Prem he - 22 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 22

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

प्रेम हे..! - 22

"काssय...😨 मी येतेय.." म्हणून सोनिया ने फोन ठेवला.. आणि जेवायचंही सोडून ती धावतच विहान च्या घरी जायला निघाली...

ती घाईघाईतच तिथे पोहोचली... आत येऊन बघते तर अंकल फोन वर बोलण्यात बिझी होते.. आणि आँटी सोफ्यावर बसून रडत होत्या... ती आँटींजवळ गेली..
त्यांच्या हातावर हात ठेवत तिने त्यांना धीर दिला... आणि विहान च्या रूम मध्ये गेली...

"विहान काय चाललंय तुझं?? आँटींची काय अवस्था झालीय बघ रडून रडून....😧" सोनिया म्हणाली..

"सोनिया प्लीज.. I request you... नको अडवू मला..."

"का नको अडवू.. आमचा विचार नाही करावासा वाटला का तुला..?? तुझ्याशिवाय आमची अवस्था काय होईल कल्पना तरी केलीस का?? 😓😓"

" सोनिया प्लीज... जीव गुदमरतोय माझा इथे...इथे निहिरा च्या आठवणी मला स्वस्थ जगून देणार नाहीत.. 😣 मला जाऊ दे प्लीज... "

" तिच्यामुळे मलाही सोडून जाणार तू?😐 किती सवय झालीय तुझी.. कशी राहू मी?😥 आणि अंकल, आँटी.. त्यांना तरी कोण आहे दुसरं तुझ्याशिवाय?? 😓"

"तू आहेस ना.. तू लक्ष दे मॉम कडे.. डॅड सावरतील स्वतःला.. ते मला समजून घेतील.. तू फक्त मॉम ची काळजी घे.. ती हळवी आहे... मी रोज कॉल करेनच तिला.. पण परत इकडे यायची इच्छा नाहिये आता.... त्यामुळे पुढे कसं होणार माहीत नाही....इथे मला रोज रोज असं तुटताना बघून जास्त त्रास होईल त्यांना 😢 त्यापेक्षा मी तिथे गेलो तर थोडे दिवस वाईट वाटेल त्यांना पण सावरतील ते.. 😧" म्हणून त्याने दीर्घ श्वास घेतला.. 😥

सोनिया ने त्याच्याकडे बघितलं... आणि त्याला घट्ट मिठी मारली... 😑
" विहान नको ना जाऊ... 😫"

विहान काही बोलला नाही.. तिला मिठीत घेऊन तो अश्रू गाळत होता.. 😭

. - - - - - - - XOX - - - - - - -

सोनिया त्याच्या रूम मधून बाहेर आली.. येऊन विहान च्या मॉम जवळ बसली.. त्यांनी आशेने तिच्याकडे बघितलं...

"आँटी.. त्याचं ठरलंय.. 😔" ती मान खाली घालून बोलली..
"पण मनाला नका लावून घेऊ.. येईल तो परत.. त्याला हसून निरोप देऊया.. तो एकटा असणार आहे तिथे.. आपण असं दुःखी राहिलो तर त्याला काळजी लागून राहील तिथे... प्लीज त्याला बॅग पॅकिंग करायला हेल्प करूया... प्लीज 😐" तिने त्यांना समजावलं.. तशा त्या उठल्या.. काही गरजेच्या वस्तू आठवणीने त्याच्या बॅग मध्ये टाकल्या.. त्याला काय हवं नको बघू लागल्या... विहान ने डोळ्यांनीच सोनिया ला थँक्स म्हटलं.. ☺️

पण त्या रात्री कुणीच जेवलं नाही... सोनिया ने विहान जवळ हट्ट केला की मी सुद्धा येईन तुला एअरपोर्ट वर सोडायला... तिच्या हट्टापुढे त्याचा नाईलाज झाला... तिने मॉम ला फोन करून विहान च्या जाण्याबद्दल सांगितलं.. आणि आपण इथेच थांबणार असल्याचं तिने सांगितलं... तिचे मॉम डॅड ही रात्रीच त्याला भेटून गेले..... ती अख्खी रात्र विहान ने निहिरा च्या आठवणींत जागून काढली... अख्खी रात्र तरी कुठे होती त्याच्याकडे... रात्री अडीच वाजताच ते एअरपोर्ट वर जायला निघाले...

