"अग मी का सोडून जाऊ तुला आणि रागवायचे कशाला. हा आता तू तुझ्यासोबत झालेला प्रसंग नाही सांगितलास म्हणजे अस तर नाही होत ना की मी हे नातं संपवाव. कदाचित ती योग्य वेळ आलीच नसावी की तू तुझ्यासोबत झालेला तो वाईट प्रसंग मला सांगावास. माहीत आहे वाईट प्रसंग सांगायला ही हिम्मत लागते. आणि आपलं नात एवढं ही ठिसूळ नाहीये की या छोट्या मोठ्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम हॊईल. मी तेव्हा ही तुझ्यासोबत होतो आता ही आहे आणि कायम राहील..."
"मी तेव्हा ही प्रेम करत होतो, आता ही करतो आणि यापुढे ही काहीही झालं. कितीही वाईट प्रसंग येउदे मी तुझ्यावर तेवढच प्रेम करेन. कारण मी तुझ्या शरीरावर नाही तर तुझ्या आत्म्यावर प्रेम करतो." हे बोलत असताना माझा बांध सुटला आणि मी धावत जाऊन निशांतला बिलागले. काय पुण्य केलं की एवढा समजुदार आणि प्रेम करणारा साथीदार मला मिळाला. देवाचे खुप आभार मानले. त्या दिवशी मी निशांतला काही घरी जाऊ दिले नाही. तो दिवस निशांत माझ्याच उशाशी बसून होता...
सकाळी लवकर जाऊन फ्रेश होऊन परत चांगल्या मुड मध्ये तो माझ्या समोर उभा होता. त्याची ती हॅपी फेसवरची स्माईल बघून मी देखील खुश झाले आणि माझा दिवस सुरू झाला... काही दिवस मला सारख वाटतच की देवांश परत आला तर....!! रात्रीची झोप उडाली होती. कोणत्याही अनोळखी नंबरने फोन आला तरी मी घाबरून तो कॉल घ्यायचे ही नाही. एवढी भीती मला वाटायला लागली होती.. रात्री दचकुन उठण तर सवय झालेली म्हणून आता आई माझ्या सोबत झोपायची...
अशीच एकदा झोपेतून दचकुन उठले आणि सहज नजर एका कोपऱ्यात गेली... तर तिथे कोणी तरी उभं होत आणि ती सावली पूढे सरकत आली. मी चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होते. पण अंधार असल्याने त्याचा चेहरा काही दिसत नव्हता. पण ती सावली जसजशी पुढे आली खोलीतल्या दिव्याच्या प्रकाशात त्याचा चेहऱ्या दिसला आणि तो अजून कोणी नसुन देवांश होता.. मी जोरात ओरडले. तर ते स्वप्न होत. आईने धावत जाऊन लाईट लावली आणि टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास मला दिला.. माझ्या चेहऱ्यावर भीती साफ दिसून येत होती.
पुढेच काही दिवस मला होणाऱ्या भासामुळे आई-बाबांनी मला सायकॉलॉजीस्टकडे नेलं. त्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंट नंतर मला रात्रीचे होणारे भास कमी होत गेले. कोर्टात केस ही चालु होती. पण काही कारणांमुळे आम्हाला तारीख न मिळाल्याने आमचा निकाल काही लागत नव्हता. आणि तो दिवस.
आम्हाला काही दिवसांनी आमच्या वकिलांचा फोन आला आणि आम्हाला तारीख मिळाली ही आनंदाची बातमी त्यांनी आम्हाला दिली. कोर्टात केस सुरू झाली आणि पुराव्या शकत देवांश ला आमरण कैद झाली. त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे असल्याने त्याला तो गुन्हा स्वीकारावा लागला. मला त्रास देणं आणि हर्षलचा खुन करने. अशा गुन्ह्यात त्याला आमरण कैदी झाली. निकाल आमच्या बाजूने लागला असल्याने आम्ही सगळेच खुश झालो. पण त्याला घेऊन जाताना तो ओरडून फक्त एवढंच बोलत होता...
"प्रांजल मी परत येणार... तुला घेऊन जायला मी परत येणार... तु फक्त माझी आहेस.....!!" पूर्ण कोर्ट त्याच्या आवाजाने भरून गेलं. मी तर माझे दोन्ही कान आपल्या हाताने झाकून घेतले होते...
आम्ही निघताना ही त्याच्या वडिलांनी परत एकदा माझी आणि माझ्या घरच्यांची माफी मागितली आणि आम्ही निघालो.
आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी आम्ही सगळे गणपतीच्या मंदिरात गेलो. आणि सुरू झाली नवीन सुरुवात.., नवीन आयुष्याची.....
पण हे आयुष्य एवढं ही सोपं नसतं बाबूमोशाय...
to be continued.....
(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे..)
स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.