Prem he - 20 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 20

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

प्रेम हे..! - 20

............ Sunday म्हणून निहिरा आज जरा उशीराच उठली... जेमतेम आंघोळ करून ती पेपर वाचत बसली होती... इतक्यात तिचा फोन वाजला... स्क्रीन वरचं नाव बघून ती चकित झाली......
सोनिया...!!!????


निहिरा ला आश्चर्य वाटलं... एवढ्या महिन्यानंतर सोनिया चा फोन? 🤔... तिने कॉल रिसीव्ह केला...

"हाय निहिरा... कशी आहेस.....?".... सोनिया ने जरा चाचरतच विचारलं... त्या पार्टी नंतर तिने आज पहिल्यांदा निहिरा ला कॉल केला होता.. आणि त्यानंतर पहिल्यांदाच ती तिच्यासोबत बोलत होती...

"मी ठीक आहे... तू कशी आहेस.. आणि आज अचानक कॉल कसा केलास?"

"मी पण ठीक आहे.. अगं थोडं बोलायचं होतं... माझ्या घरी येतेस का आत्ता?? 😓" सोनिया ने विचारलं...

"काय झालं... म्हणजे... अचानक.... 🙁"

"ये तर... आल्यावर सांगते..."

"OK.. ठीक आहे.." निहिरा बोलली..

"OK.. भेटूया मग.. बाय.."

"हो.. चल बाय..."

आणि तिने फोन कट केला... निहिरा विचारात पडली... अचानक का बोलावलंय हिने.. काय बोलायचं असेल... 🙁 तिने लगेच अवनी ला कॉल केला आणि सोनिया सोबत झालेलं बोलणं सांगितलं... अवनीलाही आपल्या सोबत चलायला सांगितलं.. आणि ती तयार होण्यासाठी तिच्या रूम मध्ये गेली..

तिने चेंज केलं आणि आरशासमोर उभी राहिली.... आणि विचारांत हरवली .. काय कारण असेल की सोनिया ने असं अचानक बोलावलंय...😓 विहान ला तर भेटायचं नसेल ना मला?!!😮 विहान चं नाव ओठांवर येताच ती आनंदली... आणि पटापट आवरायला लागली...


🎵🎶
कैसे बिछडू़ँ कि वो मुझमे ही कहीं रहता है..
उससे जब बच के गुज़रता हूँ तो ये लगता है..
वो नज़र छुप के मुझे देख रही हो जैसे....
तेरी फ़रियाद मगर.. मुझमें दबी हो जैसे....

- - - - - - - XOX - - - - - - -

निहिरा आणि अवनी तयार होऊन निघाल्या.. निहिरा चं हृदय जोराने धडधडत होतं... आज तिला विहान ची ओढ लागली होती.... सोनिया मुळे का होईना दहा महिन्यानंतर तिने त्याच्या दिशेने पाऊल उचललं होतं...! आज तिच्याही नकळत तिच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता.... आपण एवढे दिवस विहान पासून स्वतःला दूर ठेवलं याचं तिला वाईट वाटत होतं... 😔 तिने स्कूटी चा वेग वाढवला... आणि काही क्षणांतच ती सोनिया च्या कॉलनी मध्ये येऊन पोहोचली...स्कूटी पार्क करून तिने एकदा विहान च्या घराच्या दिशेने बघितलं.. आणि तिला भरून आलं... अवनी ला तिची अवस्था कळली.. स्वतःला सावरत ती सोनिया च्या घराच्या दिशेने वळली... अवनी ही तिच्या मागोमाग गेली... सोनिया ने दरवाजा उघडून हसून त्यांच स्वागत केलं... निहिरा ला थोडं अवघडल्यासारखं वाटलं... ती याआधीही बर्‍याच वेळा सोनिया च्या घरी आली होती.. पण त्या प्रसंगानंतर ती पहिल्यांदाच तिच्या घरी येत होती... म्हणूनच तिला थोडं ऑकवर्ड वाटत होतं...

निहिरा ची नजर विहान ला शोधत होती.. पण तो समोर तरी तिला दिसला नाही... ती मग आत किचन मध्ये जाऊन सोनिया च्या मॉम ला भेटली...

"अरे निहिरा.. किती दिवसांनी आलीस इकडे.. 😃😃 आहेस तरी कुठे..." सोनिया च्या मॉम ने आपुलकीने विचारलं..

"actually आँटी जॉब मुळे नाही जमत कुठे जायला 😊" निहिरा ने उगीचच काहीतरी कारण दिलं..

