!.....प्रपोज......!
by sanjay kamble
*******************
प्रपोज...
" काळ्या जिभेची कुठली.... तोंड बंद कर नाहीतर बघ......."
मध्यम वयाची महीला कर्मचारी एका पेशंटवर ओरडत होती.. अंगान काहीशी जाड. सावळ्या रंगाची... गोल चेहरा आणी किंचित बसक नाक यामुळे तेच्या नेहमीच रागिट दिसायचे...आवाज तसाच करडा.. हॉस्पीटलच्या शांत वातावरणात तीचा आवाज हॉस्पीटलच्या दुस-या मजल्यावरच्या संपुर्ण वार्डमधे घुमला......
दुपारची कडक उन्हाची दाहकता आता काहीशी कमी होत सुर्य क्षितीजाकडे झुकत चाललेला... पाय-या चढुन हॉस्पीटलच्या वॉर्ड मधुन इन्स्पेक्टर झपाझप पावल टाकत चालत येत होते त्यांच्या मागे दोन हवलदार डोक्यावरची टोपी नीट करत चालत होते. पायातल्या बुटांचा खट्ट खट्ट खट्ट आवाज संपूर्ण वार्डमधे घुमत होता... इन्स्पेक्टर साहेबांच्या सोबत हॉस्पीटलचे प्रमुख डॉक्टर जोशी चालता चालता म्हणाले..
" साहेब मी दोन दिवस मुंबईला होतो.. हैल्युसिनेशन या मानसिक आजारावर एक व्याख्यान आयोजित केलेल आणी मुख्य अतीथी म्हणुन मलाच बोलवलेल...."
त्यांच्या कडे न पहाताच साहेबांनी विचारलं
" बर मग तुम्ही कधी आलात...?"
इतक्यात त्यांच्या कानावर पुन्हा त्याच कर्मचारी स्त्रीचा आवाज पडला
" ए सटवे... काळ्या जीभेची कुठली... अस काहीतरी अभद्र बोलतेस म्हणुनच तुझ्या घरच्यांनी इथ ठेवलय...."
बोलता बोलता ती मागे फिरली आणी आपल्या दिशेने येणाऱ्या साहेबांना पाहुन दचकली... इन्स्पेक्टर तसेच चालत पुढ येत ती कर्मचारी ज्या पेशंटला रागवत होत्या त्या रूमच्या उघड्या दरवाजातुन पाहु लागले... काळोखान भरलेल्या त्या रुममधे कोप-यातुन किलकिल्या डोळ्यांवरच्या चष्म्याच्या पांढ-या काचा तेवढ्याच दिसत होत्या... इन्स्पेक्टर रूमजवळ जात पाहू लागले... एका कोपऱ्यात बसून कोणीतरी पहात बाहेर होत.. बाहेर कोणा व्यक्तीला नाही तर ती नजर स्थिरावली होती आपल्या समोरच्या रूम मधे...
" साहेब.... हीच रूम....." मावशी उद्गारल्या तसे साहेब मागे फिरले
"हम्म... तुम्ही कोण.....?"
" मी इथली वार्डन... 'मावशी' म्हणतात सगळे..." मावशींनी दाखवलेल्या रुमकडे साहेब पाहु लागले.... तो बंद दरवाजा किंचीत उघडला तशी समोरच्या खिडकीतुन मावळतीला गेलेल्या सुर्याची कोवळी किरणे आत पसरलेली दिसली... बाहेरून ती खोली नीट न्याहाळत इन्स्पेक्टर एक एक पाऊल टाकत आत आले... त्यांची पोलिसी नजर सर्वत्र फिरत होती... भिंतीच्या कडेला एक छोटा बेड होता ज्यावर किंचीत रक्ताचे डाग दिसत होते.. समोरील खिडकीच्या पारदर्शक काचा फुटून बाहेरच्या बाजुला पडलेल्या... साहेबांनी खिडकीतुन बाहेर पाहील तर खाली दुरवर काचांचे तुकडे पसरलेले.. इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या हातातल्या त्या छोट्या स्टिक ने खिकडीच दार किंचीत पुढ केल आणी मागे फिरत पुन्हा ती खोली पाहु लागले... फर्शीवर ठिकठीकाणी रक्ताचे सुकलेले डाग पडलेले तर भिंतीवरही रक्त उडालेल.. अचानक साहेबांची नजर एके ठिकाणी स्थिरावली .... कोप-यात... भुवया आकसत ते खाली झुकले... तो मानवी हाताच अर्धा तुटलेल बोट होत.. फॉरन्सिक टीमला नमुने घ्यायला सांगुन ते त्या रुमच्या दरवाजातुन बाहेर पडु लागले तशी त्यांची नजर त्या समोरच्या रूमच्या किंचीत उघड्या दरवाजातुन आतल्या काळोखात दिसणा-या किलकील्या डोळ्यांवर गेली... तसा त्या खोलीतुन आवाज आला..