विहान सर्वांचा निरोप घेऊन निघून गेला... फ्लाईट मध्ये सीट वर बसल्यावर त्याने डोके मागे सीट ला टेकले... आणि एक सुस्कारा सोडला... 😑

🎶🎶
आँसू नमक से लागे, रिश्ते है कच्चे धागे
रेत पे अपने सायें खुद से क्युँ दूर भागे...
खींच के हमको लाया कहां पे रकीब रे....
खुदाया वे.. इश्क है कैसा ये अजीब रे.....

- - - - - - - - XOX - - - - - - - -

वर्तमान......

"आता तो तिकडचा बिझनेस सांभाळतोय.. 😐इथे राहून तुझी आठवण आली असती म्हणून त्याने तिकडे जाण्याचा निर्णय घेतला.. 😓 दहा महिने झाले त्याला जाऊन... अजून एकदाही इकडे आला नाही.. अंकल, आँटी, मी आणि कधीतरी माझे मॉम, डॅड आम्हीच तिथे जाऊन भेटतो त्याला... 😑" सोनिया ने निहिरा ला सर्व सांगितलं...

" म्हणजे ते स्वप्न मला त्याच दिवशी पहाटे पडलं होतं जेव्हा विहान बँगलोरला जायला निघाला होता...! हो.. तेव्हाच!! आणि ते दोन हात इतर कोणाचे नसून नियतीचे होते... नियतीनेच त्याला माझ्यापासून दूर केलंय... 😫
पण नियती ला तरी कशी दोष देऊ मी.. खरं तर हे सर्व माझ्यामुळेच झालंय.... 😣😣"

सोनिया च्या बोलण्याने निहिरा च्या काळजावर जणू घाव घातले होते!! तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चात्ताप होत होता... 😑😑 तिला विहान ची माफी मागायची होती..

" सोनिया.. मला विहान चा नंबर दे प्लीज... मला बोलायचंय त्याच्यासोबत... भेटायचंय त्याला 😧" निहिरा म्हणाली..

"सॉरी निहिरा... विहान ने त्याचा नंबर कुणालाही द्यायला मना केलंय... 😖 "

"मलाही??.. 😧"

सोनिया ने होकारार्थी मान हलवली..!!
"तुझ्याबद्दल बोलायलाही मनाई केलीय त्याने.. तो स्वतः ही कधी तुझा विषय काढत नाही.. 😓"

निहिरा च्या डोळ्यांतून पाणी आलं... 😥

" सॉरी निहिरा.. पण मी प्रॉमीस केलंय त्याला... 😓😓"

" it's ok सोनिया.. माझ्या चुकीची शिक्षा मी भोगायला तयार आहे.. ही तर सुरुवात आहे... विहान ने माझ्यामुळे जे सहन केलंय त्यासाठी मी माफीच्या ही लायक नाहिये... 😫😫" आणि निहिरा रडायला लागली..

"हे बघ निहिरा... तू त्याला कॉल करूच नको.. नाहीतर तो तुला भेटायला कधीच तयार नाही होणार...तू त्याच्यावर जो अविश्वास दाखवलास त्यामुळे तो खूप हर्ट झालाय...त्यासाठी तुला अचानक त्याच्या समोर जायला लागेल.. 😓" सोनिया ने निहिरा ला सल्ला दिला..

" ठीक आहे... मी नाही कॉल करू शकत... पण तू तर करू शकतेस ना... प्लीज एकदा मला त्याचा आवाज ऐकव... फक्त एकदाच... माझे कान तरसलेत गं त्याचा आवाज ऐकण्यासाठी.. 😭 प्लीज सोनिया.... 😫🙏" निहिरा ने तिला request केली..