"ह्म्म्म ते ही आहेच... सोनिया ला ही हल्ली ऑफिस जॉईन केल्यापासून जास्त वेळ नसतो.. चालायचंच... 😅 मग.. लग्नाचा विचार आहे की नाही यंदा? 😄😄" सोनिया च्या मॉम ने हसतच निहिरा आणि अवनी ला विचारलं..

दोघीही फक्त हसल्या...

"काय मॉम... तुझं तर काहीही...🙄" सोनिया काहीसं वैतागून बोलली... आणि ती दोघींना आपल्या रूम मध्ये घेऊन गेली...

सोनिया ची मॉम हसली आणि त्यांच्यासाठी कॉफी बनवायला घेतली...

निहिरा चं हृदय अजूनच जोरजोरात धडधडायला लागलं... त्या सोनिया च्या रूम मध्ये गेल्या... पण तिथेही विहान नव्हता...! निहिरा चा चेहरा पडला😒.. पण ती गप्प बसली...

"सोनिया... काय बोलायचंय तुला? बोल ना..." निहिरा ने न राहवून विचारलं

"थोssडा वेळ थांबा... आणखी कुणीतरी येतंय... मग आपण बोलू😊" सोनिया म्हणाली...

म्हणजे विहान आत्ता येणार आहे तर!! 😅 - निहिरा ची कळी खुलली..!!

"बसा तुम्ही मी कॉफी आणते तुमच्यासाठी... 😊" सोनिया बोलली.. तितक्यात बेल वाजली... सोनिया धावतच दरवाजा उघडायला गेली...

निहिरा ची बेचैनी वाढली होती.. 😓

हातातल्या ट्रे मध्ये कॉफी चे तीन मग घेऊन सोनिया तिच्या रूम मध्ये आली... सोनिया च्या सोबत आलेल्या व्यक्तीला बघून निहिरा आणि अवनी दोघीही गोंधळल्या.. दोघींनी एकमेकींकडे बघितलं... आणि काहीही न कळून सोनिया कडे बघितलं.. सोनिया हसली... अशा काय बघताय.. ह्याला ओळखता ना.... अंकित !!!

त्यांच्याच ग्रुप मधल्या अंकित ला सोनिया ने कॉल करुन बोलावले होते... अंकित ही निहिरा आणि अवनी ला तिथे बघून चक्रावला होता...! अंकित ला बसायला सांगून सोनिया ने आधी तिघांना कॉफी घ्यायला सांगितलं.. कॉफी पिऊन झाल्यावर ती मग किचन मध्ये ठेऊन आली.. ते तिघेही काही न कळल्यामुळे गप्पच बसले होते...

सोनिया ने बोलायला सुरुवात केली...

"सॉरी निहिरा.. मला तो विषय परत काढायला लागतोय त्यासाठी ..!"

निहिरा ने फक्त गोंधळून तिच्याकडे बघितलं..😓

"निहिरा चा प्रोजेक्ट का डिलीट केलास अंकित???? 😡" सोनिया च्या थेट प्रश्नाने अंकित चमकलाच!! निहिरा आणि अवनी ला ही आश्चर्य वाटलं तिच्या प्रश्नाचं...!

" अंकित मी तुला विचारतेय... "सोनिया ने परत विचारलं

अंकित ची चुळबुळ सुरू झाली.. तो उगीच इकडे तिकडे पाहू लागला... आणि परत मान खाली घालून बसला...

" तू सांगतोयस की मी सांगू... 😡" सोनिया ने परत एकदा त्याला धारेवर धरलं..

त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता..

सोनिया ने मोबाईल तिच्या रूम मधल्या टीव्ही ला कनेक्ट केला आणि तिने तो फोटो त्यांना दाखवला ज्यामध्ये नाचणार्‍या ग्रुप च्या मागे आतल्या रूम कडे जाणारा अंकित स्पष्ट दिसत होता... तो फोटो बघून अंकित उडालाच... हे फोटोज् फक्त निहिरा कडेच होते... पियुष जिथे बसून फोटोज् क्लिक करत होता तिथून आतल्या रूम चा दरवाजा बरोबर समोर दिसत होता... फोटो काढताना हे त्याच्याही लक्षात आलं नव्हतं... पण त्याचा उपयोग आज सोनिया ला झाला होता... तो फोटो बघून निहिरा च्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या...!

सोनिया ने आता तो व्हिडिओ प्ले केला... ज्यामध्ये अंकित आतल्या रूम मध्ये जाऊन आल्याचं दिसत होतं.. आणि तो बाहेर आल्यानंतर विहान आत गेल्याचं दिसत होतं...!! व्हिडिओ बघून निहिरा सुन्न झाली... तिने फक्त रागाने एक लूक अंकित ला दिला...