" अंत झाला शेवटी... पन खरच अंत , की सुरवात... की सुरवात होण्याआधीच अंत.... त्यान मुक्त केल शेवटी... एक बळी देऊन तीला मुक्त केल..."
मावशी रागाने तो दरवाजा बंद करत म्हणाल्या..
" साहेब, ही सुजाता.... काय त्या आजाराच नाव....हालू.... हालू...."
" हैल्युलिनेशन......" डॉक्टर जोशी उद्गारले....
" हा तेच ते.... भुत बीत दीसत म्हणते तीला..... काय पन नमुणे येतात...."
पन त्यांच्या बोलण्याकड लक्ष न देता इन्स्पेक्टर चालत पुढ निघाले...
मावशीची बडबड मात्र सुरूच होती...
"साहेब आमच्या हॉस्पिटलमध्ये येणारे मेंटल भुताखेतान पछाडल्या सारखेच असतात... यांनाच बरी भुतं धरतात.. इतकी वर्षे या हॉस्पिटलमध्ये काम करतेय पण एकदाही मला भुतान धरलेलं नाही.."
चालता चालता साहेबांनी मावशीकडे पाहील आणी भुवया चढवत काही न बोलता चालू लागले... . दोन्ही बाजुला दिसणा-या रुग्णाच्या खोल्या पहात सर्व डाव्या बाजुला मोडकळीला आलेल्या बाथरुमजवळ पोहोचले... तीथ आधीच उभ्या दोन वयस्कर व्यक्ती बाजुला सरकल्या त्यातला एक वॉचमन तर दुसरा त्या मावशीचा नवरा दोघेही हॉस्पीटल च्या आवारात त्यांना बाधुन दिलेल्या खोलीत रहायचे...
इन्स्पेक्टर बाथरूमच्या उघड्या दरवाजातुन आत आले... बाथरूमच्या आतल्या पांढ-या फर्शीवर एक प्रेत पडलेल... त्या प्रेताच्या बाजुलाच पडलेला एक धारदार प्युअर स्टेनलेस स्टीलचा चाकु भिंतीवरील बल्बच्या प्रकाशात चकाकत होता. त्या चाकुच्या धारधार दात-यांमधे त्याच्या मांसाचे बारीक लालसर कण अडकलेले अगदी स्पष्ट दिसत होते. गळा चिरून त्याचा खुन झालेला...त्याच्या जखमेतून भळाभळा वाहणार रक्त हवेच्या संपर्कात आल्यान घट्ट होऊन बाथरूमच्या पांढ-या फर्शीवर पसरलेल... रक्ताचा लाल भडक रंग पांढ-या फर्शीमुळ अधिकच खुपच भडक दिसत होता.. त्याचा एक जाडसर थरच तयार झालेला. रक्तात पुरत भिजुन पालथ पडलेल त्याच शरीर निष्प्राण झाल असल तरी डोळे मात्र सताड उघडे होते... जीव गेला असला तरी एके ठिकानी स्थिरावलेली त्याची नजर काहीतरी इशारा करत होती... प्रेताच्या डाव्या बाजूला भिंतीवरील एका आरशावर त्याची निष्प्राण नजर खिळली होती... इन्स्पेक्टर साहेबांनी समोरच्या आरशाकड पाहील, आरशाच्या त्या काचेवर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहील होत... दोनच शब्द .. अर्धवट संदेश... पन त्या दोन शब्दांच कोड उलगडेना... कदाचीत खुन करून पसार होण्याच्या नादात तो अर्धवट राहीला असावा.. इन्स्पेक्टर त्या प्रेताकड पाहात म्हणाले ..
" खुन करुन खुनी पसार झाला, पन कुणीच पाहील नाही.... वाॅचमन झोपला होता काय...?"
पन सर्व तसेच शांत उभे होते... साहेबांना वॉशबेसीनवर एक मोबाईल ठेवलेला दिसला.. इन्स्पेक्टर साहेबांनी खिशातला पांढरा रुमाल काढुन तो मोबाईल उचचला....
'Sound recorder' ऑप्शन सुरू होत... एक रेकॉर्ड केलेला मेसेज.... मोबाईल फ्लाईट मोडमधे टाकलेला कदाचित साऊंड रेकॉर्ड होताना call येऊ नये यासाठी असावा....
मोबाईल हातात घेत त्यांनी एक नजर सर्वांकडे पाहील... डॉक्टर जोशी शांतपने साहेबांकडे पहात होते तर त्यांचा स्टाफ एकमेकांत कुजबूज करीत होता...
त्यानी तो मेसेज प्ले केला.... तशी सर्वांची कुजबूज थांबली... सर्वच तो शांतपने ऐकु लागले... कदाचीत हा खुन करणा-यानच हा मेसेज ठेवलेला असेल...
एका गुढ शांततेनंतर त्या मोबाईल मधुन एका युवकाचा आवाज येऊ लागला..
क्रमशः.