सोनिया ला ही तीचं वाईट वाटलं... तिने लगेच विहान ला कॉल केला.. आणि स्पीकर ऑन केला...

" हां सोनिया बोल... कशी आहेस? "

सोनिया ने निहिरा कडे बघितलं ..... 😐 पलीकडून विहान चा आवाज ऐकून निहिरा ला अश्रू आवरत नव्हते ... ती तोंडावर हात गच्च दाबून आलेला हुंदका अडवण्याचा प्रयत्न करत होती..

"मी ठीक आहे.. तू कसा आहेस?😓" सोनिया बोलली..

"सोड... इकडे कधी येतेयस बोल... I miss you यार... ये ना दोन चार दिवस.. मस्त फिरू इथे...!" विहान बोलत होता...

"OK buddy.. येईन लवकरच.. सरप्राइज देईन बघ तुला 😅"

"Oh.. Really!! Let's see.. 😊 ऐक मला एक कॉल येतोय.. रात्री करतो तुला कॉल....बाय " म्हणून त्याने फोन कट केला..

आणि निहिरा सोनिया च्या गळ्यात पडून रडू लागली... आज एवढ्या महिन्यांनी विहान चा आवाज ऐकून ती भारावून गेली... 😥😥 आजही त्याच्या आवाजामध्ये तिला उदासीनता जाणवली... 😧

"सोनिया.. जे काही झालं त्यासाठी मी तुझी ही माफी मागते.. कळत नकळत मी तुलाही दुखावलंय... "निहिरा रडता रडता म्हणाली..

"प्लीज निहिरा... विसर ते सर्व.."

"आता काय करायचं ठरवलंयस तू? 😓" अवनी ने निहिरा ला विचारलं..

"मला विहान ला भेटायचंय... त्याची माफी मागायचीय...खूप त्रास दिलाय मी त्याला... तू होतीस म्हणून त्याला सावरलंस.. थँक्स सोनिया!! " ती सोनिया कडे बघत म्हणाली..

"ह्म्म्म्म..... पण... तुझ्याकडे जास्त वेळ नाहिये निहिरा... 😓 विहान च्या मॉम ने त्याच्यासाठी एक स्थळ सुचवलंय... अंकल, आँटींना मुलगी पसंत आहे.. आता फक्त विहान च्या होकाराची वाट बघताहेत... 😐 नेक्स्ट month दोघेही तिकडे जाणार आहेत.. आणि आँटी काही करून त्याचा होकार घेऊनच येतील असं मला वाटतंय.. 😧" सोनिया म्हणाली..

निहिरा ला कळत नव्हतं.. आपण कसे भेटणार विहान ला...
" सोनिया मी घरी जाऊन यावर विचार करते... आणि तुला कळवते.. 😓" आणि सोनिया चा निरोप घेऊन निहिरा आणि अवनी तिथून निघून गेल्या...

- - - - - - - - XOX - - - - - - - -

निहिरा घरी आली.. पण तीचं कशातच लक्ष लागेना... ती सारखा एकच विचार करत होती.. विहान ला कसं भेटायचं🤔😓 आणि अचानक तिच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं...!! 😅

निहिरा च्या ऑफिस मधून काही स्टाफ ला पुढच्या महिन्यात ट्रेनिंग साठी बँगलोर च्या ब्रँच मध्ये पाठवण्यात येणार होतं...वीस दिवसांची ट्रेनिंग होती.... ट्रेनीज् ची लिस्ट रेडी होती... आणि त्यात निहिरा चं नाव नव्हतं... कारण निहिरा ऑलरेडी डेव्हलपर च्या पोस्ट ला होती.. तिला या ट्रेनिंग ची तशी काही गरज नव्हती... पण निहिरा ने एक प्रयत्न करून बघायचं ठरवलं...

दुसर्‍या दिवशी ती ऑफिस ला गेली... संधी बघून सरांच्या केबिन मध्ये शिरली...!