सोनिया ने अंकित ला विचारलं...
"आता तरी सांगणार आहेस का???"

तसा अंकित उठला आणि निहिरा च्या समोर हात जोडून उभा राहिला...
"निहिरा.. मला माफ कर... 😫 मी गुन्हेगार आहे तुझा... तुझा प्रोजेक्ट विहान ने नाही... मी डिलीट केला होता😭..." आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले...

निहिरा ने उठून त्याची कॉलर पकडली...
"का.... का केलंस तू असं?? तुला माहितीये तू काय केलयस?? माझा प्रोजेक्ट तर गेलाच पण तुझ्यामुळे मी विहान वर संशय घेतला.... 😡😠 चांगली मैत्री निभावलीस तू 😡😫" आणि तिने त्याला किंचित मागे ढकलून त्याची कॉलर सोडली.. आणि ती अवनी च्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली... 😭😭

सोनिया ने त्याला विचारलं..
" सांग का केलंस तू हे??😠"

त्याने बोलायला सुरुवात केली...
" फर्स्ट इयर ला असल्यापासून मी निहिरा वर प्रेम करत होतो... पण मी तिला विचारायच्या आधीच मला तिच्या आणि विहान च्या रिलेशन बद्दल समजलं😔... निहिरा ने विहान सोबत असलेलं मला बिलकुल आवडायचं नाही... 😓 मी काहीही करून एक ना एक दिवस विहान ला तिच्यापासून दूर करायचं ठरवलं... 😑 पण मला योग्य संधी मिळत नव्हती... अशातच एकदा मला समजलं की मेधा ला विहान आवडतो.. मग मी तिच्याशी गोड बोलून तिच्यासोबत हातमिळवणी केली... ती ही विहान ला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होती.. आम्ही संधीच्या शोधात होतो... अशातच 31st पार्टी चा प्लान झाला.. मी फार्म हाऊस वर पोहोचलो तेव्हा तुम्ही सर्व बाहेर गार्डन मध्ये थांबून गप्पा मारत होतात.. पण निहिरा आणि विहान तिथे दिसत नव्हते... म्हणून मी त्यांना बघायला आत गेलो.. हॉल मध्ये ही कुणीच नव्हतं... म्हणून मी आतल्या रूम कडे गेलो.. आणि बघितलं तर निहिरा विहान च्या मिठीत होती.. 😖 मला खूप संताप आला त्यांना असं बघून... इतक्यात माझ्या धक्क्याने दरवाजा हलला आणि त्याचा आवाज झाला... म्हणून मी पटकन तिथून निसटलो... " एवढं बोलून त्याने निहिरा कडे एक नजर टाकली... ती डोळ्यांत अंगार घेऊन त्याच्याकडे बघत होती.. त्याने आवंढा गिळला आणि पुढे बोलू लागला...

