Two points - 4 in Marathi Fiction Stories by Kanchan books and stories PDF | दोन टोकं. भाग ४

The Author
Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

दोन टोकं. भाग ४

भाग ४

विशाखा घरी येऊन आवरून पटकन झोपून गेली. एकटीच राहत होती, घरी काम करायला आणि जेवण बनवायला काकु होत्या. त्याच सगळं काम करायच्या. त्यांनी बनवलं की खायचं नाहीतर उपाशी झोपायच. कारण तीला काही बनवताच येत नव्हतं, ना कोणी शिकवलं आणि ना कधी हीने शिकण्याचा प्रयत्न केला.
स्वभावही तसाच चिडचिडा आणि रागीट पण एकदम बिनधास्त. रागाला आली की मग समोरच्याच काही खरं नसायचं. तीला तीच्याच आश्रमातल्या मुली घाबरायच्या.

तेच त्याच्या विरुद्ध सायली..... स्वभावाने नेहमी हसरी, शांत, कधीच रागाला न येणारी, घरातील प्रत्येक काम करणारी. प्रत्येकाशी मिळून मिसळून राहणारी. पण नेहमी वडिलांच्या धाकात वावरणारी, सतत मनावर त्यांचं दडपण घेऊन जगणारी.‌
उद्या दिदीला डिस्चार्ज देणार म्हणल्यावर तीला जायचं होतं पण त्या डॉक्टरला आठवून परत cancel केलं जायचं.
" उद्या जा दवाखान्यात आणि दिदीसोबत जा तिच्या घरी थोडे दिवस. "

" हॉस्पिटलला नको. डायरेक्ट घरीच जाते. "

" का ?? हॉस्पिटलला का नको. तिच्या सासरचे ओरडतील परत, की हाताखाली दवाखान्यात का नाही पाठवली म्हणून आणि तीच सामान तु घेशील ना. दोन्ही दोन्ही ती कसं बघेल. जा गुपचुप ".

किती दिवस असं सगळ्यांना घाबरून रहायचं काय माहिती, हिच्या घरचे असं म्हणतील, तिच्या घरचे असं म्हणतील... श्या......
" बघ कितीही शिव्या दिल्या तरी जावं लागणार आहे. " आईने लगेच सांगितलं.

" मी का शिव्या देऊ 😟. मी नाही देते शिव्या. "

" मग काय पुटपुटत होतीस. "

" काही नाही. सकाळी लवकर जाईन म्हणजे तीच्या घरी पण लवकर जाता येईल. " बर आहे तेवढंच त्या डॉक्टर यायच्या आत सटकता येईल असा विचार करून ती झोपली.



पण तीला भेटायचं म्हणून विशाखा लवकर उठून पटापट आवरून हॉस्पिटलला आली.
आल्या आल्या पंडितने अडवल.
" गुड मॉर्निंग मॅम ☺️ " मस्त स्माईल देत तो म्हणाला.

" अं.... हो गुड मॉर्निंग " आपल्याच धुंदीत असताना मध्येच त्याने विचारल्याने तीने उत्तर दिलं.

" आज सकाळी लवकर कसं काय " त्याला कल्टी देऊन सटकायच्या आधीच त्याने प्रश्न विचारला.

" का, येऊ शकत नाही का ??? 🤨 " त्याच्याकडे एक लूक देऊन ती म्हणाली. यामुळे तो चांगलाच गडबडला.

" नाही...... तुमचचं हॉस्पीटल आहे, कधीही या. " म्हणत पटकन तिथून निघाला. " बर झाल चिडायच्या आधीच निघालो. नाहीतर सकाळ माझ्या अंगावर आली असती 🤦🏻‍♂️ " बडबडत जातचं होता की समोरून येणाऱ्या सायलीला धडकला.

" ओह सॉरी. मला दिसलचं नाही. "

" It's okk. " म्हणून पुढे निघून आली. " अरे यार शिट...... ह्याला विचारायला पाहिजे होतं की त्या डॉक्टर आल्यात का म्हणून. पण जाऊदे. असंही आल्याच नसतील. एवढ्या लवकर कोण येत. " असं स्वत:शीच बोलत सायली विशाखाच्याच केबीनसमोरून निघून गेली.

त्याचवेळी विशाखा कॅन्टीनकडे चहा प्यायला गेली होती. चहा पिता पिता एकटीच बडबडत होती,
आता ती येईल ना, मग मी तीला बोलेन. पण असं अचानक जाऊन काय बोलणार, म्ममममम् हाय मी विशाखा...... अर्रररर त्यादिवशी तर नाव सांगितलं ना, मग परत नाव सांगुन माती खायची का 🤦🤦........... नाही नाही. आता डायरेक्ट बोलायचं. पण काय बोलायचं राव.

