Gost eka vachkichi - 7 - last part in Marathi Love Stories by Anji T books and stories PDF | गोस्ट एका वाचकीची - भाग -७ ( अंतिम भाग )

The Author
Featured Books
Categories
Share

गोस्ट एका वाचकीची - भाग -७ ( अंतिम भाग )

ट्रिप वरून आल्या नंतर पहिले वेळेस आम्ही भेटतो. ट्रिपच्या विषय बोलत बोलत आमचा घरी जायचा वेळ होतो. नि आम्ही घरी जायला निघतो.
राम मला थोडा त्या वेळेस टेन्शन मध्ये वाटतो. मी विचारते त्याला पण तो काही सांगत नाही आणि आम्ही घरी जातो.

खर तर मी रामच्या प्रेमात त्या ट्रेन मध्ये बुक वाचल्याचं पडते. त्याच ते लिहलेली स्टोरी मध्येच मला राम आवडायला लागला असतो. पण मला माहित नाही का मी त्याच्या प्रप्रोसलला हो म्हणायला एवढा वेळ लावत आहे. मी घरी पोहचून खूप विचार करते आणि मला त्या वेळेस वाटायला लागते कि रामला सांगून देऊ के तो मला आवडतो आणि लग्ना साठी मला काहीच प्रॉब्लेम नाही.

मी माझ्या घरी सांगायचं पण विचार करते. पण अगोदर मला रामशी बोलायचं असते तर मी त्या नंतर राम ला भेटून सांगायच विचार करून त्याला मेसेज करते कि आपण लवकरच भेटू मला काम आहे तर.

राम भेटायला हो म्हणतो....

एके दिवशी आम्ही भेटायचं निर्णय करतो आणि आमच्या नेहमीच्या जागी बसले असतो.
रामला मी अचानक सांगण्याचं विचार करते कि मला तो आवडायला लागला आहे.
पण कस सांगू कळत नव्हता.
मी त्या दिवशी रामला विचारते कि त्याचे आई बाबा काही बोलले का त्याला आमच्या विषय.
तो नाही म्हणतो आणि राम मला सांगतो कि अंजली तुझ्या परवानगी शिवाय तो काही घरी बोलणार नाही आहे.

राम मला तुला काही सांगायचं आहे...
हो बोलना अंजली ...
मला नाही कळत आहे मी कस सांगू पण राम खार तर.... मला पण तू आवडतो आणि मी लग्ना साठी पण तयार आहे.
राम ते ऐकून खूप खुश होतो आणि आम्ही घरी सांगायचं ठरवतो...

राम मला तुला आणखी काही सांगायचं आहे.. पण...

हो सांगना काय झालं ?? मला माहित आहे तू काय विचार करत आहे ते..
तू काळजी नको करू काही मी सांभाळून घेणार.

राम ते नाही मला आणखी काही दुसर सांगायचं आहे.. पण चाल खूप वेळ होत आहे मी घरी जाते आपण फोन वर बोलू बाकीचं...
अंजली थांब ना थोडा वेळ please please थोडा वेळ...
नाही ना राम तू समझ आता निघूया..
चाल बाय.. I LOVE YOU

काय काय बोललीस तू मी काही ऐकलं परत बोल.. बोलणं बोलणं अंजली

हा हा हा हा
बाय.. बाय.. बाय.. बाय..
मी नाही बोलत.

ठीक आहे पोहचून रात्री कॉल कर..
हो राम..


दुसऱ्या दिवशी Sunday असतो आणि ट्रिप नंतर आम्ही सर्वे भेटायचं प्लान करतो. मला काही घरी काम असल्या मुले मी ग्रुप मध्ये नाही येणार आहे असं मेसेज करते. तेवढ्यात राम चा मला कॉल येतो कि तू का नाही येत आहे ??
मी त्याला सांगते कि घरी आईला काम आहे तर नाही येऊ शकणार ...
बर राम ऐकणं मी काय म्हणते आपण एकाच Ngo मध्ये काम करतो तर तू केव्हा थॅलॅसेमियाचा रिपोर्ट काढला का तू तुझा ??

राम हो म्हणतो नि सांगतो कि तो कॉलेज मध्ये असतानाच केलेला असतो.

पण अचानक अंजली तू असं का विचारतेस ??

राम मला काही सांगायचं होत तर ते हे आहे कि मला मायनर थॅलॅसेमिया आहे. मला वाटलं कि मी तुला सांगून देऊ सर्व मला काही लपवायचं नाही.
मला माहित आहे तू समझत असणार आणि तुला पण मायनर विषय माहित आहे तर.. एवढंच मला सांगायचं होत.

बर ऐकणं अंजली घरी कोणी आलं आहे मी पाहतो कोण आहे तर, आपण बोलू थोड्या वेळेत, मी करतो तुला कॉल.

हो बर पण पटकन कर कॉल फ्री होऊन
बाय...

