आह्मी ह्या घरात राहू लागलो . मध्यंतरीत काळात आई वडील वारले . आता समीर चे आई वडील च माझे आई वडील . त्यात समीरच्या आई ची तब्बेत एकदम खालावली . डॉक्टर कडे नेह्ल्यावर समजले की त्याना केन्सर झालय . आता त्यांच्या ऑपरेशन साठी मला पैसे गोळा करयचेत .खूप पायपीटी केल्यावर हा जॉब मिळाला . मी तुला ह्या साठी हे सगळं सांगते , की तू जे मला कॉफी शॉप मधे सांगितल .ते अगदी लहान मुला सारख होत . ते कधी शक्य ही होणार नाही . मी तुज्या पेक्षा पाच वर्षाने मोठी आहे. तूझ सुंदर आयुष्य तूझ्या पुढे उभ आहे . तुला कोणीही चांगली मुलगी मिळेल .तिच्या शी सुखाचा संसार कर . मी तुला नकार ' ' कॉफी शॉप ' ' मधे ही देऊ शकत होते . पण , मला तूझ्या सारखा मित्र गम्वय्चा नव्हता . मी अयुषत खूप गमावले आहे . आता ही नोकरी आणि तूझ्या सारखा मित्र हे दोनच मझ्या आयुष्यातील सुखाचे क्षण आहेत .
सोहम ला काय बोलावे .काहीच कळेना . तो तेथून काही न बोलता निघून गेला .त्यानी रिक्षा पकडली आणि तो घरी आला . तो निशाच्या घरून आल्यापासून त्याने स्वतःला बेडरूम मधे बंद करून घेतले होते .
रात्र झाली होती , तरी निशा आज काही केल्या झौप येत नव्हती .ते एकसारखी कूस बदलत होती .पण झौप काही केल्या येत नव्हती .सारखा सारखा ' ' कॉफी शॉप ' ' मधला तो प्रसंग आठवत होता .
पण , सोहम ने जेव्हा पासून निशाचा भूतकाळ ऐकला होता .तेव्हा पासून त्याला तिच्या बद्दल जास्त वाईट वाटत होते .आणि समीर नी तिच्याशी ईतक वाईट वागला .तरीही ती त्याच्या आई वडिलांना चांगले सांभाळते . त्याला तिच्या बद्दल जास्त आदर वाटत होता .आणि आपल्या आयुष्याचा योग्य जोडीदार निवडला म्हणून , स्वतः हा बदल अभिमान ही वाटत होता . आता त्याला निशा बद्दल जास्तच प्रेम वाटू लागले . आणि काही जाहाले तरी निशाची साथ शेवट पर्यन्त द्यायची . तिने जे आतापर्यंत जे भोगलय ते तिला कधीही भोगून द्यायच नाही . आता फ़क्त तिच्या अयुष्त सुख आणायचे . मनाशी निश्चय करून तो झोपी गेला .
त्याने बेडरूम चे दार उघडले . किचन मधे झाकूण ठेवलेले जेवण ताटात घेतले . आणि जेवायला सुरवात केली . नेहमी बाहेर च काहीतरी खाऊन येणारा सोहमला आज घरातले जेवण म्हणजे अम्रूत च वाटत होते .त्याने जेवण केले . आणि झोपी गेला . दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला .आंघोळ करून नवीन कपडे घालून पुस्तके घेऊन तो कॉलेज मधे आला . कॉलेज मधे येताच त्याने लायब्ररी गाठली . सोहम ला लायब्ररीत बघून सगळे आश्चर्यचकित जाहाले होते . पण आता त्याचा काहीच फरक पडत नव्हता . त्याने सगळ्या वाईट सवयी सोडय्च्या ठरवल्या होत्या .आणि आता फ़क्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचे ठरवले होते .
