Novel premavin vyarth he jeevan Part 10 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..- 10

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..- 10

का ? कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग – १० वा

----------------------------------------------------------------

गेल्या वेळी झालेल्या भेटीचा दिवस आठवण्यात अनुषा वेळेचे भान हरपून गेली होती.

अभिजितजवळ आपले मन मोकळे केले ते बरेच झाले , त्यामुळे तर ,स्वारीने आपल्याला

प्रतिसाद देत मनातले प्रेम कबुल केले आहे खरे .

आणि वर वास्तवाची जाणीव करून देत म्हटले .की ..

मी –सागर देशमुख नावाच्या एक अतिश्रीमंत –कर्तबगार व्यक्तीचा मुलगा आहे , पण, याच

सागर देशमुख नावाच्या व्यक्तीचे ..पारिवारिक स्वरूप ..ते मात्र अकल्पनीय आहे , अशा माणसाची

सून होणे “, अभिजीतच्या आईचे आणि त्यांचे घरातील नाते-संबंध ..अभिजीतच्या बहिणीशी ..

म्हणजे स्वताच्या मुलीशी असलेले नाते तोडून ..तिला आपल्या आयुष्यातून वजा करू शकणार्या

विक्षिप्त स्वभावाच्या सागर देशमुखच्या मुलाशी आपले प्रेम आहे ,

त्याच्याशीच लग्न करण्याचा निश्चय ,निर्धार “ हे सर्व ..तुझ्या आई- बाबंना आवडेल का अनुषा ?

अभिचा प्रश्न चूक नव्हता – अनुषा विचार करू लागली ..

आपले आई-बाबा , त्यांचे ही समाजात एक चांगले स्टेट्स आहे , लोक त्यांना आदराने ओळखतात .

अभिजित आणि आपले प्रेम “ ही गोष्ट त्यांना पटेल का ? रुचेल

आजच्या घडीला अभी आणि त्याच्या बाबात , त्याच्या बाबात आणि आई यांच्यातील रिलेशन मध्ये

किती ही तणाव असले तरी ..उद्या हे सगळे एकत्र आले तर ?

सगळ्या गोष्टी नीट तरी होतील किंवा अजून बिघडतील तरी ..

थोडक्यात ..अभिजितबद्दल आपल्या घरात पहिले मत तर नक्कीच अनुकूल नसेल “, खूप पटवावे

लागेल ,

अभिजित आणि त्यांचा परिचय करून दिल्यावर फरक पडेल थोडा फार , पण ..कायम नाते

असणार आहे या देशमुख कुटुंबाशी ..तेव्हा ..एका मुलीचे आई-वडील म्हणून त्यांना निर्णय घेण्यास

वेळ दिला तर ..?

असा विचार करू करू आजकाल अनुषा स्वतःतच बिझी झाल्या सारखी झाली.

तिचे कोलेज ,आणि

अभ्यास ,पेपर ,मासिके आणि विविध टीव्ही मिडियासाठी ग्रेट-भेटी , मुलाखती , हे उपक्रम चालूच

होते ,आता या सर्व गोष्टी तिच्या आवडीच्या असल्यामुळे ..किती ही केले तरी त्याचे मनावर ओझे येत

नसायचे आणि या धावपळीचा थकवा पण जाणवत नसायचा .

पण, मध्येच अभिजीतचा प्रश्न आठवायचा आणि ती गंभीर होऊन बसायची.

इतक्यावरही बोअर झाले तर .?

.छान उपाय होता ..अभिजितला भेटणे , सुट्टीच्या दिवशी ग्रुप सोबतच्या कार्यक्रमात

.अभिजीतच्या सहवासात राहायला मिळते “ मग हे संधी ती चुकवत नव्हती ,

अभिजित सुद्धा न विसरता तिला भेटायचे म्हणून येतोय “,

मूड छान होण्यासाठी अनुशाला हे पुरेसे होते.

मागच्या भेटीत त्यांचे ठरले होते ..की .

आपल्यातील हे नाते .. इतक्यात कुणालच सांगयचे नाही ,

ज्यावेळी आपल्या दोघांच्या मनाला असे वाटू लागेल की ..आपल्या नात्याला कुणाचा विरोध नाहीये ,

आपले प्रेम ..सगळ्यांना मंजूर आहे ..

याची खात्री पटल्यावर ..हळू हळू एकेकाला कल्पना देत जाऊ ,सांगू आणि शेअर करू .

अभिजीतचा हा प्लैन ऐकून ..अनुशाला अगोदर तर हसायला आले..

