काय झालं असेल तीला...? हा विचार करतच सर्व तिथून बाहेर पडलो..
****
सकाळी उठायला जरा उशीरच झाला , कदाचीत काल रात्री बराच वेळ त्या मुलीचा, म्हणजे तीच्या अवस्थेचा विचार करत होतो, त्यामुळे लवकर झोप लागली नव्हती.. हातांवर, गालावर ,मानेवर नख्यांनी ओरबडलेल्या जखमा , पिंजलेले केस, आणी अचानक तीच किंचाळण. रात्रभर तेच दृष्य डोळ्यांसमोर येत होत... अंघोळ वगैरे आटोपुन नेहमीप्रमाणे कामावर जायला निघालो... बाईक वरून बाहेर पडलो आणि काही अंतरावर गेलो होतो तस लक्षात आल की मोबाइल घरीच राहीला आहे... बाईक वळवण्यासाठी मी मागे पाहिल तशी 'ती' येताना दिसली.. तीचे वडिल गाडी चालवत होते... ती मागे बसलेली , तोंडाला रूमाल गुंडाळला असला तरी तीच्या डोळ्यावरून मी तीला ओळखल.. अंगात फुलं बाह्यांचा दगडी कलरचा टॉप आणी फिक्कट निळी जीन्स, त्यावर पांढ-या रंगाची सैंडल, हातात तांबूस लेदरचा बेल्ट असलेलं घड्याळ.. मी तीच्याकडेच पहात होतो.... ते गाडीवरुन पुढे गेले तसे तीच्यावर इंप्रेशन मारण्यासाठी रिकामटेकड्या तरूणांच्या गाड्या त्यांच्या मागे वेडीवाकडी वळण घेत सुटल्या...
*****
या घटनेला दोन दिवस उलटुन गेले होते... काम खुप वाढल्यामुळे आता मला घरी यायला बराच उशीर होत होता त्यामुळे मित्रांच्या भेटी कमी होऊ लागल्या...
रात्री नेहमीप्रमाणेच उशीरा घरी आलो... कट्ट्यावर जायची इच्छा होती पन खुपच थकलो होतो.. जेवण आवरुन झोप येईपर्यन्त टीवी पाहु लागलो.. पन कधी झोप लागली कळलच नाही... जाग आली ती कुत्र्यांच्या भुंकण्याने.. खुपच गोंधळ माजला होता... बाहेर जणु शहरातली सगळी कुत्री एकत्र येऊन जोरजोरात रडत, भुंकत होतीत... कोणीतरी बाहेर येऊन त्यांना हूसकाऊन लावेल म्हणुन वाट पहात होतो पन व्यर्थ , वैताग आला, तडक उठलो आणी दरवाजा उघडुन सरळ चालत रस्त्यावर आलो ... आवाजाच्या दिशेन पाहील तर तो दहा, बारा कुत्र्यांचा झुंड भुंकत, रडत होता... माझ्यापासुन काही अंतरावर असलेल्या विद्युत खांबावरील पांढ-या ट्युबलाईटने रस्ता अगदी स्पष्ट द्सत होता पन तो कळप जिथ भुंकत होता तीथल्या खांबावरील ट्युब लहान मुलांनी दगड मारुन फोडल्यान बंदच होती, त्यामुळे ती नेमक कोणावर भुंकत होती हे समजत नव्हत.. मला त्या आवाजान झोप येत नव्हती म्हणुन बाजुचाच एक लहानसा दगड उचलुन हातात घेतला आणी त्यांच्या दिशेने भिरकावला तस कुइssss कुईsssss करत धावतच तो झुंड अंधारात नाहीसा झाला पन भुंकण चालुच होत , फक्त आवाज कमी होता... पुन्हा एकदा रस्त्यावर नजर टाकली तर जीथ त्या श्वानांचा गोंधळ चालु होत तीथच घराला लागुन बांधलेल्या कट्ट्यावर कोणीतरी बसल््याच जाणवलं... कोण आहे हे स्पष्ट दिसत नसल तरी आकारावरुन आणी किंचीतशा होत असलेल्या हलचालीवरून तरी वाटत होत की कोणीतरी होत... जे त्या घराजवळ घुटमळत होत.. मी तसच चालत पुढ जाऊन पहायचा निर्णय घेतला... एक म्हणजे गल्ली आमची त्यात चोरांचा सुळसूळाट , लक्ष ठेवावच लागत... मोबाईल कानाला लावत मी तसाच पुढ निघालो तसा 'ते' हळूच उठुन उभ राहु लागल, मी ही त्याच्यावरच नजर ठेऊन होतो.. पन मी त्याच्या दिशेन जाताना ते ही घराच्या दरवाजाकडे सरकत गेल.. आता जेमतेम 20 पावलांच अंतर असेल. मी त्याच्याकडेच पहात होतो पन दरवाजाची चौकट काहीशी आत असल्यान आणी खांबावरील बंद विजेच्या दिव्यांमुळे तीथ लख्ख काळोख पसरलेला .
