Ahamsmi yodh - 2 in Marathi Adventure Stories by Shashank Tupe books and stories PDF | अहमस्मि योध: - भाग - २

Featured Books
Categories
Share

अहमस्मि योध: - भाग - २

" समीर..अरे उठ रे बाळा !! " कॉलेज ला नाही का जायचं ?... ये खाली लवकर.. " समीरची आई म्हणाली.

 

"हो..आई उठतोच..पाच मिनिटात तयार होऊन येतो खाली.." समीर उत्साहात बोलला खरा पण बेड वरून उठण्याची त्याची अजिबातच इच्छा नव्हती..समीर तयार होऊन नाश्ता करायला खाली आला..घाई-घाई ने त्याने नाश्ता संपवला आणि कॉलेज ला निघाला.कॉलेज तसं त्याच्या घरापासून लांबच होतं, म्हणून तो बाईक घेऊन जायचा.

 

कॉलेजच्या गेट जवळ दिग्या त्याची वाट बघत होता..समीर येताच तो बोल्ला.."या या शेठ..सुप्रभात.." 

 

"गुड मॉर्निंग..दिग्या.." - समीर गाडी पार्क करत म्हणाला..

 

दोघं ही बोलत बोलत कॅन्टीनच्या दिशेने गेले..

 

"चाचा..एक स्ट्रोंग ब्लॅक कॉफी और एक कटिंग.. ३ नं. टेबल पर... - समीरने कॅन्टीन चालकाला ऑर्डर दिली.."

 

ऐऽऽऽ..सम्या..वडापाव पण सांग ना.."  - दिग्या.

 

"चाचा , एक वडापाव भी भेज देना. " पाकिटातून पैसे काढत समीर त्या माणसाला म्हणला आणि दिग्या समोर जाऊन बसला..

 

" काय रे आज अचानक ब्लॅक कॉफी..रात्री झोप पूर्ण झाली नाही वाटतं" - दिग्या.

 

"हो रे..जरा उशीराच झोपलो.. "- समीर म्हणाला. आणि काल रात्री घडलेला सगळा प्रसंग त्यानी दिग्या समोर मांडला.. तेवढ्यात त्यांची ऑर्डर येते..समीर मोबाईल मधे बघत कॉफी पिऊ लागतो..

दिग्या ही वडापाव वर ताव मारत असतो..आणि मागून कोणी तरी "हाय" म्हणतं...

 

"दिगंबर , तुला बायोच्या नोट्स  हव्या होत्या ना !! " असा एका मुलीचा आवाज आला.ती मुलगी टेबल जवळ दिगंबरशीच बोलण्यासाठी येत होती.तिच्या हातात 2-3 पुस्तकं होती..

 

" हॅलो स्नेहा !! "- दिग्या.

 

पांढऱ्या रंगाचं अगदी साधं  टी - शर्ट कोणतीही अक्षरं किंवा काहीच फॅन्सी डिझाईन नसलेलं निळ्या रंगाची जीन्स आणि पाठीवर छोटीशी बॅग..तपकिरी डोळे, मोकळे सोडलेले केस , गुलाबी गुलाबी ओठ आणि चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारची स्माइल..ती समोर येऊन बसली आणि दिग्या बरोबर बोलू लागली..समीर मोबाईल मध्ये बघत होता पण नजर चोरून तिच्याकडेच पाहत होता..ती दिगंबर बरोबर बोलण्यात गुंग होती इतक्यात तिच्या मैत्रिणी आल्या आणि.."चल बाय, येते मी.." असं म्हणून स्नेहा निघाली.

 

समीर तिच्याकडेच पाहत होता.तिने ही मागे वळुन समीर कडे पाहिलं आणि केसांची बट कानामागे करत परत पुढे चालू लागली..

 

समीर तसा कोणालाही आवडेल असाच होता...धडधाकट, रुबाबदार , उंचपुरा , जिम मध्ये जाऊन बॉडी कमावलेला...कॉलेजातल्या बऱ्याच मुली त्याच्या मागे धावून धावून थकल्या होत्या पण त्याने कोणालाही लिफ्ट दिली नव्हती..

 

"समीर तू सांगून का नाही टाकत तिला..एकदाच विषय संपवून टाक.." - दिग्या.

 

"नाही रे दिग्या.." समीर म्हणाला " तिने नकार दिला तर..मी काय करू.."

