मला ते ऐकून धक्काच बसला, "घरी आहेस तर फोन का नाही केलास तू? " मला काहीच समजत नव्हते. मनात कित्येक शंकानी घर केले होते. रागवून तिला म्हणालो. तिला कदाचित समजले नसेल मी रागात बोललो. ती तेवढ्याच प्रेमाने, "अरे राजा आजच आले मी घरी " . तिच्या ते राजा म्हंटल्यावर मी मेणबत्ती सारखं वितळलो.. का कुणास ठावूक स्त्रियांच्या अश्या बोलण्याने माणसे वितळत असतिल. जगातल्या सगळ्या पुरुषांच्या बाबतीत असच होत असेल का? ... भले रती महारती यांना जे वाटत असेल तसा भास मला झाला. नंतर दररोज बोलण सुरू झाल. तो अनुभव माझ्यासाठी वेगळाच.कधी कधी बोलता बोलता मला जेवायचे भान रहायचे नाही. तासा मागे तास व दिवसा मागे दिवस जाऊन एक महिना झाला. तिकडे तिच्या कॉलेजलाही सुट्टी लागल्याने ती तिच्या घरीच होती. एक दिवस ती मला म्हणाली की तिला तिच्या आईचा खूप राग आला आहे. मी त्याच कारण विचारल्यावर तिने तिच्या लग्नाच्या गोष्टी चालू असल्याच सांगितलं. मला एक गोष्ट लक्ष्यात येत नव्हती कि हिला फक्त 21 वर्ष पूर्ण झालेल असताना घरातले इतक्या लवकर हिच्या लग्नाच्या का मागे लागलेले आहेत.
मला एक गोष्ट कळत नाही कि मुलींच्या घरचे त्यांच्या लग्नाच्या मागे का लागतात. फक्त एक मुलगा बघितला लग्न लावून दिले कि झाले का? त्या मुलावर आपली मुलगी अवलंबून ठेवण्यापेक्षा आपल्या मुलीलाच जास्त शिकवून आपल्या पायावर उभा का करत नाहीत? कुणास ठावूक का असे करत असतील.
सरप्राईज
एक दिवस सकाळी मला फोन आला अर्थात तो तिचाच होता. मला तरी तिच्याशिवाय कोण होते आई बाबा गेल्यानंतर. मी फोन उचलताच तिची विचारपूस केली. ती मला म्हणाली, "ती मला म्हणाली तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे."…..
मला आता या गोष्टीची सवयच झाली होती कारण मुलींची प्रत्येक गोष्ट ही त्यांना सरप्राईज वाटते. मी दरवेळी विचारतो तसा तिला उत्सुकतेने सरप्राईज बद्दल विचारले. मी आपल्याबद्दल आईला सांगितल अस ती म्हणाली व मी तुझ्याशीच लग्न करेल हे सुद्धा सांगितलंय बर का ! ….हे ऐकून मी स्तब्ध झालो. आता सरप्राईज या गोष्टीची मला भीती वाटू लागली. स्वताच्या मनाला म्हणालो, "आपण अजून एकमेकांना धड ओळखत नाही. फक्त दीड महिन्यापासून फोन वरच काय ते बोललो असेल, त्यात हॉस्पिटल सोडले तर प्रत्यक्ष एकदा सुद्धा प्रत्यक्ष भेट नाही. त्यात मी पडलो एकटा, काहीच सेव्हिंग नाही. आई बाबा गेल्यानंतर जेवढी होती, तेवढी शिक्षणासाठी खर्च केली. आता कुठे एक नोकरी लागली. काय करावे काही सुचत नव्हते नाही बोलाव तर ही घरी आईला सांगून बसली आहे. मला काही सुचत नव्हते मी तिला तिच्या आईकडे फोन द्यायला सांगितला.
माझी पाहिलीच वेळ होती तिच्या आईशी बोलण्याची मी बोलायला काही सुचत नसल्याने खोकत खोकत म्हणालो, "काकू मी तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. पण माझी काही स्वप्न आहेत, मला यासाठी काही वेळ हवा आहे मी आताच तयार नाही. " मी माझ्या घरात माझ्या व्यतिरिक्त कोणीही नसल्याची कल्पना दिली. सपनाची आई म्हणाली, "मी पण हिला हेच सांगते घाई करू नका एवढ्यातच, दीड महिन्यात अजून तुम्ही एकमेकांना ओळखत देखील नाहीत, एकमेकांना समजून घ्या, मग करा हव तर. " तिच्या आईशी पहिल्यांदा बोलून खूप समाधान वाटले पण त्याच बरोबर सपनाचा राग व आततायीपणाची कीव आली.
(चालू वेळ)
तेवढ्यात सूरजचा फोन वाजतो. पलीकडून सागर “सपना शुद्धीवर आली का ?” या बद्दल विचारतो. सूरज त्याला ती अजून शुद्धीवर न आल्याचे सांगतो. बोलून झाल्यावर सूरज फोन ठेवतो." एक तास कसा गेला समजलंच नाही", सूरज घड्याळाकडे बघत म्हणतो.
निशा रागाने म्हणते तुमच लग्नापर्यंत गेलेल्या गोष्टी तू माझ्यापासून लपवल्या. ही गोष्ट तुमच्यासाठी मोठी नसेल पण माझ्यासाठी खूप मोठी आहे. कोणतीही स्त्री आपल्या पतीला कोणासंगे वाटून घेण्यासाठी कदापिही तयार होणार नाही. निशा रागाने सूरजला म्हणते, "तुम्ही लोक समजत काय असता स्त्रियांना, तुम्हाला काय आम्ही खेळण वाटतो की काय." सूरज तिला पाणी देतो व सांगतो शांतपणे ऐकून घे गोष्ट अजून संपलेली नाही तुला मी काय सांगितले होते पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नकोस, पूर्ण ऐक आधी.
इतक्यात बेडरूम मधून सपनाचा आवाज येतो .अचानक काय झाले हेआहे हे बघण्यासाठी दोघे बेडरूम च्या दिशेने धावत जातात.सपना आतमधे घामाघूम झालेली असते..घामाच्या धारा वाहून ओलेचिंब झालेली सपना. आतमधे सपना बेशुद्धावस्थेत काही तरी बडबडत असते . संजय... संजय....व परत शांत होते. ते दोघे परत हॉल मध्ये येतात.
तेवढ्यात सूरजचा फोन वाजतो. पलीकडून सागर “सपना शुद्धीवर आली का ?” या बद्दल विचारतो. बोलून झाल्यावर सूरज फोन ठेवतो." एक तास कसा गेला समजलंच नाही", सूरज घड्याळाकडे बघत म्हणतो.