*छोड आये हम वो गलियाँ*
काल संध्याकाळची वेळ
दोन कर्मचारी आमच्या भागात डासांचे औषध फवारणीसाठी धुरांचे मशीन घेऊन आले ...
खर तर नेहमीचचं झालं होतं त्यांचं ,,या भागात आले की कोणीच काही बोलत नाही याची संधी साधून ते एका गल्लीत जातात तर एका नाही आणि जिथे जातात तिथेही अर्धातुनच परततात....
तीनवेळा पकडलेलं मी त्यांना आज तर संतापलीच मी,,मला बघुन न बघितल्याचे सोंग घेत ते गाडीला किक मारुन दुसर्या गल्लीत गेले ...संतापातच मीही बडबड करत गाडी घेऊन त्यांच्या मागावर गेली...
पण रागाच्या भरात मी काय करतेय याची जाणीवही नाही झाली काही क्षण...
खरचं फक्त या गल्लीतुन त्या गल्लीत जाण्यासाठी गाडी आणि तेही 40-45 चा स्पीड ....
त्या गल्लीच्या अर्धावर गेल्यावर लक्षात आले की काही तरी चुकतय...मी काही तरी चुकिचं केलय...पण काय?
मी त्या गल्लीत गेलेय जिथे मी न जाण्याचा प्रण केला होता,,आपण तिथेच आलोय....
तसा गाडीचा स्पीड अचानक कमी झाल्याचं जाणवलं खरतर झाला नव्हताच पण सगळं जग संथ झाल्यासारखं वाटलं....
तिथे आसपास कुणी नव्हतं तरी सगळे मलाच बघताय ..मलाच खुणावताय...मलाच डिचवताय(हीच ती...अच्छा हीच का ती..) असं जाणवलं...कानाजवळ कोणी सुतळी बाँब फोडावा तसे सुन्न.... हृदयाची धडधड इतकी वाढली की जणु ती सार्या जगाला ऐकु येईल आता ... अचानक एक गाणं कानावर आलं
*छोड आये हम वो गलीयाँ*
मी त्या काकांशी काय बोलले मला काही माहित नाही ...आणि आठवतही नाही...मी कशी बशी घरी आली,,कोण काय बोलतय ,काय विचारतय काहीच कळत नव्हतं...तशीच बाथरुममध्ये गेली बादलीभर पाणी डोक्यावर ओतलं वर शाँवरही चालु...
आता हळुहळु डोळ्यात पाणी यायला लागलं...
म्हणतात न तोंडावर किती पाणी मारलं तरी डोळ्यातलं पाणी लपत नाही... तसंच काहीसं झालं होतं माझं...
का ..पण का मीच का....?
माझी काय चुक होती ...
एवढंच की मी त्याला लग्नाला नकार दिला होता...
एक नकारही नाही पचवता आला त्याला...आणि का?
फक्त या एका गोष्टीमुळे किती काय काय बदललं न..
आमची इतकी चांगली मैञी की जिला पाहुन सर्वांच्याच पोटात दुखायचं..ती तोडण्यासाठी काय काय उपाय नसतील केले सगळ्यांनी...पण आम्ही ठाम अगदी शोले सारखं...
एक मुलगा एक मुलगी फक्त मिञ कसं शक्य आहे...असचं डिचवत राहिले सगळे....
आणि बसं लागली नजर...
त्याच्या मनात कधी प्रेमाचं काहुर सुरु झालं कळलच नाही...
एक दिवस अचानक कुणी नसतांना घरी आला आणि डायरेक्ट प्रपोज...काही क्षण मला कळलच नाही काय बोलावं ...
काही काय रे ...कुठेही मजाक..वेडा कुठला ,,काय काम आहे बोल?
मी खरचं बोलतोय म्हणत तो थोडा गंभीर झाला आणि काही कळायच्या आत मला जवळ ओढलं त्याच्या त्या घट्ट न सुटणार्या मिठीत...एक वेगळीच लहर आली..मला खरच काय बोलावं कळतच नव्हतं.. ती मिठी अजुन घट्ट झाली अन् मी ओरडलेच ,,काय करतोय...its hurting me... सोड...
त्याला क्षणात दुर लोटलं आणि एक खणखणीत कानशिळात ठेवली...तो तसाच काही न बोलता चालता झाला...एकदोन दिवसांनी पुन्हा भेटला ..माफी मागितली..पुन्हा नाही करणार ..पण मी खरचं नाही राहु शकत गं तुझ्याशिवाय...लग्न करशील माझ्याशी....
तु वेडा आहेस का ..काही काय बडबडतोय...मी लग्न तेही तुझ्याशी..आता अती होतय हं ..असं म्हणता म्हणता वाद इतक्या विकोपाला गेला की पुन्हा मला तोंड पण नको दाखवुस तुझं ... असं म्हणत मी चालती झाली पाणावलेल्या डोळ्यांनी पुन्हा कधीच न भेटण्यासाठी..
बसं येवढच ...
या गोष्टी वरुन त्याचा ञास सुरु झाला मला सारखं फोन करणं ,,मँसेजेस करणं ,,(इथं पासुन ते... )तु फक्त माझीच आहे...तुझं लग्न कसं होतं तेच बघतोच मी, , (इथपर्यंत) धमक्या सुरू झाल्या ..मान्य खुपमनापासुन प्रेम केलं त्याने ..त्या धमक्या वरवर होत्या पण काही झालं तर मुलगीच न मी समाजाच्या अलिखीत नियमांनी बांधलेली...मग माझ्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केली कुणी मुलगा ञास देतोय...त्याच्या पुर्ण गल्लीला कळालं ...त्याला कारणीभुत बायाच अगं तुला माहितीये का? ती मुलगी नं...तीनेा असं केलं...काय बाई आज कालच्या मुली ...हे बोलतांना एकदा तरी विचार करायचा की माझ्या घरच्यांसाठी .. याच समाजासाठी मी त्याच्या प्रेमाला नकार दिला एक खुप चांगला मिञ गमावला...
आता सांगा माझी काय चुक होती...
अगं काय करतीये ही काय अंघोळीची वेळ आहे बाहेर निघ आधी या आईच्या आवाजाने तंद्री तुटली.....
बाहेर आल्यावर नेहमीप्रमाणे
पुन्हा सगळ्यांत मिसळली...
माझ्यावर लागु होणार्या ओळींप्रमाणे ...तुम इतना क्यु मुस्कुरा रहे हो..क्या गम है जसको छिपा रहे हो.......
आणि हे सगळं घडलं तेही त्याच्याच वाढदिवशी.......
.
- *अश्विनी कासार*