मी पाहत होते. नाही तर लोक फक्त स्वतःची काम असतील तरच आपल्याशी गोड बोलतात.
"मॅडम मी काय बोलतो एक जागा आहे जाऊया का तुम्हाला आवडेल ते..." हो चालेलं जाऊ, पण आधी हे मॅडम बोलणं बंद कर मग जाऊया तू सांगशील तिथे." यावर आम्ही दोघेही मनमुरादपणे हसलो.
परत एकदा त्याला डोळ्यात साठवून आम्ही निघालो त्याचा निरोप घेऊन. एक टेकडी वर. जवळच होती. आकाश काळ्या ढगानी भरलं होत. कोणत्याही क्षणात मोठा पाऊस येऊ शकत होता. आम्ही बाईकची स्पीड वाढवली आणि पोहोचलो. टेकडीवरुन समोरच सर्वकाही सुंदर दिसत होता. समोरून काळे ढग हळू हळू त्या खाली असलेक्या गावांना आपल्या वशमध्ये करू पाहत होते. एक-एक करत ते पुढे येत होते आणि मला जे दिसलं ते अविस्मरणीय होतं. त्या ढगांसोबत पाऊस पडत पुढे पुढे येत होता. मी पाऊस अनुभवला पण आज तो मी डोळ्यांनी बघत होते. माझ्या डोळ्यांनी. तो क्षण तिथेच थांबावा असच ते दृष्य होतं. काही वेळ आम्ही तसच बघत होतो पाऊस. अनुभवत होते मी, तो पाऊस. नेहमी अंगाला, मनाला स्पर्श करणारा पाऊस आज माझ्याशी बोलायला चालुन येत आहे असा तो अनूभव मी आयुष्यभर जपण्यासाठी मनात भरून ठेवत होती.
मग काही वेळ बसवून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. अचानक त्याचा चेहरा कोमेजल्यासारखा वाटून गेला. माझी तिकीट काढून आम्ही ट्रेनसाठी उभे होतो. आज खुप काही घेऊन जात होते. मनाच्या प्रत्येक कप्प्यात आठवणी भरून ठेवत होते. कधी वाटलं तर त्या आठवणी परत जगून घेता याव्यात म्हणुन. जाताना न विसरता अनयचे मनापासून आभार मानले. अनोळखी शहरात आपलासा वाटणारा एक मित्र भेटुन गेला होता.
ट्रेनमध्ये चढताना मन उगाचच बैचेन होत होते. पण थकव्यामुळे असेल असं मन स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्नही करत होते. एक विंडोसीट बघून मी बसली. अनयला बाय करत, पुन्हा भेटु नक्की अस प्रॉमिस देत माझी ट्रेन निघाली परतीच्या प्रवासाला.
आज मी या प्रवासातून खूप काही सुंदर क्षण घेऊन जाणार होते. निसर्ग, पाऊस, गणु आणि अनय. आमची पहिली भेट.
आकाशात काळे ढग जमा होत होते आणि तो परत बरसण्यासाठी सज्ज झाला होता. असा हा पाऊस पूर्ण प्रवासात माझा सोबती बनून राहिला.
घरी पोहोचताच अनय ला व्हाट्सएप केला. त्याचाही रिप्लाय आला. कदाचित तो वाटच बघत होता असच काही जाणवलं. मग खुप गप्पा झाल्या. आता आम्ही रोज गप्पा मारत असतो. कॉल वर बोलणे ही होते. कदाचित त्या प्रवासाने मला नवीन मित्र तर दिलाच पण प्रेम करायला ही शिकवले. आज एक वर्ष पूर्ण झालं त्या प्रवासाला. म्हणुन आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. अनय आज मला भेटायला मुंबईत आलाय. पण आज मी देखील त्याला काही तरी गिफ्ट देणार आहे. माझ्या प्रेमाची कबुली. आज त्याला मी प्रपोज करणार आहे. त्याच उत्तर मला म्हाहित आहे, पण तरीही एकदा नक्कीच विचारेन.
एका कॉपीशॉपमध्ये आम्ही भेटलो. "हेय कशी आहेस..?"
"मी नेहमी सारखीच मस्त..!" अन तू..? "मी पण",त्याने हसुन सांगितलं.
गप्पा झाल्या आणि मी त्याला विचारलं. "अनय जरा बोलायच होत बोलू का..?" "तु कधी पासून परवानगी घेऊ लागली. बोल ना."
"अनय माझं तुझ्यावर प्रेम आहे" म्हणजे बघ तुझं नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये.
"ओ मॅडम या क्षणाची मी एक वर्ष वाट बघितली आहे आणि तुम्ही सांगत आहात काही प्रॉब्लेम असेल तर..!"
"माझ तर त्याच दिवशी तुझ्यावर प्रेम जडलं होत, जेव्हा तु मनापासून त्या गणपतीच्या पाया पडत होतीस. त्या निसर्गात फुलपाखरा सारखी बागडत होतीस. त्या पावसाला अनुभवत होतीस."
त्याने माझा हात आपल्या हातात घेतला आणि आपले ओठ त्यावर टेकवले. आणि बाहेर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कदाचित त्याच्याही मनात तेच असाव.
आम्ही त्या पावसासोबत मनाने आज एकत्र झालो. बाहेर पाऊस आनंदाने नाचत आहे असच वाटत होतं. बाहेर पडलो आणि एकाच छत्रीत चालत गेलो. दूरपर्यंत.. त्या पावसात दिसेनासे होईपर्यंत...
पाऊस मात्र जोरदार कोसळत होता. जसा की माझ्या ही पेक्षा जास्त त्यालाच आनंद झाला असावा.
असा तो सोबतीचा पाऊस मला प्रेम करायला शिकवून गेला...
■◆◆■