" संधी बघून मी मेधा ला आपला प्लॅन सांगितला.. तीही लगेच तयार झाली.. सर्वजण डान्स मध्ये गुंग होते... मी मुद्दामच मेधा ला निहिरा ला कोल्ड ड्रिंक्स आणायला पाठवायला सांगितलं... कोल्ड ड्रिंक्स चा बॉक्स मी आधीच तिला पटकन सापडणार नाही अशा जागी ठेऊन आलो होतो... निहिरा वर गेल्यावर मेधा ला विहान ला बोलण्यात गुंतवून ठेवायला सांगितलं होतं... तिने तिचं काम चोख बजावलं.. आणि त्या वेळेतच मी पटकन आत गेलो... निहिरा च्या प्रोजेक्ट बद्दल मला माहीत होतं त्यामुळे मी पटापट प्रोजेक्ट नेम सर्च मारून फाईल्स डिलीट केल्या... पण माझ्याकडून एक चूक झाली की मी फाईल्स फक्त डिलीट करायच्या ऐवजी घाईघाईत शिफ्ट डिलीट केल्या..कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता.. कारण कोणत्याही क्षणी विहान निहिरा ला शोधायला तिथे येईल हे मला माहीत होतं... त्यामुळे त्या फाईल्स रिसायकल बिन मध्ये न जाता पर्मनंटली डिलीट झाल्या.. 😩...आणि ते मलाही तेव्हा समजलं नाही.. जेव्हा बाहेर आल्यावर निहिरा विहान ला फाईल्स पर्मनंटली डिलीट केल्यावरून बोलली तेव्हा मला जाणीव झाली की मी काय केलंय.. पण मी काही बोललो नाही... मी दरवाज्याच्या एका बाजूने बाहेर आलो आणि काही सेकंदाच्या फरकाने विहान दुसर्‍या बाजूने आत गेला.... मी सुटकेचा निश्वास सोडला.. आणि अपेक्षेप्रमाणे नेमकं निहिरा ने विहान ला बाहेर पडताना बघितलं.. मला निहिरा चा प्रोजेक्ट डिलीट करायचा नव्हता मला फक्त विहान ला यात गुंतवायचं होतं... आणि निहिरा पासून त्याला दूर करायचं होतं...जरी माझ्या हातून चूक झाली होती तरी निहिरा आणि विहान चं ब्रेकअप झालं त्यामुळे मी आणि मेधा खुश होतो.. 😓 मी मध्ये एक महिना जाऊ दिला.. जेणेकरुन निहिरा ला सावरायला वेळ मिळेल.. आणि मग संधी बघून कॉलेज मध्ये तिला प्रपोज केलं.. पण तिने मला नकार दिला.. आणि ती विहान शिवाय इतर कोणाचाच विचार करू शकत नसल्याचं तिने सांगितलं... मला खूप वाईट वाटलं.. माझ्या मेहनतीवर शेवटी पाणी फेरलं होतं... पण निहिरा मला कधीच हो म्हणणार नाही हे माझ्या लक्षात आलं.. आणि मी तिच्यापासून दूर झालो... 😩😩" एवढं बोलून तो गप्प बसला..

तशी सोनिया त्याच्याजवळ आली आणि त्याच्या खाडकन् एक कानशिलात लगावली... 😡

" तू निहिरा चा प्रोजेक्ट डिलीट केलास त्याचं नक्कीच वाईट वाटतंय.. पण ही थप्पड त्यासाठी नव्हती... ही थप्पड तुझ्यामुळे विहान ने जे सहन केलंय त्यासाठी होती 😠"

खरं तर अंकित ला ही थप्पड अपेक्षितच होती.. पण सोनिया कडून नाही तर निहिरा कडून..! पण ती तर सुन्न बसून होती..
सोनिया तिला बोलली..." निहिरा.... तुला काहीच बोलायचं नाहीये का ह्याला... विश्वासघात केलाय ह्याने तुझा! "

निहिरा किंचित हसली.." मी काय बोलणार त्याला...मी दुसरं काय केलंय... विश्वासघात तर मीही केलाच ना विहान चा..😩 " तिला सर्व आठवून भरून आलं...

निहिरा ला असं बघून अंकित लाही वाईट वाटलं.. त्याला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला होता.. 😖 त्याने परत एकदा निहिरा ची माफी मागितली...

" याक्षणी मी तुला काहीच बोलत नाही अंकित... पण इथून पुढे तू माझा फ्रेंड नाहीस हे लक्षात ठेव.. 😑 जाऊ शकतोस तू.. " निहिरा च्या बोलण्याचं त्याला खूप वाईट वाटलं पण पुढे काही बोलून उपयोग नव्हता.. म्हणून तो निमुटपणे तिथून निघून गेला....

निहिरा थोडा वेळ तशीच शांत बसली... आणि मग अचानक सोनिया ला म्हणाली...

" पण मग ती मुलगी... ती मुलगी कोण आहे?? 😓"

" कोण मुलगी?? " सोनिया ने गोंधळून विचारलं..

"जिला मी विहान सोबत बघितलं.. पार्टी च्या दिवशी सकाळी...! 😑 खूप सुंदर होती... विहान ला अगदी चिकटून बसली होती... 😩"

सोनिया विचारात पडली... आणि काहीतरी आठवून तिने निहिरा ला तिचं वर्णन विचारलं... निहिरा ने सर्व जसंच्या तसं सांगितलं.. ते ऐकून सोनिया ने कपाळावर हात मारला...