इकडे सायली पटपट सगळं बॅग भरत होती. तीलि डॉक्टर यायच्या आत पळायचं होत. तेवढ्यात तीला दिदीने हाक मारली आणि कॅन्टीनमध्ये चहा आणायला पाठवलं.
जाता जाता पण सायली स्वत:शीच बडबडत होती, आता पटकन चहा आणावा आणि त्या मॅडम यायच्या आत निघाव‌ लागेल. एकटीच बडबड करत तिथं पोहोचली आणि तीथेच थांबली. अरे देवा 🤦. मला वाटलं ह्या अजून आल्याच नसतील पण ह्या तर इथेच बसल्यात 😟. कसल्या भारी राहतात राव ह्या एकदम टकाटक, नाहीतर मी 😖. अं......... ज्याच्यापासून पळालं तेच समोर यावा. चला सायली मॅडम आता, आलीया भोगासी असावे, असावे... काय आहे पुढे, मरू दे......

सायली तशीच पुढे निघून गेली पण विशाखा ने अजूनही तिला आलेलं बघितलं नव्हतं. ती मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसली होती. तेवढ्यात तिला सायलीच आवाज आला पटकन मान वर करून बघितलं तर समोर कोणच नव्हतं परत मागे वळून बघितलं तर तिथे सायली चहाची ऑर्डर देतो होती. तीला बघून विशाखा भलतीच खुश झाली ☺️☺️.

सायली ऑर्डर येईपर्यंत इकडे तिकडे बघत होती पण कटाक्षाने विशाखा कडे बघायचं टाळत होती तर विशाखा कधी ती आपल्याकडे बघतीये आणि आपण तिला हाय करतो याची वाट बघत होती. इकडे तिकडे करता करता शेवटी नजरानजर झालीच. विशाखा ने तिच्याकडे बघून smile केलं आणि त्यामुळे सायलीला पण करावं लागलं. असंही ऑर्डर यायला वेळ होता तोपर्यंत तिच्याशी गप्पा माराव्यात म्हणून सायली चालत चालत विशाखा कडे गेली.

" हाय. आज कसं काय ?? " विशाखाला माहिती होतं तरीही तीने विचारायचं म्हणून विचारलं.

" दिदीला डिस्चार्ज देणार आहेत ना म्हणून आले. "
अरे ह्यांना माहिती नाही का ?? 🤔. हां, आता एवढा व्याप सांभाळतात म्हणल्यावर कसं काय लक्षात राहिल.

" अरे हो बरोबर. बस ना इथे. " समोर हात दाखवत विशाखा म्हणाली. पण सायलीच्या डोळ्यात हरवून गेली. कसले भारी डोळे आहेत यार हिचे, एकदम पाणीदार आणि काळे भोर...... काश माझे असे असते..... 😟.

आणि विशाखा एकटक बघत असल्यामुळे सायली अवघडली होती. यार कसल्या भारी राहतात ह्या, आणि आता तर एकटक माझ्याकडे बघतायत. पक्का विचार करत असतील की किती खराब राहते ही पोरगी, एकदम काकुबाई टाईप आणि दिसायला पण भंगार 😖
तीने मान खालीच घातली होती आणि स्वत:शीच विचार करत बसली होती. हळूच नजर वर करून बघितलं तर विशाखा अजूनही तिच्याकडेच बघत होती.
देवा...... ह्या तर माझ्याकडेच बघतायत. मी काय करू, उठून जाऊ का ??? नको नको, असं मधेच उठलं तर काय वाटेल की किती उद्धट आहे, मी समोर बसले आणि उठून निघून गेली 🤦🤦.

" एवढा काय विचार करतीयेस 🤨 " सायली स्वत:तर हरवलेली बघून विशाखाने विचारलं.

" काही नाही. सहज असंच आपलं ☺️ " गडबडून सायली पटकन म्हणाली.

" बरं. "
यार मला तर अजून बोलायचं होतं पण काय बोलुन. ही तर जेवढ्यास तेवढंच उत्तर देतीये. बोलायला आवडत नसेल का ?? हां आता अनोळखी व्यक्तीसोबत बोलता येत नसेल. पण तरीही यार थोडसं बोलायला काय जातंय 😖😖😖. यार ही काहीच बोलत नाही, हीला आवडत नसेल का बोलायला ...... असेल तसं.

चहाची ऑर्डर आली तसं सायली उठून निघून गेली. इकडे विशाखा मॅडम मात्र विचारच करत बसल्या होत्या.
यार ही तर निघून पण गेली 😨😨😨. कसं कसं बोलणार मी आता. ती बोलतच नाही मला. जाऊदे आता मी पण लक्ष नाही देणार. अज्जिबात नाही देणार. मी उगच एवढ बोलायचं बोलायचं करतीये पण तीच्याकडून तर बघितलच नाही. तीला बोलाव वाटत का ?? तीला मैत्री करायची आहे की नाही ते पण नाही विचारलं. आणि मी बोलायला लागले तर तीला काय वाटेल, ओळख ना पाळख तरी उगच चिटकायला येतीये. नाही नाही नाही नाही, आता नाही उगच लांबट लावायचं. चला आपल्या कामाला लागा विशाखाबाई.