आता तो दरवाजा पाच एक फुटांवर असेल पन मघापासुन घुटमळणार ते जे कोणी होत ते तीथ दिसत नव्हत... मी ही मोबाईलचा टॉर्च सुरू करून त्या काळोखात पुरता बुडालेल्या दरवाजावर पांढरा एल ए डी लाईट पाडला पन काहीच नव्हत. ते जे कोणी होत ते कदाचित तीथुन पळून गेल असाव.. थोडा वेळ मी तीथ आजुबाजूला नजर फिरवली पन व्यर्थ... पन मघाशी मी हाकलुन लावलेल्या कुत्र्यांच्या कळपातील काही दुर रिकाम्या टेकडीवर उभी राहुन भुंकत होतीत. रात्रीच्या या निरव शांततेत कोल्हेकुई व्हावी तसाच काहीसा त्यांचा आवाज वाटत होता... कदाचीत चोर असावा नाहीतर मला बघुन का लपुन बसला असता... मी माघारी फिरत पुन्हा टॉर्च दरवाजावर रोखला पन काहीच नाही. दुरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर येता येता तो ही बंद झाला , राहीली ती निरव शांतता. मध्यरात्रीच्या त्या शांत वातावरणात रातकिड्यांचा मंद आवाज तेवढाच येऊ लागलेला , मी तसाच चालत घराकडे परतू लागलो पन चालत येतान अस वाटल की कोणीतरी माझ्या मागे येतय.... चालत.... ती चाहुल जाणवली तसा मी चालण्याचा वेग कमी केला . मागुन येणारा पावलांचा आवाज अगदी जवळ येत असल्यासारखा वाटला ... कदाचीत मघाशी मला पाहुन लपलेला तो इसम असावा म्हणुन मी ही चौकस राहीलो ... हातातला मोबाइल कानाला लावत जागेवर थांबलो... चाहूल अगदी माझ्या मागे जेमतेम हाताच्या अंतरावर जाणवू लागली..... इतक्यात माझ्या मानेवर काहीतरी वळवळत असल्यासारख वाटु लागल मी झटक्यासरशी ते बाजुला केल , लाईटच्या खांबावरील पाखरू असाव म्हणुन मी दुर्लक्ष केल तोच कोणातरी माझ्या खांद्यावर हात ठेवला...मान किंचीत बाजुला झुकवत नजर तीरकी केली तसा एक काळाकुट्ट हात माझ्या खांद्यावरून सरकत मागे गेला.. झटकन मागे फिरून पाहील.... काळजात धस्स झाल... जेमतेम पंन्नास पावलांवर रस्त्याच्या मधोमध कोणीतरी उभ होत. दुरवरील खांबावरच्या त्या ट्युबच्या अंधुक प्रकाशात त्याची काळी आकृती तेवढीच दिसत होती. ते उभ होत पन त्याचे दोन्ही हात जमीनीला स्पर्श करत होते, अगदी शांतपने उभी ती भयान आकृती रखरखत्या क्रुर नजरेन माझ्याकडेच पहात होती.. माझ्याइतकीच साधारणच उंची म्हणजे 6 फुटाला थोडीच कमी अंगानेही जेमतेम. एखाद्या सावलीप्रमाणे धुसर आकृती मी भुवया आकसून पहाताना माझ्या काळजाची धडधड मला स्पष्ट ऐकु येत होती.. ते जे कोणी होतं ते माणूस नव्हत हे मात्र त्याच्या हालचाली वरून मला कळून चुकलेल...काय करावं हे कळत नव्हतं , भितीनं अंगावर काटा उभा राहिला..आता कसलाच विचार न करता आपल्या घराच्या दिशेने धावत सुटायचे हा ठाम निश्चय केला होता .इतक्यात ती अमानवीय आकृती उभी असलेल्या त्याच्या समोरच्या घरातल्या लाईट लागल्या आणी काळजात धस्स झाल. म्हणजे अंगावर सरसरून काटा आला तो ही भीतीन... कारण लाईट लागताच ती आकृती कुठेतरी नाहीशी झाली... मला आपेक्षीत होत की प्रकाशात ते कोण आहे समजेल पन झाल अगदी उलट... घरात जाव की तीथच थांबाव या संभ्रमावस्थेतच होतो की त्या घरात थोडा गोंधळ सुरू असल्या सारख वाटल. घरातुन कोणीतरी घाईतच बाहेर पडल. गोंधळलेल्या मनस्थितीतच होते.... तसे एकाच गल्लीत रहात असल्यान थोडी ओळख होतीच . मला समोर पाहताच हात करून बोलवल... कदाचीत अशा अवेळी ओरडून हाक मारावी तर आजुबाजूचे लोक जागे होतील याची त्यांना भिती असावी.. मला बोलवुन ते घाईतच घरात शिरले . मी ही झपाझप पावल टाकीत त्यांच्या घरात गेलो ...
"प्लीज एखादी रिक्शा पहाल का...?"
त्यांचा प्रश्न मला समजला, म्हणजे कोणालातरी तातडीन हॉस्पीटलमधे न्याव लागणार होत...
फोन लावत त्यांच्या घरात गेलो आणी दचकुन जागेवरच थीजलो... 'ती' जमीनिवर पडुन होती, निश्चल, खोबणीत गेलेले सताड उघडे डोळे आणी त्याखाली काळी वर्तुळे तयार झालेली , रूक्ष निर्जीव केस , चेहराही निस्तेज थकल्यासारखा दीसत होता....
"'प्रिया... काळजी करू नकोस बाळा.."
हुंदका आवरत तीची आई जवळ बसुन तीला शुध्दीवर आणायचा प्रयत्न करत होती...
क्रमशः