" ती नक्कीच अभिरा असणार... विहान ची cousin sister! न्यू यॉर्क ला असते... दहा दिवसांसाठी विहान कडे आली होती.. Actually ती लहानाची मोठी तिकडेच झालीय.. त्यामुळे तिचं वागणं ही तिथल्या मुलींसारखंच आहे.. बोल्ड आणि बिनधास्त!! त्यात तिला भाऊ नाहिये आणि विहान ला बहीण.. त्यामुळे दोघांची bonding ही खूप छान आहे.. विहान तिच्या सोबत सर्व शेअर करतो.. तुझ्याबद्दल ही तिला सर्व माहीत आहे... तिला तुला भेटायचं होतं.. पण तुझी एक्झाम आणि प्रोजेक्ट स्टडी चालू होती त्यामुळे विहान ने तिला मना केलं.. आणि पुढच्या वेळी आल्यावर भेटवेन असं सांगितलं...एवढंच नाही तर ती आपल्या पार्टी च्या दिवशी जाणार होती रिटर्न.. आणि दर वेळी विहान तिला एअरपोर्ट वर घेऊन जातो पण यावेळी तो तिलाही नाही बोलला.. कारण त्याला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता.. 😑"

निहिरा साठी हा धक्काच होता...!
" पण मग तिच्या हातातलं ते ब्रेसलेट??? 😧"

" ते ही तिचंच होतं... इकडे आल्यावर विहान ने तिला ते ब्रेसलेट दाखवलं.. तिला ते खूपच आवडलं त्यामुळे मलाही असंच ब्रेसलेट हवंय म्हणून ती विहान च्या मागे लागली.. विहान ने तिला वेगळी डिझाईन सिलेक्ट करायला सांगितलं.. पण तिला सेम ब्रेसलेट पाहिजे होतं.. मग विहान चा नाईलाज झाला.. आणि त्याने तिला ब्रेसलेट घेऊन दिलं.... "

निहिरा च्या डोळ्यांत पाणी आलं...
" पण... विहान कधी बोलला नाही माझ्याजवळ तिच्याबद्दल.. 😓"

" महिन्यातून दोनदा बोलायचात तुम्ही.. तेवढ्या वेळात तो तुमच्या दोघांबद्दल बोलेल की ईतर कुणाबद्दल... तुझ्यासोबत बोलताना तो सर्व विसरायचा...अगदी मलाही... मग ती कुठून आठवणार... 🙁"

निहिरा ला आता विहान साठी खूप वाईट वाटायला लागलं..
अजून एक शंका होती तिच्या मनात.. तीही तिने सोनिया ला विचारली...
" आणि... विहान च्या हातावरचा टॅटू??? 😓 ते नाव कोणाचं आहे 😧"

सोनिया हलकेच हसली..." तू ह्या सर्व गोष्टींमुळे जास्त चिडलीस ना त्याच्यावर.... एकदा येऊन मला विचारलं असतंस ना तर सर्व क्लिअर केलं असतं... दोघांनाही एवढं सहन करायची गरज नसती लागली... 😐...थोडं रागाच्या पलीकडे जाऊन विचार केला असतास तर मला तुला काही क्लिअर करायची गरज नसती लागली.... 😑....सोड... मला सांग काय नाव बघितलंस तू विहान च्या हातावर??? "

"निवि..... " निहिरा मान खाली घालून म्हणाली..

" निहिरा... एवढं कसं कळलं नाही गं तुला.. 😓 नि फॉर निहिरा आणि वि फॉर विहान!! तुला त्याने प्रपोज केलं त्याच दिवशी त्याने तो टॅटू बनवून घेतला होता.... मी होते त्याच्यासोबत... मी त्याला म्हणालेही तिने अजून स्पष्ट होकार दिलेला नाही तरीही तू का तिच्या नावाचा टॅटू बनवून घेतोयस... तेव्हा तो म्हणाला... की तिची जागा इतर कुणीही घेऊ शकत नाही.... 😑"

" अरे हो... मी का नाही असा विचार केला... 😨" म्हणत ती मटकन बेडवर बसली..

" रागाच्या पलीकडे तुला काही सुचतं का निहिरा 😧🙁" अवनी बोलली..

"हो.. खरच चुकलं माझं... 😑 आई बरोबर बोलायची.. रागाला आवर नाहीतर पश्चात्ताप करायची वेळ येईल कधीतरी.... 😩 तेच झालं.... माझ्या रागामुळे विहान ला काय काय सहन करावं लागलं... 😫 बिचारा एका शब्दातही मला बोलला नाही... 😫😫... सोनिया मला आत्ताच्या आत्ता विहान ला भेटायचंय.... चल " आणि ती सोनिया चा हात धरून तिला ओढायला लागली...

" आत्ता???? "सोनिया म्हणाली..

" हो.. आत्ताच... "

" पण ते शक्य नाही.. 😒 "

" पण का???? 😧"

" विहान इथे नाहिये.... 😩"

" म्हणजे..... कुठे आहे तो??? 😨"

" बंगलोर.......! 😓"




To be continued...
🙏
#प्रीत