"सर मे आय कम इन??"
सर लॅपटॉप वर काहीतरी काम करण्यात बिझी होते... त्यांनी मान वर करून कोण आहे ते बघितलं...

"ओह्ह निहिरा... येस कम इन... हॅव अ सीट.... 😊 काय म्हणतेयस?? "

निहिरा त्यांच्या समोरच्या चेअर वर बसत म्हणाली.....
"सर.. Can I go for training to Banglore?? 🙂"

" What?? मला वाटतं तुला गरज नाहिये त्या ट्रेनिंग ची.. 😓"

"सर प्लीज.. मला आवडेल शिकायला.. आणि माझं नॉलेज ही improve होईल ना.. 😊 "

" ते तर आहेच.. पण खरच तुला वाटतंय का तुला जायला पाहिजे?"

"हो सर... चांगली संधी आहे ही माझ्यासाठी शिकण्याची.. असं मला वाटतं.. ☺️"

लिस्ट सरांनीच काढली होती.. त्यांनी निहिरा चं नाव एवढ्यासाठीच नव्हतं टाकलं कारण त्यांना वाटत होतं की निहिरा ला या ट्रेनिंग ची गरज नाहिये.. पण आता तिला स्वतःहून शिकावंसं वाटतय तर तिला पाठवायला काही हरकत नाही असं त्यांना वाटलं... शिवाय तसेही ते तिच्या हुशारीवर,तिच्या कामावर खुश होते.. त्यामुळे त्यांनी तिला परमिशन दिली..!

निहिरा खुश होत आणि सरांचे आभार मानत केबिन बाहेर पडली.. 😅😅

तिने लगेच सोनिया ला कॉल केला आणि पुढच्या महिन्यात बँगलोरला जात असल्याचं कळवलं... सोनिया ही खुश झाली... तिने निहिरा ला मी सोबत येऊ का तिकडे म्हणून विचारलं.. पण निहिरा ने नकार दिला... तिच्या मते चूक तिची होती ती तिलाच सुधारायची होती... सोनिया ने आत्तापर्यंत खूप काही केलं होतं तिच्यासाठी आता जे काही करायचं होतं ते ती स्वतः करणार होती... ☺️

ट्रेनिंग पुढच्या महिन्यात होती... अजून वीस दिवस तरी बाकी होते... आता तिला हे वीस दिवस विहान शिवाय काढणं कठीण वाटत होतं...!! पण नाईलाज होता.. 😒 विहान ने तिच्यावाचून दहा महिने काढले होते... हे वीस दिवस त्या मानाने काहीच नव्हते..! तिनेही दहा महिन्यांत विहान ला खूप मिस केलं होतं पण तिचा त्याच्यावर राग ही होताच त्यामुळे ती त्याच्यापासून दूर राहिली होती... पण या दुराव्याचा जास्त त्रास विहान ला झाला होता... आणि आता तो तिला सहन करावा लागणार होता.... 😓

एक गोष्ट मात्र तिला सतावत होती... वीस दिवस आपण कसेतरी काढू.. पण तोपर्यंत विहान च्या मॉम,डॅड नी तिथे जाऊन त्याला होकार द्यायला लावला तर...!!???? 😨

- - - - - - - - XOX - - - - - - - -

खूप प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस उजाडला... आई, बाबा तिला सोडायला प्लॅटफॉर्म वर आले होते....आईला थोडी धाकधूक वाटत होती.. पहिल्यांदाच त्यांची मुलगी एवढ्या लांब चालली होती.. पण सोबत इतरही स्टाफ होता त्यामुळे जास्त टेन्शन नव्हतं.. अखेर Coimbatore express स्टेशन वर आली... आणि निहिरा आणि टीम त्यात चढली...
तिने आई बाबांचा निरोप घेतला आणि आपल्या जागेवर येऊन बसली... आपण विहान ला भेटणार या कल्पनेनेच तीचं अंग शहारलं...!!! ❤️

To be continued...
🙏
#प्रीत