 

दिग्याने आपल्या कपाळावर हात मारून संताप व्यक्त केला.. " कठीण आहे यार तुझं..अरे तिला पण तू आवडतोस..तुझ्या वर्गात वाकून वाकून बघत असते तुला..तुझा लक्ष वेधून घेण्यासाठीची तिची धडपड गेली कित्येक दिवस मी स्वतः पाहतोय. " - दिग्या समीरला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता.

 

" बाय...वी विल टॉक अबाऊट धिस लेटर..." हसत हसत एवढं बोलून समीर बॅग एका खांद्यावर लाऊन निघून जातो..

.

.

.

संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर समीर घरी जायला निघतो..पार्किंग मध्ये त्याच्या गाडी जवळ त्याला चिठ्ठी सारखं काहीतरी ठेवलेलं दिसतं. तो इकडे तिकडे बघतो आणि चिठ्ठी खोलून वाचतो.

 

" देवधर सावध हो...काहीतरी अघटीत होणार आहे.. "

 

असं मजकूर त्या चिठ्ठीत लिहलेलं होतं..प्रथम

समीर गोंधळून गेला.. " मला असा संदेश कोणी पाठवला असेल.." तो स्वतःशीच बोलू लागला. "  कॉलेज मधूनच कोणीतरी आपली मस्करी करत असेल.. हो...असचं असेल..!! " असं म्हणून त्यांनी तो कागद फेकून दिला आणि घरी जायला निघाला... घरी पोहचल्यावर तो फ्रेश होऊन त्याच्या खोलीत बसलेला तेवढ्यात..त्याच्या मोबाईलची रिंग वाजते..समोरून दिग्याचा फोन आलेला असतो..

 

"हॅलो..सम्या..काय रे..आज न भेटताच निघून गेलास.. सगळं ठीक आहे ना.." - दिग्या

 

"हो..हो..आज जरा कंटाळा आलेला रे..- सम्या.

 

" ते जाऊदे..आपल्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे... - दिग्या.

 

" काय " - समीर जरा दचकून म्हणाला.

 

"मी येतो तुझ्या घरी..मग आपण सविस्तर बोलू.." - दिग्या.

 

हो चालेल.. - सम्या.

 

थोड्याच वेळात दिग्या समीर च्या घरी पोहोचतो.. दोघांची अभ्यासा विषयी काहीतरी चर्चा चालू होती.. आता रात्रीचे आठ वाजून गेले होते..दिगंबर घरी निघण्याची तयारी करतो..

 

" चल सम्या..उद्या येईन मी सकाळी..मला काही धडे समजावून सांग.. " - दिग्या.

 

" बाय , नीट जा.." - सम्या.

 

दिग्या गेट जवळ जातो..तेव्हा त्याला दत्तु काका घाई घाई ने येताना दिसतात..

 

" काय.. दत्तु काका कसे आहात.." दिग्या.

 

दत्तू काका त्याच्या कडे बघतात पण काहीच न बोलता लगबगीने निघून जातात..

" काय माणूस आहे हा..जाऊदे.." दिग्या मागे वळून दत्तू काकांना जाताना बघत म्हणतो..

 

दुसऱ्यादिवशी समीर आणि दिग्या अभ्यास करत असतात..सकाळची संध्याकाळ होते. दिवसभर अभ्यास करून कंटाळा आलेला असतो..म्हणून ते गच्ची वर मोकळ्या हवेत जातात..तिथून त्यांना दत्तू काका लॉन मधे काम करताना दिसतात.

 

"सम्या..हे तुमचे दत्तू काका... मला ठीक दिसतं नाही रे.. " - दिग्या.

 

" असं का बोलतोय तू.. " - सम्या.

 

" अरे माहीत नाही..पण जरा विचित्र वागतात... त्यांचा स्वभाव आधी सारखा राहिला नाही.. आजोबा गेल्या नंतर त्यांना धक्का लागणार हे साहजिक आहे...तरी पण मला..

 

" साहेब.." समीर दिग्याच बोलणं अडवत म्हणाला.

" हा शुद्ध वेडेपणा आहे..आपण अभ्यासाकडे लक्ष दिलं तर ते जास्त फायद्याचं ठरेल नाही का.." समीर हसतच म्हणाला..आणि दोघं खाली निघून गेले..