ते आवरून धरीत ती म्हणाली ..

यासाठी पाच वर्षे की दहा वर्ष ..इतकी वाट पहायची का महाराज आपण ?

म्हातारपणीची सोबत करण्यासाठी बहुदा एकत्र येऊ आपण, हो ना ?

अनुशाचा हात हातात घेत अभी म्हणाला –

मी तर माझ्या घरातल्या माणसांना म्हणजे आईला लगेच सांगणार नाही ..

बाबांना तर या बाबतीत कसे आणि काय सांगायचे ?

त्यासाठी त्यांच्याकडे मलाच जावे लागेल ,

फक्त माझ्या प्रिय ताईला ,आपले हे ऐकून खूप आवडेल .

अनुषा ..कमीत कमी ..वर्ष –दीड वर्ष तरी लागेल आपल्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला .

तुझ्या घरीसुद्धा आपल्याला मनापासूनचा होकार असावा , विरोध नको . तुझ्या आई-बाबांच्या

मनाविरुध्ह वागणे ,त्यांची मने दुखावणे “, हे मलाच आवडणार नाहीये.

अनुषा – “ माझे लहानपण आई-बाबांच्या बे-बनावाच्या दिवसांनी वेढून गेले , मी मोठा झालो त्या दिवसात

बाबांच्या एककल्ली ,हेकट, रागीट स्वभावाच्या तडाख्याने ..माझी लाडकी ताई .कायमची या घराला

दुरावली , आणि आता ..आम्ही तीनच माणसे ..

पण.एकमेकांचे कुणीच नसल्यासारखे राहतो आहोत .

माझी आई ,ती तर सर्वात दुर्दैवी ..तिच्याकडे ,तिचे सगळे काही असून..आज तिच्या पदरात काहीच नाहीये.

लेक दुरावली , बाप-लेकांच्या मतभेदात ..दोघेही दोन दिशेला , आणि तिचे तिच्या नवर्याशी मन-भेद

झाले आहेत ..त्यात तिचा काहीच दोष नाही .

अनुषा ..तू भेटे पर्यंत तर ...माझ्या जीवनात ..सगळे असून काहीच नव्हते ..

तू आलीस ....तुझे प्रेम घेऊन “,

माझे आयुष्य सुंदर केलेस तू . तुझे हे प्रेम यापुढे माझ्या जगण्याचे आनंददायक कारण असेल.

अनुषा ..मी आणि माझे घर ,माझ्या घरातील माणसांना ..आता तू शिकवायचे आहेस ..प्रेम म्हणजे काय ,

“प्रेमाविण व्यर्थ हे जीवन “.कसे असते .हे तू दाखवून देशील सगळ्यांना .

करशील न अनुषा माझ्यासाठी हे सगळ ?

पहिल्यांदा असा भाव-व्याकूळ अभिजितला .ती पहात होती ..आणि तिच्या मनातील त्याच्याविषयीचे

प्रेम अधिकच घट्ट झाले.

अभिच्या गळ्यात हात टाकीत ती म्हणाली ..

राजा ..तुझ्या मनातली या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन .

आपण आनंदाने सारे एकत्र आलो आहोत

असे जेव्हा तुला जाणवेल ना ?

बस ,त्या दिवसापासून ..तुझ्या प्रेमालाय “ मध्ये ..

ही तुझी अनुषा ..तुला

सौ. अनुषा अभिजित देशमुख म्हणून वावरतांना दिसेल .

खरेच असे होईल अनुषा ? अभिजीतला हे खरे वाटत नव्हते ..

डियर अभी ..अभी आगे आगे देखो होता ही क्या ..!

काय करणार आहेस अनुषा तू ?

आपल्या दोन घरातील ,दोन परिवारातील सगळ्यांना प्रेमाच्या धाग्याने एकत्र जोडण्याचे काम !

करणार आहे मी .अगदी गोडी-गुलाबीने .

अभी तू फक्त पाहत रहा ..

आणि मला ज्या ज्या वेळी तुझी मदत लागेल , तेव्हा ..आपण सोबत असलो

तरी .एकमेकांचे कुणी नाही असेच दाखवणार आहोत . ठीक आहे ना ?

अनुषा ..तू विपरीत असे काही करणार नाही, वागणार नाही,बोलणार नाहीस ,

याची खात्री आहे मला

.पण, जे करशील ते सांभाळून ,काळजीपूर्वक कर.प्लीज.

हो ,अभी , आपल्या प्रेमाला ,आपल्या नात्याला कमीपणा येईल असे मी कधीच काही करणार नाही.