फोन ठेवल्या वर खूप थक थक वाटत होत. काय होणार ?? राम काय विचार करणार ? त्याचा काय निर्णय असणार ? तो काय विचार करत असणार ?
असे भरपूर प्रश्न डोक्यात फिरू लागले..
मला माहित होत की राम समझणार आणि तो या प्रॉब्लेम मुले मला समझणार..
पण जो पर्यंत माझी गोस्ट राम शी होत नव्हती तो पर्यंत मी त्याचा कॉलची वाट पाहत बसली असते.
रात्रीचे ११ वाजतात पण त्याच्या कॉल की मेसेज नसतो येत..

मला खूप टेन्शन होऊ लागते..
रात्रीचे १२ वाजतात रामचा मेसेज येतो कि आपण उद्या बोलू तू झोप आता.. खूप वेळ झाला आहे तर..

मी काही न बोलता झोपून जाते.

दुसऱ्या दिवशी सकाळी संडे असल्या मुळे आईला काही कामात मी मदत करते. राम चा काहीच मेसेज की कॉल न आल्या मुळे काळजी वाटू लागते.
मी त्याला मेसेज पण करते.. पूर्ण दिवस निघून जातो काहीच रिप्लाय नाही येत रामचा.
संध्याकाळी मला सुमितचा कॉल येतो कि पहा जर जमणार तर ये थोडा वेळ आम्ही सर्व बसले आहोत.

मी सुमितला विचारते कि कोण कोण आले आहेत ??
तो सांगतो कि राशी, प्रिन्स, राम पण आला आहे.
मी सुमितला म्हणते कि रामला कॉल दे..
रामशी माझं बोलणं होते तर तो म्हणतो मी फ्री झाल्या वर कॉल करणारच होतो..

मी वाट पाहणार राम. चाल बाय आणि जास्त काही न बोलता कॉल ठेवते.

राम च असं वागणं मला थोडं विचित्र वाटते कारण तो केव्हाच असं इग्नोर नव्हता करत आणि अचानक न बोलायचं कारण कळत असून सुध्या कळत नव्हता.

रात्रीचे ११ वाजता त्याचा कॉल येतो.
माझ्या पुष्कर विचारल्या नंतर तो सांगतो कि अंजली आपलं लग्न नाही होऊ शकत आणि सॉरी मी काहीच नाही करू शकत.
मी आई बाबा बरोबर तुझ्या मायनर थॅलॅसेमिया विषय गोष्ट केली आहे आणि आईने लग्ना साठी नाही म्हटलं आहे.

ते ऐकून माझ्या एक पण शब्द निघत नव्हता मी काय बोलू कळत नव्हता..
डोळ्यातुन फक्त अश्रू वाहत होते.. मला काहीच बोलायला सुचत नव्हता..

राम तरी सुद्धा बोलत राहतो अंजली काल रात्री नंतर मी सुद्धा विचारात पडलो आहे कि घरी कस सांगू आणि काय बोलू त्यान्हा, मला माहित होत कि आई बाबा हे ऐकून केव्हाच हो म्हणणार नाही..
अंजली मी आज सकाळी उडताच बाबा ला कॉल केला होता मी त्यान्हा सांगितलं आणि माझ्या खूप समझवल्या नंतर पण ते ऐकायला तयार नाही.

अंजली तू काही बोलत का नाही आहे... अगं बोलणं please अंजली अंजली ऐकत आहे का...

राम आपण उध्या भेटायचं का ??
आपण भेटून बोलूया.

हो मी तेच म्हणार होतो अंजली कि आपण भेटून बोलूया आणि तू रडू नकोस मी येतो उध्या संध्याकाळी..

हो बर राम मी ठेवते आता बाय.

तू बोलणं थोड्या वेळ काय झालं तुला ग ?? अंजली तू काळजी नको करू मी आहे तुझ्या सोबत.

राम उध्या बोलायचं का ? मला आता काहीच नाही बोलायचं आहे.

बर चाल बाय ठेवते मी.

मी काही न विचार करता फक्त उध्याची वाट पाहात असते.
सकाळी उठून मी ऑफिस ची तयारी करते आणि ऑफिस ला निघते..
मला पूर्ण दिवस ७ केव्हा वाजणार विचारात मी वाट पाहत बसते. रामचा नेहमी प्रमाणे मेसेज येतो कि मी निघाली ७ पर्यंत येतो मी.

आम्ही आमच्या जागी भेटतो आणि राम सांगतो कि आईचा कॉल आला होता ती मला तेच सांगत होती. पण अंजली मला वाटते कि आई बाबा बरोबर सांगत आहे..
काय ?? राम तू काय बोलत आहे कळत आहे तुला.
तु त्यान्हा समझवायचं बदले तू मला सांगत आहे.. तुला पण माहित आहे हे काही एवढं मोठं नाही मायनर असणं म्हणजे मी पण नॉर्मल आहे.
राम तुला पण माहित आहे पुष्कर एक्टरेस ला पण आहे ते पण त्यांचं लाइफ जगात आहे त्यान्हा काहीच प्रॉब्लेम नाही राम.