कॅन्टीनमधून जाताना बघितलं तर सायली निघून गेली होती आणि तो पेशंट पण. आता तो वॉर्ड रिकामाच होता. कितीही लक्ष नाही द्यायच म्हणल तरी जाता जाता विशाखा ने तिकडे नजर टाकलीच होती. तशीच केबीनमध्ये गेली. आणि कामात बुडून गेली.

इकडे सायली दिदीला घेऊन तिच्या घरी गेली. सगळं सामान नीट ठेवलं, पिलुला झोपवलं आणि परत आपल्या घरी यायला निघाली. बसमध्ये पण तिचाच विचार करत बसली होती. मी चुकीचं केलं का ?? म्हणजे असं वाटतं होतं की त्यांना बोलायचय माझ्याशी पण मी जास्ती बोललेच नाही. असं नाही की मला बोलाव‌ वाटत नाही पण त्यांना कसं बोलणार मी. त्यांना बोलावंसं पण वाटत आणि बोलावंसं वाटत पण नाही. म्हणजे असं कळतच नाही की काय होतंय. म्हणजे मागे असं वाटतं की खुप बोलाव पण समोर गेलं की तोंडातून शब्दच बाहेर येत नाहीत. अं........‌ 😖😖😖 काय बडबडतीये मी, माझं मलाच कळत नाहीये.

उतरून घराकडे निघून गेली. घरात गेली तसं सगळे विचार बाजूला करून परत आपल्या कामाला लागली.
इकडे विशाखा हॉस्पिटलमधून घरी आली आणि आवरून टिव्ही बघत बसली. लक्ष त्यात घालायचा प्रयत्न करत होती पण तरीही सकाळचचं आठवत होतं तिला.

कसं असतं ना आपलं मन, एखादी गोष्ट कितीही आठवायचा नाही म्हणलं तरीही ते आठवतं. उलट अजून जास्त आठवत. नाही म्हणलं तरी सायलीची राहून राहून आठवण यायचीच. किती तरी वेळा तीची पाऊल आपोआप त्या वॉर्डकडे जायची. तीथे दुसरा पेशंट दिसला की मग मनाचा हिरमोड व्हायचा. माहिती होतं की ती येणार नाही इथे तरी उगच विशाखा सतत कॅन्टीनमध्ये जाऊन बसायची. मधे ४-५ दिवस तर पहाटे त्या गार्डनमध्ये पण जाऊन आली होती. पण भेट काही झालीच नाही. आता विशाखा ने पण तो नाद सोडून द्याच ठरवल.

पण तिचं हे वागणं पंडितने चांगलच नोटीस केलं होतं. त्याची खात्री झाली होती की त्याच्या मॅडम प्रेमात पडल्यात पण त्यांच्या ह्या वागण्यामागचं कारण कळत नव्हतं त्याला. बिचारा विचार करून थकला होता 😿.
ते प्रीतीलाही दिसत होतं की तो सतत कुठल्यातरी विचारात होता.

" काय झालं सर.... कसला विचार करताय " प्रीतीने त्याला विचारल.

आधी तर तो काही बोललाच नाही, आपल्याच तंद्रीत होता. पण तीने परत त्याच्या हाताला हलवून विचारलं तेव्हा म्हणाला,
" काही नाही. "

" काय चाललंय हे... इकडे तुम्ही आणि तिकडे विशाखा मॅम. दोघी पण वेगळे वागताय... "

" बघ. म्हणजे तुला पण वाटतंय ना की मॅम बदल्यात " एकदम excited होतं त्याने विचारल.

" हो. म्हणजे वेगळं असं नाही पण कधीही न करणा-या गोष्टी करतायत. आणि असं स्वत:मध्ये हरवलेल्या असतात. जसं की काही विचार करावा तसं.... "

" करेक्ट. मला तर वाटतंय मॅमच त्यांच्या ह्यांच्या सोबत भांडण झालय म्हणून त्या तसं वागतायत. " तो एकदम गंभीर चेहरा करत म्हणाला.

पण प्रीतीला काही कळलंच नाही,
" काय काय काय काय ?? कुणाच्या त्यांच्या कुणाचं काय भांडण झालंय. म्हणजे नेमकं कोण भांडलय 🤔😟 " पुर्ण confuse होतं तीने विचारलं.

" हो असंच आहे. कळलं मला आता.... " एकटच बडबडत तो निघूनही गेला.
आणि प्रीती विचार परत बसली, " नेमकं काय म्हणाले सर 🤔🤔 "