 

*************************************

 

या गोष्टीला २-३ महिने उलटून गेले..समीर आणि दिगंबर ची वार्षिक परीक्षा ही उत्तम रित्या पार पडली होती..एव्हाना समीर ला जंगलात घडलेला प्रसंग आणि ती मिळालेली चिठ्ठी या दोन्ही गोष्टींचा विसर पडलेला असतो..सगळे कॉलेज च्या ' सेंड ऑफ ' च्या तयारीत व्यस्त असतात..समीर आणि स्नेहा मधे ही जवळीक वाढू लागली होती..खरंतर त्या दोघांपेक्षा इतर मित्र मैत्रिणींना त्यांच्यात काहीतरी लफडं सुरू आहे असं वाटू लागलं होतं..दोघांनाही याची कल्पना होतीच.. पण कोणी पुढाकार घेत नव्हतं. पण ' सेंड ऑफ '  चा  दिवस निमित्त ठरला.

 

आज समीर कार घेऊन कॉलेजला आला होता .सगळे मित्रमैत्रिणी जमले होते.सगळे फोटो काढण्यात व्यस्त होते. पण समीर स्नेहा ची वाट पाहत होता.

 

स्नेहा समोरून चालत येत होती. एक दोन मिनिटं समीर तिच्याच भावविश्वात रमून गेला होता. काळया रंगाची साडी आणि लाल ब्लाऊज मधे ती खूप गोड दिसत होती.सोडलेले केस आणि पुढे येणाऱ्या बटा सारख्या बाजूला सावरत ती जशी जवळ आली..तसा समीर भानावर आला.

 

प्रिया , वर्षा यांनी तिचं खूप कौतुक केलं स्नेहानेही त्या दोघींचं कौतुक केलं. कार्यक्रमांना सुरुवात देखील झाली होती. समीर मुद्दाम स्नेहाच्या बाजूला येऊन बसला.तो काही बोलणार इतक्यात..

 

"सम्या तू सांगितलं नाहीस मी कशी दिसतेय ते ? " - स्नेहा.

 

" अगं , खुप छान दिसतेस.खरतर मी केव्हाच सांगणार होतो.पण यू नो ना..मग हे सगळे आपल्याला चिडवायला लागतात म्हणून नाही बोल्लो. " - समीर.

 

" तुला नाही आवडत का आपल्याला चिडवतात ते ? " - स्नेहा.

 

" नाही गं , तसं नाही , मी तुला काय वाटेल याचा विचार करतो. " - समीर.

 

" मी नाही लक्ष देत , आपल्याला काय वाटतं हे महत्वाचं " - स्नेहा.

 

स्नेहाच्या एकांदर बोलण्यावरून समीर एकदम भांबावून गेला होता काही बोलायची त्याची अजिबात हिम्मत होत नव्हती. कार्यक्रमात एका गाण्यावर सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली होती. स्नेहाला साडी मुळे मनसोक्त नाचणं शक्य नव्हतं. ती सर्वांमधून हळूच बाहेर गेली. समीर ही तिला कंपनी म्हणून तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला.तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. 

 

समीर ने हिम्मत करून तिला सांगायचं ठरवलं -

" स्नेहा ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचं होतं . "

 

" हमम बोल.." - स्नेहा.

 

" स्नेहा , आय.... "

तो काहीतरी बोलणार त्याच वेळी त्याची नजर एका झाडा मागे लपून असणाऱ्या एका व्यक्ती वर पडली  खरं वाटत नव्हतं पण कोणीतरी त्याचा मागोवा घेत आहे ही जाणीव त्याला लख्ख झाली.

" स्नेहा , मी आलोच.." - समीर त्या झाडाच्या दिशेने जाताना म्हणाला..

 

" काय झालं समीर ? " - स्नेहा.

 

पण समीर काहीच बोल्ला नाही..तो जसजसा जवळ जात होता तसतसा  त्या व्यक्तीने हालचाली करण्यास सुरवात केली आता तो बाहेर पळायला लागला..समीरही त्याचा पाठलाग करू लागला.. समीरला बाहेर पळत जाताना पाहून दिगंबर ही त्याच्या मागे गेला..तेवढ्यात एक कार मागून वेगात आली आणि  तो माणूस घाईघाईने कारमध्ये बसला आणि हवेत धूर सोडत ती कार निघून गली .थकून गेलेला समीर गुडघ्यावर हात ठेवत आणि जोरात श्वास घेताना कारकडे पाहत राहिला.

 

अंधार असल्यामुळे गाडीचा नंबर - " MH 08 AW.... " एवढचं त्याच्या नजरेस पडलं होतं.

 

" समीर काय झालं कोण होता तो माणूस ? " मागून आलेल्या दिग्या ने विचारलं .

 

" काय माहित पळून गेला साला.. "  - समीर.