तो तेव्हा मला समझवायल लागतो कि मी आई बाबा ला सर्व सांगितलं आणि ते नाही ऐकत आहे. मी माझ्या ताई शी पण बोललो जी एक गायनॉकॉलॉजिस्ट आहे
तिने पण बाबा ला सांगितलं याचा विषय. पण नाही ऐकत आहे ते.

अंजली तू पण समझ ते बरोबर म्हणत आहे ना त्याचा मी एकच मुलगा आहे आणि ते माझ्या विषय जास्त विचार करतात.

मग आता काय करायचं राम ?

बघ अंजली तू पण विचार कर प्रॅक्टिकली.. आता आपण इमोशनल होऊन बोलत आहे.
आणि आई बाबा च्या निर्णय समोर मी काहीच नाही करू शकत. बाबा ला अगोदरच एक अटॅक आलेला आहे मी त्यान्हा जास्त फोर्स करून काहीच परत असं काही होवो इच्छत नाही.

रडत रडत मला तिथून निघून जाऊशी वाटत होत.. रामच बोलणं ऐकून मला एवढं समझल होते कि मी आता त्याला काहीच बोलू नाही शकत आणि माझ्या समझवल्या वर पण तो काहीच ऐकणार आंही आहे.

अचानक खूप जोरात पाऊस येऊ लागतो..
त्या नंतर मी एक सेकेंड पण न काही विचार करता तिथून निघून जाते. भिजत भिजत मी माझ्या ऍक्टिवा जवळ पोहचते, मला वाटत होत की राम येणार मला बोलवायला तो म्हणणार अंजली नको जाऊ थांब पाऊस थांबू दे, नंतर जा..
पण असं काहीच नाही झालं आणि त्याने मला जाऊ दिल.

मी तिथून निघाली आणि समोर जाऊन पूल खाली उभी राहली.. खूप रडू सुध्या येत होता. डोक्यात रामचे सर्व गोष्टी फिरत होत्या, मी काय करू शकते आता विचारात उभी असते. पाऊस आणखी जोरात येऊ लागला. मी राम च्या आईला कॉल करून नोलायचा निर्णय करते. पण घरी पोहचन जरुरी होत तर मी रस्त्याने निघते घरी जायला आणि घरी पोहचून कॉल करते.

त्याचा नंबर माझ्या कडे नसतो पण राशी राम ची खूप जुनी मैत्रिण असल्या मुले मी राशी कडून रामचा बाबाचा नंबर घेते.
मी त्यान्हा कॉल करते आणि माझ्या कडून रडणं बंद नव्हता होत.
रामचे बाबा कॉल रेसिइव्ह करतात आणि मी त्यान्हा काकू कडे फोन द्यायला सांगते.
रामच्या आईला मी विचारते कि जे राम म्हणत आहे ते बरोबर आहे का ??
त्या मला हो म्हणतात.
त्यांचे ते वाक्य ऐकून खूपच वाईट वाटते मला. त्या सुध्या मला समझवायला लागतात माझ्या एकाच मुलगा आहे मी माझ्या मुलं आणि पुढच्या भविष्याचा विचार करून अंजली सांगत आहे. अंजली बेटा तू पण लहान नाही आहे तू मला समझू शकतेस.

मी फोन ठेवायच्या अगोदर त्यान्हा एकच प्रश्न करते कि "जर तुमच्या मुलीला असं असता तर तुम्ही काय केलं असत"
त्या मला म्हणतात कि "आम्ही तीच लग्न नसता करून दिल"
त्यांचं तेवढं ते ऐकून मी फोन ठेवते.

माझ्या कडे बोलायला काहीच नव्हता रामचे आणि त्याच्या आईचे वाक्य सर्व बोलणं सारखं होत. रामने मला जे काही सांगितलं होत ते सर्व बरोबर होत.
तो काहीच खोट नव्हता बोलला. मला एवढं कळलं होत तेव्हा कि राम ला काहीच मी समझवु नाही शकत आणि तो त्याच्या आई बाबा समोर काहीच नाही करणार. तेव्हा मी शांत राहून एकच निर्णय केला कि मला आता पुढे काहीच बोलायचं नाही आहे रामशी.
आणि मी जो राम पाहिला होता एका बुक मध्ये तो कोणी दुसरा होता. रामचे ते बुक मधली स्टोरी पण मला आता खोटी वाटू लागली होती. त्याचे ते लिहलेले बुक मधले सर्व खोटं खोटं होत..
ते एक फेक स्टोरी वाटू लागली होती. मला फक्त आता एवढं कळलं होत कि रामच्या बुक मधलं थॅलॅसेमिया विषय लिहणारा कोणी दुसरा राम होता आणि माझ्या समोर जो आहे तो कोणी दुसराच होता.

मित्रानो हि एक माझ्या जीवनातील रिअल स्टोरी आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे कि राम सारखे लोक आहेत. जे लिहतात काही आणि रिअल जीवनात ते नसतात.

कथा वाचून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

अंजली