आता तरी .माझ्या ऑपरेशन फमिली “प्रोजेक्ट ला ग्रीन सिग्नल देतोस ना ?

यस माय डियर अनुषा , गो अहेड ..बेस्ट लक.!

अभी, तू म्हणजे न एकदम ड्राय माइंडचा आहेस ..काही समजत नाही,आणि ,

सुचत तर बिलकुल नाही तुला.

होणार्या बायकोला ..असे कोरडे बेस्ट लक देतात का कुठे ?

जाऊ दे, मलाच या गोष्टी पण तुला शिकवाव्या लागणार आहेत रे !

कठीण आहे .बाई !कसं होणार आहे माझे ? कुणास ठाऊक ?

तुझे म्हणजे ना अभी – सिखा नही सबक तूने प्यार का ..तू जाने क्या मजा ..

अभिला जवळ घेत ,

अनुशाने आज पहिल्यांदा त्याचा कीस घेतला ..

ती असे काही करू शकेल ?

अनपेक्षित होते हे ...अभिला क्षणभर काही सुचलेच नाही.

दुसर्याच क्षणाला ..

अनुशाला ..त्याने आपल्या मिठीत घेत ..तिच्या गालांचे कीस घेतला ,

अनुषा डोळे मिटून उभी ,

तिच्या बंद डोळ्यांच्या पापणीवर त्याने ओठे टेकवले ..हे तिला जाणवले ..

अनुषा मनोमन मोहरून आली ,

आज अचानक या सुखाच्या सरीखाली ती नखशिखांत भिजत होती .

तिच्या ओठावर अभिने ओठ टेकवले ,

त्याक्षणी आपल्या अंगातून विजेची लहर गेली कि काय असे तिला वाटले .

त्याच्या गळ्यातले हात अधिकच घट्ट करीत जणू अनुषा ..अभिला अलगद बिलगली .

त्याचा आणि तिचा श्वास एकमेकात मिसळून गेलाय .. तिच्या छातीवर ..त्याचा स्पर्श ..

OMG...

---..अभी ..असेच जवळ घे..कीस मी डियर ..

अभी आणि अनुषा आज पहिल्यांदा परस्परांच्या मिठीत प्रेमाची हे गोड उब अनुभवत होते.

चुंबनाची मधुरता , ओठांचे स्पर्श , शरीराचा बेधुंद करणारा स्पर्श ..

अनुशाने डोळे उघडून अभिकडे पाहिले ..

तिचा अभी प्रेमच्या नजरेने तिच्याकडे पाहत होता ..

अगदी एकटक , तिला वाटले ..आपल्या सार्या शरीराला त्याच्या या नजरेने पार वेढून टाकलय ,

एकेक स्पर्श किती बोलका होता त्याचा ..

अभी म्हणाला ..अनुषा ..आजच्या गोड बक्षीस बद्दल .

तुला मी .रिटर्न –गिफ्ट पण लगेच दिली बरे का !

पुन्हा तू म्हण्यची काय अभी ....तुला काही काळात नाही .

अभी..आता कधीच असे नाही म्हणणार राजा ..

तू माझ्यावर किती प्रेम करतोस ..हे तुझ्या मिठीत आज मला जाणवले .

आणि माझ्या मनाची खात्री झाली ..माझे “प्रेमालाय “ म्हणजे तुझी मिठी.

आजच्या भेटीमुळे एक बेस्ट झाले अनुषा .

काय झाले अभी ,मला काही समजले नाही ,काय म्हणयचे तुला ?

अनुषा – आता यापुढे .आपण भेटू तेव्हा

सुरुवातीला - वेलकम कीस ,

जाताना पुन्हा बाय बाय ..कीस ..

हे छान झालं , मला आवडला हा छान चेंज .

हो का अभी -..

न आवडायला काय झालं ? पण, नेहमी आणि सारखं सारख हे असे नाही मिळणार .

अनुषा ..तू दिले नाही तर काही हरकत नाही , पण

मी दिले तर तू घेशील की नाही ?

ए अभी –हो , घेईल की , तुझे मन नाही मोडणार ही अनुषा . खुश आता .!

मग त्यादिवशी ..खूप गप्पा झाल्या .तिचे मन जणू आभाळातले पाखरू झाले होते .मस्त हवेत

भिरभिरणारे स्वच्छंद प्रेमी –पक्षी .

अनुषा ..आपण दोघेच जेव्हा ठरवून भेटू न .

