दुसर्या दिवशी सकाळी विजयला जाग आली तेव्हा रात्रभर विचार करुन करुन त्याच डोक जरा जड झाल होत. उठल्यावर जांभई देता देता त्यानी बेडवर पाहील तर रिया बेडवर नव्हती आता मात्र त्याला काळजी वाटू लागली की रिया घरी कोणाला न सांगताच निघून गेली नसेल ना, की तिने मला खरं सांगितल तसच आई-बाबांना पण नाही ना सांगितल सर्व, असे एक ना अनेक प्रश्न आता त्याच्या डोक्यात येऊ लागले. तो पटापट आपले बिछाने आवरून धावत च त्याच्या बेडरूम च्या बाहेर आला त्याने इकडे तिकडे पाहिलं तर आई किचन मध्ये नाश्ता बनवत होती, बहीण कल्पना ही सकाळी सकाळी टिव्हीवर बातम्या लावून बसली होती आणि बाबा आंघोळ करून देव पूजा करण्यात मग्न होते आणि रिया त्यांच्या बाजूलाच बसून त्यांना देवपूजेसाठी मदत करत होती. एक क्षण तर त्याला स्वतःलाच कळलं नाही कि नक्की काय चाललंय रियाच. काल रात्री अगदी तिच्याबद्दल सर्व खरं खरं सहज सांगणारी रिया, आपल्या प्रियकराबद्दल सर्व बिंदास बोलणारी रिया आज त्याच्या घरच्यांबरोबर एवढ्या आपुलकीने वागेल हे त्याला वाटलंही न्हवत तो पुरता गोंधळला होता.
तेवढ्यात किचन मधून आई ने त्याला पाहिलं आणि रिया ला म्हणाली ओ सुनबाई तुमचे साहेब उठले बघा त्यांच्या चहा नाश्ताची सोय करा, त्यांना उशीर झालेला चालत नाही. रिया ने त्याला पाहिलं आणि त्याला म्हणाली तुम्ही बसा रूम मधेच मी आले पटकन नाश्ता घेऊन तोपर्यंत तुम्ही फ्रेश वैगेरे व्हा. तसा तो शांत जाऊन पुन्हा रूम मध्ये येऊन बसला, थोडा वेळ त्याचा पुन्हा विचार करण्यातच गेला.त्याच्या सोबत हे काय चाललं होत त्याच त्यालाही कळत न्हवत. शेवटी तितक्यात रिया चहा आणि नाश्ता घेऊन आत आली. त्याने न राहवून तिला विचारलं की हे सर्व काय चाललंय नक्की.काळ रात्री तर आपण ठरवलं होत ना की तू ३-४ दिवसांनी पुन्हा माहेरी जाणार आहेस आणि मग तू तुझ्या मार्गाला जायला मोकळी. मग आता हे सर्व असं वागणं सकाळपासून ती म्हणाली थांबा बाबांना आधी देव पूजेला मदत करते मग आपण बोलूया यावर मी तुम्हाला सर्वकाही समजावून सांगते आणि ती परत बाबांना देव पूजेला मदत करायला निघून गेली. हादेखील चहा नाश्ता करण्यात मग्न झाला पण विचारांचं चक्र मनात चालूच होत. नंतर फ्रेश वैगेरे होऊन हॉल मध्ये सोफ्यावर येऊन बसला. रिया सर्वांशी अगदी नीट पणे वागत होती अगदी कुठेच तिचा तुटका किंवा सोडून जाण्याच्या स्वभाव हा दिसत न्हवता.
आता बाबांची देव पूजा सुद्धा झाली होती आता आई, बाबा, कल्पना आणि रिया असे सर्वजण विजय कडे बघून गालातल्या गालात हसत होते. विजयला कळत होत कि काहीतरी चाललंय यांसर्वाचं पण नक्की काय हे त्याला ही कळत न्हवत. तेवढ्यात रिया पुढे आली आणि दोन्ही कान पकडून अगदी गुढघ्यावर बसून त्याला सॉरी म्हणू लागली त्याने विचारलं अरे का.?काय झालं...? तेवढ्यात त्याची बहीण कल्पना त्याला म्हणाली "दादा आज तारीख काय आहे रे..?" विजय म्हणाला "एक एप्रिल.." आणि तेवढयात रिया आणि घरातली सर्व मंडळी एकत्र जोरात ओरडली...."एप्रिल फूल."
रिया जवळ आली आणि म्हणाली "सॉरी, मला माफ करा मी खोटं बोलले माझं असं काहीच नाहीये तुम्हाला फक्त एप्रिल फूल करायचं असं ठरल होत आणि आम्ही सर्वांनी मिळून हा प्लॅन केला होता. "
आता विजय ला ही सर्व हळूहळू कळू लागलं आणि एकाअर्थी त्याच्या जीवात जीव पण आला कि काल रियाने त्याला जे काही सांगितलं होत ते सर्व खोटं होत आणि स्वतःवर च आता त्याला हसू येत होत त्याने सर्वांसमोरच रियाला मिठीत घेतलं आणि "पुन्हा अशी मस्ती नको करुस असं वचन मागितलं रियाने ही कुठलेही आढेवेढे न घेता लगेच त्याला वचन दिल."
विजय रिया ला तो सांगत होता कि हा माझ्या आयुष्यातील सर्वात आठवणीत राहिलेला क्षण राहील नेहमीच..." आणि त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात झाली....एकदम हॅपीली..
आणि त्या रात्री खरच त्यांची मधुचंद्राची रात्र झाली.
The End....!!!
कशी वाटली स्टोरी, तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा... आवडल्यास नक्की शेयर करा आणि लाईक करा..