निशाही कॉलेज मधे आली होती .रात्री झौप न आल्या मुळे तिचे डोळे सूजले होते . आणि कदाचित आपण सोहम ला नकार दिल्यामुळे तो आता कदाचित आपल्याशी बोलणार ही नाही . एक चांगला मित्र गमावल्याचे दुख ही तिच्या चेहऱ्यावर दिसत होते . तीच मन काल झलेल्या गोष्टीचाच विचार करत होते . ऐत्क्यात बेल वाजली . फर्स्ट लेक्चर घेण्यासाठी ती निघाली . तीच फर्स्ट लेक्चर सोहम च्या च वर्गावर होते . ती वर्गावर आली . तिने एक नजर वर्गावर टाकली .तिला समोरच सोहम बसलेला दिसला .प्रसन्न चेहऱ्यानी . पण , त्याच्यात तिला खूप बदल दिसत होता .पण तो बदल कशासाठी , कोणासाठी तिला काहीच कळेना . पण तिकडे दुर्लक्ष करून तिने शिकवायला सुरवात केली .
कसाबसा तिने तास संपवला . आणि ती हाफ डे घेऊन घरी आली . घरी आल्यावर ती फ्रेश झाली . तिने टी .वी . चालू केला .थोडा वेळ तिने टी .वी .पहिला .पण , त्यात ही तिचे लक्ष लागेना . तिने बागेत जाऊन एक फेरी मारायची ठरवली . तिने उरकून ती बागेत जायला निघाली . थोड्याच वेळात ती बागेत येऊन पोहचली . बागेत आल्यावर तिला जरा बरे वाटू लागले . तिथे सुंदर सुंदर झाडे होती , त्यावर सुंदर फुले होती .फुलांवर सुंदर सुंदर फुलपाखरे होती . बाजूलाच सुंदर मुले ही खेळत होती . ती त्या मुलाना पाहत होती . त्या तील एक छोटी मुलगी तिच्या आई कडे कसला तरी आग्रह करत होती . आणि तिची आई तिला प्रेमाने सम्ज्वत होती .
निशाला त्या मायलेकीणा पाहून फार हेवा वाटत होता .आपल्या अयुषत असा कधीच प्रसंग येणार नाही का ? आपण कधीच आई होऊ शकणार नाहीं .समीर शी लग्न ठरलेल तेव्हा किती स्वप्न पहिली होती . ती आपली स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार का ? ती असा विचार करत होती . तेच तीच दुसर मन तिला सांगू लागले .का , नाही होणार पूर्ण स्वप्न . योग्य जोडीदार मिळाला की होतील तुझी स्वप्न पूर्ण . लगेच तिच्या पहिल्या मनाने प्रश्न केला . योग्य जोडिदार आणि तू कुठे असेल , कधी असेल , आणि कसा ओळखणार की तो योग्यच ठरेल .आणि तो अयुष्भर साथ कशावरून देयील . कशावरून तो समीर सारखा नसेल .
लगेच तिच्या दुसऱ्या मनाने तिला धीर देत म्हणाले .......प्रत्येक वेळी आपल्या बरोबर काही वाईटच होईल , अस का समजावे . जोडीदार योग्य आहे की नाही हे स्वतः पारखून पहावे . जसा सोहम ............
सोहम चा विचार मनात येताच निशा भानावर आली .आपण हा काय विचार करतोय . आपण असा स्वार्थी विचार कसा काय करू शकतो . आपल्यावर आई , बाबांची जबाबदारी आहे .जरी ते समीरचे आई बाबा असले तरी त्यानी नेहमी आपली साथ दिली आहे . पण सोहम ..... सोहम च्या विषयी काहीही मनात यायच्या आधीच त्यानी घर गाठले .
ती घरात येताच ती स्वयंपाक घरात शिरली .तिने जेवण बनवायला घेतले . तर पहाते तर काय , सगळं जेवण बनवून झाले होते . ' ' वरन , भात , पोळी , भाजी ' ' . ऐत्क्यात तिचे बाबा किचन मधे आले . अग जेवण मी बनवले . ' ' अहो , बाबा का बनवले जेवण ? मी बनवले असते .' ' निशा म्हणाली . ' ' अग , तू दुपारी लवकर आलीस , अह्माला वाटले , की आजारी आहेस .का ? म्हणून बनवले जेवण ...' ' बाबा म्हणाले . अस काही नाहीं बाबा निशा म्हणाली .
यावर विषय बदलत बाबा म्हणाले , तुज्या आईला आणि मला काही बोलायचे आहे तूज्यासोब्त . निशा थोड थांबून म्हणाली , ' ' बोला ना बाबा ' ' . यावर बाबा म्हणाले , तुज्या आईच्या खोलीत चल . निशाला काही समजेना ह्या दोघाना मझ्याशी काय बोलायचे असेल ....