.त्या प्रत्येक भेटीच्या वेळी ..तू मला साडीत दिसावीस ..मला तू अशी साडीत आवडशील

छान ,सुंदर ,आकर्षक अनुषा , अंगाभोवती मस्त लपेटलेली साडी ,त्यातून दिसणारे तुझे धुंद

शरीर ..बस..पाहून मदहोश होऊ देत जा मला .

ओ .शायर अभिजित ..अभी होश मी आओ , इश्क ने पागल कर दिया तुम को ,

बाप रे ,अभी , तू तर पक्का हौशी मजनू आहेस की .

इतके दिवस लपून होता ..हा माझा मजनू

आज चान्स दिला की ..सुटलाय तू तर.

अभी ..मला तू आवडतोस ..आजचे तुझे हे रसिक रुपडे सुद्धा खूप आवडले .

दरवेळी तुझी अनु ..तुला तुझ्या समोर साडीमध्ये दिसेल ..तुझ्या आवड्या कलरच्या साडीत.

अनुच्या बोलण्याने अभी भावूक होऊन गेला .

एकदम गंभीर होत तो तिला म्हणाला ..

अनु ..इतका आनंद, इतके सुख ,मी आज पहिल्यांदा अनुभवल. माझ मन इतका आनंद सहन

नाही करू शकत ,सवय नाही ग मला .

खूप भीती वाटते , मनावर दडपण येते ..आणि मग,

काही वाईट घडले तर ?

नाही अनुषा ..असे काही आपल्या प्रेमात घडू देऊ नको ..

आपल्या प्रेमाला , तुझ्या अभिला ..सांभाळशील न नेहमी ..कधी दूर करू नको ..

असे केलेस तर तुझा अभी मरून जाईल ग दुख्हाने .

त्याचे हे असे बोलणे , त्याचा अचानक बदलून गेलेला मूड ,त्याचे लहान मुलासारखे

बोलणे ..

क्षणभर काय बोलावे ? अनुशाला सुचेना .

त्याला जवळ घेत , त्याला थोपटत ती म्हणाली ..

अभी ..असे काहीच होणार नाही. तुझी अनुषा कधीच तुला ,तुझ्या प्रेमाला सोडून देऊ शकत नाही.

माझ्यावर विश्वास ठेव राजा ..!

अनु..रियली लव्हज यु ...

तिच्या मिठीत ..अभी हळू हळू शांत झाला ,स्थिर झाला .

तिच्या मिठीतून बाजूला होत म्हणला ..

बघ अनु..तुझा अभी आहे तो असा आहे, काय करू मी तू सांग. माझ्या मनाला लागलेली

वाईट सवय आहे ..

खूप चांगले काही घडू लागले की..मला खूप भीती वाटू लागते ..मन सैरभैर होऊन जाते ,

आज तू सावरलेस ,यापुढे हेच करशील डियर .

हो हो ..अभी ..तू एकटा नाहीस आता ..

तुझ्यात ही अनुषा आहे. तुझ्याशी मनाने एकरूप झालेली .

आता अशा दुबळ्या मनाने जगण्याचे सोडून दे राजा ..!

मी आहे ना !

निरोप घेतांना अभिने तिला जवळ ओढून घेत बाय-बाय कीस घेतलाच .

रस्त्याने तिला वाटले ..आज अभिला आपल्या घरी घेऊन जावे ,आई-बाबांशी ओळख करून द्यावी.

हा एक मित्र आहे म्हणून.

पण,आपले बाबा विश्वास नाही ठेवणार ..फक्त मित्र आहोत “असे आपल्या सांगण्यावर

हे अनुशाला माहिती होते .

तिने विचार बदलला .आणि अभिने तिच्या घरसमोर गाडी थांबवताच ,

ती एकटीच उतरली आणि आपल्या घरात गेली.

मोबाईलची रिंग वाजली आणि अनुषा तिच्या लव्ह-स्टोरीतून बाहेर आली .

तिच्या मैत्रिणीचा फोन होता .

कॉलेजमध्ये आज खूप मोठे पाहुणे येणार होते ..त्यांची छोटीशी मुलाखत

अनुषा आणि तिची मैत्रीण घेणार होती.

अरे बाप रे ..ही गोष्ट तर पार विसरून गेलोत आपण !

अनुषा स्वताच्या मनाशी हसली .. या अभिजितने पार वेड केलय हेच खरे.

“ प्यार का दर्द ही मीठा मीठा प्यारा

दो दिलो का है सहारा .. !!!

तिच्या आवडत्या गाण्याच्या ओळी गुणगुणत ती कोलेजला निघाली ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात .वाचू या ..

भाग -११ वा लवकरच येत आहे .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ...

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------