 

" चल जाऊ आपण सगळे काळजी करत असतील.." दिग्या समीरच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. दोघं कॉलेजच्या ग्राउंड मधे परत येतात.   सगळे समीरची विचारपूस करतात. आता रात्रीचे अकरा वाजत आले होते . 

 

" स्नेहा , चल मी तुला ड्रॉप करतो..दिग्या पण आहेच सोबत मी त्याच बाजूला चाललोय.." - समीर.

 

" ओक्के " - स्नेहा.

 

सर्व मित्र मंडळींचा निरोप घेऊन समीर , दिग्या आणि स्नेहा निघाले..

निर्मनुष्य रस्ता.. काळ्याकुट्ट अंधाराला छेदत आणि शांततेचा भंग करत समीरची गाडी चालत होती... थोड्याच वेळात स्नेहाच घर आलं . ती शिक्षणासाठी तिच्या मामाच्या घरी राहत होती..

स्नेहा गाडीतून उतरून समीर च्या जवळ आली " कोण होता तो माणूस.. असं तुझ्या वर पाळत का ठेवत होता.. सांग ना रे..मला काळजी वाटतेय खूप.." - स्नेहाच्या बोलण्यातून तिची समीर बद्दलची चिंता स्पष्ट दिसत होती.

 

" खरंतर मला पण माहित नाही..पण तू काळजी करू नकोस.." - समीर.

 

" ओक्के बाय.. टेक केअर.. गूड नाईट.. गुड नाईट दिगंबर..नीट जा.." - स्नेहा.

 

स्नेहाला सोडून समीर आणि दिग्या पुन्हा गाडीत बसले आणि निघून गेले.

" दिग्या ऐक ना..ते डोळे..ती भेदक नजर या आधी ही मी पाहिली आहे..तुला आठवतंय आपण जंगलात गेलो होतो तेव्हा ती झाडावरची आकृती..मला खात्री आहे की हाच तो माणूस असावा. " - समीर गंभीर स्वरात म्हणाला.

 

" काय बोलतोस..तुला नक्की आठवतंय का..? " दिग्या ने कुतूहलाने समीर कडे बघत त्याला विचारलं.

 

" हो..मला लख्ख आठवतंय.. " - समीर.

 

" समीर हे प्रकरण काहीतरी गंभीर वाटतंय...तू सांभाळून राह.." - दिग्या.

 

" दिग्या , काही महिन्यांपूर्वी मला एक चिठ्ठी मिळाली होती कॉलेजमधे. त्याच्यावर ही सावध राहायचं संदेश होता. हा केवळ योगायोग नाही. काहीतरी दडलंय यात ".. - समीर.

 

" कसली चिठ्ठी..आणि तू मला आता सांगतोय.." दिग्याच्या आवाजात नाराजीची झलक होती.

 

" अरे..मला त्या वेळी वाटलं की कोणी तरी माझी थट्टा करत आहे..म्हणून मी लक्ष नाही दिलं.." - समीर.

 

" बरं..आपण शोधून काढूच. " - दिग्या.

 

दिग्याच्या घराजवळ कार थांबली.. दिग्याने  समीरचा निरोप घेतला. समीर आता घराकडे निघाला. त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांनी चंग बांधला होता. तो पूर्णपणे त्याच्या विचारांमध्ये गुंतला होता.समोर एका वळणावर त्याची कार पोहोचली तसा टर्न घेण्यासाठी त्याने स्टिअरिंग फिरवायला सुरुवात केली. तोच त्याच्या गाडी समोर कोणीतरी आलं..बहुदा प्रकट झालं..पुढच्या क्षणात त्याने सारी ताकद एकवटून डाव्या हातानं झटक्यासरशी गाडीचा हँडब्रेक खेचला..

 

आणि...

 

पुढची काही सेकंद त्याचं कशावरच नियंत्रण राहिलं नाही..गाडी वेगात असल्यामुळे सरपटत थांबली.. तसं काही सेकंदांनी सारं काही शांत झालं.. आजूबाजूला काय आहे हे समजण्यासाठी त्याचा मेंदू असक्षम होता. स्टिअरिंग छातीवर बडवल्यानं छातीत भयंकर वेदना उमटल्या होत्या. बंद डोळे हळूहळू उघडू लागले तसं त्याला पहिलं दृश्य दिसलं ते पाहून त्याच्या काळजात धस्स झालं..

.

.

असं काय दिसलं असेल समीरला... ??

 

 

 

.....................................................................................................................................

 

क्रमशः